नमस्कार मंडळी,
बऱ्याच काळापासून या विषयावर चर्चेचा धागा काढायचे मनात होते. शेवटी आज जागतिक छायाचित्रणकला दिवसाच्या मुहूर्तावर ते प्रत्यक्षात आणतोय. आंतरजाल सहजपणे उपलब्ध होण्यापूर्वी माझ्यासारख्यांच्या दैनदिन आयुष्यात (आस्वाद घेण्याजोग्या) छायाचित्रांची उपलब्धतता आजच्या तुलनेत नगण्यच होती. दर्जेदार कागद अन छपाई असणारी इंग्रजी मासिके, कधी कुणाच्या घरी पोस्टर म्हणून लावलेले एखादे उत्तम छायाचित्र इत्यादी.
गेल्या एक दीड दशकात हे चित्र वेगाने पालटले. इतरांनी काढलेली उत्तमोत्तम छायाचित्रे पाहिली की आपणही कधी अशी छायाचित्रे काढू शकू का हा विचार मनात पूर्वी यायचा. त्या दिशेने थोडे फार प्रयत्न केल्यावर उमजले की उत्तम व दर्जेदार छायाचित्रे काढणे हे त्या प्रकारची चित्रे पाहण्याच्या तुलनेत खूपच अवघड आहे. त्यामुळे स्वतःच्या समाधानासाठी जशी जमतील तशी छायाचित्रे काढावीत अन इतरांच्या उत्तमोत्तम छायाचित्रांचा आस्वाद घेताना 'आपल्याला जमेला का' असे प्रश्न अजिबात मनात आणायचे नाहीत असे मी ठरवले.
अन या मार्गाने उपलब्ध वेळेचा उपयोग उत्तमोत्तम छायाचित्रे पाहण्यात घालवून स्वतःसाठी एक दालनच उघडले. छायाचित्रे हे असे माध्यम आहे की आस्वाद घेणाऱ्याला फार वेळ घालवायची गरज नाही. उपलब्ध असणाऱ्या अन जालाला जोडलेल्या अनेक उपकरणांवर आपण छायाचित्रे बघू शकतो. छायाचित्रांतून इतिहास, भूगोल, संस्कृती, नव्या घडामोडी यांची माहिती आपोआप सहजपणे होत राहते. छायाचित्रणकला स्वतः तर एक कला आहेच पण इतर अनेक कलांचा अन शास्त्रांचा आरसा म्हणूनही ती महत्त्वाची भूमिका पार पाडते.
माझ्या दिवसाची सुरुवात बिंग. कॉमवरचे रोज बदलणारे छायाचित्र पाहून होते. दिवसभरात अन रात्री झोपण्यापूर्वी फेसबुक फोटोग्राफी पेजेस, फ्लिकर, इन्स्टाग्राम इत्यादींवर विविध विषयांवरच्या उत्तमोत्तम छायाचित्रांचा आस्वाद मी घेत असतो. मिपावर देखील अनेक प्रवासवर्णनांमधे , छायाचित्रणकला स्पर्धांमधे अन इतरही लेखनांत मिपाकर छायाचित्रकारांची दर्जेदार छायाचित्रे बघायला मिळतात. मिपावर अन जालावर इतरत्रही अशा कलाकारांचे छायाचित्रणाबाबतचे अनुभवकथन वाचणे ही देखील पर्वणी असते.
माझ्यासारखीच आवड असणाऱ्या मिपाकरांना विनंती करतो की त्यांनी आवडत्या छायाचित्रांचे दुवे प्रतिसादांत द्यावेत. तसेच आवडत्या छायाचित्रांबाबत अन छायाचित्रकारांबाबत लिहावे. मी माझ्या परीने भर घालणार आहेच. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
या विषयावरचे बिंगचे एक होमपेज जालावरून साभार -
या निमित्ताने, आपल्या कलेद्वारे माझ्यासारख्या अनेकांचे अनूभूतीविश्व संपन्न करणाऱ्या ज्ञात व अज्ञात छायाचित्रकारांना वंदन करतो.
प्रतिक्रिया
20 Aug 2018 - 5:35 am | कंजूस
लेख आणि विचार आवडले.
