देव गाभाऱ्याबाहेर निघाला!

DEADPOOL's picture
DEADPOOL in जे न देखे रवी...
19 Apr 2016 - 10:44 am

शून्य मनाने बसलो होतो गाभाऱ्यात
आली ती पलीकडुन!
सांगितले कानात
येताहेत भेटायला तुला!

किती आनंदलो मी!
बहुता दिसा भेट होणार
का जन्मासी आलो मी!
जगण्याला अर्थ येणार

आली ती देवळात
निघाली माझ्याकडे येण्यासाठी!
आता रिते झाले मन
नवे वर्म भरून घेण्यासाठी!

थांब कुलटा
घणाघात झाला!
परंपरा तोडशिल?
मुलाला भेटायला!

परंपरा आड आली
भरल्या डोळ्याने परत निघाली!
मुलाला भेटावयाची इच्छा
इच्छा अधुरीच राहिली!

माता गेली माघारी
मुलाचा कोप झाला!
आणि परंपरा तोडून
देव गाभाऱ्याबाहेर निघाला!

संस्कृतीकलानाट्यधर्मजीवनमान

प्रतिक्रिया

माहितगार's picture

19 Apr 2016 - 11:02 am | माहितगार

सही !

पोचली आणि आवडली

विजय पुरोहित's picture

19 Apr 2016 - 12:15 pm | विजय पुरोहित

सहमत.
+१११

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Apr 2016 - 11:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कविता चांगली जमली आहे.

-दिलीप बिरुटे

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Apr 2016 - 11:58 am | ज्ञानोबाचे पैजार

सुनीता विल्यम्स आणि कल्पना चावला अंतराळात भरारी मारुन आल्या.
त्या नंतर देखिल स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशा वरुन वादंग सुरु आहेतच.
असल्या देवळांमधे देव सुध्दा रहात नसेल.

पैजारबुवा,

नाखु's picture

19 Apr 2016 - 2:25 pm | नाखु

आणि तुळजापुरला याची प्रचिती येते..

बिचारा खंडोबा अगदी पाठीशी शिल्ञा (वासाच्या) फुलांचे निर्माल्य आणि बडव्यांची अरेरावीत किती थांबणार तो केव्हाच बाहेर पडला असेल...

कुठलाही नवसाचा आणि बिन नवसाचा अश्या भेदभावी लोकांना फाट्यावर मारणारा नाखु
एक नमस्कार पुरेसा आहे

तुषार काळभोर's picture

19 Apr 2016 - 2:30 pm | तुषार काळभोर

एक नमस्कार पुरेसा आहे

चला देवाला नमस्कार करण्यावर तरी कुणाचा आक्षेप नाही असे समजूया!

DEADPOOL's picture

19 Apr 2016 - 2:06 pm | DEADPOOL

धन्यवाद मंडळी!!!!!

जव्हेरगंज's picture

19 Apr 2016 - 2:34 pm | जव्हेरगंज

i

अनिरुद्ध.वैद्य's picture

19 Apr 2016 - 3:14 pm | अनिरुद्ध.वैद्य

.

सही रे सई's picture

19 Apr 2016 - 10:42 pm | सही रे सई

कविता खरचं खूप छान जमली आहे. अभिनंदन तुमचे त्याबद्दल.

DEADPOOL's picture

20 Apr 2016 - 2:34 pm | DEADPOOL

धन्यवाद सई!

लालगरूड's picture

21 Apr 2016 - 3:17 pm | लालगरूड

काळीज को छू गई :-( :-(

DEADPOOL's picture

21 Apr 2016 - 4:38 pm | DEADPOOL

धन्यवाद!!!!!!

बोका-ए-आझम's picture

21 Apr 2016 - 11:14 pm | बोका-ए-आझम

कधीकधी आपला समाज पहिला स विसरतो आणि फक्त शेवटचा माज शिल्लक राहतो. :(

संपूर्ण समाजाला टार्गेट नाही करता येणार बोकाशेठ, पण आपण बोललात त्यात बऱ्याच अंशी तथ्य आहे !

बोका-ए-आझम's picture

22 Apr 2016 - 8:59 am | बोका-ए-आझम

पण जे त्याला विरोध करत नाहीत किंवा तटस्थ राहतात त्यांचा दोष नक्कीच आहे.

नाखु's picture

22 Apr 2016 - 5:18 pm | नाखु

दुर्जन+कंट्क संख्येने जास्त नाहीत, तर संख्येने जास्त असलेले विनाकारण दुर्बळ आणि नको इतके सज्जन राहतात म्हणून कंटकाचे फावते (अर्थात मला काय त्याचे)!

चारचौघातला तरी वेडसर नाखु

DEADPOOL's picture

24 Apr 2016 - 7:22 am | DEADPOOL

बरोबर.!!!

नीलमोहर's picture

22 Apr 2016 - 5:33 pm | नीलमोहर

आवडली कविता..

अभिजीत अवलिया's picture

30 Apr 2016 - 9:44 am | अभिजीत अवलिया

उत्तम कविता.

DEADPOOL's picture

30 Apr 2016 - 10:03 am | DEADPOOL

धँस अभिजीत!!!

चांगलंय दादा...भावना अप्रतिम!

DEADPOOL's picture

30 Apr 2016 - 11:08 am | DEADPOOL

थँक्स असंका!

माहितगार's picture

30 Apr 2016 - 11:38 am | माहितगार

@DEADPOOL या कवितेचे अधिक भाषातून स्वैर अनुवाद करवून घ्यावेत असे सुचवावेसे वाटते.

विजय पुरोहित's picture

30 Apr 2016 - 11:46 am | विजय पुरोहित

खरंच. तेवढी ताकदवान आहे नक्कीच...

DEADPOOL's picture

30 Apr 2016 - 12:03 pm | DEADPOOL

धँस माहितगार!
बघूयात जमते का?
काही मार्ग सुचवा!

आँ! ही कविता कशी काय मिसली ? सुरेख रचना !!

यशोधरा's picture

4 May 2016 - 4:47 am | यशोधरा

माता गेली माघारी
मुलाचा कोप झाला!
आणि परंपरा तोडून
देव गाभाऱ्याबाहेर निघाला!

काश..

ज्ञानराम's picture

9 Jun 2016 - 2:21 pm | ज्ञानराम

उत्तम !