मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१- स्पर्धे करता नाही

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in मिपा कलादालन
26 Jun 2021 - 10:53 am

छायाचित्रण कला स्पर्धा दणाक्यात सुरु झाली आहे. मिपाकरांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

स्पर्धक एका गटात एकच छायाचित्र देउ शकत असल्याने त्यांच्या आवडत्या छायाचित्रांचा आस्वाद इतर मिपाकरांना घेता यावा म्हणून हा धागा सुरु करत आहोत.

या धाग्यावर प्रतिसादामधे मिपाकर आपली आवडती छायाचित्रे देउ शकतात. (कितीही)

धाग्याची सुरुवात प्रशांत आणि टर्मिनेटर यांच्या या तीन छायाचित्रांनी करत आहोत.

PRASHANT
प्रशांत

Terminator 1
गोव्यातील शापोरा किल्ल्यावरून दिसणारा समुद्र
-टर्मीनेटर

Judgement Day

देवबाग ते वालावल च्या रस्त्यावर चिपी विमानतळजवळील एका पुलावरून दिसणारे दृष्य
- टर्मीनेटर

प्रतिक्रिया

हंटरब्राव्हो's picture

9 Jul 2021 - 6:28 pm | हंटरब्राव्हो

शिव

टर्मीनेटर's picture

9 Jul 2021 - 6:40 pm | टर्मीनेटर

हा फोटो दिसला... सुंदर आहे.

हंटरब्राव्हो's picture

9 Jul 2021 - 9:35 pm | हंटरब्राव्हो

धन्यवाद !

हंटरब्राव्हो's picture

9 Jul 2021 - 9:36 pm | हंटरब्राव्हो

ab

हंटरब्राव्हो's picture

9 Jul 2021 - 9:39 pm | हंटरब्राव्हो

c

टर्मीनेटर's picture

9 Jul 2021 - 10:53 pm | टर्मीनेटर

छान...
वरचा आणि खालचा फोटो दिसत नाहीये.

हंटरब्राव्हो's picture

12 Jul 2021 - 12:31 pm | हंटरब्राव्हो

पुन्हा टाकतो.

राघव's picture

10 Jul 2021 - 9:45 pm | राघव

छान काढला आहे.
बाकीचेही बघावेसे वाटलेत, पण दिसत नाहीयेत. :-(

Bhakti's picture

11 Jul 2021 - 9:39 am | Bhakti

छान

हंटरब्राव्हो's picture

9 Jul 2021 - 9:44 pm | हंटरब्राव्हो

d

गुल्लू दादा's picture

9 Jul 2021 - 11:02 pm | गुल्लू दादा

200 वा प्रतिसाद आणि या धाग्यात दिसणारे एकूण 150 फोटो जमा झालेत. मस्त चाललंय.

सुमो's picture

10 Jul 2021 - 9:45 am | सुमो

ह्या धाग्यावरची सर्वच छायाचित्रे सुरेख आहेत अगदी.

फूड फोटोग्राफी जराशी मागं पडली आहे. मिपावरच्या बल्लव मंडळींकडून काही लाळगाळू फोटो यावेत.

टर्मीनेटर's picture

10 Jul 2021 - 5:33 pm | टर्मीनेटर

बिंब - प्रतिबिंब....

वालावलचे लक्ष्मी नारायण मंदिर ज्या तलावाच्या काठावर आहे त्या तलावात दिसणारे सूर्यबिंबाचे दुहेरी प्रतिबिंब.

प्रतिबिंब

त्या सुंदर तलावाचे आणखीन दोन फोटोज

तलाव

तलाव

प्रचेतस's picture

10 Jul 2021 - 5:55 pm | प्रचेतस

तिन्ही भारी आहेत,
दुसरा खूपच शांत, निवांत, मस्त.

गुल्लू दादा's picture

10 Jul 2021 - 6:38 pm | गुल्लू दादा

मस्त. तिसरा खूप आवडला.

श्रीरंग_जोशी's picture

12 Jul 2021 - 8:45 am | श्रीरंग_जोशी

साडेतीन वर्षांनी छायाचित्रणकला स्पर्धा या लोकप्रिय उपक्रमाचे पुनरुज्जीवन केल्याबद्दल साहित्य संपादकांचे लक्ष लक्ष आभार.
तसेच स्पर्धेसाठी अन या धाग्यावर स्पर्धेसाठी नसणारे एकाहून एक फोटोज प्रकाशित केल्याबद्दल मिपाकरांचे मन:पूर्वक आभार.