उत्तम व दर्जेदार छायाचित्रे काढणे हे त्या प्रकारची चित्रे पाहण्याच्या तुलनेत खूपच अवघड आहे. त्यामुळे स्वतःच्या समाधानासाठी जशी जमतील तशी छायाचित्रे काढावीत अन इतरांच्या उत्तमोत्तम छायाचित्रांचा आस्वाद घेताना 'आपल्याला जमेला का' असे प्रश्न अजिबात मनात आणायचे नाहीत असे मी ठरवले.
बरोबर.
छायाचित्रांना १)काळानुरूप आणि २)परिस्थितीप्रमाणे महत्त्व प्राप्त होत जाते. तांत्रिकदृष्ट्या त्यांचे मुल्यमापन होत नाही. कुटुंबातली चित्रे (१) आणि युद्ध,दंगली,आपत्ती,विशेष घटना हे (२) प्रकारातील असतात.
20 Aug 2018 - 6:59 pm | पद्मावति
उत्तम धागा.
20 Aug 2018 - 8:23 pm | टर्मीनेटर
काही दिवसांपूर्वी बरखाजींनी फिनलँड विषयी लिहिलेल्या लेख मालिकेतील हेलसिंकी सांबा कार्निवल च्या भागातील सर्वच छायाचित्रे सुंदर आहेत. रंगसंगती आणि सहभागी झालेल्या युवतीच्या चेहऱ्यावरील भावांमुळे मला त्यातले विशेष आवडलेले छायाचित्र खाली देत आहे.
21 Aug 2018 - 9:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर कल्पना !
कालच काढलेले ताजे चित्र. का कोणास ठाऊक पण, पावसाळ्यात पारिजातकाच्या खाली पडलेला नाजूक द्विरंगी फुलांचा सडा पाहिला की मन प्रसन्न होते...
23 Aug 2018 - 5:14 pm | चौकटराजा
लाल फुलांच्या लिपीतला हा लेख मला कळला अंगणी
पारिजात फुलला !
28 Aug 2018 - 11:21 am | टर्मीनेटर
पारिजातकाचा सडा छानच दिसतोय. ह्या वर्षीच्या जानेवारीत मुन्नार (केरळ) येथील रोज गार्डन मध्ये काढलेल्या असंख्य फुलांच्या फोटोंमधील दोन फोटो टाकण्याचा मोह आवरत नाहीये.
30 Aug 2018 - 8:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं ! सुंदर फुलांचे सुंदर फोटो मन प्रसन्न करून जातात !
22 Aug 2018 - 12:23 am | श्रीरंग_जोशी
कंजूस, पद्मावति, टर्मीनेटर, डॉ. म्हात्रे प्रतिसादांसाठी धन्यवाद.
टर्मीनेटर - तुम्ही वर दिलेला हेलसिंकी सांबा कार्निवलमधला फोटो आवडला.
डॉ. म्हात्रे - तुम्ही काढलेले पारिजातकाच्या फुलांचे फोटो पाहून प्रसन्नता लाभली.
मला भावलेल्या काही फोटो कलेक्शन्सचे दुवे:
आजचे बिंगचे होमपेज
कॅलिफोर्नियातल्या सॅन्टा मोनिका पीअरचा हा फोटो काढला आहे Chris Fabregas यांनी.
22 Aug 2018 - 7:17 pm | जयंत कुलकर्णी
मी काढलेले एक छायाचित्र... नाणेघाट !
22 Aug 2018 - 9:46 pm | श्रीरंग_जोशी
नाणेघाटाचे छायाचित्र आवडले. दक्षिण भारताच्या नकाशाशी साधर्म्य साधणारा आकार वाटला.
नुकताच वाचलेला एक लेख - Review: Contemplating 'a Handful of Dust' at the California Museum of Photography.
24 Aug 2018 - 10:40 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर !
28 Aug 2018 - 11:34 am | टर्मीनेटर
प्रत्यक्षात बघितलेल्या नाणेघाटाचे वेगळेच दर्शन ह्या फोटोतून घडले. सुंदर फोटो.
कुंभलगढ (राजस्थान) च्या जगप्रसिद्ध ३६ कि.मी. लांबीच्या तटबंदीचे २०१६ च्या एप्रिल मध्ये काढलेला फोटो.
