मला आवडलेले शायर २ : दुष्यंतकुमार

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
27 Sep 2016 - 2:48 pm

असं म्हणतात गझल अनुभवण्याची गोष्ट आहे. मानवी मनाचं प्रतिबिंब गझलेत कायम दिसत आलं आहे.
मीर तकी मीर, गालिब यांसारख्या कित्येक मोठ्या शायरांनी गझल रुजवली. मुघल काळात गझलेला राजाश्रय लाभला, एवढे भाग्य क्वचितच कोणत्या काव्य प्रकाराला लाभले असेल. पुढे दुष्यन्त कुमार, बशीर बद्र, निदा फाजली यांसारख्या लोकप्रिय शायरांनी हिंदुस्तानी भाषेत गझल लिहून ती अधिकच लोकप्रिय केली. या मालिकेत मला आवडलेली गझलकार/शायरांचा परिचय देण्याचा प्रयत्न करेन
_____________________________________________________________________

माणसं वाचणारा शायर : राजेश रेड्डी
____________________________________________________________________

 .

तू किसी रेल सी गुजरती है,
मै किसी पूल सा थरथराता हूं

हे 'मसान' मधलं गाणं ऐकत असता, त्या गाण्याचा इतिहास तपासून पाहिला तेव्हा या वरच्या दोन ओळी दुष्यंतकुमार यांच्या गझलेतून घेतल्याचे कळले. दुष्यंतकुमार हे काय प्रकरण पाहतांना रेख्तावर त्यांच्या काही गझला सापडल्या आणि एक सुंदर खजिना हाती लागला.

हिंदी-उर्दू गझलेच्या क्षेत्रात काही थोड्या काळात भरीव कार्य केले आहे त्यांत, 'दुष्यंत कुमार' यांचं नाव अग्रक्रमाने घेतले जाते. हिंदी गझलेला वैभावाचे दिवस मिळवून देण्याचे कार्य दुष्यंतकुमार यांनी केलं.
०१ सप्टेंबर १९३३ ला उत्तरप्रदेशच्या बिजनौर मधल्या राजपूर नवादा मध्ये जन्मलेल्या दुष्यंतकुमार यांनी . इलाहाबाद विश्वविद्यालय मधून शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना आकाशवाणी भोपाळ येथे असिस्टंट प्रोड्युसर ची नोकरी मिळाली. भोपाळ हे शहर अतिशय प्रिय होतं त्या शहराबद्दल तिथल्या तलावांबद्दल त्यांना एक वेगळ्याच प्रकारची आत्मीयता होती. अतिशय साध्या सोप्या शब्दांत कविता/गझल लिहिणारे दुष्यंतकुमार हे क्रांतिकारी शायर/कवी म्हणून जास्त प्रसिद्ध होते. त्यांचा कल डाव्या विचारांकडे झुकणारा होता, जे त्यावेळी अगदी साहजिकच होतं .
दुष्यंतकुमार जेव्हा राजकारण्यांवर प्रहार करतात तेव्हा ते म्हणतात.

मस्लहम आमेज होते हैं सियासत के कदम
तू न समझेगा सियासत, तू अभी इंसान है”

त्यांचे माझे आवडते शेर देतो आहे.

‘मुझमें रहते हैं करोड़ों लोग, चुप कैसे रहूँ
हर गज़ल अब सल्तनत के नाम इक बयान है”

”गूंगे निकल पड़े हैं जुबां की तलाश में
सरकार के खिलाफ ये साजिश तो देखिये”

”कैसे आकाश में सूराख हो नहीं सकता
एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो”
( हे बोकाभाऊंच कायप्पा स्टेट्स आहे बहुदा )

ये लोग होमो-हवन में यकीन रखते हैं
चलो यहां से चलें, हाथ न जल जाएं कहीं”

राजकारणी, दांभिकता यांवर प्रहार करणारे दुष्यंतकुमार रोमँटिक शायरी पण तितक्याच ताकदीने लिहितात.

एक आदत सी बन गई है तू
और आदत कभी नहीं जाती

चांदनी छत पे चल रही होगी
अब अकेली टहल रही होगी

फिर मेरा ज़िक्र आ गया होगा
बर्फ़-सी वो पिघल रही होगी

हि पूर्ण गझल सुंदर आहे.

मैं जिसे ओढ़ता -बिछाता हूँ ,
वो गज़ल आपको सुनाता हूँ।

एक जंगल है तेरी आँखों में
मैं जहाँ राह भूल जाता हूँ।

तू किसी रेल सी गुजरती है,
मैं किसी पुल -सा थरथराता हूँ।

हर तरफ़ एतराज़ होता है,
मैं अगर रोशनी में आता हूँ।

एक बाजू उखड़ गया जब से,
और ज़्यादा वज़न उठाता हूँ।

मैं तुझे भूलने की कोशिश में,
आज कितने क़रीब पाता हूँ।

कौन ये फासला निभाएगा,
मैं फ़रिश्ता हूँ सच बताता हूँ।

उण्यापुऱ्या ४२ वर्षाचं आयुष्य लाभलेल्या या असामान्य प्रतिभेच्या शायराने सामान्य माणसासोबत केवळ हात नाही मिळवला तर त्याच्या दुखणं बोलतं केलं.

