हिवाळ्यातला लदाख - विमानातून दिसणारा महा-हिमालय (समाप्त)
मागील पानावरून ............
तेथून परत मुख्य रस्त्यावरती आलो. तेथून टैक्सी पडून दहा रुपयात मेन चौकात आलो. नंतर रस्ता पार करून चोगलमसर ला जाणारी टैक्सी पकडली आणि जेल पर्यंत यायला अजून पंधरा रुपये लागले. दिल्ली वरून निघताना एक मुंबई वरून फोन आला होता कि, येताना सिन्धु नदीचं पाणी घेऊन ये म्हणून. माज्याकडे अजून खूप वेळ होता. बाटली घेतली आणि सिंधू घाटावर पोहोचलो. चार दिवस झाले लेह फिरतोय. तेच तेच नजारे बघून आता वैताग आला होता. कधी घरी जातोय असे झाले होते. उद्या अकरा वाजता फ्लाइट आहे. त्यामुळे फक्त आजची रात्र लेह मध्ये काढायची होती.
..........
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२५ जानेवारी २०१३
आज मला दिल्ली ला जायचे होते. सीआरपीएफ मधील काही मित्र पण आज दिल्लीला जाणार होते. त्यांना सरकार कडून वारंट मिळत ते जम्मू साठी मान्य असतं. पण त्यांना दिल्ली ला जायचे होते म्हणून ते जुगाडाच्या भानगडीत होते. नंतर माहिती पडलं कि त्यांचं हे जुगाड काही जुळून आलं नाही. आता त्यांना जम्मूचेच विमान पकडावे लागणार होते.
विमानाची वेळ सव्वा अकराची होती. मी नऊ वाजताच तिथे पोहोचलो. प्रवेश दारावर ओळखपत्र दाखवल्यावर त्यांनी आत सोडले. आत जाउन बघतो तर खूप मोठी लाइन लागली होती. मी ओळखलं कि, हे दिल्लीला जाणारे प्रवासी आहेत. एका कोपऱ्यात लाईट वरचा हीटर लावला होता आणि दुसरीकडे एका मोठ्या ब्लॉअर मधून गरम हवा येत होती. मी आणि काही प्रवासी तिथे जाउन उभे राहिलो.
जेव्हा मी दिल्ली वरून लेहला आलो होतो तेव्हा अनुभव नसल्याने खिडकी जवळची सीट मिळाली नव्हती. आज मी ती सीट घेण्यासाठी खूप प्रयत्न करणार. साडे दहा नंतर प्रतीक्षा खोली पासून पुढे जाण्याची परवानगी मिळाली तेव्हा तर लाइन अजून लांब झाली होती. मी जर प्रामाणिकपणे लाइन ला थांबलो असतो तर खिडकी जवळची सीट मिळण्याचा प्रश्नच नव्हता. मी लाइन तोडून पुढे जाउन दरवाजाच्या आत घुसलो. मागच्या लोकांनी धिंगाणा करायला सुरुवात केली. तोपर्यंत मी आत गेलो होतो. भारतीय रेल्वेचा अनुभव येथे कामास आला.
दिल्ली वरून येताना हैंड बैग जवळ ठेवायची परवानगी मिळाली होती. पण आता २६ जानेवारी असल्याने हैंड बैग पण मोठ्या सामना बरोबरच जाणार. जवळ काहीच ठेवायचे नाही. कैमेरा जवळ ठेवायची परवानगी मिळाली.
दिल्लीवरून आठवड्यातून तीन वेळा लेह साठी एयर इंडिया ची उडाणे आहेत. दिल्ली वरून जे विमान लेहला येत तेच विमान पुढील दोन दिवस जम्मू आणि एक दिवस श्रीनगरला जातं. मग परत लेह ला येउन दिल्लीला उडान घेत. आम्ही ज्या विमानातून जाणार आहोत ते विमान आता जम्मू वरून येणार आहे. जम्मू वरून येताना ते अर्धा तास उशिराने आलं. त्यामुळे आता ते दिल्लीला सव्वा तास उशिराने निघणार होतं.
एका सुरक्षा दरवाज्यावर जैकेट काढायला लावलं. कैमराच्या कवर वरती सुरक्षित असल्याचा शिक्का मारला. माझ्या हातात सिन्धु नदीच्या पाण्याची बाटली पाहून तो सुरक्षा रक्षक म्हणाला कि, "इसमें से एक घूंट पानी पीओ."
मला कसली भीती होती. त्यातले एक घोट पाणी त्याच्या समोर मी पिलो. पाण्याची बाटली सामाना बरोबर पाठवली नाही. मला म्हणाला कि,"यह लगेज में नहीं जायेगी, इसे साथ लेकर जाओ."
पावणे बारा वाजता विमानात बसण्याची परवानगी मिळाली. पण शेवटचा सुरक्षा दरवाजा पार करताना बाटली काढून घेतली. तरी त्याला मी खूप वेळा सांगितलं कि,"भाई, यह साधारण पानी नहीं है, बल्कि सिन्धु जल है."
पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही. शेवटी सिंधू नदीच्या पाण्याची बाटली तेथेच सोडावी लागली. बरोबर साडे बारा वाजता विमानाने अवकाशात झेप घेतली. मला खिडकी जवळची सीट मिळाली होती.
दहा मिनिटातच आम्ही महा-हिमालयावरून जाऊ लागलो. चारी बाजूनी बर्फाचं राज्यं होतं. मला चांगलं माहिती होतं कि विमान कोणत्या दिशेने चाललं आहे. त्यामुळे मी लेह-मनाली रोडच्या शोधात होतो. पण जास्त बर्फामुळे रस्ता सापडलाच नाही. शेवटी हिमाचल प्रदेश मध्ये बारला-चा च्या आसपास एक रस्ता दिसला. परंतु इथे २५० किलोमीटर पर्यंत मानववस्ती नाहीय. त्यामुळे ह्या रस्त्याचा काहीच उपयोग नाही. उन्हाळ्याची गोष्ट वेगळी आहे.
रोहतांग पार केल्यानंतर बर्फ कमी होऊ लागला आणि हिरवळ दिसू लागली. विमानाच्या खाली डाव्या बाजूला मनाली आणि कुल्लू होतं पण ते दिसू शकले नाही. रामपूर पासून विमान निघून रोहडू च्या वर जाउन पोहोचलं. उजव्या बाजूला विशाल शिमला दिसू लागला. त्यानंतर पौंटा साहिब च्या वरून जाउन विमान यूपी मध्ये आलं. खाली यमुना पण दिसू लागली. मैदानात आल्यानंतर धुके दिसू लागलं. काहीच दिसत नव्हतं पण थोडं थोडं समझत होतं. यमुनाच्या पडयाल कुरुक्षेत्र आणि करनाल च्या नंतर पानीपत दिसू लागलं. तेलाच्या कारखान्यातून निघणारा धूर पण दिसत होता. इथून विमानाने दिशा बदलली आणि यमुनाच्या नंतर हरियाना मध्ये प्रवेश केला. सोनीपत पण निघून गेलं. नंतर वाटू लागलं कि बहादुरगढ च्या वरून जाउन मग आपण एयरपोर्ट पोहोचणार पण तितक्यात अचानक विमानाने पलटी मारली आणि ते यमुना पार करून परत यूपी च्या गाजियाबाद जिल्ह्याच्या वरती जाउन पोहोचलं. हिण्डन धाव पट्टी च्या वरून निघून दिलशाद गार्डन आणि वैशाली मेट्रो स्टेशन चे दर्शन घेऊन दिल्लीच्या दिशेने निघालं. दिल्ली मध्ये परत यमुना पार करून पश्चिम दिशेला असणार्या रिंग रोड च्या बरोबरीने ते एयरपोर्टला पोहोचले. इथे बैग शोधायला जास्त वेळ लागला नाही. इथे बैग भेटल्यानंतर परत चेकिंग होत नाही. आपण सरळ घरी जाऊ शकता. इथे आपण कोणाचेहि सामान घेऊन जाऊ शकतो किंवा आपले पण सामान कोणीही घेऊन जाऊ शकतो. इथे आल्यावर आनंदाची बातमी कळली कि, एयरपोर्ट मेट्रो किती तरी महिने बंद असल्यापासून आता परत सुरु झाली आहे. हा पण फुल स्पीड वर चालवलं जात नव्हतं. तरी पण कश्मीरी गेट पर्यंत लागणारा अडीच तासाच्या वेळेपेक्षा एका तासात घरी पोहोचणे , हि सुखावणारी गोष्ट होती.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्षणचित्रे :
लेह श्रीनगर रोड
हा पण लेह श्रीनगर रोड आहे
लेहची धावपट्टि आणि बाजुला लेह श्रीनगर रोड
बर्फाने आच्छादलेला महा-हिमालय
मला असं वाटत कि हे नुन व कुन पर्वत आहे. जे कारगिल-पदुम रोड च्या जवळ आहे.
लांब दूरवर पसरलेला महा-हिमालय
ह्या फोटो मध्ये खाली लेह मनाली रस्ता स्पष्टपणे दिसत आहे. पण आता ह्या रस्त्यावर खूप बर्फ पडलेला आहे. तो जून मधेच हटणार.
जस जसे दक्षिणे कडे आलो तसे बर्फ कमी होऊन जंगल दिसू लागले.
सिट च्या समोर दिसनारे आकडे
हि नक्किच व्यास नदि असनार
शिमला
पर्वत सम्पल्या नन्तर धुक्या मधे प्रवेश केला
पानीपत
यमुना नदी
खाली वैशाली मेट्रो स्टेशन दिसत आहे
दिल्ली- फरीदाबाद रोड व मेट्रोची बदरपुर कड्ची लाइन
लोटस टेम्पल
टाटा बाय बाय !! चाललो आम्ही आमच्या घरी
--------------------------------------------------------------(समाप्त)-------------------------------------------------------------
मागील भागात जाण्यासाठी...
