(तरही) या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला!

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
18 Jan 2018 - 2:00 pm

(मौसम तरही का छाया है, तो गुस्ताखी माफ! पण तरहीच्या ओळीसाठी विशाल व क्रांतीताईंचे आभार,तसेच अगंतूकपणे तरही लिहिल्याबद्दल क्षमस्व!)

सूर्य मावळता कधीही व्हायचे नव्हते मला
या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला!

पावले वळली कितीदा त्याच त्या वळणावरी
ज्या जुन्या शहरात पुन्न्हा जायचे नव्हते मला!

आजही डोळ्यांत माझ्या धुंद ही आली कशी?
मी पुन्हा प्यालो..खरेतर, प्यायचे नव्हते मला!

वेळ नाही,काळ नाही,ना ऋतूंना लाजही
थेंब-थेंबाला विचारा,न्हायचे नव्हते मला!

भावनांना भाव नव्हता मैफलींमध्ध्ये तुझ्या
गात आलो गीत मी,जे गायचे नव्हते मला!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलशांतरसकवितागझल

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jan 2018 - 8:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडल्या सर्वच ओळी लिहित राहा.

-दिलीप बिरुटे

माधुरी विनायक's picture

18 Jan 2018 - 9:00 pm | माधुरी विनायक

आवडली कविता. हात लिहिता राहो...

पैसा's picture

18 Jan 2018 - 9:26 pm | पैसा

आवडले!

प्राची अश्विनी's picture

19 Jan 2018 - 9:51 am | प्राची अश्विनी

काफिया बदलला पण छान झालीय.

विनिता००२'s picture

19 Jan 2018 - 10:21 am | विनिता००२

मस्त !!

सत्यजित...'s picture

19 Jan 2018 - 9:58 pm | सत्यजित...

प्रतिसादांबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!

शार्दुल_हातोळकर's picture

21 Jan 2018 - 8:37 am | शार्दुल_हातोळकर

मस्त !

विशाल कुलकर्णी's picture

23 Jan 2018 - 11:08 am | विशाल कुलकर्णी

सुरेख ! मस्तच जमलीय. पुलेशु...

ss_sameer's picture

24 Jan 2018 - 6:27 pm | ss_sameer

खास जमलंय

वापरलेल्या ओळींवर पुन्हा लिहिणे अवघड

अभिनंदन.

कोणी म्हणेल चांगला प्रयत्न होता
माझ्यामते हा प्रयत्न नाहीच

हा तर सरसकट निकाल हाती ठेवलाय

छानच

सत्यजित...'s picture

25 Jan 2018 - 7:58 pm | सत्यजित...

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक धन्यवाद!