सलाम दुष्यंतकुमार

संस्कृतीगझलसाहित्यिकप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

पुजारी's picture

27 Sep 2016 - 3:43 pm | पुजारी

एकच ओळ आठवते आहे ,
"भूख है तो सब्र कर रोटी नहीं तो क्या हुआ, आजकल दिल्ली में है ज़ेर-ए-बहस ये मुदद्आ "

महासंग्राम's picture

27 Sep 2016 - 3:58 pm | महासंग्राम

भूख है तो सब्र कर रोटी नहीं तो क्या हुआ
आजकल दिल्ली में है ज़ेर-ए-बहस ये मुदद्आ ।

मौत ने तो धर दबोचा एक चीते कि तरह
ज़िंदगी ने जब छुआ तो फ़ासला रखकर छुआ ।

गिड़गिड़ाने का यहां कोई असर होता नही
पेट भरकर गालियां दो, आह भरकर बददुआ ।

क्या वज़ह है प्यास ज्यादा तेज़ लगती है यहाँ
लोग कहते हैं कि पहले इस जगह पर था कुँआ ।

आप दस्ताने पहनकर छू रहे हैं आग को
आप के भी ख़ून का रंग हो गया है साँवला ।

इस अंगीठी तक गली से कुछ हवा आने तो दो
जब तलक खिलते नहीं ये कोयले देंगे धुँआ ।

दोस्त, अपने मुल्क कि किस्मत पे रंजीदा न हो
उनके हाथों में है पिंजरा, उनके पिंजरे में सुआ ।

इस शहर मे वो कोई बारात हो या वारदात
अब किसी भी बात पर खुलती नहीं हैं खिड़कियाँ ।

पद्मावति's picture

27 Sep 2016 - 3:51 pm | पद्मावति

सुरेख!

एक आदत सी बन गई है तू
और आदत कभी नहीं जाती

फिर मेरा ज़िक्र आ गया होगा
बर्फ़-सी वो पिघल रही होगी
क्या बात है!!!!

या धाग्यावरुन अश्फाक यांचे धागे आठवले !
आदाब अर्ज है !
आदाब अर्ज है !
आदाब अर्ज है !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- KALI (electron accelerator)

महासंग्राम's picture

27 Sep 2016 - 4:10 pm | महासंग्राम

नै हो ते मोक्लाया दाही दिशा टैप वाटते

मना पासुन लिखाण करणार्‍याची आणि माहिती देण्यार्‍याची आम्ही टर खेचत नाही ! त्यांनी दिलेली शायरी सुंदर आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- KALI (electron accelerator)

पैसा's picture

27 Sep 2016 - 5:58 pm | पैसा

सुरेख!

प्राची अश्विनी's picture

27 Sep 2016 - 6:09 pm | प्राची अश्विनी

क्या बात!

यशोधरा's picture

27 Sep 2016 - 9:31 pm | यशोधरा

कौन ये फासला निभाएगा,
मैं फ़रिश्ता हूँ सच बताता हूँ।

!!

सुंड्या's picture

27 Sep 2016 - 11:54 pm | सुंड्या

मुकर्रर

जयन्त बा शिम्पि's picture

28 Sep 2016 - 8:34 am | जयन्त बा शिम्पि

मलाही आवडणारा शायर,
' आपके घर के कालिन देखंगे किसी और दिन , इस समय तो पाँव किचड में फॅंसे है '
' ये सारा जिस्म बोझसे झुका हुआ होगा, मैं सजदे में नही था यारो, आपको धोखा हुआ होगा '
' यहाँतक आते आते सुख जाती है कई नदियाँ , मुझे मालूम है, पानी कहाँ, ठहरा हुआ होगा '
' कौन कहता है कि आकाश में सुराख नही हो सकता, एक पत्थर, जरा तबियतसे मारो यारो '
असे काही शेर, जसे आठवले तसे लिहिले आहेत.

हो गई है पीर पर्वत-सी पिघलनी चाहिए,
इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए।

आज यह दीवार, परदों की तरह हिलने लगी,
शर्त लेकिन थी कि ये बुनियाद हिलनी चाहिए।

हर सड़क पर, हर गली में, हर नगर, हर गाँव में,
हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए।

सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,
सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।

मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही,
हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए।

खास करून ultimate आणि penultimate शेर तर नित्य प्रेरणादायी

मारवा's picture

28 Sep 2016 - 2:37 pm | मारवा

छान उपक्रम हाती घेतलाय तुम्ही
सुंदर
कंटीन्यु ठेवा.