या लेखातील सर्व भाग वाचण्यासाठी खालील लिंक्स वर जावा
दिवसदिनांकविषय प्रवास कशाने
दिवस पहिला१५ जानेवारी २०१३
हिवाळ्यातला लदाख - सुरुवात (भाग १)विमानाने
दिवस तिसरा१७ जानेवारी २०१३
हिवाळ्यातला लदाख - लेह प्रवेश, सिंधू दर्शन व चिलिंग कडे (भाग २)टैक्सी ने
दिवस चौथा व पाचवा१७ व १८ जानेवारी २०१३
हिवाळ्यातला लदाख - जांस्कर घाटीमध्ये बर्फवृष्टी (भाग ३)पायाने
दिवस सहावा१९ जानेवारी २०१३
हिवाळ्यातला लदाख - चादर ट्रेक आणि बर्फाच्या गुहेतील एक रात्र (भाग ४)पायाने
दिवस सातवा व आठवा२० व २१ जानेवारी २०१३
हिवाळ्यातला लदाख - चिलिंगवरून परतीचा प्रवास आणि लेह भ्रमंती (भाग ५)पायाने व टैक्सी ने
दिवस नववा २२ जानेवारी २०१३
हिवाळ्यातला लदाख - लेह पैलेस आणि शान्ति स्तूप (भाग ६)पायाने व टैक्सी ने
दिवस दहावा २३ जानेवारी २०१३
हिवाळ्यातला लदाख - खारदुंगलाचं परमिट आणि शे गोनपा (भाग ७) पायाने व टैक्सी ने
दिवस अकरावा २४ जानेवारी २०१३
हिवाळ्यातला लदाख - सैनिकांची परेड आणि युद्ध संग्रालय (भाग ८) पायाने व टैक्सी ने
दिवस अकरावा २४ जानेवारी २०१३
हिवाळ्यातला लदाख - पिटुक गोनपा (स्पिटुक गोनपा) (भाग ९) पायाने व टैक्सी ने
दिवस बारावा२५ जानेवारी २०१३
हिवाळ्यातला लदाख - विमानातून दिसणारा महा-हिमालय (समाप्त) विमानाने
प्रतिक्रिया
7 Apr 2016 - 12:02 pm | खेडूत
सुंदर मालिका राजकुमारजी.
प्रत्यक्ष जाऊन आल्याचा अनुभव घेता आला.
असेच फिरत रहा आणि छान लेख मालिका लिहीत रहा!
7 Apr 2016 - 12:21 pm | यशोधरा
अहा! हिमालय!
7 Apr 2016 - 2:47 pm | जगप्रवासी
अरेरे अजून एक सुंदर प्रवास संपला
छान लेखमालिका
7 Apr 2016 - 2:59 pm | स्वामिनी
फोतो नेहमी प्रमाणे सुरेख. फारच सुन्दर सफर.
7 Apr 2016 - 3:10 pm | 'पिंक' पॅंथर्न
मस्तच !!
7 Apr 2016 - 3:13 pm | माहितगार
सिंप्ली ग्रेट !!
7 Apr 2016 - 4:17 pm | पिलीयन रायडर
अत्यंत सुंदर लेखमाला..!!
ती इतक्या नेटकेपणाने मांडलेली असते की वाचायला अजुन छान वाटतं..
7 Apr 2016 - 4:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हिमालय. क्लासच.
-दिलीप बिरुटे
7 Apr 2016 - 5:58 pm | अभिजित - १
सुंदर
7 Apr 2016 - 10:00 pm | अजया
अप्रतिम शेवटसुध्दा.विमानप्रवास घडला फोटोतून!
7 Apr 2016 - 10:14 pm | स्रुजा
काय फोटो काढलेत !! हॅट्स ऑफ !!
8 Apr 2016 - 12:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर फोटोंनी भरलेली सुंदर लेखमाला !
"लांब दूरवर पसरलेला महा-हिमालय" हा फोटो खास आवडला.
बर्फाच्छादित हिमालय ११ किलोमीटर वरून उडत पाहणे हा अवर्णनिय अनुभव आहे ! शब्दांत पकडणे शक्य नाही ! फोटोही त्याचा आवाका काहीच प्रमाणात पकडू शकतात.
19 Apr 2016 - 5:42 pm | राजेंद्र मेहेंदळे
एक छान मालिका संपली . काय काय आहे आपल्या भारत देशात. काय काय बघायचे राहिलेय अजुन. कधी बघणार एव्ह्ढे सगळे ? असे अनेक विचार या मालिकेचे भाग वाचताना मनात येत होते. असो.
राजकुमार व नीरज यांचे आभार अशी मालिका लिहिल्यबद्दल.
19 Apr 2016 - 6:44 pm | बोका-ए-आझम
असेच म्हणतो! आता लवकरच पुढची अशीच भन्नाट मालिका येऊ द्या!
19 Apr 2016 - 5:45 pm | टवाळ कार्टा
हिमालय जब्रा आहे