अपुले प्रधानमंत्री मोदी

सोहम कामत's picture
सोहम कामत in जे न देखे रवी...
11 Nov 2016 - 11:56 pm

('जगण्याचे भान हे' गाण्याच्या चालीवर रचलेले काव्य)

देशाचे प्रेम उसळले..

पाचशेचे नोटच गळले..

हजारला कीड लागली..

भ्रष्टांची गल्लत फसली..

मोदींचा निर्णय एकला....

भुरट्यांना केले कंगाल..

बॅंकांची भलती उलाढाल..

उधळून तो काळा पैसा शेठ मावळले....

अकलेचे झाड हे मोदी अपुले..

देशाचे हाड हे मोदी अपुले..

हम्म.. वट ती शेठांची झालीया फुसकी..

झालीया सार्या नेत्यांची मासकी..

जातच नाही गळ्यातून व्हिसकी..

काळी ती नोट निघाली नासकी..

नि:वस्त्र झाले..

भ्रष्ट पळाले..

मंत्र्यांनी सार्या..

टिकास्त्र फेकले..

भाजपचे प्रधानमंत्री स्तुतीने न्हाले..

अकलेचे झाड हे मोदी अपुले..

देशाचे हाड हे मोदी अपुले..

हो.. पांढरा रंग हा..

होतसे या नेत्यांचा..

झालिया बोंबाबोंब..

ऐन या रातीला..

शेठांचा पैसा काळा..

बसलाया त्याला आळा..

जनतेचे अच्छे दिन ते आज उगवले..

अकलेचे झाड हे मोदी अपुले..

देशाचे हाड हे मोदी अपुले.

कविताविडंबनअर्थकारणअर्थव्यवहारराजकारण

प्रतिक्रिया

कवितेसारखे वाटतेय काहीतरी...

सतिश गावडे's picture

12 Nov 2016 - 8:36 am | सतिश गावडे

हम्म.. वट ती शेठांची झालीया फुसकी..
झालीया सार्या नेत्यांची मासकी..
जातच नाही गळ्यातून व्हिसकी..
काळी ती नोट निघाली नासकी..

अप्रतिम !!!

जनतेचे अच्छे दिन ते आज उगवले..
अकलेचे झाड हे मोदी अपुले..
देशाचे हाड हे मोदी अपुले.

सुंदर !!!

अभिजीत अवलिया's picture

12 Nov 2016 - 8:38 am | अभिजीत अवलिया

वाह अतिसुंदर कविता !!!
कोणता रस म्हणायचा हा?

संदीप डांगे's picture

12 Nov 2016 - 8:41 am | संदीप डांगे

भयाणरस?

स्वामी संकेतानंद's picture

12 Nov 2016 - 8:41 am | स्वामी संकेतानंद

करुणरस

अभिजीत अवलिया's picture

12 Nov 2016 - 9:09 am | अभिजीत अवलिया

ह्या भयाणरसाने / करुणरसाने सजलेल्या ताजमहालला माझी एक वीट

कविता करताना कवीने मला नाही 'आठवले'
म्ह्णूनच हो दुर्दैवी मिपाकर कवितेचे यमकच बिघडले

किसन शिंदे's picture

12 Nov 2016 - 10:18 am | किसन शिंदे

लिल्याची एक बीचारे अण्णा आठवली मला.
आजकाल कुठे असतो कुणास ठाऊक.

बोका-ए-आझम's picture

12 Nov 2016 - 10:38 am | बोका-ए-आझम

कोडाईकनाल, भूछत्री, गरम पाण्याचे कुंड इत्यादी नसल्याचा णिशेध!

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Nov 2016 - 11:03 am | कैलासवासी सोन्याबापु

इंडियन आर्मीला हिंदुत्व वगैरेशी जोडणारी दिव्य रचना पण ह्यांच्याच कळफलकातून स्रावली होती न हो मंडळी?

