तुम्ही काही वेगळ्या रुपकाच्या अर्थाने धागा लेख उघडला असेल तर अंमळ चुकला आहात. हि पाकिस्तानच्या प्रसिद्ध अंग्रेजी दैनिक डॉननेच दिलेली बातमी आहे. तुम्ही म्हणाल कि असते एकेका प्राण्याला किंमत, तशीच असेल पाकिस्तानी गाढवालाही किंमत, त्यात विशेष ते काय ? विशेष बाब अशी कि पाकिस्तानी गाढवांच्या किंमतीची चर्चा सिंधच्या विधानसभेत झाली, आणि चर्चेचा उद्देश्य तसा किंमत नव्हताच मुळी ४७०० गाढवांची त्यांच्या पोलीसांना म्हणे कातडी मिळाली जी कुणी चिनी व्यापारी चीनला घेऊन जाणार होता.
म्हणजे नेहमीचाच व्यापार होणार होता तर यात सिंधी विधानसभेत चर्चा होण्यासारखे काय मोठे ? आपल्याला फसवून पाकिस्तानी गाढवंतर खायला घातली जात नाहीत ना, असे त्यांच्या विधानसभेच्या सदस्यांचे धाबे दणाणलेले होते :) तशी नक्कीच केस नसल्याचे सिंधीमंत्र्यांनी आमदारांना आश्वासान दिल्याचे दैनिक डॉनच्या वृत्तात म्हटले आहे.
सगळी बातमी तर वाचून झाली पण पाकिस्तानी गाढवाची किंमत किती ठरली ? आता ती किंमत किती आणि कशी मोजावयास हवी या बद्दल मिपाकरांची आणि भारतीयांची आपापली मते असू शकतातच पण डॉन वृत्तपत्रात आलेल्या बातमीतली किंमत सांगूनच टाकतो ती आहे चक्क १ लाख रुपये प्रती गाढव.
पाकीस्तानी गाढव पाकीस्तानी गायी पेक्षा महाग का असेना 'पाकिस्तानी गाढव' हे शब्द लिहिण्याकरता कोणतेही पैसे मिपाकरांना मोजावे लागत नाहीत ह्याचा आनंदच बातमीची बातमी देताना विशेष. बाकी विशेष बातमी नसलेली गोष्ट म्हणजे पाकिस्तानला चीन देशावर केलेल्या प्रेमाच्या मोबदल्यात वर्षाला ३ अब्ज डॉलर मोजावे लागणार आहेत ३० वर्षांसाठी त्यांच्याकडून घेतलेल्या कर्जांच्या मोबदल्यात. आता हा कर्जांचा बोजा पाकीस्तानी गाढवात वाटून दिला तर प्रति गाढव किती कर्ज दर वर्षाला फेडले जाईल हे चांगले गणिती कोडे आहे. कर्ज नको म्हणून बँकींगच्या नावाने बोटे मोडणार्या पाकींना असे कर्ज बाजारी होणे चालते ह्याचा विचार करत बसले तर आपले पाकिस्तानी गाढवाची किंमत किती हे गणित बाजूलाच राहील.
तसे पाकीस्तानी गाढवाची किंमत किती याच्या गणितात जसे भारतीयांना रस असू शकतो तसा चिनी, सौदी, आमेरीकन, रशियन इत्यादीं भारतीयांपेक्षा अधिक असतो हे लक्षात घेतले तर पाकीस्तानी गाढवे एवढी महाग का याचे रहस्य उलगडण्यास कदाचित मदतच होईल. बघा हे पाकिस्तानी गाढवांच्या किमतीचे गणित तुम्हाला उलगडते का ?
संदर्भ पाकीवृत्त पत्र डॉन
प्रतिक्रिया
29 Apr 2017 - 4:25 pm | पैसा
पाकिस्तानी गाढवे दुर्दैवी बिचारी! चिनी लोक या कातड्यांचे काय करणार होते म्हणे?
29 Apr 2017 - 4:33 pm | माहितगार
ते मैत नै पण कदाचित युरोमिरकनांना जोडे चपला बनवून विकणार असती ;) कुणि सांगावे पाकीस्तानी इज्जतीच कातड चिनी कितीला घेतात ते तरी या निमित्ताने कळाले १ लाखाच गाढव मारुन कातड्याचे फक्त २५ हजार देत असावेत आता हे कसे याचा त्या बातमीतून उलगडा झालेला नाही.
