मिसळपाव काव्यलेखन स्पर्धा : २०२०
नमस्कार मंडळी,
नुकतीच शासनाने लॉकडाउन आणखी दोन आठवडे वाढवत असल्याची घोषणा केली. म्हणजे आपल्याला आणखी दोन आठवडे घरी थांबायचे आहे. म्हणून मग आपण आणखी एक स्पर्धा आयोजित केली आहे.
सोसुनिया लॉकडाउनचे घाव
पुरता इस्कटलोय, काय सांगू राव
मनी दिसे आता फक्त एकच नाव
मिसळपाव मिसळपाव
काय म्हणतो, बरोबर ना भाव?
प्रत्येकाच्या आतमध्ये एक कवी दडलेला असतो. आणि पुढच्या काही दिवसांत त्याला बाहेर काढायचे आहे. कवितेला विषयाचे कसलेच बंधन नाही. मात्र ही स्पर्धा आहे, तेव्हा आपली कविता इतरांपेक्षा हटके असली पाहिजे याची जरूर काळजी घ्या. कविता लिहिण्यात जो आनंद मिळतो, तो इतर कोणत्याही लिखाणातून मिळत नाही. तेव्हा या आनंदाला मुकू नका..!
तर ह्या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे आहेत -
१) धागा प्रकाशित झाल्यानंतर स्पर्धा लगेचच सुरू होईल आणि २० मे २०२० रोजी २३.५९ भाप्रवे संपेल.
२) स्पर्धकांनी आपली कविता 'साहित्य संपादक' या आयडीला व्यनिने पाठवायची आहे.
साहित्य संपादकांना व्यनि पाठवण्यासाठी क्लिक करा.
कोणत्याही साहित्य संपादकाला वैयक्तिक व्यनिने किंवा मिसळपावच्या अथवा सासंच्या ईमेल आयडीवर किंवा अन्य कोणत्याही दुसऱ्या मार्गाने कविता पाठवू नये.
३) प्रत्येक व्यक्ती जास्तीत जास्त २ (अक्षरी दोन फक्त) कविता पाठवू शकते. मतदान दोन्ही कवितांना होईल, मात्र जर दोन्ही कवितांची मते विजयी क्रमांकाच्या यादीत आली, तर दोन्हींपैकी ज्या कवितेला जास्त मते मिळालेली असतील, ती एकच कविता विजेती धरली जाईल.
४) ०३ मे २०२० ते २० मे २०२० या काळात दर चोवीस तासांतून एकदा साहित्य संपादक आयडी आलेल्या कविता स्वतःच्या नावाने प्रकाशित करेल. मूळ कवीचे नाव जाहीर होणार नाही. ('कविता बघून मत देण्याऐवजी आयडी बघून मत देतात' हा आक्षेप घेतला जाऊ नये, म्हणून हे करण्यात आले आहे.). स्पर्धा संपल्यावर कवींची ओळख जाहीर करायचीच आहे.
५) मूळ कवीने आपली ओळख जाहीर करू नये अशी अपेक्षा आहे. कवितेच्या धाग्यावर, मिपावरच्या सार्वजनिक जागेत (अन्य धाग्यांवर किंवा खरडफळ्यावर), मिपाच्या फेसबुक पानावर किंवा ट्विटर अकाउंटवर आपली ओळख कवी म्हणून जाहीर केल्यास ती कविता रद्दबातल ठरवून स्पर्धेतून बाद केली जाईल.
६) साहित्य संपादक कविता प्रकाशित करताना मुळाबरहुकूम (म्हणजे जशी आली तशी) करतील. मुद्रितशोधन किंवा अन्य कोणतेही संपादकीय संस्कार केले जाणार नाहीत. स्पर्धेमधल्या कवितेमध्ये व्याकरणाचे नियम, शुद्धलेखन, मुद्रितशोधन वगैरेची जबाबदारी संपूर्णपणे स्पर्धकाची असेल.
