माझ्या आठवणीतला तात्या

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
17 May 2019 - 10:46 pm

"आम्ही तात्याला पहिला नाही"अशा काही प्रतिक्रिया पाहिल्या आणि वाटलं, तात्याचे चार फोटू टाकावेत.

मात्र जे फोटो डोळ्यापुढे होते, ते संगणकात नव्हते हे जाणवले आणि स्व्तःवरच चरफडलो.
२००५ च्या सुमारास शिवाजी पार्कवर भरलेल्या पहिल्या वहिल्या कट्ट्यात टिपलेले "असा घ्यायचा शास्त्रिय संगिताचा आस्वाद"यावर तात्या रंगात येऊन बोलत असतानाचे फोटो.....
मधे एकदा अचानक पुण्याला जायची लहर आली. मी, तात्या, जयन्तराव कुलकर्णी, बहुधा माधव कुलकर्णी पण होते. काही पुणेकर मंडळी थेट तिथेच मैफिलीत सामिल झाली, रात्री बरोबर मैफल रंगत गेली. गप्पा रंगत गेल्या, मध्यरात्रीनंतर डावा हात कानावर घेऊन उजवा हात वर करत यमन गाताना टिपलेला तात्याचा फोटो आणि तात्याचा फोटो मोबाईलवर टिपत असताना काढलेला पेठकर साहेबांचा फोटो

तात्यानच गोळा केलेल्यांत सामावून रॉयल चॅलेंज मध्ये जमलेल्या धमाल गप्पांचा फोटो

बदललेले संगणक, बॅक अप घेताना गोची होऊन अनेक फोटो गेले. अखेर शोधता शोधता एका ठाणे कट्ट्याचे फोटो सापडले. मोठा जोरदार कट्टा झाला होता. तात्या, जयन्तराव कुलकर्णी, माधव कुलकर्णी, अत्यानंद, कुमार जावडेकर, अजब, शंतनु, केशव सुमार, नरेन्द्र गोळे, आनंद घारे, डॉ विलास पवार, डॉ मिलिंद फणसे, छाया राजे, चित्तरंजन भट या व अशा अनेक थोरा मोठ्यांनी हजेरी लावली होती. त्या वेळचे हे फोटो

t1

t2

t3

t4

तात्याचा आनंदी चेहरा आणि आग्रही आवाज, बोलण्यातली लगबग अजूनही आठवते. माझ्यावर तात्याचा का कुणास टाऊक पण जीव होता. एकदा रात्री रामदासांचा'फोन, 'साक्षी, उत्सवला बसलोय तात्या आठवण काढतोय, पाठोपाठ तात्याचा आवाज, अरे बाबा ये लवकर. 'तात्या, अरे आता तुमचा कार्यक्रम संपत आला असेल'माझी एक शंका. लगेच उत्तर 'अरे, नाही बाबा तू ये, आम्ही आहोत'. आता हजेरी लावण्याखेरीज गत्यंतर नव्हतं. तिथे पोचताच तात्याच्या चेहर्‍यावर दिसलेला आनंद डोळ्यापुढे आहे.

'आयला झक मारली आणि पिऊन स्कूटर चालवली. ***** नेमका पकड्लो गेलो, *** ऐकायला तयार नाहीत रे, साल्यांनी रात्रभर पोलिस स्टेशनला रखडवलं, सकाळी कोर्टात हजर केलं, साला ******* एकदाचा जज 'कबूल'म्हणून दंड भरून सुटलो. आता कानाला खडा, पिऊन गाडीला हात लावणार नाही असं साभिनय सांगणार्‍या तात्या.

एक दिवस अचानक कचेरीत तात्याचा फोन, 'अरे साक्षी आपला नंदन आलाय, आत्ता त्याला घेऊन मामलेदारला आलोय'

'मनोगत'चं गंभीर वातावरण न भावलेल्या तात्याने एक दिवस मिपा चालू केलं. काही कारणास्तव मी तेव्हा सदस्यत्व घेतलं नव्हतं. आणि एक दिवस तात्याचा रात्री फोन, 'अरे हे काय रे? तू माझा गाववाला आणि मिपावर नाहीस असं म्हणत माझी हजेरी. मी येतो म्हणालो. तात्यानं सांगितलं, तुझा आयडी राखून ठेवला आहे, पासवर्ड मेल केला आहे, दाखल हो. मी उलट फोन मारला, 'तात्या, पासवर्ड ची गोची दिसते रे लॉग इन होत नाही. क्षणांत तात्याने उलट फोन केला, पासवर्ड चंद्रशेखर, आता सरळ दाखल हो. आणि नुसता येऊ नको, मला उद्या एक मस्त लेख हवा. मी सदस्य झालो आणि 'माझी नवी मैत्रीण हा लेख टाकला. तेव्हा खुष झालेला तात्या

