गणितं..

मन्या ऽ's picture
मन्या ऽ in जे न देखे रवी...
16 May 2020 - 2:05 pm

गणितं..

आयुष्याच्या पाटीवरची
गणितं माझी चुकली
चुका लपवण्यासाठी
मी ती पटापट पुसली
मनाचा शिक्षक आहे थोर
कडक शिस्तीचा
पुसलेली गणितं
परत परत विचारली

उत्तर देता येईनात
झाली पळता भुई थोडी
माझे मनच होऊनी मैत्र
आता माझी शिकवणी घेई
शिकवणी झाली चांगली
मास्तरांनी सांगितला
एक जालिम उपाय
जुनी शिदोरी पाठीला
नवे अनुभव बांध गाठीला
निर्धास्त होऊन जग
मी आहेच तुझ्या सोबतीला

उपाय कामी आला
अन् आनंदीआनंद झाला
नवे लोक नवी आव्हानं
असतील रोज रोज
कशाला दडायचे
आता थेट भिडायचे
मनसोक्त जगायचे
पण ह्यावेळी
गणितं सोडवताना
भान मात्र ठेवायचे!

-दिप्ती भगत
(६ डिसेंबर, २०१९)

मुक्त कविताकवितामुक्तकगणितचुकाआयुष्य

प्रतिक्रिया

कौस्तुभ भोसले's picture

16 May 2020 - 3:56 pm | कौस्तुभ भोसले

छान

मन्या ऽ's picture

22 May 2020 - 3:43 pm | मन्या ऽ

कौस्तुभ धन्यवाद!

मन्या ऽ's picture

23 May 2020 - 1:34 am | मन्या ऽ

कॉमर्समधुन बाहेर पडता आले.. (स्मायली पाहुनच समजले होते.)
वाचत रहा! :)

गणेशा's picture

23 May 2020 - 7:33 am | गणेशा

मनीचे मन....भारी..

अवांतर :

कॉमर्स वाल्यांचा मला कायम हेवा वाटायचा.. सायन्स ला होतो, गणित आवडता विषय पण इतर वेळेस कॉमर्स असावे असं वाटायचं कायम.

मन्या ऽ's picture

23 May 2020 - 9:23 am | मन्या ऽ

अवांतर: हे आपल्याकडे टक्केवारीमुळे कायम होत आलंय. ज्यांना टक्के जास्त ते सायन्स. जे ऍवरेज ते कॉमर्सला जातात.
ज्यां उरलेले आर्ट्समधे हातपाय मारतात. खुप कमी लोक स्वतःची आवड जपत करिअर चुज करतात. असो. चालायचंच.