फुलपाखरु मनाचे हळुवार होत आहे!
मग्रूर काजव्यांचा संचार होत आहे
पणती जपून ठेवा अंधार होत आहे!
वाटेत सावल्यांचे थांबे नकोत मजला
माझ्याच सावलीचा मज भार होत आहे!
झाली नवीन ओळख,माझी मला अशी की
ऐन्यासमोर चिमणी बेजार होत आहे!
सुरवंट वेदनेचा कोषांत वाढताना
फुलपाखरु मनाचे हळुवार होत आहे!
हे कोणत्या ऋतूचे नादावलेत पैंजण?
एकेक पाकळीचा गुलजार होत आहे!
—सत्यजित
वाचने
4227
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
kyaa baat hai, mast
हे कोणत्या ऋतूचे नादावलेत
व्वा व्वा ! सुंदर
In reply to व्वा व्वा ! सुंदर by संदीप-लेले
धन्यवाद!
In reply to व्वा व्वा ! सुंदर by संदीप-लेले
'चिमणी' शब्दाच्या अर्थछटेवर
In reply to 'चिमणी' शब्दाच्या अर्थछटेवर by माहितगार
कच्ची बच्ची पिलावळ (लहानमुले)
In reply to कच्ची बच्ची पिलावळ (लहानमुले) by माहितगार
तसं नव्हे!
धन्यवाद!
मस्त आहे.. तिसरे कडवे नसते
'ए दिल मुझे बता दे' ची चाल
In reply to 'ए दिल मुझे बता दे' ची चाल by पुंबा
होय!
वाह!
धन्यवाद!
सुरेख !!!
वा! सुरेख!
धन्यवाद मितान,रुपी!