क्रांतिकारकांवरचा माझा एखादा लेख आवडल्यावर 'मिपाला श्रीमंत करणारा'लेख असे तोंड्भरुन कौतुक करणारा तात्या.

मध्यंतरी बरच काही घडून गेलं. माझा मिपावरचा वावरही कमी झाला होता. मिपावर एकदा दाखल झाल्यावर बरीच गड्बड होऊन गेल्याचं वाचनात आलं. काही पत्ताच लागत नव्हता. मग काही ओळखीच्या सदस्यांकडून काही समजलं. त्यालाही अनेक दिवस झाले. अचानक एका दोन जानेवारीला तात्याची खूप आठवण झाली. मी, रामदास, संतोष आमची फोनाफोनी झाली. अखेर राम्दासांनी तात्याला राजी केलं. रात्री नऊच्या सुमारास मी, रामदास, संतोष (बहुतेक आणखी एकजण असावा, आता आठवत नाही) महेश लंच होम्वर जमलो. तात्याला वाढदिवसा निमित्त मच्छी खायला घालायची होती, दोन घोट घ्यायचे होते. तात्या येतो की नाही अशी धाकधुक होती. पण तो आला. सगळे जेवलो, तात्या अस्वस्थ होताअसं वाटलं आणि ते साहजिक होतं. सात आठ वर्षं झाली असावित या गोष्टिला. ती अखेरची भेट.

पुन्हा कधीही तात्या भेटला नाही आणि फोनही लागला नाही. परवा अचानक तात्या गेल्याचं समजलं. तात्याच्या सगळ्या गाठी भेटी डोळ्यापुढे उभ्या राहिल्या.

जीवनमानप्रकटनविचारसद्भावना

प्रतिक्रिया

कंजूस's picture

18 May 2019 - 5:11 am | कंजूस

मित्रपरिवारत रमणारे व्यक्तिमत्व दिसतय!

वरुण मोहिते's picture

18 May 2019 - 8:04 am | वरुण मोहिते

उत्तम आठवण

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 May 2019 - 9:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्याच्या आठवणी उत्तम.

च्यायला, मी कैच नै लिहू शकत.

- दिलीप बिरुटे

यमनकल्याण गायनाचा तात्यांचा एक व्हिडिओ ....

https://youtu.be/UYt5vnxQpHw

" रोशनी " जेव्हढं पण लिहिलं आहे, आजच वाचायला घेतलं आणि वाचून संपवलं .. काय ओघवतं लिहिलं होत , तात्यांनी .. खरंच वाईट वाटतंय , तुमच्या जाण्याबद्दल ...

मी कोंडून घेतलंय स्वतःला

जागा हळूहळू कमी होत चाललीय

एवढी कि आता फक्त तिथे कसाबसा उभा राहतोय

त्या एवढयाश्या जागेवरूनच अवतीभवती पाहतोय

मी आणि माझा मेंदू , मेंदू आणि मी

एक अविरत चाललेली लढाई

विचारांची त्सुनामी , भावनांचे वादळ

अवहेलनांचा पाऊस आणि बरेच काही

कुठेतरी दूर एक आशेचा किरण दिसतोय

इथे मात्र मिट्ट काळोख आणि त्या तेवढ्याच जागेवर उभा राहणारा मी

गुदमरतोय जीव माझा , पण मोकळीक कुठेच दिसत नाही

आधी मेंदूची लढाई सुरु होती

आता श्वासांच्या सैनिकांनी त्यामध्ये उडी घेतली

किती मोजू आणि किती घेऊ आणि का घेऊ ?

तरीही घेतोय , कारण ...कारण...

