मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१- स्पर्धे करता नाही

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in मिपा कलादालन
26 Jun 2021 - 10:53 am

छायाचित्रण कला स्पर्धा दणाक्यात सुरु झाली आहे. मिपाकरांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

स्पर्धक एका गटात एकच छायाचित्र देउ शकत असल्याने त्यांच्या आवडत्या छायाचित्रांचा आस्वाद इतर मिपाकरांना घेता यावा म्हणून हा धागा सुरु करत आहोत.

या धाग्यावर प्रतिसादामधे मिपाकर आपली आवडती छायाचित्रे देउ शकतात. (कितीही)

धाग्याची सुरुवात प्रशांत आणि टर्मिनेटर यांच्या या तीन छायाचित्रांनी करत आहोत.

PRASHANT
प्रशांत

Terminator 1
गोव्यातील शापोरा किल्ल्यावरून दिसणारा समुद्र
-टर्मीनेटर

Judgement Day

देवबाग ते वालावल च्या रस्त्यावर चिपी विमानतळजवळील एका पुलावरून दिसणारे दृष्य
- टर्मीनेटर

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

2 Jul 2021 - 8:49 am | तुषार काळभोर

सुख!

सुबोध खरे's picture

2 Jul 2021 - 9:11 am | सुबोध खरे

+१००

कॉमी's picture

2 Jul 2021 - 9:39 am | कॉमी

सुंदर फोटो आहेत.

नावातकायआहे's picture

2 Jul 2021 - 7:20 pm | नावातकायआहे

क ड क! (स्पर्धेला का नाही?)

सुक्या's picture

2 Jul 2021 - 10:14 pm | सुक्या

धन्यवाद !!

स्पर्धेला एकच पाठवायचा होता ... म्हणुन दुसरा पाठवला ...

नावातकायआहे's picture

2 Jul 2021 - 10:42 pm | नावातकायआहे

वॉटर मार्क टाका. पब्लिक ढापेल. :-)

सर्वसाक्षी's picture

2 Jul 2021 - 8:48 pm | सर्वसाक्षी

सर्वच फोटो सुंदर आले आहेत. मस्त.

सर्वसाक्षी's picture

8 Jul 2021 - 5:48 pm | सर्वसाक्षी

अधिक आवडला

सगळेच फोटो उत्तम. पहिला जास्त भावला, कदाचित अशा ठिकाणी जायची माझी ईच्छा असल्यामुळे असेल!
शेवटचा फोटो बघून काजवा महोत्सवातील काजव्यांनी डवरलेल्या झाडाच्या वर्णनाची आठवण झाली! :-)

प्रचेतस's picture

3 Jul 2021 - 9:11 am | प्रचेतस

a

गुल्लू दादा's picture

3 Jul 2021 - 10:24 am | गुल्लू दादा

आवडला हा फोटो. धन्यवाद.

तुषार काळभोर's picture

3 Jul 2021 - 10:42 am | तुषार काळभोर

हे दृष्य पाहताना प्रत्येक वेळी भान हरपतं!

ताम्हिणी घाटात एका तुटलेल्या काटेरी निष्पर्ण खोडावर फुललेलं ऑर्किड

a

a

Bhakti's picture

3 Jul 2021 - 9:30 am | Bhakti

वाह! मस्तच!

गुल्लू दादा's picture

3 Jul 2021 - 10:25 am | गुल्लू दादा

आवडले. धन्यवाद.

प्रचेतस's picture

3 Jul 2021 - 9:13 am | प्रचेतस

ताम्हिणी घाटातलंच एक झाड

a

सर्वसाक्षी's picture

8 Jul 2021 - 5:49 pm | सर्वसाक्षी

आवडला

कंजूस's picture

3 Jul 2021 - 11:03 am | कंजूस

ती अजून सापडतात का?

प्रचेतस's picture

3 Jul 2021 - 11:05 am | प्रचेतस

हो, ऑर्किड्स भरपूर दिसतात. थोडं आत जायची तयारी पाहिजे.

कोणत्या वर्षीचा,महिन्यातला हा फोटो आहे?

प्रचेतस's picture

3 Jul 2021 - 2:21 pm | प्रचेतस

जून २०१६

प्रदीप's picture

3 Jul 2021 - 11:13 am | प्रदीप

सर्वांचे, सर्वच फोटो छान आहेत; आवडले.

सर्वच मिपाकरांचे फोटो भारी आहेत...👍

हा धागा म्हणजे खरंच उत्तमोत्तम फोटोज पाहण्याची पर्वणी आहे. मी सुद्धा आज पासून भरपूर फोटोज टाकणार आहे... 😀

टर्मीनेटर's picture

3 Jul 2021 - 6:14 pm | टर्मीनेटर

तवसाळ ते जयगड फेरी बोट.

चंद्रोदय.

वरच्या फोटोत एकाच वेळी जेट्टीच्या डाव्या बाजूला दिसणारा चंद्रोदयाचा तर खालच्या फोटोत जेट्टीच्या उजव्या बाजूला दिसणारा सूर्यास्ताचा देखावा.

सूर्यास्त.

- - : - - : - -

खाडी.

फेरी बोटीतून दिसणारी खाडी आणि परिसर.

तुषार काळभोर's picture

3 Jul 2021 - 7:11 pm | तुषार काळभोर

सांगितले नाही तर सूर्यबिंब वाटेल इतका छान रंग आहे चंद्राचा..

त्या दिवशी चंद्राचे तेजच काही विलक्षण होते..
खालचा जयगडला उतरल्यावरचा फोटो.
चंद्र

तुषार काळभोर's picture

3 Jul 2021 - 8:04 pm | तुषार काळभोर

हाच चंद्र आपल्याकडे इतका सुंदर दिसला नसता.

