1992 पासून मी दरवर्षी दिवाळी अंक विकत घेतो. सुरूवातीला काही वर्षे, म्हणजे साधारण 2006 पर्यंत, हवे असलेले सगळे अंक लगेच विकत घेत होतो, पण 2006-07 च्या सुमारास समजले की, डोंबिवली येथे मार्च-एप्रिल मध्ये, हेच दिवाळी अंक, कमी पैशांत मिळतात. त्यामुळे, 2-3 वाचनालयातून हे अंक गोळा करतो.
नमनाला, इतके तेल भरपूर झाले.
आता मुळ मुद्द्याकडे येतो....
ह्यावर्षी खालील अंक घेतले
1. उत्तमकथा
2. आवाज, पाटकर
3. साप्ताहिक सकाळ
4. लोकमत, दीपोत्सव
5. दीपावली
6. लोकसत्ता
7. जत्रा, मेनका प्रकाशन
8. जत्रा, महाराष्ट्राची
9. किस्त्रीम
10. धनंजय
11. मौज
12. माहेर
13. ऋतुरंग
14. मोहिनी
15. पद्मगंधा
16. मिळून सार्याजणी
17. हंस
18. वसा
19. अक्षरगंध
20. मानिनी
21. थिंक पाॅझीटिव्ह
दर वर्षी मी, "शतायुषी" हा अंक घेतोच, पण ह्या वर्षी तो प्रकाशित झाला नाही, असे समजले.
अजून कुठले अंक घेऊ?
प्रतिक्रिया
11 Mar 2021 - 11:56 am | सरिता बांदेकर
लक्की आहात. मी अजून लायब्ररीच्या फेऱयाच मारतेय.
यावर्षीचं काही खरं नाहीय बरेच अंक ॲानलाईन आहेत.
11 Mar 2021 - 12:18 pm | मराठी_माणूस
ही खुप चांगली सवय आहे. दिवाळी अंक हा आपल्य संस्क्रूतीचाच एक भाग आहे आणि ती टिकवुन ठेवायची असेल तर प्रत्येकाने यथाशक्ती काही अंक विकत घ्यावेत.
दिवाळी अंक काढणार्यांना त्यातुन प्रोत्साहन मिळते.
12 Mar 2021 - 12:41 am | सुक्या
सहमत. मी आवर्जुन आवाज / जत्रा / सकाळ चा दिवाळी अंक मागवतो भारतातुन. पार्सल ला पैसे लागतात परंतु त्याला किंमत नाही.
माझे बरेच अंक मित्र परीवारात विखुरले गेले आहेत .. आता कोण वाचत असेल माहीत नाही. त्यामुळे संग्रह असा झालाच नाही.
11 Mar 2021 - 12:49 pm | चौथा कोनाडा
मी देखील २-४ अंक घ्यायचो, मग ४-५ महिन्यांनंतर जवळच्या स्टॉलवरुन इतर घ्यायचो. ऑन-लाईन अवांतर वाचन वाढल्याने गेली २-३ वर्षे यात खंड पडलाय.
२०२० या कोविड वर्षीची गोष्ट्च वेगळी होती.
11 Mar 2021 - 4:44 pm | हस्तर
नवल किति मधे आहे ?
11 Mar 2021 - 5:24 pm | श्रीगुरुजी
महाअनुभव दिवाळी अंक चांगला आहे.
11 Mar 2021 - 9:46 pm | उत्खनक
तुमच्या कडे मग चंद्रकांत खोतांच्या "अबकडई" चे अंक असतील काय? काहीच अंक असावेत.. कारण खोतांनी नंतर ते बंद करून टाकले.. बर्याच वर्षांपासून शोधतोय.
12 Mar 2021 - 7:22 am | मुक्त विहारि
अक्षर, अमृत, अबकडई चे काही अंक आहेत...
16 Mar 2021 - 4:37 pm | राघव
व्यनि करत आहे
11 Mar 2021 - 9:59 pm | nutanm
पुरूषस्पंदन, भटकंती,किल्ले (किल्लयांवरील, नांव नीट आठवत नाही.इतिहासावरील,प्रवासावर, हेरकथांचे असल्यास,युद्ध, किशोर आवडत असल्यास, अमृत व वरील. सर्व. वेगवेगळे विषय, जास्तीत जास्त. विविध विषय वाचण्यास मला आवडतात.हल्ली इतिहास, भूगोल खूप आवडतात.
12 Mar 2021 - 7:25 am | मुक्त विहारि
पण,
सध्या किशोर ऑनलाईन वाचता येतो.
लिंक देतो
http://kishor.ebalbharati.in/Archive/
इथे सगळे अंक मिळतील....
11 Mar 2021 - 10:57 pm | nutanm
अंतरनाद पुढील वर्षी बंद होणार.उत्तम अनुवाद, श्री दिपलक्ष्मी.
17 Mar 2021 - 2:18 pm | असा मी असामी
मस्त आहे.. मागील २५ वर्शे मधले लेख दिले आहेत. एकसो एक लेख आहेत.
19 Mar 2021 - 6:44 pm | मुक्त विहारि
कालनिर्णय मिळाला
3 Apr 2021 - 6:32 pm | मुक्त विहारि
अनुराधा
श्री दीपलक्ष्मी
आवाज, मगदूम
नवल
प्रपंच