मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१- स्पर्धे करता नाही

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in मिपा कलादालन
26 Jun 2021 - 10:53 am

छायाचित्रण कला स्पर्धा दणाक्यात सुरु झाली आहे. मिपाकरांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

स्पर्धक एका गटात एकच छायाचित्र देउ शकत असल्याने त्यांच्या आवडत्या छायाचित्रांचा आस्वाद इतर मिपाकरांना घेता यावा म्हणून हा धागा सुरु करत आहोत.

या धाग्यावर प्रतिसादामधे मिपाकर आपली आवडती छायाचित्रे देउ शकतात. (कितीही)

धाग्याची सुरुवात प्रशांत आणि टर्मिनेटर यांच्या या तीन छायाचित्रांनी करत आहोत.

PRASHANT
प्रशांत

Terminator 1
गोव्यातील शापोरा किल्ल्यावरून दिसणारा समुद्र
-टर्मीनेटर

Judgement Day

देवबाग ते वालावल च्या रस्त्यावर चिपी विमानतळजवळील एका पुलावरून दिसणारे दृष्य
- टर्मीनेटर

प्रतिक्रिया

हो.
कारण मुक्त विषय. आपला फोटो कोणत्या विभागात टाकायचा या संभ्रमामुळे येत नाहीत.
आपले घरातले फोटो हे एक आठवण म्हणून काढतो. दहा/ वीस वर्षांपूर्वी अमुक कसे दिसत होते. लहान मुले मोठी झाल्यावर त्यांना खूप आवडतात.

हैदराबाद मधील माझ्या सोसायटीतील हे सुंदर फूल (फूलझाडाचं नाव माहिती नाही)

Flower

श्रीरंग_जोशी's picture

26 Jul 2021 - 8:05 am | श्रीरंग_जोशी

मी या धाग्यावर अगोदर प्रकाशित केलेल्या फोटोजवरच्या प्रतिक्रियांसाठी आपणा सर्वांना धन्यवाद.
अमेरिकेतल्या काही देवळांचे मी काढलेले फोटोज:

देमॉइन आयोवा येथील देऊळ

शिकागो येथील स्वामीनारायण मंदीर

शिकागो येथील श्री वेंकटेश्वरा मंदीर

ओरलँडो, फ्लोरिडा येथील देऊळ

मिनेसोटातले कम्बोडियन मंदीर

सुमो's picture

26 Jul 2021 - 11:37 am | सुमो

फेसबुक वरुन इथे दिलेले फोटो काही दिवसातच दिसेनासे होतात. शक्य असल्यास इतर फोटो होस्टिंग साईट वरून फोटो द्यावेत.

या धाग्याच्या पाचव्या पानावर तुम्ही आणि चंद्रसूर्यकुमारांनी दिलेले फोटो गायब झालेत.

कंजूस's picture

26 Jul 2021 - 1:08 pm | कंजूस

फेसबुक यासाठी उपयोगाचे नाही.

श्रीरंग_जोशी's picture

26 Jul 2021 - 7:27 pm | श्रीरंग_जोशी

सुमो साहेब - या माहितीसाठी मनःपूर्वक धन्यवाद. फेसबुकद्वारे फोटो मिपावर करण्याबाबतच्या समस्येविषयी प्रथमच कळले. माझे फ्लिकरवर पेड सबस्क्रीप्शन असल्याने यापुढे त्याचाच वापर करीन.

सुमो's picture

28 Jul 2021 - 11:12 am | सुमो

फक्त सुमो म्हणा प्लीज. 🙏

फेसबुक फोटो लिंक डेट स्टँप्ड असते. त्यामुळे दिसेनाशी होते काही काळानंतर.

तुमचे दोन तीन फोटोज आवडले म्हणून सेव्ह करून घेतले होते. ते इथे देतोय.

१.

२.

३.

👍

मिपावर मी बर्‍याचवेळी रोमात असतो म्हणून तेव्हा प्रतिसाद द्यायचा राहून गेला होता.

पूर्वी ( फ्री अकाउंटला) हाई रेझलूशनचे फोटो चढवता येत. म्हणजे याचसाठी वापरले जायचे. पण दोन वर्षांपूर्वी smugmug ने घेतल्यापासून फ्री स्टोरेज १००० फोटो केलंय. आणि शेअरिंगचा फोटो लहानच ( १००-१५० केबीचा )जातोय असं वाटतं.