कॉमी's picture

3 Jul 2021 - 6:59 pm | कॉमी

तापोळा-


शिवराज धाबा कराड इथली सुंदर प्रतिमा-
शिवराय बसले भोजनास
तृप्त झाले स्वराज्य

पहिला फोटो दिसत नाहीये...बाकीचे मस्त!
👍

गुल्लू दादा's picture

3 Jul 2021 - 8:40 pm | गुल्लू दादा

वारूळ

कडाक्याच्या थंडीतील शेकोटी... आहाहा...!

सगळ्यांचेच फोटो मस्त आहेत. मला सुक्या यांचा फुलांचा फोटो विशेष आवडला. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - twenty one pilots - Heathens ( Lyrics )

प्रचेतस's picture

3 Jul 2021 - 10:39 pm | प्रचेतस

भारी आहेत फोटो एकेक.

सर्वसाक्षी's picture

4 Jul 2021 - 6:25 pm | सर्वसाक्षी

sh1

गुल्लू दादा's picture

4 Jul 2021 - 8:06 pm | गुल्लू दादा

सातपुड्यातील एक झरा

या फोटोत नावीन्य काहीच नाही तरी सुद्धा मला तो का आवडतो काय माहित.

दोनेक वर्षांपूर्वीच मेळघाटात गेलो असल्याने सातपुड्याचं सौंदर्य जवळून माहीत आहे. काय सुरेख आणि अनाघ्रात जंगल आहे राव.
सिपना, गडगा नद्या पण अविस्मरणीय. शहानूर ते धारणी प्रवास हा तर जंगलाच्या मध्यभागातून होतो, जबरी.

कंजूस's picture

4 Jul 2021 - 9:37 pm | कंजूस

श्रीशैलंम अभयारण्यसुद्धा मेळघाटासारखंच आहे (मेळघाटाचे फोटो पाहिले, श्रीशैलंमला गेलोय.). तिथेही अस्वलं आहेत. पाऊस फार कमी. पानगळीचे वृक्ष.

मराठी_माणूस's picture

5 Jul 2021 - 10:39 am | मराठी_माणूस

https://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/nashik-city/248/05072021/0/0/

ह्या पानावरचे सुरेख छायाचित्र

चांदणे संदीप's picture

5 Jul 2021 - 3:13 pm | चांदणे संदीप

माझे अलीकडेच मोबल्यातून काढलेले काही बरे फोटो

१) कुंडीतली मेथी
1

२)अनामिकेची कळी
2

३) रानफुलं
3

४) भूछत्री
4

५) रूईचं झाड
5

६) इस्टर आयलँडवरच्या शिल्पांसारखा उभा असलेला एक दगड
6

नव्या मोबल्यामध्ये बरा कॅमेरा असल्याने नुसता क्लिकक्लिकाट सुरू आहे.

सं - दी - प

Bhakti's picture

5 Jul 2021 - 4:49 pm | Bhakti

मस्त!
अनामिका म्हणजे कोणतं फुलं?

चांदणे संदीप's picture

5 Jul 2021 - 6:12 pm | चांदणे संदीप

Anamika
सुवासिक आणि सुंदर फूल!

सं - दी - प

अनंत आहे का हा?मी फोटोच पाहिला आहे.असाच दिसतो.

कंजूस's picture

5 Jul 2021 - 6:07 pm | कंजूस

मोबल्या कुठला हो? मोटो वन फ्युझन मध्ये macro आहे ना?

चांदणे संदीप's picture

5 Jul 2021 - 6:15 pm | चांदणे संदीप

Tecno Camon 16 आहे काका.

फीचर्स एवढे काही खास नाही. मी तो चांगल्या बॅटरी बॅकअप साठी घेतलाय.

सं - दी - प

बेंगुताई's picture

5 Jul 2021 - 6:30 pm | बेंगुताई

माझे आजोबा आमच्या शेतात जाताना.

कापूस पिंजून ठेवलाय जसा!

गुल्लू दादा's picture

6 Jul 2021 - 2:17 pm | गुल्लू दादा

आजोबा शेतात जातानाच एखाद्या आत्मचरित्राच मुखपृष्ठ वाटावं इतकं जिवंत आहे. धन्यवाद.

चौथा कोनाडा's picture

6 Jul 2021 - 5:38 pm | चौथा कोनाडा

कदाचित त्यांच्या आत्मचरित्राच्या मुखपृष्ठासाठीच फोटो काढलेला असेल हा !

हॅरी पॉटर's picture

5 Jul 2021 - 11:43 pm | हॅरी पॉटर

मंडळी मला फोटो काढायची हौस आहे पण फुलाची जास्त नावं माहित नाहीत. काही चुकले तर सांगा.

कामिनी

नाकतोडा

कमळ

मशरूम

शेताजवळील नजारा

कमळ

पैसा

लाजाळूची फुले

गुलाबाचे फुले

गुल्लू दादा's picture

6 Jul 2021 - 1:59 pm | गुल्लू दादा

दोन्ही कमळ आवडलेत. धन्यवाद.

कंजूस's picture

6 Jul 2021 - 5:19 am | कंजूस

पांढऱ्या फुलांचा फोटो बऱ्याचदा चांगला येत नाही कारण प्रकाश परावर्तित होतो. कमळं आवडली. टबात लावली आहेत!

बदामी गुहा पाहायला आलेली शाळेची मुलेमुली.
बदामिची शाळेची सहल.७
( जोड्यांची रांग करून तिथून नेतात आणि शिक्षक पुढे चला पुढे चला करत असतात. बसमध्ये परत चढताना मुले मोजणे. शाळेच्या वहीत शैक्षणिक सहल नेऊन आणल्याची नोंद. हीच पद्धत सर्व ठिकाणी वापरली जाते.)