(महाग्रु)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
2 Sep 2017 - 11:27 am

(महाग्रु)
पेरणा क्र १ आणि पेरणा क्र २

सूर्य मी अन काजवे ते, जाणूनी होतो जरी
राहतो धूंदीत माझ्या, पाठ माझी खाजरी

आत्ममग्न उष्टपक्षी, म्हणती मला पाठीवरी
मीच घडवले, मीच केले, ग्रेट माझी शायरी

भेट जर झालीच आपुली, सोडेन ना तूजला घरी
माझिया माझेच कौतुक, ऐकूनी तू दमला जरी

समूळ पिळून्-बोरकर

अज्ञ पामरांच्या माहिती साठी - उष्टपक्षी = शहामृग्

eggsअदभूतआरोग्यदायी पाककृतीकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडट्रम्पअद्भुतरसधर्मबालगीतआईस्क्रीमऔषधोपचारकृष्णमुर्ती

प्रतिक्रिया

खेडूत's picture

2 Sep 2017 - 11:46 am | खेडूत

:))

सिरुसेरि's picture

2 Sep 2017 - 12:13 pm | सिरुसेरि

+१ .
"चार होते कावळे ते , एक तो राजहंस मी "
"भेदुनी उपहास त्यांचा , चाललो निश्चींत मी "

--- तपीश .

दुर्गविहारी's picture

2 Sep 2017 - 4:37 pm | दुर्गविहारी

जबर्‍या !!!!!! _____/\______
बाकी डोकलाममधून चिनी सैनिकांनी माघार घेतली याला म्हाग्रुसुध्दा कारणी'भुत' आहेत म्हणे. डोकलाम सीमेवरच्या कुठल्यातरी मराठी सैनिकाने "चला ना गडे ( कि नागडे ) " हे निखळ निरागस बडबड गीत ( चित्रपट- नवरा माझा नवसाचा ) लावले होते. ते एकूनच चिनी सैनिक पँट आवळत पळाले म्हणतात. जय म्हाग्रु॥

शार्दुल_हातोळकर's picture

2 Sep 2017 - 6:31 pm | शार्दुल_हातोळकर

विडंबनाला तोड नाही..... :-)

पैसा's picture

2 Sep 2017 - 9:40 pm | पैसा

=))

ज्योति अळवणी's picture

2 Sep 2017 - 11:01 pm | ज्योति अळवणी

झक्कास

माम्लेदारचा पन्खा's picture

2 Sep 2017 - 11:19 pm | माम्लेदारचा पन्खा

सृष्टीची रचना ही माझी ,ब्रम्हदेव तो केवळ मुकादम
मीच तो ब्रम्हांडाचा निर्माता, दिग्दर्शक बाकी सगळे पानीकम !

अत्रुप्त आत्मा's picture

3 Sep 2017 - 5:18 pm | अत्रुप्त आत्मा

खण्ण्ण! =))

पुंबा's picture

4 Sep 2017 - 2:22 pm | पुंबा

हाहाहा..
फस्क्लास!!

नाखु's picture

4 Sep 2017 - 8:34 pm | नाखु

याचं पुरुष वर्तन करणेत यावं,"मी कशाला आरशात पाहू गं,मी ....."

विडंबन जोरदार

मोबाईल निरक्षर नाखू

स्वधर्म's picture

5 Sep 2017 - 12:31 pm | स्वधर्म

मस्त पैजारबुवा

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Sep 2017 - 2:03 pm | ज्ञानोबाचे पैजार

मी म्हागुरु, मी म्हागुरु, म्हणा म्हागुरु
ज्ञानाची खाण, दिसतो लहान,
विगही छान, अकलेचे बाण,
फुकटचा मान, मी लै महान,
मारीतो चकरा शोधतो बकरा,
अ‍ॅवॉर्ड फंक्शनला मारीतो चकरा,
चकरा-बकरा, चकरा-बकरा,चकरा-बकरा,
मी म्हागुरु, मी म्हागुरु, म्हणा म्हागुरु

मेरा देख जलवा,
बळच हलवा,
लैच कालवा,
माना तुम्ही डोलवा,
आम्हाला बोलवा,
बोलवा-डोलवा, बोलवा-डोलवा, बोलवा-डोलवा
मी म्हागुरु, मी म्हागुरु, म्हणा म्हागुरु

अटक मटक चवळी चटक,
माझी खाजवुन, मला लटक
चटक लटक, चटक लटक, चटक लटक,
मी म्हागुरु, मी म्हागुरु, म्हणा म्हागुरु

गरा गरा, अन गरा गरा,
मी चालतो बळच भरा भरा,
हिरोइन दिसता बरी जरा,
मी फुलवतो उगा माझा पिसारा,
मी म्हागुरु, मी म्हागुरु, म्हणा म्हागुरु

ऐका ऐका माझे शेर ऐका,
माझे भाषण ऐका, माझे विनोद ऐका,
एका पेक्षा एक माझे अनुभव ऐका,
कोणाला घडवले, सांगतो ऐका,
मी कसा थोर ते नीट ऐका,
फक्त ऐका, ऐका ऐका ऐका ऐका
मी म्हागुरु, मी म्हागुरु, म्हणा म्हागुरु

पैजारबुवा,

पुंबा's picture

5 Sep 2017 - 4:51 pm | पुंबा

ठ्ठो...!!!
कं हाणलंय!

काय लिवलंय.. काय लिवलंय...

__/\__

विडंबन लिवलंय.. विडंबन लिवलंय
वरती दिसत नाही का?

सुबोध खरे's picture

5 Sep 2017 - 7:56 pm | सुबोध खरे

काय लिहिलंय पैजार बुवा?
ह ह पु वा
साष्टांग दंडवत --/\--,