सोहम कामत's picture

12 Nov 2016 - 2:08 pm | सोहम कामत

सोन्याबापूंना प्रामाणिक विनंती.. असे की माझ्या इतर कवितांवर काही आक्षेप असेल तर तो त्या कवितेच्या वेळी बोलावा. त्याचा संदर्भ इतर कवितांत लावून कवितांचा आस्वाद गढूळ करू नये.. आपणास आवडली नसेल तर कृपया माझ्या इतर चुका येथे दाखवू नये.

सतिश गावडे's picture

12 Nov 2016 - 2:27 pm | सतिश गावडे

इतक्या सुंदर कवितेचा आस्वाद घ्यायचा सोडून तिचा इतर कवितांशी संबंध जोडून कवितेची चव डागाळणार्‍या सोन्याबापूंचा त्रिवार आणि तिव्र निशेध.

आधीच एक बापू धावाधाव करुनही मिळेनासे झालेत !

नाखु's picture

12 Nov 2016 - 4:03 pm | नाखु

लोक लाईन लावायला लागलेत तरी मिळेनात ते !

सतिश गावडे's picture

12 Nov 2016 - 5:13 pm | सतिश गावडे

एक बापू आत आहेत. कोणत्या बापूंबद्दल बोलत आहेत तुम्ही मापंजी?

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Nov 2016 - 5:53 pm | कैलासवासी सोन्याबापु

कामत साहेब आपण जे काही लिहितो त्याला आपण अन फक्त आपण जबाबदार असतो ह्याचे भान ठेवा जरासे. ही तुमची तीच दिव्य कविता ह्या कविते (?) वर शेवटची कॉमेंट माझीच आहे, तुम्ही त्याला काहीही प्रतिसाद दिलेला नाहीयेत. परत मलाच शिकवताय की जिथले तिथे बोला ?? आधी जे काही वैचारिक रित्या गरिबीरेषेच्या खाली लिहिलंय त्याची जबाबदारी घेऊन, जिथे लिहिलंय तिथे स्पष्टीकरण द्यायचे धारिष्ट्य दाखवा, मग मी इथे तुम्हाला ह्या कवितेबद्दल (परत ?)प्रतिक्रिया सुद्धा देतो अन प्रामाणिक प्रश्न सुद्धा विचारतो, कसे??.

पिलीयन रायडर's picture

12 Nov 2016 - 5:57 pm | पिलीयन रायडर

बापु... "दारिद्र्य" रेषेखाली जास्त चपखल वाटेल ना हो!

सतिश गावडे's picture

12 Nov 2016 - 6:00 pm | सतिश गावडे

वैचारीक दारीद्र्य रेषा =))

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Nov 2016 - 6:07 pm | कैलासवासी सोन्याबापु

मी दुरुस्त उभा राहतो (i stand corrected) दारिद्र्य रेषेखाली असे वाचावे

सोहम कामत's picture

12 Nov 2016 - 6:41 pm | सोहम कामत

तुमची अस्वस्थ प्रतिक्रिया मान्य आहे आणि हेही मान्य करतो की त्या कवितेत हिंदू धर्माबद्दल भावूक होवून लिहीले आहे आणि त्याबद्दल क्षमस्व.. मी हिंदू असल्याने थोडा भावूक झालो होतो तेंव्हा माहित नव्हते की वाचक इतर नजरेने सुद्धा वाचतात.
परंतु फक्त एका कवितेच्या चुकीमुळे कवीला चुकीचे ठरवणे चुकीचे आहे. तुम्हाला कवितेतील काही कळत नसेल तर कृपया प्रतिक्रिया देवू नये. मी आपणास शिकवित नाही तर समजावतो आहे.. त्या कवितांची चुक इतरत्र काढून कृपया गोंधळ वाढवू नये. आपल्यामुळे इतरांना कवितेचा आनंद घेणे कठीण होते.
काही चुकीचे बोललो असल्यास क्षमस्व..

संदीप डांगे's picture

12 Nov 2016 - 6:46 pm | संदीप डांगे

रा रा रा... धागाकर्ते..!

