कुरबुर झाली
(काल रात्री साडे तीन वाजता पाणी बचतीवर एक पथनाट्य लिहीले. एका व्हाट्सअॅप गृपमध्ये येथील सदस्य दुर्गविहारी अन दीपक११७७ यांनी झोप घेत चला अन काही कुरबुर झाली असेल असे विनोदाने लिहीले. सकाळी मी ते वाचले अन मग त्यांना देण्याचे उत्तर या गीतलेखनातून लिहीले.)
तुझ्यासंग माझ्यावाली
कुरबुर झाली ग कुरबुर झाली
त्यानेच माझी झोपायाची
ग झोपायाची पंचाईत झाली ||धृ||
काल मी तुला नाही दाखवला
सिनेमा प्लेक्समंदी
आवड तुला पाहायाची अंधारात
सिनेमा कोप-यामधी
तिकीट नाही मिळाले तर
येवढ्यावरून चिडली
अन मग
तुझ्यासंग माझ्यावाली
कुरबुर झाली ग कुरबुर झाली||१||
नाही घेतली ग घेतली मी तुला
साडी जरी पैठणीची
नाही भरवला मी तुला नाही भरवला
काल तुला पेस्ट्री केक मावावाला
विसरलो मी तुझा वाढदिवस
माफी मला मागावी लागली
अन मग
तुझ्यासंग माझ्यावाली
कुरबुर झाली ग कुरबुर झाली
त्यानेच माझी झोपायाची
ग झोपायाची पंचाईत झाली||२||
- विसराळूभेद पाषाणभेद
२३/०६/२०१९
प्रतिक्रिया
23 Jun 2019 - 3:01 pm | दीपक११७७
हा हा छान
23 Jun 2019 - 3:39 pm | दुर्गविहारी
हायला ! एकंदरीत अच्च झालं तलं. ;-)
23 Jun 2019 - 6:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
=)) =)) =))
23 Jun 2019 - 8:56 pm | जॉनविक्क
अजून बरंच काही भेदता.