माझ्यासारख्या छायाचित्रणकलाप्रेमीसाठी ही तर पर्वणीच.

मी गेल्या काही महिन्यांत फुलांशी संबंधीत उद्द्याने व गावांना भेट दिली. तेव्हा काढलेले काही फोटोज.

आयोवा राज्यातल्या पेला या गावी हॉटेल रॉयल अ‍ॅमस्टरडॅमशेजारी हा फोटो काढला आहे.

तिथल्याच सेन्ट्रल पार्कमधल्या टुलिप्सचा फोटो.

मिनेसोटा लॅन्डस्केप आर्बोरेटममधील टुलिप्स

मिनियापोलिसच्या लेकवूड सेमेटरी येथील फोटो

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Jul 2021 - 8:48 am | ज्ञानोबाचे पैजार

नयनरम्य फोटो आहेत सगळे
सगळेच्या सगळे कॉपी करुन घेणार आहे आणि डेस्कटॉप थीम म्हणून वापरणार आहे.
पैजारबुवा,

टर्मीनेटर's picture

12 Jul 2021 - 11:41 am | टर्मीनेटर

सुरेख आहेत सगळे फोटोज...

गुल्लू दादा's picture

12 Jul 2021 - 12:40 pm | गुल्लू दादा

सर्व फोटो सुरेख आहेत श्रीरंग तुमचे. धन्यवाद.

टर्मीनेटर's picture

12 Jul 2021 - 12:18 pm | टर्मीनेटर

राजस्थानातील मेवाड प्रांतात अरवली पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटी पासून ३६०० फूट उंचीवर पंधराव्या शतकात बांधलेला कुंभलगड भारतातला चितोडगड नंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा किल्ला आहे.

चिनच्या भिंती नंतर जगातली दुसऱ्या क्रमांकाची मानली जाणाऱ्या ह्या किल्ल्याच्या ३६ किमी लांबीच्या तटबंदीच्या भिंतीचे २०१६ मधे टिपलेले काही फोटोज.

कुंभलगड

कुंभलगड

कुंभलगड

तुषार काळभोर's picture

12 Jul 2021 - 1:37 pm | तुषार काळभोर

३६ किमी लांब तटबंदी...
बाबौ!

भव्यतेच्या जोडीला असे आखीव रेखीव बांधकाम,
सलाम त्या कारागीरांच्या करागिरीला...
कुंभलगड

ज्योति अळवणी's picture

12 Jul 2021 - 2:26 pm | ज्योति अळवणी

फारच छान धागा, सगळे फोटो आवडले!!!

ज्योति अळवणी's picture

12 Jul 2021 - 2:44 pm | ज्योति अळवणी

माझीही थोडी भर
अतिशय प्रतिकूल हवामानात फुलवलेली सुंदर बाग -
दुबईचे मिरॅकल गार्डन.

mg

mg

mg

mg

mg

mg

mg

सौंदाळा's picture

12 Jul 2021 - 2:50 pm | सौंदाळा

अतीव सुंदर

टर्मीनेटर's picture

12 Jul 2021 - 2:58 pm | टर्मीनेटर

माईंड ब्लोईंग....
दुर्दैवाने आम्ही गेलो होतो तेव्हा काही कारणास्तव मिरॅकल गार्डन बंद होते त्यामुळे ही चमत्कारीक सुंदर बाग बघता नव्हती आली 😔

ज्योति अळवणी's picture

12 Jul 2021 - 2:55 pm | ज्योति अळवणी

शापोरा समुद्रकिनारा फारच सुंदर

मला वयक्तिक समुद्र खूप आवडतो

टर्मीनेटर's picture

12 Jul 2021 - 3:02 pm | टर्मीनेटर

शापोरा पेक्षा मला काबो डी रामा जास्त सुंदर वाटतो.

टर्मीनेटर's picture

13 Jul 2021 - 5:01 pm | टर्मीनेटर

राणकपूर जैन मंदिर - राजस्थान.

पंधराव्या शतकात बांधलेल्या ह्या संगमरवरी मंदिराला ८० कळस असून त्यात १४४४ नक्षीदार खांब आहेत. ह्या संगमरवरी खांबांचे वैशिष्ट्य असे की प्रत्येकावरचे कोरीवकाम वेगळे आहे, एकही खांब दुसऱ्या खंबासारखा नाही. गाभाऱ्यात आदीनाथांची चौमुखी मूर्ती असून सगळी कोरीवकामे फार प्रेक्षणीय आहेत.

ranakpur

कंजूस's picture

13 Jul 2021 - 5:23 pm | कंजूस

फलना स्टेशनपासून तीस किमी. छान आहे ही जागा. वानरं भरपूर. पण त्रास नाही देत.