बापुसाहेब हिंदूही नाहीत आणि भावूक तर अज्याबात नाहीत. ते फक्त सैनिक आहेत. एवढं ज्याला कळत नसेल त्याने इतरांच्या कळण्या-न-कळण्याच्या, समजावण्याच्या फंदात पडू नये. हे मी आपल्याला शिकवित नाही, समजवत नाही, काहीच करत नाही. मला मिसळपावच्या मालकांनी प्रतिक्रिया द्यायचा हक्क दिलाय तो बजावतोय...

सोहम कामत's picture

12 Nov 2016 - 6:57 pm | सोहम कामत

मान्य आहे पण इतर कवितांचा संदर्भ येथे लावण्याची आवश्यकताच नाही आहे..

अत्रुप्त आत्मा's picture

12 Nov 2016 - 4:21 pm | अत्रुप्त आत्मा

बुळूक बुळूक बुळूक...!
वावराला सोन्याची झुळूक!
.
.
.
डबडं घेऊन पळत पळत जौन बसल्यासारखं वाट्टय... वर पासून खालपरेंत वाचताना! =))

सतिश गावडे's picture

12 Nov 2016 - 5:13 pm | सतिश गावडे

"बुवा" इज ब्याक !!!

राजेश घासकडवी's picture

12 Nov 2016 - 5:22 pm | राजेश घासकडवी

अकलेचे झाड? देशाचे हाड? अहो माननीय पंतप्रधानांना तुम्ही अशा उपमा का दिल्या आहेत? अकलेचं झाड वाचल्यावर अकलेचा कांदा हा शब्दप्रयोग डोळ्यासमोर आला. आणि देशाचं हाड म्हटल्यावर 'तुमच्या देशाला काही हाड-बिड नाही का?' असं काहीतरी वाटलं. किंवा देशच त्यांना 'हाsssड' म्हणतोय असं वाटलं. जरा चांगले शब्द वापरा की हो.

सोहम कामत's picture

12 Nov 2016 - 6:49 pm | सोहम कामत

अहो विडंबन काव्य आहे ते.. वाचकांना थोडेसे विनोदी वाटायला पाहिजे ना पंतप्रधानांना आम्हीही मान देतोच की.. परंतु चुकीचे शब्द म्हणण्यापेक्षा मान ठेवून विडंबन केलेले शब्द असे म्हणणे कसे वाटेल? :-P

निओ१'s picture

12 Nov 2016 - 5:31 pm | निओ१

तुमचे किती अडकले ?

सोहम कामत's picture

12 Nov 2016 - 6:51 pm | सोहम कामत

१५-२० हजार आहेत घरी ५००-१००० चे.. नोटा बदलून देता का? :-P

संदीप डांगे's picture

12 Nov 2016 - 6:08 pm | संदीप डांगे

'जगण्याचे भान हे' हे कोणते गाणे आहे?

सोहम कामत's picture

12 Nov 2016 - 6:50 pm | सोहम कामत

अग बाई अरेच्च्या भाग २ मधील गाणे आहे..

एकतर त्यांनी तीन आठवड्यांत तेरा कविता टाकल्या त्याचं कै कवतुक नै!

निओ१'s picture

12 Nov 2016 - 6:52 pm | निओ१

चोर कवी!

सोहम कामत's picture

12 Nov 2016 - 7:00 pm | सोहम कामत

चोर कवी?
मला समजले नाही तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे..

सोहम कामत's picture

12 Nov 2016 - 7:01 pm | सोहम कामत

चोर कवी?
मला समजले नाही तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे..

सचु कुळकर्णी's picture

12 Nov 2016 - 6:54 pm | सचु कुळकर्णी

ह्यालाच तीन तेरा होणे असे म्हणत असावेत.

बराय बावा र्हायलेल्या १२ कवितांच्या वाटेला नाय गेलो.
खोकलाया १२ दिशा ;)
ह्याच निमित्ताने गडबडीतच का होईना बुवा तांब्या स्वारी डबड घेउन आले हे हि नसे थोडके ;)