22 Aug 2018 - 9:57 pm | अंतु बर्वा
मला वेळ मिळेल तसा बॉस्टनग्लोब वरील बिग पिक्चर या मालिकेचा आस्वाद घेत असतो. एक थीम घेउन छायाचित्रे एकत्र केलेली असतात आणि त्यांच्या कॅप्शन्सच्या माध्यमातुन स्टोरी टेलिंग सारखा अनुभव येतो.
वानगीदाखल हे पहा.
23 Aug 2018 - 10:33 am | प्रचेतस
23 Aug 2018 - 5:11 pm | चौकटराजा
कडक ? छे नीतळ ! एकदम ब्यास !
28 Aug 2018 - 11:43 am | टर्मीनेटर
खूप सुंदर आलाय हा जीवधन-वानरलिंगीचा फोटो.
काश्मीर मधल्या पहेलगाम पासून सुमारे १०० कि.मी. अंतरावर असलेल्या आणि वर्षाचे जवळपास बारा महिने बर्फाच्छादित असणाऱ्या सिंथन टाॅप इथे २०१७ च्या जून महिन्यात काढलेला एक फोटो.
30 Aug 2018 - 8:18 pm | Nitin Palkar
अप्रतिम!
23 Aug 2018 - 5:27 pm | चौकटराजा
खालील फोटो १२०० एक एम झूम असलेल्या माझ्या नव्या कॅमेर्याने घेतला आहे. गुगल अर्थ प्रमाणे कॅमेरा व हे साइन यातील अंतर ९३० मीटर आहे . इंदिरानगर नासिक येथील एका बाल्कनी तून हा उद्योग करून पाहिला . यु ट्यूब मधील एका डेमो नुसार गुरू व त्याचे उपग्रह याचाही फोटो या सोनी कॅमेर्याने काढता येतो . मात्र शनी साठी निकोन ९०० पी हा कॅमेरा लागतो .
23 Aug 2018 - 5:32 pm | चौकटराजा
सदर फोटो ट्रायपौड न वापरता घेतला आहे ! तो वापरलयास अधिक उत्तम !
28 Aug 2018 - 11:57 am | टर्मीनेटर
९३० मीटर्सच्या अंतरावरून सुद्धा ग्लोसाइन वरची अक्षरे एवढी सुस्पष्ट दिसणारा फोटो काढणाऱ्या तुमच्या कॅमेऱ्याला सलाम.
जानेवारी २०१८ ला बाहुबली फेम अथीरापल्ली फॉल्स (केरळ) चा सुमारे ८०० मीटर्स अंतरावरून झूम करून काढलेला एक फोटो.
29 Aug 2018 - 1:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
भारी प्रयोग, भारी कॅमेरा, भारी कॅमेरामन !
24 Aug 2018 - 9:25 pm | श्रीरंग_जोशी
अंतु बर्वा - बॉस्टन ग्लोबच्या दुव्यासाठी धन्यवाद.
प्रचेतस - जीवधन-वानरलिंगीचा फोटो भारी आहे.
चौरा - झूम करुन काढलेला सुस्पष्ट फोटो आवडला.
सेल्फी हा मला व्यक्तिशः न आवडणारा प्रकार. परंतु या प्रकारातला हा खूप आवडलेला एक फोटो.
A cockpit selfie taken by a British RAF pilot has been nominated for a photography award
आजचे बिंगचे होमपेज. सेन्ट लुईसच्या गेटवे आर्चचा प्रतिबिंबासकटचा फोटो.
कॅमेरा सेन्सरवर अथवा लेन्सवरच्या धुलीकणांमुळे फोटोतल्या आकाशातल्या भागावर डाग दिसत आहे. असे जेव्हा माझ्या फोटोसोबत घडते तेव्हा शक्यतोवर एडिटींगमध्ये दुरुस्त केल्याशिवाय मी फोटो प्रकाशित करत नाही. परंतु या फोटोत ती दुरुस्ती न करताही बिंगने तो प्रकाशित केला आहे अन प्रथमदर्शनीतरी फोटोत दिसणार्या सौंदर्याला बाधा आलेली वाटत नाही.
28 Aug 2018 - 11:50 am | टर्मीनेटर
कॉकपिट सेल्फी आणि सूर्यग्रहणाचे फोटो खूप आवडले.
27 Aug 2018 - 9:42 am | श्रीरंग_जोशी
.
27 Aug 2018 - 9:42 am | श्रीरंग_जोशी
.