७) एकोळी, दोनोळी किंवा चारोळी पाठवू नये. तसेच दीर्घ कविताही स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत. याबाबत काही अपवाद असतील तर त्याचा संपूर्ण निर्णय साहित्य संपादक घेतील.
८) तसेच, कवितेत कोणतीही चित्रे, दृक्-श्राव्य दुवे, फॉरमॅटिंग वगैरे असल्यास ते वगळून कविता प्रकाशित केली जाईल.
९) जातिधर्माला दुखावणारे, राजकीय किंवा सामाजिक द्वेष पसरवणारे, वा अश्लील लेखन आल्यास कविता स्पर्धेसाठी न घ्यायचा निर्णय संपादकीय अधिकारात घेतला जाईल. प्रवेशिका नाकारायचा अधिकार साहित्य संपादक राखून ठेवत आहेत. स्पर्धा संपल्यावर कवी नियमबाह्य कविता स्वतःच्या जबाबदारीवर प्रकाशित करू शकतात.
१०) कवितेला आपण देऊ इच्छित असणारे नाव व्यनिच्या विषयामध्ये लिहिलेले असावे.
११) कुठेही पूर्वप्रकाशित कविता स्वीकारली जाणार नाही.
१२) कविता आधारित असल्यास, कवितेच्या शेवटी तसा स्पष्ट उल्लेख करावा.
कविता प्रकाशित झाल्यावर लगेच मतदान सुरू होईल आणि दि. २३ मे २०२०, २३.५९ भाप्रवेपर्यंत करता येईल.
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.
सदस्यांनी मतदानाबरोबरंच अभिप्रायाचे दोन शब्दही जरूर लिहावेत, ही विनंती. याचा कवीला जरूर लाभ मिळेल.
निकाल दिनांक २५ मे २०२० रोजी घोषित केला जाईल.
विजेत्यांना मिसळपाव दिवाळी अंक २०१९ची छापील प्रत बक्षीस म्हणून देण्यात येईल (विजेता भारतामध्ये असल्यास).
भारताबाहेरील विजेत्यांची प्रत त्यांच्या जवळच्या व्यक्तीला देता येईल.
लेखन करण्याविषयी / व्यनिविषयी / स्पर्धेविषयी कोणतीही शंका अथवा अडचण असल्यास प्रतिसादांमध्ये विचारू शकता.
एक मार्गदर्शिका -
कविता मराठीमध्ये असावी. एखादे हिंदी-इंग्लिश वाक्य कवितेची गरज म्हणून चालेल, पण कविता मराठीत हवी. प्रमाण मराठी, झाडीबोली, वऱ्हाडी, खान्देशी, सातारी, पुणेरी, आगरी, मालवणी... कोणतीही पण मराठीत हवी..
body {
background: url(https://i.postimg.cc/B6qm6LSv/flower-background-312907.jpg);
background-size: 900px;
}
प्रतिक्रिया
3 May 2020 - 3:57 pm | चांदणे संदीप
झाली.... धुराळा... धुराळा....निस्ता धुराळा...!
मघाशीच अंदाज आला होता. :)
आता टीशर्टाच्या बाह्या मुडपून घेतो.
होय, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून टीशर्टातच आहे. अर्थात वेगवेगळ्या! ;)
सं - दी - प
3 May 2020 - 6:53 pm | गणेशा
तुमच्या ह्या प्रतिसादाचा हुरूप पाहता मला तुम्ही पुन्हा विजेत्याच्या रूपात दिसत आहे..
All the best
3 May 2020 - 7:30 pm | चांदणे संदीप
कुठल्याही प्रकारची स्पर्धा ज्यात आपल्याला स्पर्धा करून चुरस निर्माण करता येईल अशा सगळ्या ठिकाणी मला सहभाग घ्यायला आवडतो. जिंकणाऱ्याला सुद्धा समाधान वाटलं पाहिजे की कुठल्या अमक्या तमक्याला नाही तर खमक्याला हरवून जिंकलोय! ;)
सं - दी - प
4 May 2020 - 11:17 am | तुषार काळभोर
भले शाब्बास !!!