गोरगावलेकर's picture

13 Jul 2021 - 10:14 pm | गोरगावलेकर

हंटरब्राव्हो, टर्मीनेटर, श्रीरंग_जोशी, ज्योति अळवणी या सर्वांचे फोटो आवडले.
@ज्योति अळवणी. अजून तरी परदेश वारी शक्य झालेली नाही. दुबई येथील मिरॅकल गार्डनच्या धर्तीवर बनवलेली नाशिक येथील बाग मात्र पाहण्याचा योग आला आहे. अर्थात मिरॅकल गार्डन कितीतरी पटीने भव्य आणि सुंदर दिसते आहे ती गोष्ट वेगळी.

सहमत, आणि थोडंफार असंच म्हटलंय मी. शारीरिक क्षमता/तंदुरुस्ती आणि अशा प्रवासाची मानसिक तयारी महत्वाची. हल्ली काही लोक सोशल मीडिया वरचे फोटोज आणि ब्लॉग्स वाचून हनिमून साठी किंवा लहान मुलाबाळांसोबत तिथे जायचा प्लॅन करतात आणि ट्रॅव्हल फोरमवर त्याबद्दल विचारणा करतात जे अव्यवहार्य आहे त्यासाठी वरचा आगंतुक सल्ला दिला होता.
ती जागा फोटोजेनिक आहे आणि "प्रत्यक्षाहूनही प्रतिमा सुंदर" म्हणतात त्याप्रमाणे ते ठिकाण फोटोत जितके सुंदर दिसते तेवढे प्रत्यक्ष डोळ्यांना सुंदर दिसत नाही असे माझे वैयक्तिक मत आहे.
अर्थात "Beauty is in the eye of the beholder." हेच खरे... प्रत्येकाची मते भिन्न असू शकतात 🙂

महाराणा प्रताप म्युझियम - हल्दीघाटी, राजस्थान.
१५७६ साली हल्दीघाटी येथे झालेल्या लढाईचे स्मारक म्हणुन बांधलेले हे भव्य संग्रहलंय आणि इथला लाईट & साउंड शो फारच प्रेक्षणीय आहे.
असेच एक भव्य आणि दर्जेदार स्मारक आपल्या शिवरायांचेही असावे असे मनोमन वाटते!

haldighati

चौथा कोनाडा's picture

17 Jul 2021 - 8:40 pm | चौथा कोनाडा

हंटरब्राव्हो,

भारी फोटो असं म्हणणार होतो पण फोटोच दिसत नाहीयत !
काय गंडलंय ? तपासून परत टाकाव्या लागतील !

कंजूस's picture

18 Jul 2021 - 5:22 am | कंजूस

हंटरब्राव्हो, टर्मीनेटर, श्रीरंग_जोशी, ज्योति अळवणी या सर्वांचे फोटो आवडले.
- सहमत.

वाह्ह... सगळ्यांनी किती मस्त फोटे काढले आहेत !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Dolbywalya Song Making Video | Jaundya Na Balasaheb | Ajay Atul | Girish Kulkarni

श्रीरंग_जोशी's picture

18 Jul 2021 - 8:26 am | श्रीरंग_जोशी

गेल्या शनिवारी डुलुथ मिनेसोटा येथील कॅनल पार्कशेजारच्या बीचवर हा फोटो काढला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jul 2021 - 9:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अतिशय सुंदर. काहींना लिंका व्यवस्थित नसल्यामुळे काही फोटो दिसले नाही. आता मला पण काही फोटो टाकणे आले. :)

-दिलीप बिरुटे

कॅनन, निकॉन आणि डी. एस्. एल्. आर्. छायाचित्रण
ही एस यांची लेख मालिका फोटोग्राफ्री प्रेमींसाठी वाचनिय मालिका आहे.

