मंटो च्या लघुकथा ३ : बेखबरी का फायदा

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
21 Nov 2016 - 5:18 pm

बेखबरी का फायदा

मूळ लेखक : स़आदत हसन मन्टो.
१९१२-१९५५

-------------------------------------------------------------------------------------------
खटका दबला : बंदुकीतून गोळी बाहेर पडली.
खिडकीतून बाहेर पाहणारा माणूस जागेवरच आडवा झाला.
थोड्या वेळाने खटका पुन्हा दबला : बंदुकीतून दुसरी गोळी बाहेर पडली.
तो रस्त्यावर पडला, आणि त्याचं रक्त रस्त्यावर वहायला लागलं.
तिसऱ्यांदा खटका दबला. नेम चुकला, गोळी एका ओल्या भिंतीत मिसळून गेली.
चौथी गोळी एका म्हाताऱ्या स्त्रीच्या पाठीत लागली, ती ओरडू सुद्धा शकली नाही आणि तिथेच मरून पडली.
पाचवी आणि सहावी गोळी बेकार गेली, कोणी मेलं नाही आणि जखमी सुद्धा.
गोळ्या चालवणारा गोंधळून गेला.
मोकळ्या रस्त्यावर एक लहान मुलगा धावतांना दिसला.
गोळ्या चालवणार्याने बंदुकीच तोंड त्याच्याकडे वळवलं.
त्याचा साथीदार म्हणाला, " हे काय करतो आहे ?"
गोळी चालवण्यार्याने विचारलं " का ?"
"बंदुकीच्या गोळ्या तर संपलेल्या आहेत !"
"तू चूप रहा... एवढयाश्या मुलाला काय माहित पडणार?"

हे ठिकाणआस्वादभाषांतर

प्रतिक्रिया

मंटोच्या कथा पटकन समजत नाहीत.

लिहीत राहा . सध्या नवीन बॉम्बे स्टोरीज म्हणून पण मंटो च पुस्तक पुन्हा प्रकाशित झालंय.चांगला आहे जरूर वाचा .

पिलीयन रायडर's picture

21 Nov 2016 - 7:46 pm | पिलीयन रायडर

मलाही समजली नाहीये पुर्ण.. पण तुम्ही मांडलय अगदी ओघवतं! कुठेही अडखळायला झालं नाही..

महासंग्राम's picture

21 Nov 2016 - 8:05 pm | महासंग्राम

मंटोच्या कथा पटकन समजत नाहीत.

मला जसं समजलं तसं मंटोने जे काही लिहिलं आहे, त्याला बराच काळ होवून गेला आहे. तेव्हाचे आणि आताचे प्रश्न जरी सारखे असले तरी थोडा फरक पडू शकतो. पण, त्याकाळाशी जुळवून घेऊन विचार केला तर कथेचा आशय लगेच लक्षात येतो. आणि दुसरं म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे, ते तो कथेच्या शेवटी मांडतो. इथे या कथेला फाळणीची पार्श्वभूमी आहे. यावर जयंत काका जास्त अधिकारवाणीने बोलू शकतील असे वाटते.

आनंद's picture

21 Nov 2016 - 8:20 pm | आनंद

जबरदस्त कथा!
त्या लहान मुलावर बंदुक ताणली आहे त्यात गोळी असो व नसो.
इतक्या कमी शब्दात वाचकला उद्धवस्त करण्याच मंटोच कसब भारीच!

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Nov 2016 - 7:10 am | कैलासवासी सोन्याबापु

सादत हसन मंटो

______/\_______

हा माणूस मनुष्य नामे प्राण्याला नागडं करून त्यातले जनावर उद्धृत करतो.

सुबक ठेंगणी's picture

24 Nov 2016 - 3:33 pm | सुबक ठेंगणी

हा माणूस मनुष्य नामे प्राण्याला नागडं करून त्यातले जनावर उद्धृत करतो.

तितकंच उत्तम विश्लेषण.
एका माणसाची आपल्याहून निर्बळ माणसावर दहशत निर्माण करण्याची, टाचेखाली ठेवण्याची (मग बंदूक रिकामी का असेना!) वृत्ती इथे दिसते आहे.

पद्मावति's picture

24 Nov 2016 - 3:39 pm | पद्मावति

___/\___जबरदस्त!

jp_pankaj's picture

24 Nov 2016 - 3:55 pm | jp_pankaj

वाचतोय.

मराठी_माणूस's picture

24 Nov 2016 - 4:03 pm | मराठी_माणूस

गोळी असती तरी त्याने तेच केले असते हे गृहीतक आहे असे वाटते.

प्रचेतस's picture

24 Nov 2016 - 5:59 pm | प्रचेतस

उत्तम अनुवाद.
मंटो जे काही वाचलं ते मिपावरच. आवडलं किंवा नाही आवडलं ते सांगता येणार नाही पण लिखाण वेगळं आहेच.

अवांतर: ली चाईल्डच्या वन शॉटची सुरुवात काहीशी अशीच आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Nov 2016 - 11:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचतोय.

-दिलीप बिरुटे

इनू's picture

27 Nov 2016 - 11:20 am | इनू

www.rekhta.org

या संकेतस्थळावर मंटोच्या कथा आहेत.

पैसा's picture

5 Dec 2016 - 12:18 pm | पैसा

देवा!