हे असं का होतंय?

सरपंच's picture
सरपंच in जनातलं, मनातलं
8 Oct 2008 - 2:55 pm

नमस्कार मंडळी,
सर्वात आधी आज मिसळपावच्या सेवादात्याच्या खंडीत सेवेमुळे तुम्हा सर्वांना झालेल्या त्रासाबद्दल मिसळपाव तर्फे दिलगिरी व्यक्त करतो.

मिसळपाव दिवसागणीक वाढतं आहे. रोज नवीन सदस्य येत आहेत. आणि हजर असणार्‍या सदस्यांची संख्या सुध्दा वाढती आहे. सध्या खर्‍या अर्थाने सक्रिय असणार्‍या सदस्यांच्या संख्येत दुप्पट किंवा तिप्पट सुध्दा वाढ झाली तरी आपला सेवादात पुरून उरेल एवढी क्षमता आहे. मात्र गेले काही दिवस कधीतरी अचानकच भेट देणार्‍या अतिथींची संख्या खूप वाढते. सेवादात्याला
झेपणार नाही एवढ्या मागण्या केल्या जातात. हे नैसर्गीक नाही अशी शंका आहे. असो. तर अश्या वेळी ह्या वाढीव मागणीला बंधन घालण्यासाठी पुरवठा बंद केला जातो. थोड्या वेळ पुरवठा बंद झाला की केवळ सदस्य तेवढे राहतात आणि त्यांच्या मागणीला थोड्यावेळात उत्तर देता येते आणि मिसळपाव पुर्ववत सुरू होते. गेले काही दिवस आपण मिसळपाव अचानकच बंद झालेलं आणि लागलीच सुरू झालेलं पाहिलेलं आहे.

एका अर्थाने ही परिस्थिती मिसळपाववरचा वाढता ओघ दाखवते म्हणून चांगली आहे, असं म्हणूया मात्र त्यामुळे सदस्यांना काही वेळा त्रास होतो याचं वाईट सुध्दा वाटतं.

लवकरच मिसळपावचा सेवादात्याच्या क्षमता वाढवण्याचे ठरलेले आहे. त्यानंतर अश्या वाढीव मागणीला सुध्दा आपण उत्तर देऊ शकू अशी आशा आहे.

मिसळपावच्या धोरणानुसार सदस्यांना नेमकं काय होतंय याची माहिती व्हायला हवी म्हणून हे येथे देत आहे.
काही शंका किंवा सुचना असतील तर जरूर कळवा.

धन्यवाद.

हे ठिकाणधोरणमांडणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Oct 2008 - 3:06 pm | बिपिन कार्यकर्ते

हे नैसर्गीक नाही अशी शंका आहे.

हे गंभीर आहे. या बद्दल काही उपाय आहेत का?

बिपिन.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Oct 2008 - 3:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि

लवकरच मिसळपावचा सेवादात्याच्या क्षमता वाढवण्याचे ठरलेले आहे.
तात्या, हे झकासच ...

जर इथले लेख by default 'फक्त सदस्यांकरता' असे ठेवले (आता उलटे आहे), तर मग नवीन लेख वाचायची इच्छा असणार्‍यांना लॉग-ईन होऊनच वाचावे लागेल. त्यामुळे पाहुणे हळूहळू कमी होतील आणि जर anonymous crawl attacks असतील तर ते फार बँडविड्थ नाही घेणार. (अर्थात लॉग-ईन होऊन crawl attacks करता येतील, पण मग त्याचा तपास करून ते अकाऊंट बंद करता येईल)

* पाहुणे = lurkers

आनंदयात्री's picture

8 Oct 2008 - 3:12 pm | आनंदयात्री

असेच म्हणतो.
मागे नीलकांत बरोबर एकदा असे डिस्कशन झालेले आठवते. पण त्याचे असे म्हणने पडले की वाचनमात्र वाचकांची संख्या मोठी आहे, तेव्हा असे करणे योग्य ठरणार नाही.