पेठकर काकांनी मला फोटो नेहमी मॅन्युअल सेटिंग मध्ये काढावेत हे सांगितले होते... त्याचा फार फायदा मला झाला तसेच या मोडच्या वापारामुळेच मी कॅमेर्‍यावर मला हवे असलेले नियंत्रण मिळवायला देखील शिकलो.
ज्यांना डीएसएलआर विकत घेण्याची इच्छा आहे त्यांनी सगळ्यात जास्त कॅमेराचा सेंन्सरला प्राधान्य द्यावे...
https://www.dxomark.com/Cameras/ इथे तुम्हाला त्याची मदत होइल.
याच बरोबर ३५ एमएम प्राइम लेन्स नक्की विकत घ्या, याने पोट्रेट्स जबरदस्त येतात तसेच bokeh चा इफेक्ट उत्तम साधता येतो.
या लेन्स ने काय किमया साधता येते त्याचा अनुभव इथे घेता येइल :- काहीही...
यातील शेवटच्या फोटोत मात्र ३५ एमएम वापतली नाही.
काही वेबसाईटस :-
https://www3.bostonglobe.com/news/bigpicture [ इथले नुसते फोटो पाहुनच आपण कसे फोटो कसे काढायला हवेत हे शिकता येइल. ]
https://digital-photography-school.com/ [ नावावरुनच तुम्हाला समजेल की इथे तुम्ही बरेच काही शिकाल. ]
याच बरोबर कॅमेराचा वापर करुन तांत्रिक प्रयोग करण्याचे प्रयोग देखील अवश्य करा. [ जितके प्रयोग कराला तितके तुम्हाला अजुन शिकता येइल. ]
उदा. पॅनिंग...
घोस्ट इफेक्ट ! (Ghost Effect)
मी केलेले प्रयोग :-
गॅस बर्नर...
रात्री घरी लाईट गेल्यावर मेणबत्तीवर कलेला प्रयोग :- मेणबत्ती...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Dolbywalya Song Making Video | Jaundya Na Balasaheb | Ajay Atul | Girish Kulkarni

श्रीरंग_जोशी's picture

20 Jul 2021 - 9:41 am | श्रीरंग_जोशी

हिवाळ्यात अंगणातले एक दृश्य

गोठलेल्या तळ्यावरचा पतंग महोत्सव

फॉल सीझनमधले एक दृश्य

पहिला फोटो चकवा देणारा भासतोय
Macro or micro image सारखं.

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Jul 2021 - 11:16 am | ज्ञानोबाचे पैजार

मस्त आहे हा फोटो

पैजारबुवा,

सुक्या's picture

20 Jul 2021 - 11:55 am | सुक्या

मस्त . .
पानगळीचे फोटो मला खुप आवडतात . . . सुंदर ..

गुल्लू दादा's picture

20 Jul 2021 - 1:04 pm | गुल्लू दादा

सगळे फोटो आवडलेत.धन्यवाद.

चौथा कोनाडा's picture

21 Jul 2021 - 11:52 am | चौथा कोनाडा

वा, वा श्रीजो, सुंदर कलरफुल फोटोज !

चंद्रसूर्यकुमार's picture

20 Jul 2021 - 10:49 am | चंद्रसूर्यकुमार

मी काढलेले काही समुद्रकिनार्‍यांचे फोटो--

१. गणपतीपुळे
Ganapatipule

२. थोड्या वेळाने सूर्य मावळतीला लागल्यावर तोच गणपतीपुळ्याचा समुद्रकिनारा असा दिसायला लागला
Ganapatipule

Ganapatipule

३. गोव्यातील बाणावलीचा समुद्रकिनारा असा सुंदर आहे
Benaulim

४. हा गोव्यातील कॅवेलोसिमचा समुद्रकिनारा
Cavelossim

उचकापाचक करतात अजुन एक सापडला ..
.

गुल्लू दादा's picture

20 Jul 2021 - 1:06 pm | गुल्लू दादा

जबरदस्त.

चौथा कोनाडा's picture

21 Jul 2021 - 11:58 am | चौथा कोनाडा

+१
केशरी रंगांन ओलं केलं सुक्या !
💖

सर्वानी दिलेले फोटो अतिशय छान.
या धाग्यात आलेले फोटो स्पर्धेच्या फोटोंपेक्षा जास्त आवडले .
स्पर्धेकरिता का नसतील आले असे सुंदर सुंदर फोटो?
म्हणजे स्पर्धेकरिता आलेले फोटो सुंदर नाहीत असे म्हयायचे नाही. तांत्रिकदृष्ट्या मला काही कळत नाही. पण पाहताक्षणी डोळ्यांना सुखावून जाते ते सुंदर