मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१- स्पर्धे करता नाही

साहित्य संपादक · · मिपा कलादालन
छायाचित्रण कला स्पर्धा दणाक्यात सुरु झाली आहे. मिपाकरांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धक एका गटात एकच छायाचित्र देउ शकत असल्याने त्यांच्या आवडत्या छायाचित्रांचा आस्वाद इतर मिपाकरांना घेता यावा म्हणून हा धागा सुरु करत आहोत. या धाग्यावर प्रतिसादामधे मिपाकर आपली आवडती छायाचित्रे देउ शकतात. (कितीही) धाग्याची सुरुवात प्रशांत आणि टर्मिनेटर यांच्या या तीन छायाचित्रांनी करत आहोत. PRASHANT प्रशांत Terminator 1 गोव्यातील शापोरा किल्ल्यावरून दिसणारा समुद्र -टर्मीनेटर Judgement Day देवबाग ते वालावल च्या रस्त्यावर चिपी विमानतळजवळील एका पुलावरून दिसणारे दृष्य - टर्मीनेटर

वाचने 102824 वाचनखूण प्रतिक्रिया 288

सुमो Sat, 07/10/2021 - 09:45
ह्या धाग्यावरची सर्वच छायाचित्रे सुरेख आहेत अगदी. फूड फोटोग्राफी जराशी मागं पडली आहे. मिपावरच्या बल्लव मंडळींकडून काही लाळगाळू फोटो यावेत.

टर्मीनेटर Sat, 07/10/2021 - 17:33
बिंब - प्रतिबिंब.... वालावलचे लक्ष्मी नारायण मंदिर ज्या तलावाच्या काठावर आहे त्या तलावात दिसणारे सूर्यबिंबाचे दुहेरी प्रतिबिंब. प्रतिबिंब त्या सुंदर तलावाचे आणखीन दोन फोटोज तलाव तलाव

श्रीरंग_जोशी Mon, 07/12/2021 - 08:45
साडेतीन वर्षांनी छायाचित्रणकला स्पर्धा या लोकप्रिय उपक्रमाचे पुनरुज्जीवन केल्याबद्दल साहित्य संपादकांचे लक्ष लक्ष आभार. तसेच स्पर्धेसाठी अन या धाग्यावर स्पर्धेसाठी नसणारे एकाहून एक फोटोज प्रकाशित केल्याबद्दल मिपाकरांचे मन:पूर्वक आभार. माझ्यासारख्या छायाचित्रणकलाप्रेमीसाठी ही तर पर्वणीच. मी गेल्या काही महिन्यांत फुलांशी संबंधीत उद्द्याने व गावांना भेट दिली. तेव्हा काढलेले काही फोटोज. आयोवा राज्यातल्या पेला या गावी हॉटेल रॉयल अ‍ॅमस्टरडॅमशेजारी हा फोटो काढला आहे. तिथल्याच सेन्ट्रल पार्कमधल्या टुलिप्सचा फोटो. मिनेसोटा लॅन्डस्केप आर्बोरेटममधील टुलिप्स मिनियापोलिसच्या लेकवूड सेमेटरी येथील फोटो

In reply to by श्रीरंग_जोशी

नयनरम्य फोटो आहेत सगळे सगळेच्या सगळे कॉपी करुन घेणार आहे आणि डेस्कटॉप थीम म्हणून वापरणार आहे. पैजारबुवा,

टर्मीनेटर Mon, 07/12/2021 - 12:18
राजस्थानातील मेवाड प्रांतात अरवली पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटी पासून ३६०० फूट उंचीवर पंधराव्या शतकात बांधलेला कुंभलगड भारतातला चितोडगड नंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा किल्ला आहे. चिनच्या भिंती नंतर जगातली दुसऱ्या क्रमांकाची मानली जाणाऱ्या ह्या किल्ल्याच्या ३६ किमी लांबीच्या तटबंदीच्या भिंतीचे २०१६ मधे टिपलेले काही फोटोज. कुंभलगड कुंभलगड कुंभलगड

In reply to by ज्योति अळवणी

टर्मीनेटर Mon, 07/12/2021 - 14:58
माईंड ब्लोईंग.... दुर्दैवाने आम्ही गेलो होतो तेव्हा काही कारणास्तव मिरॅकल गार्डन बंद होते त्यामुळे ही चमत्कारीक सुंदर बाग बघता नव्हती आली 😔

टर्मीनेटर Tue, 07/13/2021 - 17:01
राणकपूर जैन मंदिर - राजस्थान. पंधराव्या शतकात बांधलेल्या ह्या संगमरवरी मंदिराला ८० कळस असून त्यात १४४४ नक्षीदार खांब आहेत. ह्या संगमरवरी खांबांचे वैशिष्ट्य असे की प्रत्येकावरचे कोरीवकाम वेगळे आहे, एकही खांब दुसऱ्या खंबासारखा नाही. गाभाऱ्यात आदीनाथांची चौमुखी मूर्ती असून सगळी कोरीवकामे फार प्रेक्षणीय आहेत. ranakpur

कंजूस Tue, 07/13/2021 - 17:23
फलना स्टेशनपासून तीस किमी. छान आहे ही जागा. वानरं भरपूर. पण त्रास नाही देत.