मनिष's picture

8 Oct 2008 - 3:18 pm | मनिष

लॉग इन होऊन वाचन करता येईल की....भविष्यासाठी मोठा डाटाबेस पण मिळेल इ-मेलचा. सुचना लाखमोलाची (;) ) आहे, अवश्य विचार करा.
कोड मधे थोडा बदल करता येत असेल तर प्रत्येक लेखाच्या १० ओळी दाखवाव्या - पुढच्या वाचनासाठी लॉग-इन करा म्हणायचे - हे थोडे तांत्रिक आहे, सहज जमेलच असे नाही.

आनंद's picture

9 Oct 2008 - 12:43 pm | आनंद

किंवा पाहुण्यां साठी दर दोन ते तिन डेटा रिक्वेस्ट नंतर इमेज वेरिफिकेशन टाकावे, त्या मुळे पाहुण्यांच्या स्वरुपातुन कोणी ईलेकट्रॉनिकली कोणी सेवा दात्या वर लोड आणत असेल तर ते कमी करता येइल.
आनंद

छोटा डॉन's picture

8 Oct 2008 - 3:31 pm | छोटा डॉन

कल्पना जरुर चांगली आहे पण सध्या जरा त्यात त्रुटी आहे ...
"फक्त सदस्यांना" असे ठेवणे बरोबर नाही, कित्येक लोक नुसते वाचन्मात्र आहेत ...
जर त्यांना वाचनासाठी आयडी घ्वाला गालला तर ते येतीलच असे नाही ...
अजुन १ म्हणजे सदस्यसंख्या फुगत जाऊन त्याचाही लोड येईल नक्की, हा उपाय मला पटत नाही ...

उदा : माझे "काका" नेहमी मिपा वाचतात पण त्यांनी आयडी घेतलेला नाही. फक्त वाचनमात्र !

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

प्रियाली's picture

8 Oct 2008 - 3:11 pm | प्रियाली

कोणीतरी माझा पासवर्ड हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या इमेलवर वेगळे पासवर्ड मागितल्याचे निरोप आलेले आहेत.
इतरांनाही असे अनुभव आहेत का ते बघावे.

लंबूटांग's picture

8 Oct 2008 - 6:24 pm | लंबूटांग

ही कोणाची आंतरजाला वरील करामत :-? ??

विजुभाऊ's picture

8 Oct 2008 - 3:26 pm | विजुभाऊ

मी अगोदर वाचनमात्र होतो . इथले लेख वाचले आणि त्यानन्तर मग नाव नोंदले.
जर इथले लेख by default 'फक्त सदस्यांकरता' असे ठेवले (आता उलटे आहे), तर मग नवीन लेख वाचायची इच्छा असणार्‍यांना लॉग-ईन होऊनच वाचावे लागेल.
हे असे झाले तर होउ घातलेल्या सदस्यानी काय करायचे?
नवे सदस्य कसे मिळणार?

मनिष's picture

8 Oct 2008 - 3:34 pm | मनिष

काही लेख सगळ्यांना वाचत येतील असे ठेवता येतील -- आता by default तसेच आहे. "Keep Private" हा पर्याय् किती वापरतात - पण तो पर्याय उपलब्ध आहे!

धूप मे निकलो, घटाओं मे नहाके देखो; जिंदगी क्या है ये किताबें हटाकर देखो!

कलंत्री's picture

8 Oct 2008 - 6:56 pm | कलंत्री

सध्या आहे तेच योग्य आहे असे मला वाटते.

यात एक सोय होऊ शकते, प्रत्यक्ष मिपावर येण्याऐवजी आपल्या पोष्टहापिसात सरळ सरळ लिहिलेले आले तरी चालेल, तांत्रिक भाषेत आर एस एस असे काही तर म्हणतात.

म्हणजे प्रत्येक प्रतिक्रिया सरळ माझ्या कडे येत जाईल.

अर्थात विश्वकर्मा यावर सांगेलच योग्य ते.