छायाचित्रण कला स्पर्धा दणाक्यात सुरु झाली आहे. मिपाकरांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
स्पर्धक एका गटात एकच छायाचित्र देउ शकत असल्याने त्यांच्या आवडत्या छायाचित्रांचा आस्वाद इतर मिपाकरांना घेता यावा म्हणून हा धागा सुरु करत आहोत.
या धाग्यावर प्रतिसादामधे मिपाकर आपली आवडती छायाचित्रे देउ शकतात. (कितीही)
धाग्याची सुरुवात प्रशांत आणि टर्मिनेटर यांच्या या तीन छायाचित्रांनी करत आहोत.
प्रशांत
गोव्यातील शापोरा किल्ल्यावरून दिसणारा समुद्र
-टर्मीनेटर
देवबाग ते वालावल च्या रस्त्यावर चिपी विमानतळजवळील एका पुलावरून दिसणारे दृष्य
- टर्मीनेटर
प्रतिक्रिया
6 Jul 2021 - 12:10 pm | चौथा कोनाडा
भारी धागा आहे !!!!
वेगवेगळ्या विषयांवरचे फोटो खासच आहेत ! बहुतेक सर्व आवडले !
स्पर्धेपेक्षा इथंच भारी मजा येणार की काय ?
6 Jul 2021 - 1:17 pm | टर्मीनेटर
वाह! सर्वच नवीन छायाचित्रे मस्त 👍
6 Jul 2021 - 1:38 pm | टर्मीनेटर
देवबाग बिचवर जाण्यासाठी मुख्य रस्ता सोडून आडवळणाच्या लाल मातीच्या रस्त्याने जाताना लागलेली दोन माडांची नैसर्गिक कमान. डावीकडच्या सारखा लुकडा सुकडा माड यापूर्वी कधी माझ्या पाहण्यात आला नव्हता.
खाली देवबाग खाडी आणि समुद्रकिनाऱ्याचे काही फोटोज....
6 Jul 2021 - 2:12 pm | सौंदाळा
मस्तच
दुसर्या फोटोतील लाकडाचा ओंडका पटकन बघताना मगरच वाटली.
6 Jul 2021 - 4:27 pm | टर्मीनेटर
हो... लांबून बघितलं होतं तेव्हा मलाही आधी ती मगरच वाटली होती 😀
6 Jul 2021 - 3:03 pm | कंजूस
आजोबा शेतात जातानाच एखाद्या आत्मचरित्राच मुखपृष्ठ वाटावं इतकं जिवंत आहे.
6 Jul 2021 - 5:38 pm | टर्मीनेटर
@ प्रचेतस - भुलेश्वरच्या पठारावरचा 'एकला चालोरे' सायकलस्वार मस्त 👍 बाकीचेही फोटो आवडले.
-----
@ गोरगावलेकर - (चार असूनही 😀 ) शिस्तबद्धपणे एका रेषेत सायकल चालवत जाणाऱ्या मुलींचा फोटो झकास!
प्रचेतस आणि तुमच्या दोन्ही फोटोत टिपलेल्या सारखे candid moments बघायला मला फार आवडतात.
लोणावळ्याचे आणि उंटणीचा फोटोही छान 👍
मला उंटणीच्या दुधाची चहा, कॉफी अजिबात नाही आवडत पण कुल्फी मात्र झकास लागते.
-----
@ ज्ञानोबाचे पैजार - पैजार बुवा, थाळीचा फोटो पाहूनच पोट भरले... 😀
-----
@ कॉमी - सर्वच फोटो मस्त आहेत, 'पाऊस आणि फुलं' विशेष आवडले 👍
-----
@Bhakti - चंद्र आणि किरळ दोन्ही सुंदर 👍
-----
@ तुषार काळभोर - सर्वच फोटो छान. मुरुड-दापोली आणि कानिफनाथ डोंगराचे विशेष आवडले 👍
-----
@ जयराज - फोटो दिसत नाहीये!
-----
@ सर्वसाक्षी - वेड्या राघुचे सर्वच फोटो सुंदर आहेत 👍 सवल्यांचा दिसत नाहीये!
-----
@ सुक्या - सर्वच फोटो मस्त 👍
-----
@ गुल्लू दादा - मस्त आहेत फोटोज 👍 वारूळाचा विशेष आवडला!