आणि याहूमेल वेगळं होऊन ते Verizon ने घेतलं.

श्रीरंग_जोशी's picture

28 Jul 2021 - 11:13 pm | श्रीरंग_जोशी

तुमची माहिती बरोबर आहे. फ्लिकरने अनलिमिटेड स्टोरेज दिला आहे. वर्षाला $५० घेतात. गेल्यावर्षी एकदम तीन वर्षांचे शुल्क भरल्यास १० टक्के सुट अशी ऑफर होती. गेल्या अडीच वर्षांपासून माझे फ्लिकर अकाउंट पेड आहे.

तुषार काळभोर's picture

26 Jul 2021 - 4:04 pm | तुषार काळभोर

प्रत्येक फोटोत फ्रेमिंग आणि प्रकाश अतिशय छान आहे.
प्रत्येक फोटो अतिशय देखणा आहे.

अवांतर शंका: हवा इतकी स्वच्छ दिसत आहे की अगदी फोटोत ते जाणवतंय.
हवेतील तरंगणारे कण भारतापेक्षा बऱ्याच कमी प्रमाणात असल्याने असे असावे का?

श्रीरंग_जोशी's picture

26 Jul 2021 - 7:29 pm | श्रीरंग_जोशी

धन्यवाद तुषार.

>> हवेतील तरंगणारे कण भारतापेक्षा बऱ्याच कमी प्रमाणात असल्याने असे असावे का?
कदाचित हो. मला नेमके कारण ठाऊक नाही. पण अमेरिकेत मोठ्या प्रमाणात धूळ उडू नये यासाठी प्रयत्न केले जातात असे निरिक्षण आहे.

तुषार काळभोर's picture

28 Jul 2021 - 9:52 pm | तुषार काळभोर

He सगळे फोटो कोणत्या कॅमेऱ्याने काढले आहेत?

श्रीरंग_जोशी's picture

28 Jul 2021 - 10:38 pm | श्रीरंग_जोशी

शिकागोच्या एसव्ही मंदीराचा सोनी इरिक्सन च९०५ या फोननी काढला होता. बाकी बहुतेक देवळांचे सोनी नेक्स ५ एन या मिररलेस कॅमेर्‍याने काढले आहेत. फॉल सीझनचे व फुलांच्या उद्यानाचे फोटोज व वरचा बीचचा फोटो आयफोन एस इ (२०२०) ने काढले आहेत.

कंजूस's picture

26 Jul 2021 - 1:10 pm | कंजूस

सोपे आहे आणि लिंक लहान असते.

प्रचेतस's picture

28 Jul 2021 - 3:48 pm | प्रचेतस

मागच्या रविवारीच राजगुरुनगरच्या पश्चिम भागात फिरायला जाणे झाले.

तिथे काढलेली काही छायाचित्रे

a

a

a

a

a

पावसाळ्यात सह्याद्रीची हीच खासियत असते. कुठेही जा, एकदम हिरवेगार गालिचे असतात सर्वत्र.
(हे राजगुरूनगरच्या पश्चिमेस म्हणचे चास धरणाच्या आजूबाजूला का?)

हो, चासच्या पुढे, मंदोशीच्या थोडं अलीकडे.

कंजूस's picture

28 Jul 2021 - 8:29 pm | कंजूस

थंडरबोल्ट नाही थंडरबोल्ड कठंय

प्रचेतस's picture

29 Jul 2021 - 9:52 am | प्रचेतस

तिथे नव्हती नेली.

ती इथे आहे. :)

a

a

चौथा कोनाडा's picture

28 Jul 2021 - 10:06 pm | चौथा कोनाडा

व्वा, हिरवा कंच सुंदर निसर्ग !
झकास फोटो !

श्रीरंग_जोशी's picture

28 Jul 2021 - 11:14 pm | श्रीरंग_जोशी

हिरवेगार अन नयनरम्य फोटोज पाहून पुण्याभोवतीच्या किल्ल्यांवर पूर्वी केलेल्या भटकंतीच्या आठवणी जाग्या झाल्या.

