मंटोच्या लघु कथा १ : घाटे का सौदा

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
29 Aug 2016 - 12:41 pm

सआदत हसन मंटो साहित्यातलं असं एक वादळ होतं, ज्याने तत्कालीन समाजाला मुळापासून हादरवून सोडलं. त्याने ५० वर्षांपूर्वी जे लिखाण केलंय ते आजही लागू होतं यातच त्याच्या लिखाणाची प्रगल्भता दिसून येते. आपल्या उण्यापुऱ्या ४२ वर्ष, आठ महिने आणि ७ दिवसांच्या आयुष्यात त्याला लिहायला फक्त १९ वर्षे मिळाली आणि या एकोणवीस वर्षात त्याने २३० कथा, ६७ रेडियो नाटकं, २२ शब्दचित्र आणि ७० लेख लिहलेत. साम्यवादी विचारांचा प्रभाव असणाऱ्या मंटोला आपल्या लिखाणामुळे कित्येकदा कोर्टाची पायरी सुद्धा चढावी लागली. इथे मी मंटोच्या लघुकथांचं अनुवाद करणार आहे. आजची कथा आहे,

घाटे का सौदा
मूळ लेखक : स़आदत हसन मन्टो.
१९१२-१९५५
_______________________________________________

त्या दोन मित्रांनी मिळून दहा-वीस मुलींमधून एक निवडली आणि बेचाळीस रुपये देवून तिला विकत घेतलं.

तिच्यासोबत रात्र घालवल्यावर एका मित्राने त्या मुलीला विचारलं, " नाव काय आहे तुझं ? "

त्या मुलीने आपलं नाव सांगितलं तर तो गोंधळून गेला आणि म्हणाला, "आम्हाला तर सांगितलं होतं कि तू दुसऱ्या धर्माची आहेस..... !"
मुलीने निर्विकारपणे उत्तर दिलं, " ते खोटं बोलले होते !"

हे ऐकून तो धावतच आपल्या मित्राकडे गेला
आणि म्हणाला, " त्या हरामखोरांनी आपल्याला धोका दिला आहे..... आपल्याच धर्माची मुलगी दिली होती...
चल, परत करून येवू ..... !"

हे ठिकाणभाषांतर

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

29 Aug 2016 - 1:08 pm | जव्हेरगंज

Great story...!

waiting for more...

महासंग्राम's picture

29 Aug 2016 - 2:34 pm | महासंग्राम

जव्हेरभौ __/\__

नीळा's picture

29 Aug 2016 - 1:13 pm | नीळा

सगळ्याच कथा एकदम ....काय म्हणतात मराठीत बर...."स्टन " करतात

महासंग्राम's picture

29 Aug 2016 - 2:33 pm | महासंग्राम

सगळ्याच एकदम नै व जश्या जमतील तश्या टाकणार

नाखु's picture

29 Aug 2016 - 2:37 pm | नाखु

पचायला जडंच जाणार असं दिसतय एकूण?

अनुवाद अर्थात टोकदार

महासंग्राम's picture

29 Aug 2016 - 4:09 pm | महासंग्राम

हो नाखुण्णा मंटो कायमच पचायला जड जातो, कारण त्याने समाजाविषयी काहीच आडपडदा न ठेवता लिहिलंय.

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Dec 2016 - 6:10 pm | कैलासवासी सोन्याबापु

मंटो संवेदनशीलतेला कडक थोबाडीत मारून जागं करतो!.

एस's picture

29 Aug 2016 - 3:19 pm | एस

'चल, परत करून येऊ!'... दांभिकतेवर केलेला डार्क ह्यूमर की पॅरॅडॉक्स? मंटो, _/\_...

गामा पैलवान's picture

30 Aug 2016 - 12:44 am | गामा पैलवान

लोकहो,

मंतोस द्रष्टा म्हणावं का? की लव्ह जिहाद तेव्हाही चालू होता?

आ.न.,
-गा.पै.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Aug 2016 - 7:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मंटो आवडतोच. अनुवादही आवडला. वाचतोय, अजून येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

रातराणी's picture

31 Aug 2016 - 7:54 am | रातराणी

किमान शब्दात कमाल! अनुवाद आवडला.

अजया's picture

31 Aug 2016 - 3:37 pm | अजया

अनुवाद चपखल जमलाय.पुकप्र.

पैसा's picture

4 Dec 2016 - 10:49 pm | पैसा

!!!!

सविता००१'s picture

14 Dec 2016 - 5:07 pm | सविता००१

मस्तच अनुवाद