27 Aug 2018 - 9:41 am | श्रीरंग_जोशी
इच्छाशक्तीला अनोळखी लोकांची साथ अन अथक परिश्रम यांची साथ मिळाल्यावर निघणारा हा सूर्यग्रहणाचा अप्रतिम फोटो.
This Is the Most Amazing Photo Ever Taken From a Commercial Airplane. Now, a Southwest Passenger Explains How He Did It
या अवलिया कलाकाराचे नाव आहे - Jon Carmichael.
28 Aug 2018 - 9:10 am | चौकटराजा
निशब्द !
27 Aug 2018 - 1:22 pm | डॉ सुहास म्हात्रे
Cosmic ‘Winter’ Wonderland
(Courtesy : NASA)
27 Aug 2018 - 2:25 pm | प्रचेतस
हा तार्यांचा जन्मसोहळा आहे काय?
हबलने घेतलेला 'निर्मितीच्या स्तंभांचा' (Pillars of Creation) हे छायाचित्र माझ्या अतिशय आवडीचे.
१९९५ साली हबलने घेतलेल्या ह्या छायाचित्राची आठवण म्हणून हबलनेच २०१४ साली घेतलेले हे हाय रिझोल्युशनचे छायाचित्र.
28 Aug 2018 - 12:56 am | डॉ सुहास म्हात्रे
हा तार्यांचा जन्मसोहळा आहे काय?
होय. अश्याच महामहामहास्फोटात प्रचंड आकाराचे, प्रचंड धगधगते वस्तूमान, एकत्र येऊन तारे जन्मतात... या तर तारे बनवणार्या फॅक्टर्या !
अश्याच एका फॅक्टरीत दिसलेला हा "देवाचा हात (Hand of God)" :)
28 Aug 2018 - 1:40 am | डॉ सुहास म्हात्रे
ही विश्वाची फॅक्टरी तशी काहिशी विनोदीही आहे. तिने तिच्या कामात लुडबूड करणार्या मानवाला दाखविलेले हे मधले बोट... =)) =)) =))
28 Aug 2018 - 12:12 am | मेघनाद
मी स्वतःच गगनबावडा, कोल्हापुर येथे हे छायाचित्र काढलेलं आहे. हिरवागार डोंगर आणि समोर दाट धुक्याने वेढलेली दरी. फारच प्रेक्षणीय जागा होती ती.
28 Aug 2018 - 12:58 am | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं. ते गवत आता वार्याने सळसळू लागेल असे वाटते !
28 Aug 2018 - 12:04 pm | टर्मीनेटर
मेघनादजी फोटो दिसत नाहीये.
31 Aug 2018 - 1:52 am | मेघनाद
आता बघा छायाचित्र दिसतंय का. पिकासा बंद झाल्यापासून छायाचित्र डकवणे फार जिकिरीचे झाले आहे.
31 Aug 2018 - 9:45 am | टर्मीनेटर
मेघनादजी अजूनही छायाचित्र दिसत नाहीये. गुगल फोटोज किंवा फेसबुक वरून डकवून बघा.
31 Aug 2018 - 12:42 pm | डॉ सुहास म्हात्रे
Access to doc-08-7k-docs.googleusercontent.com was denied
You don't have authorization to view this page.
HTTP ERROR 403
असा संदेश येतो. यावरून तुम्ही चित्राला "पब्लिक अॅक्सेस" दिलेला नाही असे दिसते... तो दिल्याशिवाय मिपावर चित्र दिसणार नाही.
3 Sep 2018 - 12:35 pm | मेघनाद
आता हा शेवटचा प्रयत्न. :-)
3 Sep 2018 - 1:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
मिपावर चित्रे प्रसिद्ध करण्याची कृती, हा लेख उपयोगी ठरू शकेल.
4 Sep 2018 - 1:54 am | मेघनाद
28 Aug 2018 - 12:21 am | किल्लेदार
माझ्या आवडत्या फोटोग्राफर्स पैकी एक म्हणजे स्टिव्ह मॅककरी. नॅशनल जिओग्राफिक मॅगझीनसाठीचा त्याचा आयकॉनिक फोटो सगळ्यांनाच माहित असेल.