3 May 2020 - 4:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कविता म्हणजे काव्य आपलं पहिलं प्रेम. प्लस वन देईल की नै, ते माहिती नै. पण दाद नक्की देईन.
सर्व कवींना शुभेच्छा....!
-दिलीप बिरुटे
(शुभेच्छूक पडीक मिपाकर)
3 May 2020 - 5:16 pm | मोदक
झकास स्पर्धा...
शेवटी ते खराटा झालेलं झाड का दाखवलंय..? एखादे मस्त हिरवाईने भरून गेलेले, पानाफळांनी लगडलेले झाड लावा की तिथं.
3 May 2020 - 5:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आंतरजालावर तुमच्याशी इतक्या लवकर सहमत होण्याचा बिकट प्रसंग येईल असं वाटलं नव्हतं. (ह.घ्या)
खराटा झाड़ाच्या बाबतीत सहमत. काही तरी झाडाला पालवी फुटलेलं, सृजनशीलतेचं प्रतीक. एखादी सुंदर महिला ज्यामुळे मनाला पालवी वगैरे असे काहीही चाललं असतं, असेही वाटलं.
खराटं झाड़ हे उदासवाण्याचं प्रतीक वाटलं. निषेध म्हणून साहित्य संपादकांना खरड़हित 'आवरा' असे म्हणून पुष्पगुच्छ देण्यात येईल. ;)
-दिलीप बिरुटे
3 May 2020 - 6:13 pm | चांदणे संदीप
प्रा. डॉ. सर घ्या.... कोकणचा हिरवागार किनारा लावलाय आता.
लोकशाही लोकशाही म्हणतात ती हीच काय? ;)
मला खरं तर ते बोडकं झाडंही आवडलेलं. त्याला आपापल्या काव्यातून सार्या कवींनी फुलवायचं असा अर्थ सासंना अपेक्षित होता का काय असे मला वाटलेले.
सं - दी - प
3 May 2020 - 7:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला खरं तर ते बोडखं झाडंही आवडलेलं. पण काही सदस्यांच्या खराटा झाडांच्या फोकसमुळे माझाही फोकस हटला. साहित्य संपादकांनी बदलायला नको होतं ते खराटा झाड़. बरं होतं पहिलंच.
''एक नकोसं खराटं झाड
माझ्या समोर उभं असतांना,
उजाड़ माळरानावर
निष्पर्ण श्वासांचा पाचोळा
वावटळीत लपेटलंलं''
'एक बोडखं झाड़ मनात वाढत होतं की साहित्य संपादकांनी चित्र बदलून माझ्या आनंदावर विरजन घातलं. छ्या...! :(
-दिलीप बिरुटे
4 May 2020 - 12:57 pm | मोदक
काय राव प्राडॉ.. छ्या..
रोज छापाकाटा करून भुमीका ठरवत आहात का आजकाल..? पप्पूला इतके पण फॉलो करू नका हो. ;) (ह. घ्या.)
4 May 2020 - 1:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गप्पू पेक्षा पप्पू बरा अशी नवी म्हण सध्या प्रचलित होत आहे.
लोक नावं ठेवतील म्हणून लॉकडाऊनच्या एक्सटेंशनला गप्पू आला नै म्हणतात.( ह.घ्या)
-दिलीप बिरुटे
4 May 2020 - 1:00 pm | मोदक
हा असला पुष्पगुच्छ द्या.. ;)
5 May 2020 - 1:31 am | भीमराव
5 May 2020 - 1:33 am | भीमराव
3 May 2020 - 6:42 pm | गुल्लू दादा
कधी केली नाही बा कविता पण स्पर्धा म्हंटल की आपोआप जोश येतो. कश्या का होईना 2 नक्की पाठवण्यात येतील. स्पर्धेबद्दल आयोजकांना आगाऊ धन्यवाद.
3 May 2020 - 6:48 pm | गणेशा
जुन्या कविता चालणार नाही हि मोठी शिक्षा आहे...
आताशा कविता लिहिणे जमतच नाही..
