मित्रहो..
अलीकडेच या अनोख्या चहाशी माझी ओळख झाली. आपल्याकरिता तिचा संक्षिप्त परिचय देवू इच्छितो.
या चहाचा खरेच उपयोग होतो असे जाणवले. माझ्या पत्नीला गेल्या काही दिवसांपुर्वी झोप न येण्याचा त्रास जडला होता , इतका की तिला डॉक्टरांनी काही दिवसांकरिता झोपेच्या गोळ्या लिहून दिल्या होत्या. अशातच मला हे उत्पादन सापडले pinhealth या साईटवरुन हे मागवले.
मलाही रात्री अनेकदा जाग येण्याचा त्रास अनेकदा होत असतो त्यामुळे आम्ही दोघांनी या चहाचा प्रयोग चालू केला आमची काही निरिक्षणे
- चहा घेतला की रात्री छान गाढ झोप लागते
- चहा घेतला म्हणून लगेच झोप येते असे नाही (झोपेच्या गोळ्यांप्रमाणे) तर झोपायला गेल्यावर थोड्या वेळानेच झोप लागते
- चहा पिल्यावर तरतरी येते
- चहाची चव फारशी चांगली नाही तरी सवयीने ठीक वाटू लागते.
- स्वप्न खूप पडतात
- रात्रीतून अनेकदा जाग येण्याचा त्रास खूप कमी होतो.
- सकाळी थोडा वेळ डोके किंचीत जड वाटते .. यामुळे आम्ही नंतर एक कप चहा घेण्याऐवजी एका मोठ्या मगात एकच सॅशे वापरुन जास्त चहा बनवायचा आणि दोघांनी घ्यायचा असे चालू केले
- सवय जडते असे आता तरी वाटत नाही.. म्हणजे चहा घेतला नाही तर झोप येतच नाही असं होत नाही. झालंच तर एका रात्री चहा घेतला तर पुढच्या एका रात्रीही काहीसा परिणाम जाणवतो.
तरी ज्यांना झोप न येण्याचा वा नीट /पुरेशी झोप न होण्याचा त्रास आहे त्यांनी या चहाचा प्रयोग करावा असे मी सुचवेन.. केल्यास आपले अनुभव नक्की लिहा.
प्रतिक्रिया
22 Apr 2019 - 9:20 pm | चित्रगुप्त
चांगला परिचय करून दिलास रे मराठी कथालेखका. सदर उत्पादन हे यूएसडीए सर्टिफाईड ऑर्गॅनिक आणि कॅफेन फ्री असल्याचे डब्यावर लिहीले आहे, परंतु ते "व्हेगन - कोशर - लेड फ्री - ग्लुटेन फ्री - क्रुएल्टी फ्री" आहे का ? नसल्यास सगळेच मुसळ केरात, असे 'ह्यांचे' म्हणणे..
-- चाईसाहेब निद्रागुंगीकर.
23 Apr 2019 - 12:44 pm | सुबोध खरे
यात हलाल राहिलं
22 Apr 2019 - 9:37 pm | तेजस आठवले
चहाने झोप येते ? जायफळ उगाळून घ्या त्यापेक्षा (ह. घ्या.)
तरतरी आणि झोप एकाच पेयाने येते हे काय झेपले नाही.
(आता चहा हा उन्हाळ्यात थंड आणि थंडीत उष्ण असतो असे पुलंचं लिहून गेलेत म्हटल्यावर ...)
23 Apr 2019 - 8:18 am | एमी
> • स्वप्न खूप पडतात
• सकाळी थोडा वेळ डोके किंचीत जड वाटते .
• झालंच तर एका रात्री चहा घेतला तर पुढच्या एका रात्रीही काहीसा परिणाम जाणवतो. >
"यामुळे आम्ही नंतर एक कप चहा घेण्याऐवजी एका मोठ्या मगात एकच सॅशे वापरुन जास्त चहा बनवायचा आणि दोघांनी घ्यायचा असे चालू केले" --- प्रमाण अजून निम्मे करा.
23 Apr 2019 - 7:06 pm | मराठी कथालेखक
नाही ..१/२ ठीक आहे,
१ कप (सॅशे)ही चालू शकेल पण सवय व्हायला थोडे दिवस लागतील असे मला वाटते
23 Apr 2019 - 1:10 pm | जालिम लोशन
सर्व लक्षणे दारूमुळे येण्यार्या झोपेची आहेत. नैसर्गीक झोपेची नाहीत. CNS depression. REM sleep pattern disturbance. आहे. घेवु नका. addiction होईल.
23 Apr 2019 - 7:08 pm | मराठी कथालेखक
आसव नाही.. ब्राह्मी, शंखपुष्पी , अश्वगंधा , तुळशी ई आहे.
मला वाटतं महत्वाचा परिणाम ब्राह्मी वा शंखपुष्पीने होत असावा,
23 Apr 2019 - 3:28 pm | खिलजि
हायला , ह्ये ऑरगॅनिक इंडियाचा माल मी पण वापरतो राव .. आपल्या नेहेमीच्या चहामध्ये एक तुलसी ग्रीन टी पाऊच फोडून टाकतो . त्याला आपल्या चहामध्येच उकळवतो आणि मग सर्व जण ते चहाच्या रूपात पितात .. एकानदार या गोष्टीला सुमारे तीनचार वर्षे झाली असतील .. फायदे तोटे सांगता येणार नाहीत पण एक मात्र आहे ते म्हणजे चहाला एक वेगळीच चव येते आणि ती मला आवडते ...