इउरी म्हणून एक धमाल आईसलँडर फोटोग्राफर आहे. त्याचे फोटोज खालच्या लिंक वर बघता येतील.
http://www.iuriebelegurschi.com/
28 Aug 2018 - 1:06 am | डॉ सुहास म्हात्रे
भारी आहेत सगळी चित्रे ! अशी चित्रे पाहिली की आपण या पृथ्विची कित्येक रुपे पाहिलीच नाही याची प्रकर्षाने जाणीव होते :(
28 Aug 2018 - 8:36 am | प्रचेतस
अगदी.
निर्विवादपणे देखणी.
29 Aug 2018 - 7:24 am | निशाचर
अप्रतिम आहेत एकेक फोटो. आइसलँडबद्दल तर काही बोलायलाच नको.
28 Aug 2018 - 10:50 am | अनिंद्य
आता खरा यौवनात आला हा धागा.
एक से बढ के एक फोटो आहेत.
28 Aug 2018 - 6:53 pm | प.पु.
28 Aug 2018 - 7:19 pm | प.पु.
https://photos.app.goo.gl/HuXp2aSv2EeQYzTy7
28 Aug 2018 - 7:26 pm | टर्मीनेटर
सुंदर फोटो, लिंक देण्या ऐवजी इथेच टाका ना हा फोटो.
29 Aug 2018 - 6:02 am | कंजूस
सर्वच फोटो छान आहेत.
चौकटराजा, कॅम्रा भारी आहे.
प.पु. यांचा फोटो
30 Aug 2018 - 9:44 am | प.पु.
धन्यवाद कंजूसजी, प्रयत्न केला होता फोटो इथेच टाकण्याचा पण जमले नाही.
3 Sep 2018 - 1:55 pm | डॉ सुहास म्हात्रे
मिपावर चित्रे प्रसिद्ध करण्याची कृती, हा लेख उपयोगी ठरू शकेल.
4 Sep 2018 - 2:22 pm | डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही फोटोच्या थंबनेलची लिंक टाकली होती. फोटो प्रसिद्ध करण्यासाठी, तो (थंबनेलवर डबल क्लिक करून मिळालेल्या) पूर्ण आकारात असताना घेतलेला "इमगे अड्रेस" वापरावा लागतो.
28 Aug 2018 - 10:21 pm | एक छायाचित्रकार
माझी काही छायाचित्रे येथे टाकु शकतो का?
मि एक हौशी छायाचित्रकार आहे. मला माहीत नाही माझि छायाचित्रे लोका॓ना आवडतील की नाही.
28 Aug 2018 - 10:25 pm | टर्मीनेटर
जरूर टाका.
29 Aug 2018 - 7:18 am | निशाचर
मस्त आहे हा धागा आणि फोटोज. नाणेघाटाचा फोटो विशेष आवडला.
29 Aug 2018 - 12:31 pm | महासंग्राम
मॅग्नम फोटोज या प्रकाशचित्रणाला वाहिलेल्या संस्थेच्या वेबसाईटवर अनेक प्रसिद्ध प्रकाशचित्रकारांनी काढलेली ऐतिहासिक प्रकाशचित्रे आहेत.
https://www.magnumphotos.com/
30 Aug 2018 - 9:59 am | प.पु.
31 Aug 2018 - 10:47 am | इरसाल कार्टं
सायकलिंग सुरु केल्यापासून केलेली फोटोग्राफी. यातला शेवटचा फोटो तेवढा DSLR ने काढलाय. बाकी सगळे फोन कॅमेरा वापरून. सगळेच्या सगळे सकाळच्या वेळी काढलेत. मिपाच्या सायकल आणि पुस्तकाच्या कायाप्पा समूहातल्या सदस्यांनी याआधी पाहिलेले आहेतच.
हा गावाजवळील नदीवर असलेला एक जुना बंधारा कम पूल.
तानसा धरणात एका मासेमाराकडून तराफा उसना घेऊन एकट्यानेच भटकलो होतो तेव्हा मित्राने काढलेला फोटो.
माहुली-भंडारगड
तानसा अभयारण्य परिसरात काढलेला एक फोटो.
2 Sep 2018 - 6:34 pm | चौकटराजा
एक नम्बर फोटो उत्त्मच ! पुणेकराना असा काधायचा असेल तर येत्या हिवाळ्यात कवडीपाट ला भेट द्या
बाकी सर्व लई भारी . माहुलीची स्काय लाईन लाजवाब !