प्रयत्न करतो पण..
लेख लिहिले गेले तर कविता पण सही...
3 May 2020 - 6:55 pm | ज्योति अळवणी
मजा येईल एकूणच
3 May 2020 - 6:58 pm | ज्योति अळवणी
मजा येईल एकूणच
4 May 2020 - 7:45 am | प्रचेतस
येऊ दे एकापेक्षा एक सरस कविता.
4 May 2020 - 11:13 am | रुपी
अरे वा! छान.
कवितेतलं फार कळत नाही, तरीही वाचायला उत्सुक :)
4 May 2020 - 11:28 am | तुषार काळभोर
तशा कविता पण प्रफुल्लित करणाऱ्या, उत्साहित करणाऱ्या, चाळीस डिग्री उन्हात रेबॅन घातल्यावर कसं गार्गार वाटतं, अशा येऊद्या सज्जन हो...
Corona, lockdown, राजकारण (ढेंगली- पिंपळगाव ते Pyongyang व्हाया वॉशिंग्टन अन् मिसळपाव ते दिल्ली व्हाया मुंबई) यांना लांबच राहुद्या..
5 May 2020 - 12:19 pm | भीमराव
5 May 2020 - 12:19 pm | भीमराव
6 May 2020 - 12:22 pm | मोदक
तुम्ही मोबाईलवरून टाईप करताना फोन मधील एखादी स्मायली वापरत आहात का..?
त्या शिवाय प्रतिसाद प्रकाशित करून बघा...
6 May 2020 - 11:05 am | गणेशा
एक विंनंती.
गेल्या sashak सारखे एकत्र कविता पाहता येतील का?
वेळ लागत असेल तसे करायला तर जाऊद्या..
शनिवारी रविवारी एकत्रच सगळ्या वाचता येतील.. नं शोधता असे वाटले मला
6 May 2020 - 1:41 pm | सुमो
शशक २०२० च्या धाग्यावरच कविताही एकत्रित दिसताहेत.
http://misalpav.com/shashaka
6 May 2020 - 2:53 pm | जव्हेरगंज
किंवा इथेही
http://misalpav.com/shashak2020.html
7 May 2020 - 2:21 pm | गणेशा
धन्यवाद.. वरती साईट open केल्यावर हा दुवा दिसला तर बरे होईल.. दरवेळेस येथे येऊन लिंक वर क्लिक करावि लागते आहे
7 May 2020 - 3:45 pm | जव्हेरगंज
वरती काळ्यापट्टीवर
शतशब्दकथा २०२०
लिहीलेलं आहे. ही सेम तिच लिंक आहे. शशक आणि कवितेसाठी कॉमन.6 May 2020 - 5:29 pm | टर्मीनेटर
छोटीशी दुरुस्ती...
इथे "कथा" ऐवजी 'कविता' किंवा 'काव्य' असा बदल करण्यात यावा ही विनंती!
7 May 2020 - 2:19 pm | गणेशा
सर्वांच्या कविता वाचताना, त्यावर रिप्लाय देताना जुने दिवस आठवले... मन पुन्हा 2007-2011 ला गेले..
खुप छान वाटले.. कविता कोणाची हे तेंव्हा हि फरक पडत नव्हता.. आता तर ती कोणाची हे हि माहित नाही..
धन्यवाद.. नाहीतर कवितेशी आताशा आम्ही कसलीच सलगी ठेवली नव्हती..
7 May 2020 - 3:19 pm | मोदक
कवितेशी आताशा आम्ही कसलीच सलगी ठेवली नव्हती..
एखाद्या फर्मास गझलेची सुरुवात आहे ही गणेशा... लिही आणखी...
8 May 2020 - 12:06 pm | अत्रुप्त आत्मा
साहित्य संपादक वर व्यनि जात नाहीये
This page isn’t working www.misalpav.com is currently unable to handle this request.
HTTP ERROR 500
हा मेसेज येतोय गेला 1 तास.
कृपया मेल एड्रेस द्या.