गोरगावलेकर Tue, 07/13/2021 - 22:14
हंटरब्राव्हो, टर्मीनेटर, श्रीरंग_जोशी, ज्योति अळवणी या सर्वांचे फोटो आवडले. @ज्योति अळवणी. अजून तरी परदेश वारी शक्य झालेली नाही. दुबई येथील मिरॅकल गार्डनच्या धर्तीवर बनवलेली नाशिक येथील बाग मात्र पाहण्याचा योग आला आहे. अर्थात मिरॅकल गार्डन कितीतरी पटीने भव्य आणि सुंदर दिसते आहे ती गोष्ट वेगळी.

टर्मीनेटर Wed, 07/14/2021 - 14:35
सहमत, आणि थोडंफार असंच म्हटलंय मी. शारीरिक क्षमता/तंदुरुस्ती आणि अशा प्रवासाची मानसिक तयारी महत्वाची. हल्ली काही लोक सोशल मीडिया वरचे फोटोज आणि ब्लॉग्स वाचून हनिमून साठी किंवा लहान मुलाबाळांसोबत तिथे जायचा प्लॅन करतात आणि ट्रॅव्हल फोरमवर त्याबद्दल विचारणा करतात जे अव्यवहार्य आहे त्यासाठी वरचा आगंतुक सल्ला दिला होता. ती जागा फोटोजेनिक आहे आणि "प्रत्यक्षाहूनही प्रतिमा सुंदर" म्हणतात त्याप्रमाणे ते ठिकाण फोटोत जितके सुंदर दिसते तेवढे प्रत्यक्ष डोळ्यांना सुंदर दिसत नाही असे माझे वैयक्तिक मत आहे. अर्थात "Beauty is in the eye of the beholder." हेच खरे... प्रत्येकाची मते भिन्न असू शकतात 🙂

टर्मीनेटर Wed, 07/14/2021 - 15:31
महाराणा प्रताप म्युझियम - हल्दीघाटी, राजस्थान. १५७६ साली हल्दीघाटी येथे झालेल्या लढाईचे स्मारक म्हणुन बांधलेले हे भव्य संग्रहलंय आणि इथला लाईट & साउंड शो फारच प्रेक्षणीय आहे. असेच एक भव्य आणि दर्जेदार स्मारक आपल्या शिवरायांचेही असावे असे मनोमन वाटते! haldighati

मदनबाण Sun, 07/18/2021 - 09:18
कॅनन, निकॉन आणि डी. एस्. एल्. आर्. छायाचित्रण ही एस यांची लेख मालिका फोटोग्राफ्री प्रेमींसाठी वाचनिय मालिका आहे. पेठकर काकांनी मला फोटो नेहमी मॅन्युअल सेटिंग मध्ये काढावेत हे सांगितले होते... त्याचा फार फायदा मला झाला तसेच या मोडच्या वापारामुळेच मी कॅमेर्‍यावर मला हवे असलेले नियंत्रण मिळवायला देखील शिकलो. ज्यांना डीएसएलआर विकत घेण्याची इच्छा आहे त्यांनी सगळ्यात जास्त कॅमेराचा सेंन्सरला प्राधान्य द्यावे... https://www.dxomark.com/Cameras/ इथे तुम्हाला त्याची मदत होइल. याच बरोबर ३५ एमएम प्राइम लेन्स नक्की विकत घ्या, याने पोट्रेट्स जबरदस्त येतात तसेच bokeh चा इफेक्ट उत्तम साधता येतो. या लेन्स ने काय किमया साधता येते त्याचा अनुभव इथे घेता येइल :- काहीही... यातील शेवटच्या फोटोत मात्र ३५ एमएम वापतली नाही. काही वेबसाईटस :- https://www3.bostonglobe.com/news/bigpicture [ इथले नुसते फोटो पाहुनच आपण कसे फोटो कसे काढायला हवेत हे शिकता येइल. ] https://digital-photography-school.com/ [ नावावरुनच तुम्हाला समजेल की इथे तुम्ही बरेच काही शिकाल. ] याच बरोबर कॅमेराचा वापर करुन तांत्रिक प्रयोग करण्याचे प्रयोग देखील अवश्य करा. [ जितके प्रयोग कराला तितके तुम्हाला अजुन शिकता येइल. ] उदा. पॅनिंग... घोस्ट इफेक्ट ! (Ghost Effect) मी केलेले प्रयोग :- गॅस बर्नर... रात्री घरी लाईट गेल्यावर मेणबत्तीवर कलेला प्रयोग :- मेणबत्ती...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Dolbywalya Song Making Video | Jaundya Na Balasaheb | Ajay Atul | Girish Kulkarni

मी काढलेले काही समुद्रकिनार्‍यांचे फोटो-- १. गणपतीपुळे Ganapatipule २. थोड्या वेळाने सूर्य मावळतीला लागल्यावर तोच गणपतीपुळ्याचा समुद्रकिनारा असा दिसायला लागला Ganapatipule Ganapatipule ३. गोव्यातील बाणावलीचा समुद्रकिनारा असा सुंदर आहे Benaulim ४. हा गोव्यातील कॅवेलोसिमचा समुद्रकिनारा Cavelossim

गोरगावलेकर Tue, 07/20/2021 - 12:10
सर्वानी दिलेले फोटो अतिशय छान. या धाग्यात आलेले फोटो स्पर्धेच्या फोटोंपेक्षा जास्त आवडले . स्पर्धेकरिता का नसतील आले असे सुंदर सुंदर फोटो? म्हणजे स्पर्धेकरिता आलेले फोटो सुंदर नाहीत असे म्हयायचे नाही. तांत्रिकदृष्ट्या मला काही कळत नाही. पण पाहताक्षणी डोळ्यांना सुखावून जाते ते सुंदर