चौकस२१२'s picture

29 Jul 2021 - 4:38 am | चौकस२१२

एवढा पाऊस होऊन सुद्धा उन्हाळ्यपर्यंत रखरखाट असतो.. झाडे लावलीच जात नाहीत सरकारी जमिनीवर? काय प्रश्न आहे कोण जाणे इतकी दशके ,,,नाही शतके झाली!

सुमो's picture

29 Jul 2021 - 10:59 am | सुमो

चौथा फोटो विशेष आवडला.

कंजूस's picture

28 Jul 2021 - 8:30 pm | कंजूस

थंडरबर्ड*

श्रीरंग_जोशी's picture

29 Jul 2021 - 7:55 am | श्रीरंग_जोशी

काही वर्षांपूर्वी एका तळ्यानिनारी टिपलेले हे सुर्यास्तानंतरचे दृश्य.

बाकी या धाग्यावरच्या प्रतिसादांमधले उत्तमोत्तम फोटोज पाहून व चर्चा वाचून माझ्या तीन वर्षांपूर्वीच्या धाग्याचे स्मरण झाले - छायाचित्रण कलेचा आस्वाद.

प्रचेतस's picture

29 Jul 2021 - 9:52 am | प्रचेतस

खूपच सुरेख फोटो आहे हा.

चौथा कोनाडा's picture

29 Jul 2021 - 5:47 pm | चौथा कोनाडा

व्वा, श्रीरंग_जोशी, सुंदरच !

श्रीरंग_जोशी's picture

29 Jul 2021 - 7:26 pm | श्रीरंग_जोशी

धन्यवाद प्रचेतस व चौथा कोनाडा साहेब.

या फोटोला आम्ही राहतो त्या गावच्या सिटी अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या वेबसाइटवर स्थान मिळाले आहे.

चौथा कोनाडा's picture

27 Aug 2021 - 12:55 pm | चौथा कोनाडा

व्वा, श्रीरंग !

हार्दिक अभिनंदन !
🏆

कंस's picture

26 Aug 2021 - 9:42 pm | कंस

सुंदर फोटो

श्रीरंग_जोशी's picture

29 Jul 2021 - 8:01 am | श्रीरंग_जोशी

खालील दुव्यावर यंदाच्या आयफोन फोटोग्राफी अवॉर्ड्सचे विजेते फोटोज पाहता येतील.

2021 iPhone Photography Awards: Take a look at these stunning winning photos

श्रीरंग_जोशी's picture

2 Aug 2021 - 9:48 am | श्रीरंग_जोशी

रेड फॉक्स


हरिण

हरिणी व तिची दोन पाडसं यांचा व्हिडिओ

मध्यंतरी एक coyote पण दिसला होता. गवताआड झ्टकन जागा बदलत असल्याने त्याचा फोटो काढू शकलो नाही.

प्रचेतस's picture

2 Aug 2021 - 12:13 pm | प्रचेतस

समृद्ध परिसर आहे तुमचा.

हे कोल्हे, कायोटी माणसांवर हल्ले करतात का कधी? की घाबरट असतात?

श्रीरंग_जोशी's picture

2 Aug 2021 - 8:15 pm | श्रीरंग_जोशी

धन्यवाद, प्रचेतस.
हे कोल्हे (रेड फॉक्स) व कायोटी दोन्हीही माणसाची चाहूल लागताच दूर पळतात.
रेड फॉक्स आकाराने पण लहान असतात.

गोरगावलेकर's picture

3 Aug 2021 - 3:04 pm | गोरगावलेकर

खूप सुंदर परिसर दिसतोय तुमच्या आजूबाजूचा

सर्व मिपाकरांना जागतिक फोटोग्राफी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ॲम्बी व्हॅली जवळच्या परीसरातला निसर्ग.

1

2

3

4

5

श्रीरंग_जोशी's picture

20 Aug 2021 - 12:17 am | श्रीरंग_जोशी

अ‍ॅम्बी व्हॅलीच्या भोवतालचा परिसर प्रेक्षणीय आहे. १४ वर्षांपूर्वी मी काढलेले काही फोटोज.

टर्मीनेटर's picture

20 Aug 2021 - 12:52 am | टर्मीनेटर

वाह! हे फोटोजही सुंदरच आहेत. पावसाळ्यात सह्याद्रीचे रूप खूप वेगळे आणि नेत्रसुखद असते हेच खरे.