8 May 2020 - 12:52 pm | जव्हेरगंज
जातोय की. मी आताच ट्राय केलं. खालची लिंक वापरुन पहा.
https://www.misalpav.com/messages/new/27432?destination=user/27432
8 May 2020 - 2:59 pm | अत्रुप्त आत्मा
This page isn’t working www.misalpav.com is currently unable to handle this request.
HTTP ERROR 500
8 May 2020 - 3:28 pm | साहित्य संपादक
व्यनी केला आहे. पहा.
8 May 2020 - 7:11 pm | मोगरा
नमस्कार !
हा माझा मिसळपाव वरील पहिलाच रिप्लाय.
नविन संकेताक्षर युज करुन लॉगईन केल्यावर एर्रर येत आहे.
कोणी मदत करता का प्लीज
8 May 2020 - 9:38 pm | जव्हेरगंज
नक्की कोणता एरर येतोय खालील लिंक वर व्यनि करून कळवा.
बाय द वे, पहिल्यांदा लॉगिन केल्यावर पासवर्ड बदलावा लागतो.
https://www.misalpav.com/messages/new/27432?destination=user/27432
8 May 2020 - 9:23 pm | सचिन
"साहित्य संपादकांना व्यनि पाठवण्यासाठी क्लिक करा" यावर क्लिक केले असता "अॅक्सेस डिनाईड" करण्यात आला. मला व्यनि कसा पाठवता येईल ?
8 May 2020 - 9:34 pm | जव्हेरगंज
क्लिक केल्यानंतर लॉगिन आहे का चेक करा. कधीकधी ओपोआप लॉगआऊट होते.
8 May 2020 - 10:45 pm | सचिन
हो.. लॉगिन होतच ...
पण आत पुन्हा प्रयत्न केला .. आणि प्रोब्लेम सुटलेला दिसतो आहे.
आभार !!
9 May 2020 - 9:51 am | चांदणे संदीप
हुश्श! आज, पहिल्या फेरीत आतापर्यंत आलेल्या सगळ्या कविता एकदम वाचून काढल्या, व गुण्/प्रतिसाद देऊन झाले.
या आवाहनाला प्रतिसाद देऊन सर्व कवितांवर दोन शब्दही लिहिले. आशा आहे, ज्यांना नकारात्मक प्रतिसाद दिले आहेत ते सकारात्मक घेतील व माझ्या घराचा पत्ता शोधित येणार नाहीत! ;)
एक खंत वाटली, ती म्हणजे मोजक्याच कविता आवडल्या. यापेक्षा आधिक उत्तम कवितांची अपेक्षा होती. आता येणार्या कवितांवर लक्ष असेल.
सं - दी - प
9 May 2020 - 9:53 am | चांदणे संदीप
नकारात्मक नाही तर नकारार्थी!
सं - दी - प
9 May 2020 - 10:11 am | गणेशा
संदीप भाऊ..
सर्वप्रथम तुमचे अभिनंदन.. तुमचे बरेचसे रिप्लाय पाहिले आणि आवडले.
एका कवीने इतर कवींना अभिप्राय देणे हेच एकदम छान आहे..
तुम्ही स्पष्ट आणि तुमच्या मनाला खरे वाटणारे प्रतिसाद दिलेत.. आवडले.
----------
बऱ्याच ठिकाणी माझे आणि तुमचे मत वेगळे आहे.. पण तुमचा अभिप्राय मला तेथेही योग्य वाटतो..
उदा. द्यायचे झाल्यास घरट्या संधर्भातील कविता (कालाय.. अश्या नावाने बहुतेक )
तुमचे मत परखड आहे.. योग्य आहे. एका स्पर्धे साठी हे योग्यच...
माझे प्रतिसाद मात्र मी स्पर्धा आहे म्हणून दिले नाहीत
मला वाटते येथे कोणी मोठा कवी नाही (अपवाद वगळता )
त्यामुळे त्याच्या विचारांना सलाम केला पाहिजे..
