नमस्कार,
बऱ्याच जणांना काही छंद असतात, किंवा वैयक्तिक आवडीनिवडी असतात ज्याचे रूपांतर व्यवसायात केले जाऊ शकते अथवा केलेले असते. अशा लोकांच्या वाटचालीची माहिती मिळवण्यासाठी हा धागा काढतो आहे.
मला वैयक्तिकरित्या अश्या लोकांचे कौतुक वाटते. आपल्या पैकी काही लोक जर असे व्यवसाय/ अर्थार्जन करत असतील तर जरूर माहिती द्यावी. अर्थार्जन हा मुख्य हेतू नसलेल्या पण कामाचे समाधान देण्याऱ्या व्यवसायाबद्दल पण माहिती आली तर उत्तमच ,प्रत्येक वेळेला पैसे हा घटक महत्वाचा असेलच असे नाही.
कधी कधी नोकरी मध्ये असणाऱ्या लोकांना एका ठराविक काळानंतर साचलेपण येते, अशा वेळी वेगळी वाट चोखाळणाऱ्या व्यक्तींची माहिती पण इथे मिळावी अशी अपेक्षा आहे. काही व्यक्ती आपल्या आवडीचे/ छंदांचे रूपांतर व्यवसायात करतात, जसे की खानपान सेवा पुरवणे, अथवा विविध कलाकुसरीच्या वस्तू तयार करणे इत्यादी. अशा लोकांचे अनुभव आणि वाटचाल ऐकण्यास उत्सुक आहे. काही लोकांनी घरगुती स्वरूपात अश्या प्रकारच्या सेवा पुरवायला चालू केले आणि आता त्याचे एका यशस्वी व्यवसायात रूपांतर केले. त्यांचे कौतुक ह्या धाग्यावर करूया. एकाच वेळी नोकरी आणि इतर काही साईड बिझनेस करणाऱ्यांचे विशेष कौतुक!
ह्या धाग्यातून कदाचित आपल्या वाचकांना काही प्रेरणा मिळेल; मागे पेठकर काकांच्या धाग्यावर एका मिपाकराने त्याच्या टाटा कॉलनी मधल्या हॉटेलबद्दल लिहिले होते. तसेच काहीसे.
आपल्या ओळखीतल्या , माहितीतल्या लोकांची माहिती जरूर द्यावी.एखाद्या व्यक्तीचा नोकरी/व्यवसाय काही कारणाने बंद पडला अथवा नोकरी गेली तरी खचून न जाता दुसरे काहीतरी चालू करून परत मार्गावर येणाऱ्या लोकांची गाथा सर्वांनाच प्रेरणादायी ठरू शकते.
माझा हा पहिलाच धागा आहे, काही चुकलं तर सांभाळून घ्या.
धन्यवाद!
प्रतिक्रिया
16 Oct 2016 - 11:08 pm | सुखीमाणूस
माझ्या ओळखितले एक जण flowerpot(artificial flower) and paintings भाड्याने देतात घरपोच.
Sort of library.
17 Oct 2016 - 3:43 am | मराठमोळा
चांगला धागा. माझ्या ओळखीत असे अनेक लोक आहेत की ज्यांनी कंफर्ट झोनमधून बाहेर निघून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. ते सगळं टंकणं माझ्यासाठी अवघड आहे, तसेच त्यांच्या कामातील बारकावे त्यांनाच माहिती.
बर्याच लोकांकडे चांगल्या कल्पना असतात पण त्या पुढे नेण्यातल्या आर्थिक किंवा औपचारीकतेतल्या अडचणींमुळे त्या हरवून जातात. आजकाल फ्रीलांसींग प्रकारात बर्याच संधी उपलब्ध आहेत आणि त्या नोकरी संभाळून किंवा घरबसल्या करता येतात. सर्वात महत्वाचे म्हणजे एखाद्या क्षेत्रातील पॅशन असणे फार महत्वाचे असते. ते असेल आणि थोडे मार्गदर्शन मिळाले तर अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात.
बाकीचे नंतर टंकतो. :)
17 Oct 2016 - 12:17 pm | सस्नेह
श्रीगणेश लेखमाला २०१६ वाचा. उपयुक्त माहिती मिळेल.