फुलपाखरु मनाचे हळुवार होत आहे!

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
5 Apr 2017 - 3:38 pm

मग्रूर काजव्यांचा संचार होत आहे
पणती जपून ठेवा अंधार होत आहे!

वाटेत सावल्यांचे थांबे नकोत मजला
माझ्याच सावलीचा मज भार होत आहे!

झाली नवीन ओळख,माझी मला अशी की
ऐन्यासमोर चिमणी बेजार होत आहे!

सुरवंट वेदनेचा कोषांत वाढताना
फुलपाखरु मनाचे हळुवार होत आहे!

हे कोणत्या ऋतूचे नादावलेत पैंजण?
एकेक पाकळीचा गुलजार होत आहे!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलकवितागझल

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

5 Apr 2017 - 5:56 pm | शैलेन्द्र

kyaa baat hai, mast

अत्रुप्त आत्मा's picture

5 Apr 2017 - 7:39 pm | अत्रुप्त आत्मा

हे कोणत्या ऋतूचे नादावलेत पैंजण?
एकेक पाकळीचा गुलजार होत आहे! ››› तू सॉल्लिड है बॉस!
साला लपेट लपेट के मारता है!

संदीप-लेले's picture

5 Apr 2017 - 10:08 pm | संदीप-लेले

पण ...
ऐन्यासमोर चिमणी बेजार होत आहे! ... हे नाही झेपलं

सत्यजित...'s picture

6 Apr 2017 - 3:19 pm | सत्यजित...

हां...होतं असं कधी कधी...

माहितगार's picture

13 Apr 2017 - 11:50 am | माहितगार

'चिमणी' शब्दाच्या अर्थछटेवर अवलंबून आहे का? कविचं 'हृदय' अशी अर्थछटा फिट बसते का ? आणि 'चिमणी' या शब्दाची अर्थछटा कच्ची बच्ची पिलावळ (लहानमुले) घेतली तर झेपणे अवघड गेल्यास नवल नसावे.

माहितगार's picture

13 Apr 2017 - 11:51 am | माहितगार

कच्ची बच्ची पिलावळ (लहानमुले) अशी अर्थछटा कविस अभिप्रेत असेल असे वाटत नाही.

सत्यजित...'s picture

13 Apr 2017 - 9:42 pm | सत्यजित...

स्वतःला शोधत असताना (सोबतच व्यवहाराच्या कसोटीवर स्वतःचे यश-अपयश जोखताना) स्वतःची एक अशीकाहीशी प्रतिमा कवीसमोर येते आहे,ज्यामुळे त्याच्या मनात एक विचित्र द्वंद्व उभे होते आहे!ज्याप्रमाणे एखादी चिमणी आरश्यातला आपल्याच प्रतिमेला कुणी और (प्रतिस्पर्धी ई.) समजून सारखी चोचीने टोचणी मारत राहते!

सत्यजित...'s picture

6 Apr 2017 - 3:20 pm | सत्यजित...

धन्यवाद शैलेंद्र,अत्रुप्त आत्मा

मस्त आहे.. तिसरे कडवे नसते तरी चालले असते असे वाटते..

पुंबा's picture

13 Apr 2017 - 12:17 pm | पुंबा

'ए दिल मुझे बता दे' ची चाल इथे पण फिट्ट बसतेय. हे कोणते वृत्त वगैरे आहे का?

सत्यजित...'s picture

13 Apr 2017 - 9:47 pm | सत्यजित...

गझल ही वृत्तबद्ध कवितांची मालिकाच असते,म्हणायला हरकत नाही!

पैसा's picture

13 Apr 2017 - 12:52 pm | पैसा

सुरेखच!

पणती जपून ठेवा अंधार होत आहे!

यातली 'पणती जपून ठेवा' ही आधी वाचलेली कल्पना आहे.

सत्यजित...'s picture

13 Apr 2017 - 9:48 pm | सत्यजित...

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक धन्यवाद!

मितान's picture

13 Apr 2017 - 10:01 pm | मितान

सुरेख !!!
शेवटचे चरण तर खासच !

रुपी's picture

13 Apr 2017 - 10:33 pm | रुपी

वा! सुरेख!

सत्यजित...'s picture

14 Apr 2017 - 12:59 am | सत्यजित...

धन्यवाद मितान,रुपी!