कदाचीत त्याच्या भावना दाखवायला शब्द कमी पडत असतील, तो कविता लिहितच नसेल कधी तर?
मग अश्या कवितांना +1 देऊन 2 जरी नव कवी किंवा त्यांना आवड निर्माण करू शकलो तर मस्तच ही माझी भावना..
आपण वेगवेगळ्या भावनेने रिप्लाय दिलेत, रिप्लाय देणे महत्वाचे...
स्पर्धा झाल्यावर मात्र, मी पुन्हा 2010-11 सारखे रिप्लाय देणार काव्य विभागात...
कविता 9 वर्षे झाले लिहीत नाही.. पण रिप्लाय लिहिले पाहिजे याची जाणीव झाली. नव्हे मला कविता लिहिणे नाही कवितेला रिप्लाय देणेच आवडते...
21 May 2020 - 7:42 am | चांदणे संदीप
निवांत उरलेल्या कविता वाचून त्यावर गुण देऊन झाले.
स्पर्धेच्या उत्तरार्धातल्या कविता आधिक सकस होत्या. (माझ्या दोन्हीही पूर्वार्धात! लोल!)
आवडलेल्या कवितांची यादी लिहिणार होतो पण निकाल येईपर्यंत थांबतो. काही ओळखीच्या आवडत्या कवींना पण कदाचित निगेटीव्ह रिमार्क देऊन आलो असेन. ते निकालानंतर पाहणे मजेशीर ठरेल. ;)
सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!
सं - दी - प
10 May 2020 - 10:54 am | बिपीन सुरेश सांगळे
हा देखील मस्त उपक्रम
खूप शुभेच्छा
साहित्य संपादकांना व्यनि जात नाहीये
10 May 2020 - 11:04 am | साहित्य संपादक
व्यनि केला आहे. पहा.
10 May 2020 - 11:55 am | पाषाणभेद
संपादकांना विनंती आहे की काव्य/ कविता/ गीत आणि गजल हे दोन स्वतंत्र काव्यप्रकार गणले जावेत. कवितांवर अकारण अन्याय होवू नये.
http://www.misalpav.com/node/46755
मिपावर काव्यलेखन स्पर्धा २०२० आयोजीत केली आहे. हे वाचून मनापासून आनंद आला.
सांप्रत काळात कवी आणि कवितांना इतर साहित्यप्रकारापेक्षा कमीपणाचे लेखले जाणे हे प्रतिष्ठेचे मानले जात आहे. "मला कवीता समजत नाही तरीपण वाचून मी प्रतिसाद दिला" - असे लिहीणे एकप्रकारे उपकार केल्यासारखे वाटते.
या पार्श्वभुमीवर मिपाने कवितांची स्पर्धा आयोजीत करणे अभिमानास्पद आहे.
काव्यस्पर्धेला शुभेच्छा!!
20 May 2020 - 11:21 am | साहित्य संपादक
आज स्पर्धेसाठी कविता देण्याचा शेवटचा दिवस आहे! त्वरा करा!!
24 May 2020 - 10:50 am | पाषाणभेद
उत्तमोत्तम कवितांचा संग्रह झाला आहे या स्पर्धेत. एकास एक वरचढ चढओढ!
आणि मुख्य म्हणजे कविता स्विकारून त्या त्या कविंचे नाव जाहीर न करता कविता प्रकाशीत करणे (अन आम्ही त्या न नावानिशी वाचणे) यात आनंद आहे. कसलेही लेबल न लागता आस्वाद घेता येत आहे.
स्पर्धेदरम्यान वेळ मिळाला नसल्याने आता त्या सावकाश वाचतो आहे.
गुणांसाठी वेळेत +१ देता आले नाही त्याबद्दल कवि मित्र क्षमा करतील याची अपेक्षा आहे.
24 May 2020 - 11:50 am | गुल्लू दादा
सर्व सहमत.