माझ्या नाकाला ती सवय लागलीय

आणि त्या हळव्या हृदयालासुद्धा

ज्याला स्पंदनाशिवाय जगणे मान्यच नाही

एक फक्त एक जीवघेणी कळ

आणि हेलावून जाणारी , आरडाओरडा करणारी वृद्ध आई

बस्स .... मग मिट्ट काळोख आणि काळोख , दुसरं काही नाही .....

कुणी आहेत का मिपाकर , जे सांगू शकतील , त्यांच्या पश्चात त्यांच्या आईचे कसे काय होणार आहे . काही कुणी ठरवत असेल तर उत्तम . धागा काढून सहमती घ्यावी सर्वांची ..

वाहीदा's picture

21 May 2019 - 1:23 pm | वाहीदा

एकदा आपण सर्व जाऊन त्यांच्या अम्मींना I mean आईंना जाऊन भेटुन येऊया का ? ? पैसा बहोत अहेमीयत रखता हैं जिंदगी में लेकीन emotional support उससे भी ज्यादा मायने रखता हैं .. मेरे खयाल से तात्या जो जिंदा दिली दिखाते थे वोह उनके अम्मी के जिंदा रहेने की वजह थी शायद पैसों की कमी से वोह धीरे - धीरे टूट हि गए होंगे अंदर से ..
त्यांची आयुष्यातील गणिते काही का असेना पैसा हर चीज नहीं होता .... कुछ भी हो जाए हम लोग दुश्मन की मय्यत को तक कंधा देते हैं , तात्या तो अपने थे |
खैर तात्या के मय्यत के आखरी दिदार तो नहीं हो पाएं लेकीन उनके अम्मी से मिलने का मेरा बहोत दिल कर रहा हैं .. उनकी अम्मी हि उनकी फैमिली थी..मेरे खयाल से अम्मी से मिलना जरुरी हैं
Let's decide and meet her यह फर्ज हैं हम लोगोंका . मैं कभी किसीका जनाजा नहीं छोडती ..हमेशा शरीक होती हुं अगर दूर-दराज हुं .. वक्त नहीं मिला तो १ साल बाद भी घर जाके उनके घरवालों के ग़म में जरुर शरीक होती हुं ! फर्ज हैं !!
This is not fine for me to pay homage on social media or Misalpav
आप में से कोई जा रहा हैं तो बताएं वरना मैं कुछ वक्त तक इंतेजार कर लुंगी और खुदही उनके अम्मी से मिलने चली जाऊंगी .. इस मामलेमें ना मैं गुरेज़ करुंगी और ना हि परहेज़ ! आप में से किसी को आना हैं तो आओ नहीं आना तो मत आओ, हम तो जाएंगे ग़म बांटनें !
~ वाहीदा

खिलजि's picture

21 May 2019 - 4:14 pm | खिलजि

मी येईन वाहीदा ताई .. मला व्यनि करा जाणार असाल तेव्हा. मी वाट बघतोय , तोपर्यंत इतर मिपाकरांना नम्र विनंती ..

तोपर्यंत इतर मिपाकरांना नम्र विनंती .. जर तात्यांच्या आईचा ठावठिकाणा बदलत असेल किंवा इतर नातेवाईक त्यांची व्यवस्था कुठे दुसरीकडे करत असेल तर कळवावे ..

वाहीदा's picture

22 May 2019 - 7:35 pm | वाहीदा

क्या आप हो फेसबुक पे ? मिसळपाव सोडल्यानंतर मी तिथेच active आहे. https://www.facebook.com/wahida.kazi यह हैं मेरी आयडी . एक तर तुम्ही मला तिथे इनबॉक्स करु शकता किंवा इथे व्यनी .. हम जरुर जाएंगे उनके अम्मी से मिलने ! फर्ज हैं हमारा वरना उस मां का दिल क्या सोचता होगा के जिस मिसलपाव पे मेरे बच्चे ने , तात्या ने इतना प्यार बरसाया वहां से कोई मेरा 'हाल - ए -दिल' पुछने तक नहीं आया. इतनी बेरुखी , इतने पत्थर दिल लोग.. हम नहीं हो सकते. कमसे कम मैं तो नफरतें नहीं पाल सकती.
हम जरुर जाएंगे दोस्त ! आप फेसबुक पे हमसे राब्ता किजीएगा या फिर हम व्यनी करेंगे आपको .
फिरसे एक बार आपका तहे- दिल से शुक्रिया खिलजी जी !!
~ वाहीदा

कुमार१'s picture

19 May 2019 - 10:23 am | कुमार१

+१

चौथा कोनाडा's picture

19 May 2019 - 11:40 am | चौथा कोनाडा

सुंदर आठवणी लिहिल्यात, तात्या या कलंदर माणसाच्या !