4 Sep 2018 - 2:01 am | मेघनाद
पुलावर काढलेला सायकलचा फोटो अप्रतिम. धुक्यात हरवली वाट सारखं काहीसं
31 Aug 2018 - 12:13 pm | लोनली प्लॅनेट
हा मी काढलेला माझ्या पुतणीचा चा फोटो
कॅमेरा Nikon D5100 50mmF/1.8
http://i1067.photobucket.com/albums/u437/sandeep4animals/manva_zpsblsuk6...
31 Aug 2018 - 12:45 pm | डॉ सुहास म्हात्रे
वरचा 'लोनली प्लॅनेट' यांचा सुंदर "बोलका" फोटो
1 Sep 2018 - 10:56 am | लोनली प्लॅनेट
माझ्या प्रतिसादात तो फोटो दिसत नव्हता म्हणून तुम्ही स्वतः तो पुनर्प्रकाशित केलात यासाठी खूप धन्यवाद म्हात्रे काका..
1 Sep 2018 - 9:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
न्यूझिलंडमधील फिओर्डलँडमधील वाटेवरच्या नीरव "आरसी तळ्याचा (मिरर लेक)" एक फोटो...
2 Sep 2018 - 11:18 am | प.पु.
2 Sep 2018 - 1:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
चित्र दिसत नाही. बहुतेक त्याला "पब्लिक अॅक्सेस" दिलेला नाही.
2 Sep 2018 - 1:45 pm | प.पु.
दिलेला आहे
2 Sep 2018 - 1:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
छायाचित्रण दिन २०१८ निमित्त प्रसिद्ध झालेले एक चित्र (जालावरून साभार)...
2 Sep 2018 - 4:36 pm | मदनबाण
सुंदर धागा... सुंदर प्रकाषचित्रे. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- नि मैं वोडका लगा के तेरे नाल नाचना, नि मैं वोडका लगा के तेरे नाल नाचना, होय मैं तेरा ही ना रटना अड्डी मार के वेहदा पट्टना
अज्ज मैं टल्ली होक हटना नि... :- Nawabzaade
3 Sep 2018 - 12:25 pm | अनिंद्य
+१
हा धागा खरेतर 'शिफारस' मध्ये हवा.
4 Sep 2018 - 11:51 am | मित्रहो
मस्त धागा. सकाळी सायकलींगला जाताना माझ्या सारख्या अतिशय टुकार छायाचित्रकाराने काढलेली काही छायाचित्रे कोणाला आवडू ना आवडो स्वतःला आवडायला लागतात . सकाळच्या सुदंर वातावरणाचा आणि मोबाइल मधल्या कॅमेऱ्याचा परिणाम.
4 Sep 2018 - 12:03 pm | प्रचेतस
भुलेश्वरच्या पठारावर टिपलेले हे छायाचित्र.
4 Sep 2018 - 3:08 pm | चौकटराजा
रंग , फोकस रचना एक लम्बर !
10 Sep 2018 - 2:15 pm | मीता
10 Sep 2018 - 11:07 pm | चित्रगुप्त
फ्लॉरेन्स: आर्नो नदीवरील एक पूल
इ.स. १४५८ साली बनलेल्या पित्ती/मेदिची-प्रासादातले एक दालनः
एक शयनकक्ष ऊर्फ बेडरूम (३२०,००० वर्गफुटाच्या घरातील एक खोली)
एका दालनातील छतावरील चित्रः
आंघोळीचे संगमरवरी घंगाळ आणि एक घड्याळ
11 Sep 2018 - 4:14 pm | फोटोग्राफर243
मागच्या काही वर्षा पासून छायाचित्रण शिकतो आहे,
https://www.flickr.com/photos/ambarishphotography
19 Aug 2021 - 10:58 pm | श्रीरंग_जोशी
सर्व मिपाकरांना जागतिक छायाचित्रणकला दिवसाच्या शुभेच्छा!!
गेल्या हिवाळ्यात टिपलेली पक्षाची ही मुद्रा.
अनेक वर्षांनी साहित्य संपादकांनी छायाचित्रणकला स्पर्धा या उपक्रमाचे पुनुरुज्जीवन केल्याबद्दल धन्यवाद.
21 Aug 2021 - 3:48 pm | कुमार१
सुंदर आहे
21 Aug 2021 - 5:01 pm | चौथा कोनाडा
क्या बात हैं !