माझ्या आठवणीतला तात्या
"आम्ही तात्याला पहिला नाही"अशा काही प्रतिक्रिया पाहिल्या आणि वाटलं, तात्याचे चार फोटू टाकावेत.
मात्र जे फोटो डोळ्यापुढे होते, ते संगणकात नव्हते हे जाणवले आणि स्व्तःवरच चरफडलो.
२००५ च्या सुमारास शिवाजी पार्कवर भरलेल्या पहिल्या वहिल्या कट्ट्यात टिपलेले "असा घ्यायचा शास्त्रिय संगिताचा आस्वाद"यावर तात्या रंगात येऊन बोलत असतानाचे फोटो.....
मधे एकदा अचानक पुण्याला जायची लहर आली. मी, तात्या, जयन्तराव कुलकर्णी, बहुधा माधव कुलकर्णी पण होते. काही पुणेकर मंडळी थेट तिथेच मैफिलीत सामिल झाली, रात्री बरोबर मैफल रंगत गेली. गप्पा रंगत गेल्या, मध्यरात्रीनंतर डावा हात कानावर घेऊन उजवा हात वर करत यमन गाताना टिपलेला तात्याचा फोटो आणि तात्याचा फोटो मोबाईलवर टिपत असताना काढलेला पेठकर साहेबांचा फोटो
तात्यानच गोळा केलेल्यांत सामावून रॉयल चॅलेंज मध्ये जमलेल्या धमाल गप्पांचा फोटो
बदललेले संगणक, बॅक अप घेताना गोची होऊन अनेक फोटो गेले. अखेर शोधता शोधता एका ठाणे कट्ट्याचे फोटो सापडले. मोठा जोरदार कट्टा झाला होता. तात्या, जयन्तराव कुलकर्णी, माधव कुलकर्णी, अत्यानंद, कुमार जावडेकर, अजब, शंतनु, केशव सुमार, नरेन्द्र गोळे, आनंद घारे, डॉ विलास पवार, डॉ मिलिंद फणसे, छाया राजे, चित्तरंजन भट या व अशा अनेक थोरा मोठ्यांनी हजेरी लावली होती. त्या वेळचे हे फोटो
तात्याचा आनंदी चेहरा आणि आग्रही आवाज, बोलण्यातली लगबग अजूनही आठवते. माझ्यावर तात्याचा का कुणास टाऊक पण जीव होता. एकदा रात्री रामदासांचा'फोन, 'साक्षी, उत्सवला बसलोय तात्या आठवण काढतोय, पाठोपाठ तात्याचा आवाज, अरे बाबा ये लवकर. 'तात्या, अरे आता तुमचा कार्यक्रम संपत आला असेल'माझी एक शंका. लगेच उत्तर 'अरे, नाही बाबा तू ये, आम्ही आहोत'. आता हजेरी लावण्याखेरीज गत्यंतर नव्हतं. तिथे पोचताच तात्याच्या चेहर्यावर दिसलेला आनंद डोळ्यापुढे आहे.
'आयला झक मारली आणि पिऊन स्कूटर चालवली. ***** नेमका पकड्लो गेलो, *** ऐकायला तयार नाहीत रे, साल्यांनी रात्रभर पोलिस स्टेशनला रखडवलं, सकाळी कोर्टात हजर केलं, साला ******* एकदाचा जज 'कबूल'म्हणून दंड भरून सुटलो. आता कानाला खडा, पिऊन गाडीला हात लावणार नाही असं साभिनय सांगणार्या तात्या.
एक दिवस अचानक कचेरीत तात्याचा फोन, 'अरे साक्षी आपला नंदन आलाय, आत्ता त्याला घेऊन मामलेदारला आलोय'
'मनोगत'चं गंभीर वातावरण न भावलेल्या तात्याने एक दिवस मिपा चालू केलं. काही कारणास्तव मी तेव्हा सदस्यत्व घेतलं नव्हतं. आणि एक दिवस तात्याचा रात्री फोन, 'अरे हे काय रे? तू माझा गाववाला आणि मिपावर नाहीस असं म्हणत माझी हजेरी. मी येतो म्हणालो. तात्यानं सांगितलं, तुझा आयडी राखून ठेवला आहे, पासवर्ड मेल केला आहे, दाखल हो. मी उलट फोन मारला, 'तात्या, पासवर्ड ची गोची दिसते रे लॉग इन होत नाही. क्षणांत तात्याने उलट फोन केला, पासवर्ड चंद्रशेखर, आता सरळ दाखल हो. आणि नुसता येऊ नको, मला उद्या एक मस्त लेख हवा. मी सदस्य झालो आणि 'माझी नवी मैत्रीण हा लेख टाकला. तेव्हा खुष झालेला तात्या
क्रांतिकारकांवरचा माझा एखादा लेख आवडल्यावर 'मिपाला श्रीमंत करणारा'लेख असे तोंड्भरुन कौतुक करणारा तात्या.
मध्यंतरी बरच काही घडून गेलं. माझा मिपावरचा वावरही कमी झाला होता. मिपावर एकदा दाखल झाल्यावर बरीच गड्बड होऊन गेल्याचं वाचनात आलं. काही पत्ताच लागत नव्हता. मग काही ओळखीच्या सदस्यांकडून काही समजलं. त्यालाही अनेक दिवस झाले. अचानक एका दोन जानेवारीला तात्याची खूप आठवण झाली. मी, रामदास, संतोष आमची फोनाफोनी झाली. अखेर राम्दासांनी तात्याला राजी केलं. रात्री नऊच्या सुमारास मी, रामदास, संतोष (बहुतेक आणखी एकजण असावा, आता आठवत नाही) महेश लंच होम्वर जमलो. तात्याला वाढदिवसा निमित्त मच्छी खायला घालायची होती, दोन घोट घ्यायचे होते. तात्या येतो की नाही अशी धाकधुक होती. पण तो आला. सगळे जेवलो, तात्या अस्वस्थ होताअसं वाटलं आणि ते साहजिक होतं. सात आठ वर्षं झाली असावित या गोष्टिला. ती अखेरची भेट.
पुन्हा कधीही तात्या भेटला नाही आणि फोनही लागला नाही. परवा अचानक तात्या गेल्याचं समजलं. तात्याच्या सगळ्या गाठी भेटी डोळ्यापुढे उभ्या राहिल्या.
वाचने
13882
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
मित्रपरिवारत रमणारे
धन्यवाद
छान.
यमनकल्याण गायनाचा तात्यांचा
" रोशनी " जेव्हढं पण लिहिलं
मी कोंडून घेतलंय स्वतःला
In reply to मी कोंडून घेतलंय स्वतःला by खिलजि
या खुदा !! Let's decide and meet his 'Aai' !!
In reply to या खुदा !! Let's decide and meet his 'Aai' !! by वाहीदा
@ वाहीदा ताई
In reply to @ वाहीदा ताई by खिलजि
तोपर्यंत इतर मिपाकरांना नम्र
In reply to @ वाहीदा ताई by खिलजि
शुक्रिया दोस्त !
+१
सुंदर आठवणी लिहिल्यात,
हो. या दोन्ही कट्ट्यांना मी
क्षणिक तेवीं आहे...
हरहुन्नरी व्यक्तिमत्व!
वक्त -वक्त की बात !
माझा पहिला लेख .....
रोशनी अपूर्णच ...
रोशनी अपूर्णच ...
हा प्रतिसाद आठवला
तात्या गेले?
तुला माहीत