बाटाट्याचे उपयोग
स्वयंपाकघरात गाल फुगवून बसला होता बटाटा
अंगावरल्या डोळ्यांनी मला पाहत होता ||
माझ्याशी बोलायला लागला तो जेव्हा
खरे नाही वाटले मला तेव्हा
तुम्हालाही वाटेल मी सांगे हा प्रसंग खोटा ||
"
खाण्यामध्ये उपयोग माझे आहेत खूप मोठे
तरी तुम्ही का बोलतात डोक्यात आहे कांदे बटाटे
नाकाने सोलाल कांदे तर आहे तुमचाच
तोटा ||
कांद्याचे वाढले ना रे बाजारी भाव
चढ्या दराने गंजले सारे रंकराव
आता मला आला आहे मान मोठा ||
कधीही मी कामी येई जेव्हा नसे भाजी ताजी
कोणत्याही भाजीत मिसळून जाण्या मी राजी
बहुगुणी असा सगळ्या भाज्यांत शहाणा मोठा ||
माझी करा रस्सा भाजी सुकी भाजी मटार बटाटा भाजी
किंवा करा मिक्स भाजी नाहीतर पाव भाजी
कुकरमध्ये उकडून घ्या किंवा मेथी पालकात टाका ||
खिचडीत टाका बघा चव कशी छान न्यारी
वांगी बटाटा भाजी आवडीने खातात सारी
माझ्यासवे बनवा सार भाजी घेवून टमाटा ||
माझे बनवा वेफर्स, फिंगर चिप्स, काप कापून
छोटे उद्योग झालेत मोठे त्या साऱ्याला विकून
पिकवून शेतकरी व्यापारी हाती मोजती नोटा ||
"
इतक्यात घाईने आई आली स्वयंपाकघरात
प्रश्न विचारी आज काय देवू तुला डब्यात?
बटाटा कर मी म्हटले अन केला त्याला बाय बाय टाटा ||
- पाषाणभेद
०९/१२/२०१९
प्रतिक्रिया
9 Dec 2019 - 8:26 am | पाषाणभेद
कृपया कवितेचे शिर्षक
"बटाट्याचे उपयोग" असे वाचावे.
( संपादकांना विनंती आहे की आपण शिर्षकात बदल करावा.)
9 Dec 2019 - 9:43 am | mrcoolguynice
छान कविता.
बा द वे निर्महला सिथारामन यांना पाठवायला हवी ही कविता.
कारण त्यांच्या घरी त्या कांदा वापरत नाही, त्यामुळे त्या त्यांच्या डोक्यातील बटाटे काढून, त्याचा त्या घरी बराच उपयोग करू शकतील.
12 Dec 2019 - 9:02 pm | मुक्त विहारि
छान लिहिलंय.
जिथे काही कमी तिथे बटाटा.