24 May 2020 - 1:08 pm | चांदणे संदीप
आत्ताच पुन्हा एकदा आवडलेल्या कविता आणि नवे प्रतिसाद वाचून आलो. सहज पाहिलं तर एक गोष्ट लक्षात आली की, स्पर्धेत एकूण साठच्या वर कविता आलेल्या. एका कवीने (किंवा तसे स्वतःला समजणार्याने) दोन कविता दिल्या असे जरी मानले तरी एकाही कवितेवर सर्वच्या सर्व स्पर्धकांनी गुणदान अथवा प्रतिसाद दिला नाही असेच दिसते. अगदी वीस किंवा त्यापेक्षा आधिक प्रतिसादांचा टप्पा ओलांडणार्या कविता केवळ दोन आहेत. कविता कशीही असो, चांगली अथवा वाईट, लिहिणारेच प्रतिसाद देत नसतील तर निव्वळ वाचणार्यांकडून काय अपेक्षा ठेवायच्या?
सं - दी - प
24 May 2020 - 1:16 pm | जव्हेरगंज
सहमत आहे!
कवीच कवितेला प्रतिसाद देत नसतील, तर कविता विभागाला 'दुर्लक्षित' म्हणण्याला काय अर्थ आहे?
24 May 2020 - 1:20 pm | गणेशा
मी ही आज सकाळी पुन्हा सगळ्या कविता वाचून काढल्या...
कवितेला मी दिलेला प्रतिसाद वाचून पुन्हा छान वाटले..
'कळ' कवितेला दिलेला प्रतिसाद मला उगाच हसवून गेला.. ती त्या दिवशी वाचली नसती तर तो प्रतिसाद नसता माझा...
बाकी प्रतिसादाचे चालायचेच... ज्याचे त्याचे.. सोडून द्यायचे..
24 May 2020 - 6:24 pm | स्वच्छंद
बरोबर आहे आपलं. बरी वाईट कशी का असेना प्रतिक्रिया देणे महत्त्वाचे. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर वेळेअभावी बऱ्याच कविता वाचल्या नाहीत पण आता वाचून प्रतिक्रिया नक्की देईन. किमान चांगल्या प्रतिक्रिया तरी देईनच. निकाल काहीही लागू दे
24 May 2020 - 2:48 pm | मोगरा
सर्व कविता आज पुन्हा वाचल्या, मस्त आहेत.
सर्व कवितेंना रिप्लाय द्यायला जमले नाही.
माझी कविता द्यावी म्हंटले होते, पण नाही जमले ते हि
24 May 2020 - 4:27 pm | प्राची अश्विनी
सर्वच कविता वाचल्या . आवडल्या त्यावर प्रतिसाद पण दिले.
24 May 2020 - 4:53 pm | तुषार काळभोर
एकूण स्पर्धक किमान तीस ते चाळीस असतील, आणि सरासरी प्रती कविता प्रतिसाद दहापेक्षा कमी.
म्हणजे वीस ते तीस जणांनी इतर कवितांवर प्रतिसाद सुद्धा दिले नाहीत.
आवडली - आवडली नाही किंवा मग प्रतिसाद देण्या एवढी सुद्धा बरी नाही.
24 May 2020 - 6:26 pm | स्वच्छंद
मला वाटतं आवडलेल्या कवितांची यादी प्रत्येकाने टाकूयात निकाल लागण्यापूर्वी. अर्थात निकालावर याचा परिणाम होणार नसेल तर. आणि तसं ही निकाल लागल्यात जमा आहे तेंव्हा काय हरकत आहे?
24 May 2020 - 8:42 pm | चांदणे संदीप
मलाही असेच वाटलेले.
मी माझी यादी देतो थोड्याच वेळात!
सं - दी - प
24 May 2020 - 8:52 pm | गणेशा
आयडिया चांगली आहे..
मजेने लिहितोय -
पण माझ्या कवितेला तिकडे हि कमी रिप्लाय आलेले..
अगदी वरच्या आजूबाजूच्या कवितेला +1 वर +1 आणि आम्ही मोकळे..
मग येथे हि पुन्हा कपाळ मोक्ष ठरलेला..
देवा रे वाचव मला..