-----
@ चांदणे संदीप - सर्व फोटोज छान 👍 रानफुलांचा एक नंबर!
-----
@ बेंगुताई - सर्व फोटोज छान 👍 आजोबांचा खासच!
-----
@ हॅरी पॉटर - सर्व फोटोज छान 👍 कमळ फार आवडले!
-----
@ कंजूस - कंजूस काका बदामी गुहेतली शाळेची सहल आवडली 👍
6 Jul 2021 - 6:11 pm | गोरगावलेकर
एकाच प्रतिसादात बहुतेक सर्व फोटोंचा घेतलेला आढावा आवडला.
आपलेही जयगड फेरी बोट व देवबाग किनाऱ्याचे फोटो आवडले हे वेगळे सांगायला नकोच.
माझ्या वेळणेश्वर लेखाच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे आपण इतक्या लवकर या परिसरात भटकंती करून आलातही. टाळकेश्वर दीपगृह पहिले का?
6 Jul 2021 - 6:44 pm | टर्मीनेटर
तुमच्या लेखाला दिलेल्या प्रतिसादात म्हंटल्या प्रमाणे लॉक डाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यावर जानेवारी - फेब्रुवारी मधे चांगली २० दिवसांची तळकोकण - गोवा रोड ट्रिप करुन आलो 😀
संध्याकाळ झाल्याने तिथे नाही गेलो...पण पुढच्या कोकण भेटीत नक्की बघणार ते!
6 Jul 2021 - 6:31 pm | टर्मीनेटर
वरती अनेक मिपाकरांनी दिलेले सुंदर सुंदर फुलांचे फोटो पाहून मलाही (गुलाब sodun) काही फुलांचे व निवडुंगांचे फोटोज देण्याचा मोह आवरता येत नाहीये... 🙂
स्थळ : रोज गार्डन, मुन्नार - केरळ.
6 Jul 2021 - 7:05 pm | गुल्लू दादा
तुम्ही वर एकाच प्रतिसादात जो धावता आढावा घेतला आहे तो आवडला. तुमचे सर्व फोटो खूप छान आहेत. विशेषतः क्र. 1,5,9,12.(नावे माहीत नसल्याने क्र.) रोज गार्डन केरळच्या लिस्ट मध्ये अँडवले आहे. धन्यवाद.
6 Jul 2021 - 7:35 pm | टर्मीनेटर
गंमत म्हणजे झेंडू आणि निवडुंग वगळता बाकीच्या फुलांची नावे मलाही आठवत नाहीयेत...
त्यामुळे नावे देण्याचे टाळून माझे विस्मरण (अज्ञान) झाकण्याचा प्रयत्न केला आहे 😀
6 Jul 2021 - 9:44 pm | सुक्या
लाल पिवळे फुल म्हणजे बहुतेक "कॅलिफोर्णिया पोपी सीड" (मराठी नाव माहीत नाही) आहे.
साखळी च्या कुंडीत असलेली फुले "पिटुनिया" आहेत.
6 Jul 2021 - 9:54 pm | टर्मीनेटर
तुम्ही दिलेल्या पूरक माहितीसाठी धन्यवाद.
वास्तविक तिथे सगळ्या फुलांच्या नावांच्या पाट्या लावल्या होत्या, पण आता त्यांची नावे विसरलो 😔
7 Jul 2021 - 7:53 pm | चौथा कोनाडा
म्हणुन पाट्यांचेही फोटो काढायचे असतात !
अर्थात एका ट्रिप मधील काही ठिकाणांची नावे विसरल्यामुळे आम्हाला हा साक्षात्कार झाला.
आता पाट्याबिट्यांचे जमेल तेव्हढे फोटो काढतो ! :-)
बा़की, सर्व फोटो सुंदरच ! रंगांची उधळण बघून डोळे फुलावले ! +१ !
6 Jul 2021 - 11:14 pm | बेंगुताई
गुलाब
'रोज' के मेहमान.
बटन गुलाब
निवडुंग
जखमी पिल्लू..ठीक झाल्यानंतर आपोआप उडून गेलं सोबत आमची माया घेऊन.
