रावणायन कादंबरीचा थोडक्यात आढावा

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
22 Feb 2018 - 11:36 am

इंद्रायणी सावकार यांचे रावणायन नुकतेच वाचून झाले. मला आवडले. खूप छान आहे. आपण सुध्दा जरूर वाचावे. एक वेगळीच अनुभूती आपल्याला हे पुस्तक वाचून मिळेल.

रावणाबद्दल एरवी माहिती नसलेल्या गोष्टी तर कळतीलच पण वाली सुग्रीव आणि तारा यांच्यातील खूपच पराकोटीच्या गुंतागुंतीच्या प्रेम त्रिकोणाचे अद्भुत आणि सतत दोलायमान होणारे खेळ यात वाचायला मिळतील. तसेच तारा आणि मंदोदरी यांच्यातील मैत्रीची कथा या यात प्रकर्षाने पुढे येते.

रावण मंदोदरी यांची प्रेमकथा आणि प्रेम विवाह कसा झाला हे सुध्दा यात आपल्याला कळते. विष्णुचे द्वारपाल जय विजय आणि राम रावण कुंभकर्ण यांचा काय संबंध आहे, तसेच सिता ही लक्ष्मी होती का, रावण आणि शंकर यांच्यातील संबंध, पिनाक आणि सारंग या धनुष्यांची कथा या सगळ्यांचा यात उलगडा होतो.

असा होता सिकंदर सारखीच इंद्रायणी सावकार यांची शैली नेहमीप्रमाणे वाचन आनंद वाढवते.

नक्की वाचा! रा व णा य न

पुस्तक वाचायला घेण्याआधी आधीचे राम रावणाबद्दलचे असतील नसतील ते पूर्वग्रह बाजूला काढून ठेवा किंवा पेटीत बंद करून कुलूप लावा आणि पेटी माळ्यावर ठेऊन द्या. पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही पुन्हा कधीही ती पेटी काढून कुलूप उघडणार नाहीत!

नक्की! :-)

इतिहासवाङ्मयकथाप्रतिसादसमीक्षा

प्रतिक्रिया

सतिश गावडे's picture

23 Feb 2018 - 12:19 am | सतिश गावडे

तुम्ही कादंबरी इतिहास म्हणून वाचलेली दिसते. :)

कपिलमुनी's picture

23 Feb 2018 - 12:51 am | कपिलमुनी

मागचा सिकंदरावरचा धागा वाचला नाही का ?

क्रिप्ट's picture

23 Feb 2018 - 4:28 am | क्रिप्ट

ही कादंबरी केवळ एक कथा या स्वरूपाने लिहिली गेली आहे की दिलेल्या घटना, गोष्टी सर्व इतिहासकालीन संदर्भांवर आधारित आहेत? काय आहे हल्ली अध्यात्मिक stories पण कथा कादंबरी च्या स्वरूपात लिहिण्याचे प्रमाण वाढले आहे आणि उत्सुकता वाढवण्यासाठी अनेक वेळा संधर्भ नसताना कोणत्याही घटना अथवा गोष्टी घुसडल्या जातात त्यामुळे वाचलेले हे लेखकाच्या मनाचे की त्याने खरेच संशोधन करून इतिहासकालीन संदर्भ मिळवून लिहिलेले आहे हे कळणे अवघड होऊन बसते.

manguu@mail.com's picture

23 Feb 2018 - 9:20 am | manguu@mail.com

जे घडले ते प्रत्यक्ष पाहून लिहून ठेवणारे असे कुणी नाहीच.
सगळे जुने संदर्भ याही कादंबरयाच आहेत.

सतिश गावडे's picture

23 Feb 2018 - 10:24 am | सतिश गावडे

अध्यात्मिक stories नसतात तर धार्मिक किंवा पौराणिक किंवा ऐतिहासिक stories असतात असे माईंचे हे म्हणतात.