प्राची अश्विनी's picture

20 May 2019 - 9:49 am | प्राची अश्विनी

हो. या दोन्ही कट्ट्यांना मी हजर होते.
जुन्या आठवणी.
त्यातले तात्या अजूनही लक्षात आहेत.

नंदन's picture

20 May 2019 - 1:52 pm | नंदन

जुने दिवस आठवले दहापंधरा वर्षांपूर्वीचे. मनोगत-उपक्रम आणि मिपावर भेटलेले अनेक स्नेही, प्रत्यक्ष आणि जालावर घडलेल्या भेटी, त्यांच्यासोबत रंगलेल्या चर्चा, मैफली आणि वादविवादही आठवून गेले. त्यांतले काही फुरंगटून गेले, काही व्यग्रावले. संपदा(अदिती), श्रामो यांच्यासारखे काही अगदी अकाली गेले. अंतू बर्व्यातले शब्द उसने घेऊन सांगायचं तर - अड्ड्यातल्या या रिकाम्या जागा मनात घर करून जातात.

त्यात आता अजून एक रिकामी जागा. तात्याची किंचित थट्टा करायला म्हणून 'अंमळ हळवा झालो' असं कधीतरी विनोदाने म्हणत असू; तो शब्दप्रयोग इतक्या गांभीर्याने, इतक्या अकाली करावा लागेल असं वाटलं नव्हतं!

समीरसूर's picture

21 May 2019 - 1:27 pm | समीरसूर

तात्यांशी मिपावर संपर्क झाला होता. मागील बरीच वर्षे ते अनुपस्थित होते. त्यांची अनुपस्थिती जाणवत होती. एक दिलदार, हरहुन्नरी व्यक्तिमत्व हरपले. त्यांना सद्गती लाभो आणि त्यांच्या आईला मानसिक बळ लाभो.

रविवार (१९-मे-२०१९) मटामध्ये त्यांच्यावर एक लेख येऊन गेला. लोकप्रिय असं हे व्यक्तिमत्व होतं.

वाहीदा's picture

21 May 2019 - 2:03 pm | वाहीदा

किसी ने पूछा इस दुनिया में आपका अपना कौन है ??
मैंने हँसकर कहा - समय !!
अगर वह सही , तो सभी अपने,
वरना कोई नहीं...
~ वाहीदा

सुधीर कांदळकर's picture

21 May 2019 - 7:58 pm | सुधीर कांदळकर

मी मिपावर चढवला तेव्हा तात्याच संपादक होते. त्यांच्या व इतरांच्या दिलखुलास प्रतिसादांमुळे पुढे बरेच चढवले.

त्याचे चतुरस्त्र, बेधडक, बिनधास्त, रोखठोक, इ. व्यक्तिमत्त्व विलोभनीय होतेच.

त्यांच्या स्म्रुतीला विनम्र अभिवादन.

सुधीर कांदळकर's picture

21 May 2019 - 8:00 pm | सुधीर कांदळकर

राहिली याची रुखरुख राहील

सुधीर कांदळकर's picture

21 May 2019 - 8:01 pm | सुधीर कांदळकर

राहिली याची रुखरुख राहील

योगी९००'s picture

4 Jun 2019 - 1:17 pm | योगी९००

तात्यांचा हा प्रतिसाद आठवला https://www.misalpav.com/comment/2437#comment-2437

चिगो's picture

11 Jun 2019 - 6:09 pm | चिगो

अरे देवा.. मी मिपावर आलो, तो काळ तात्यांचा होता. त्यांच्या लेखांमधून, प्रतिसादांमधून जाणवलेला हा कधीही न भेटलेला हरहुन्नरी, चाकोरीवेगळा रसिक माणूस एकदम भावून गेला मनाला.. प्रचंड आवडलं होतं मला त्यांचं लेखण.. काय बोलू आणि किती बोलू, असं झालंय. पण, असोच..

देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो, हिच प्रार्थना..

वरुण मोहिते's picture

11 Jun 2019 - 6:12 pm | वरुण मोहिते

नव्हतं इतके दिवस???