दारुचा पाढा!
दारू एके दारू, बैठक झाली सुरू
दारू दुणे ग्लास, मजा येई खास!
दारू त्रिकं वाईन, वाटे कसे फाईन!
दारू चोक बियर, टाका पुढचा गियर!
दारू पंचे रम, विसरून जाऊ ग़म
दारू सक ब्रँडी, आणा चिकन अंडी
दारू साते व्हिस्की, कॉकटेल करता रिस्की
दारू आठे बेवडा, आणा शेवचिवडा
दारू नवं कन्ट्री, मारा परत एन्ट्री
दारू दाहे प्याला, स्वर्गसुखी न्हाला!
:)
एका पुढे ढकलेल्या ईपत्रातून ही कविता मिळाली. कुणा डॉ मधुकर त्रिंबक घारपुरे नावाच्या माणसाने केलेली आहे.
आपला,
(ग्लेनफिडिच प्रेमी) तात्या.
प्रतिक्रिया
13 Dec 2007 - 1:45 pm | प्रशांतकवळे
हि कविता लोकसत्ता मध्ये पण आली होती
प्रशान्त
13 Dec 2007 - 2:40 pm | जुना अभिजित
लोकसत्ता मध्येच आली होती.
ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
13 Dec 2007 - 3:01 pm | छोटा डॉन
नाही म्हणजे कुठलाही पायथा हा मिसळ चापण्यास अयोग्यच ....
पायथा म्हणजे रेव्ह पारर्ट्या आल्याच ......
तेव्हा ........ हे हे हे ........
13 Dec 2007 - 5:21 pm | जुना अभिजित
दोन्ही हात पसरून बोलावणार्या निसर्गाच्या जवळीकीने आलेला उन्माद मारिजुआनाचे कश घेउन कसा येणार?
काय एंजॉय करायच याची अक्कल नसणारे रेव्ह पार्ट्या करतात. आणि गडांच्या पायथ्याची नावे आपल्या कर्तृत्वाने फेमस करतात.
मला त्या अजाण युवकांची आणि त्यांच्या पालकांची कीव येते. देव त्यांच भलं करो.
ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
13 Dec 2007 - 2:34 pm | विजय पाटील
तात्या, जरा ही कविता पण पहा. मला माझ्या विरोपावर मिळाली
विडंबन ...... फिटे अंधाराचे जाळे या गाण्याच्या चालीवर
पिती अंधारात सारे
झाले मोकळे हो ग्लास
नाकानाकातुन वाहे
एक उग्र असा वास !!ध्रू!!
बार जागे झाले सारे
बारबाला जाग्या झाल्या
सारे जमता हो एकत्र
बाटल्याही समोर आल्या
सारे रोजचे तरीही
नवा सुवास सुवास !!१!!
दारु पिऊन नवेल्या
झाल्या बेवड्यांच्या जाती
बारमध्येच साय्रांच्या
सरू लागल्या हो राती
क्षणापूर्विचे पालटे
जग भकास भकास !!२!!
जुना सकाळ्चा प्रवास
झाला संध्येचा काळोख
दारूड्यांचा दारूड्यांना
दारूनेच अभिषेक
एक अनोखे हे मद्य
आले ग्लासात ग्लासात !!३!!
13 Dec 2007 - 2:42 pm | अवलिया
मनोगतावर होती
13 Dec 2007 - 2:42 pm | विसोबा खेचर
आहे विडंबन...:)