29 Apr 2017 - 6:31 pm | सचु कुळकर्णी
पै ताई
चिन हा जगभरातिल वन्य प्राण्यांच्या शिकार्यांकडुन म्रुत प्राण्यांचे अवशेष खरेदी करतो. वाघांचे हाडे, कातडि, भारतिय गेंड्याचे शिंग वगैरे. त्याचा उपयोग तिथल्या औषध ईंडस्ट्रि मध्ये करतात. सेम उपयोग गाढवाच्या कातडि चा चिनी औषध बनवण्या करता होतो. हि बातमि डॉन ला वाचलि होति आणि एक पाक मिडीयात बातमि सुध्दा बघितली होती युट्युब ला.
29 Apr 2017 - 6:41 pm | सचु कुळकर्णी
क्लिप थोडी डिस्ट्रबिंग आहे....
https://youtu.be/YYl5w3UDDQg
29 Apr 2017 - 8:30 pm | पैसा
काय काय करतात तरी! मधे एकदा चीनमधे मांजरे पिंजर्यात कोंबड्यांसारखी कोंडलेला फोटो फेसबुकवर बघितला होता. चिने लोक मांजरे खात असतील तर हद्द झाली आता!
29 Apr 2017 - 10:04 pm | माहितगार
ते खात नाहीत असा सजीव (मानव सोडून) पृथ्वी पाठीवर बहुधा नसावा, एका अर्थानी चिनी लोक सगळं काही खातात हे बरे आहे नाही तर त्यांच्या लोकसंख्येमुळे कितीतरी पदार्थांच्या किंमती हाताबाहेर गेल्या असत्या.
29 Apr 2017 - 11:48 pm | सचु कुळकर्णी
माफ कर, मांजरी वगैरे तर चिल्लर आहे, साउथ चायना सी मध्ये ना कुत्रा आहे ना मांजर असो. कुत्रे कोंडलेले असतात ग त्याच्याच पिंजर्यात. आपल्या नॉर्थिस्ट पासुन सुरु होत. असो.
29 Apr 2017 - 11:51 pm | सचु कुळकर्णी
वरुण मोहिते साहेब ह्यावर जास्त प्रकाश टाकु शकतील.
30 Apr 2017 - 12:17 am | सचु कुळकर्णी
कीत्येक चैनेल्स मिक्स झाले, होतात बे कधि कधि. वरुण मोहिते साहेब सॉरी.
30 Apr 2017 - 12:37 am | सचु कुळकर्णी
वरुण मोहिते साहेब सॉरी. मेनलँड चायना तुम्हि गेला होतात म्हणुन, बाकी तर चिल्लर है ईथे जे लोक चाईनिज सुप म्हणुन पितात ते कदाचित ईनर चाईना टाऊन कोलकाता च सुप सुध्दा नाहि पिउ शकणार. BILT चे जनरल मँनेजर वा तस्तम लोक जे भिगवण सोडुन चिन च्या पेपर प्लांट ला गेले आहेत, ऑफर है सर.
29 Apr 2017 - 4:33 pm | अभ्या..
मध्ये कर्नाटकात अशि गाढवे कलेक्ट करुन महाराष्ट्रातून नेलि जायची अशी हवा होति. त्याचे मटण करुन एक्स्पोर्ट होते असा बोलवा होता.
सोलापुरात त्यासाठी डाँकी सँक्चरि नावाची संस्था कार्यरत होती. ती संस्था भटकि गाढवे एका ठिकाणी नेऊन ठेवायची. जख्मी गाढवावर उपचार वगैरे कराय्ची. त्याचे पुढे काय करायची हे माहीत नाही.
29 Apr 2017 - 4:38 pm | माहितगार
मटणात भेसळ बिसळ करण्याच्या कामात येत असतील असेही असू शकते, गल्फ मध्ये किंवा युरोमेरीकेत गाढवाचे मटण लोकप्रिय असते तर पाकीस्तानने राजरोस त्याचाच व्यवसाय केला असता पण तसे बातमीवरून प्रतित होत नाही. बाकी चिनी आणि पूर्व आशियाई लोक सर्वच प्राणी खातात म्हणे.
29 Apr 2017 - 5:40 pm | कुंदन
नांदेड मधुन पण अशी गाढवे हैद्राबादला नेली जायची मटण बिर्याणी साठी, त्याची बातमी आली होती लोकमत मध्ये
30 Apr 2017 - 8:48 pm | टवाळ कार्टा
चायनीज लोक कुत्रा मांजर माकडे घोडा गाढव काय वाट्टेल ते खातात....गाढव तर मी स्वता एकाला खाताना बघितलंय...क्लायंट मॅनेजर :)