ब्रम्हकमळ
सदाफुली
तगर/ स्वस्तिकच बोन्साय
हजारी मोगरा
जरबेरा
गुलबकावली (गुलबक्षी)
स्वस्तिकच्या झाडावर नेहमी सापडणारी अळी
वारी हनुमान
7 Jul 2021 - 9:07 am | गोरगावलेकर
हे ठिकाण माहित नव्हते. थोडा शोध घेतला असता चक्क मिपा मालकांचा हा लेख सापडला.
वारी हनुमान आणि रोडग्यांचा भंडारा.
7 Jul 2021 - 9:55 am | गुल्लू दादा
बेंगुताई तुमचे सर्व फोटो एक से बढकर एक आहेत. क्या बात आंदो और...!
8 Jul 2021 - 5:57 pm | राघव
छान फोटोज! पिलू फारच गोड दिसतंय!
त्या ब्रह्मकमळानं मात्र साईड पोज दिलीये! त्याचा चेहरा कसा दिसत असेल? ;-)
6 Sep 2021 - 3:48 pm | इरसाल कार्टं
सगळेच फोटो भारी आलेत
6 Jul 2021 - 11:42 pm | टर्मीनेटर
मस्त...
तगरीचे बोन्साय बघून ही कला शिकण्याची इच्छा आज परत उफाळून आली!
7 Jul 2021 - 9:28 am | प्रचेतस
टर्मीनेटर आणि बेंगुताईनी काढलेले फोटो जबरदस्त आहेत.
7 Jul 2021 - 10:29 am | Bhakti
सर्वांची काय सुंदर प्रसन्न फुलं फुलली आहेत.गुलाबाची फुलं एकसे बढकर एक..मी क्लिकवलेला एक ऊनसावलीतला आवडता गुलाब.
7 Jul 2021 - 11:32 am | टर्मीनेटर
काबो-डी-रामा किल्ला - दक्षिण गोवा.
किल्ल्याचे आता फक्त आवशेष उरले आहेत पण त्याची बऱ्यापैकी शाबूत असलेली तटबंदी, खंदक, तोफा आणि त्यावरून होणारे समुद्राचे दर्शन खूपच प्रेक्षणीय आहे...
7 Jul 2021 - 12:13 pm | गुल्लू दादा
नं. 4 चा विशेष आवडला. सुंदर किनारा दिसतो त्यात. बाकीचे पण छानच. धन्यवाद.
7 Jul 2021 - 12:44 pm | टर्मीनेटर
होय, माझाही तो सगळ्यात आवडता समुद्र किनाऱ्याचा फोटो आहे. 👍
हा फोटो जेव्हा मी व्हॉट्सअँप वर DP म्हणुन ठेवला होता तेव्हा परदेशी मित्रमंडळीच नाही, तर भारतीय मित्रमंडळींना सुद्धा हे दृष्य भारतातील आहे ह्यावर विश्वास ठेवणे जड जात होते 😀
7 Jul 2021 - 3:38 pm | प्रचेतस
जबरी.
काबो दि रामा पाहिला असल्याने सगळी दृश्ये डोळ्यासमोर आली. समुद्रकिनारा अत्यंत स्वच्छ, नितळ आहे, मात्र तिथल्या पाण्यात पोहणे फारच धोकादायक आहे.
7 Jul 2021 - 6:35 pm | टर्मीनेटर
खरंय... पोहण्यासाठी फारच धोकादायक आहे हा बीच!
किहीम बीच प्रमाणेच इथेही धारदार दगडांमुळे तळपाय कापण्याचा धोका आहेच आणि खडकांमधे तयार झालेल्या घळींमध्ये अडकून बुडण्याची शक्यताही मोठी आहे!
तसेच इथून दोन किमी वर असलेला कानाकोना / काणाकोणा बीचही नितांत सुंदर असला तरी पोहण्यासाठी तसा सुरक्षित नाहीये
कानाकोना बीच.
7 Jul 2021 - 6:58 pm | गुल्लू दादा
हा सुद्धा सुंदर फोटो आहे. धन्यवाद.
7 Jul 2021 - 3:10 pm | कंजूस
फोटोंचा दणका दिला आहे.
केरळचा मुन्नार टेक्कडी भाग पाहायचा राहिला आहे. इतर पाहिला. Backwaters बोटीत फिरणे राहाणे आमच्या कामाचे नाही.
-----------------
@टर्मिनेटर आणि @गोरगावलेकर
कोकण, गोवा किनार्याचे विडिओ काढत चला एक दीड मिनिटांचे आणि युट्युबवर टाका.
7 Jul 2021 - 6:25 pm | गोरगावलेकर
पुढच्या सहलीत व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न राहील.
(फोटो काढणे, साठवणे व वेळेवर उपलबद्ध करून देणे या गोष्टी नवऱ्याच्या मदतीशिवाय शक्य नाहीत)
7 Jul 2021 - 8:30 pm | कंजूस
विडिओ लेंथ सेट करता येते ती एक/ दीड मिनिट करायची. विडिओ रेझलुशन 720 p. किंवा 480 p. मोबाईलचा क्याम्रा हाई रेझलूशन विडिओ करू शकला तरी पाठवण्यासाठी, युट्युबसाठी साधेच बरे.
मोबाईल आडवा धरूनच विडीओ काढायचे धडाधडा। नंतर हवे तेच अपलोड करता येतात. काटाछाटी फार करावी लागत नाही. पोर्ट्रेट मोडचे आडव्या स्क्रीनवर बरे दिसत नाही त.
8 Jul 2021 - 11:41 am | टर्मीनेटर
कंकाका काही ३६०° व्हिडिओ काढले आहेत अजून युट्युब वर अपलोड केले नाहीयेत.
त्या बोटीत राहणे मलाही अजिबात आवडत नाही, बॅकवॉटर्ससाठी डे टूर घ्यायची, खूप मजा येते.
त्यात अशी बोट (खरोखरची) चालवायला मिळाली तर धमालच....
8 Jul 2021 - 2:12 pm | ज्ञानोबाचे पैजार
पैजारबुवा,
8 Jul 2021 - 4:40 pm | टर्मीनेटर
🙂
7 Jul 2021 - 5:55 pm | सर्वसाक्षी
आधिचा फोटो दिसत नसल्याने पुन्हा देत आहे
7 Jul 2021 - 6:16 pm | गोरगावलेकर
आवडला
7 Jul 2021 - 8:48 pm | तुषार काळभोर
अतिशय सुंदर.
8 Jul 2021 - 12:05 pm | टर्मीनेटर
मस्तच...
👍
7 Jul 2021 - 6:34 pm | राघव
वेगवेगळ्या वेळेस हे सर्व फोटोज काढलेले आहेत.
१. हरीहरेश्वरला जातांना व तिथे गेल्यावर काढलेले काही फोटोजः
कर्दे किनारा:
कर्दे किनार्याजवळचा आणिक एक किनारा:
ऑफिस मधील आवारातला बहावा आणि इतरः
7 Jul 2021 - 6:44 pm | टर्मीनेटर
रंगांची उधळण बघून 'दिल गार्डन गार्डन हो गया'...
मस्त आहेत सगळे फोटोज 👍
7 Jul 2021 - 7:52 pm | तुषार काळभोर
ती सोन्याने डवरलेली झाडे कोणती आहेत?
7 Jul 2021 - 8:22 pm | राघव
बहावा.. पाहत रहावा! :-)
7 Jul 2021 - 8:47 pm | तुषार काळभोर
:)
8 Jul 2021 - 12:19 pm | टर्मीनेटर
मी तीनवर्षांपूर्वी एक बहावा लावला आहे फार्मवर, अजून झाड लहान आहे (जेमतेम ३ फुटांच)) पण ह्यावर्षी एप्रिल महिन्यात त्याला एक फुलांचा झुबका लागला होता... 😍
फोटो सापडत नाहीये त्याचा, बहुतेक बॅकअप न घेता डिलीट करण्याचा मूर्खपणा केलाय.
8 Jul 2021 - 6:00 pm | राघव
फार अप्रतीम दिसते ती माळ! झुंबरं लगडलेली वाटतात अगदी.
त्याचं हिंदी नावही अप्रतीम आहे - अमलताश!
7 Jul 2021 - 8:32 pm | कंजूस
किनारा सुंदर.
सावल्या मस्त.
8 Jul 2021 - 5:42 pm | राघव
धन्स कंकाका. :-)
7 Jul 2021 - 9:48 pm | सुक्या
सुंदर ...
पुन्हा पुन्हा येउन .. परत परत बघावा असा हा धागा झाला आहे.
सर्व फोटो अप्रतीम आहेत ...
7 Jul 2021 - 11:17 pm | सर्वसाक्षी