हिवाळ्यातला लदाख - चादर ट्रेक आणि बर्फाच्या गुहेतील एक रात्र (भाग ४)

राजकुमार१२३४५६'s picture
राजकुमार१२३४५६ in भटकंती
22 Mar 2016 - 8:15 pm

जागरणहा लेख ३० जून २०१३ ला जागरण पेपर मध्ये छापून आला होता.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हिवाळ्यातला लदाख - चादर ट्रेक आणि बर्फाच्या गुहेतील एक रात्र (भाग ४)

मागील पानावरून ............
भटकंती हि काय कोणती शर्यत नाही कि जो जीता वही सिकन्दर. परत आयुष्यात असे कितीतरी चादर ट्रेक येतील. ह्यावेळेस तर चादर च्या तोंडाजवळ येउन गेलोय. जानेवारी महिन्यात लद्दाख फिरायला मिळणे हीच खूप मोठी गोष्ट आहे.
शरीराच्या सर्व अंगानी आत्म्याच्या या निर्णयाचे स्वागत केले. पहिले स्वागत तर पायांनीच केले.
आज शुक्रवार होता. परवा म्हणजे रविवारी लेहला जाणारी बस येणार आहे. उद्या थांबून इथले जनजीवन बघून परवाच्याला लेहला जाऊया........
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

१९ जानेवारी २०१३
आज शनिवार आहे. लेहला जाणारी बस उद्या येईल. आता सकाळचे दहा वाजलेत. अजून अंथरुणातच पडून आहे. डोळे तर दोन तासापूर्वीच उघडले होते तरी अजून तसाच पडून आहे. घरातली मानसं थोड्या थोड्या वेळानी येउन दरवाजा वाजवत होती कि, हा महाराज उठेल म्हणजे त्याला लगेच चहा नाश्ता द्यायला. खाली जाड गादी आणि अंगावर भली मोठी पश्मीना घोंगडी त्यामुळे बाहेर निघुशी वाटत नव्हते.

सकाळी साडे दहाला उठलो. लगेच चहा आणि चपाती आली. आज जरा वेगळ्याच पद्धतीने चपात्या बनवल्या होत्या. राजस्थान मध्ये कशी बाटी असते तशीच जाड पण आगीत विस्तवात चांगली शेकून काढलेली. मग त्या बरोबर लोणी आणि जाम लावून खाल्ली.

आजच लक्ष्य होतं कि चिलिंग मधलं लोकांचं राहणीमान बघायचं आणि फोटो काढायचे.
पण अचानक अंतर आत्म्याने हुकुम सोडला कि नेरक ला जायचं. हा वट हुकुम एवढा जबरदस्त होता कि, शरीराच्या कोणत्याच भागाला सावरायला अन सांभाळायला वेळ भेटला नाही. सगळ्यांनी चुपचाप पणे त्यांचा हुकुम मान्य केला. हा पायांनी कानकूच केलं थोडं पण लगेच अंतर आत्म्यांनी सांगितलं कि - चूप.

नेरक हे चिलिंग पासून पुढे चाळीस किलोमीटर वर जास्कर नदीच्या किनारी वसलेलं सुंदर गाव आहे. आठ किलोमीटर पर्यंत रस्ता चांगला बनवलेला आहे. त्यानंतर पुढे फक्त पायवाट आहे. हि पायवाट सध्या बर्फ खाली गाडली गेलेली आहे. त्यामुळे याच बर्फाच्या पायवाटेवरून चालणे म्हणजे चादर ट्रेक.

माझी परत जायची तारीख पंचवीस आहे. त्या हिशोबाने माझ्याकडे फक्त सहा दिवस उरतात. त्यामुळे चार दिवसात नेरकला जाउन आरामशीर पणे परत येऊ शकतो. मालकिणीला याबाबत बोललो. त्याच बरोबर एक काठी, एक चेश्मा आणि दोरी साठी पण सांगितलं. बैग च्या वरती स्लीपिंग बैग दोरीनी बांधून टाकली. मालकिणीन दोन चपात्या, लोणी आणि जाम बांधून दिलं. तसं खाण्यासाठी माझ्याकडे पण पुष्कळ सामान होतं. पाचशे रुपयाच्या हिशोबाने एक हजार रुपये झाले. त्यामध्ये राहणे, जेवण खावन सर्व मिळून होतं.

साडे अकरा वाजता तेथून निघालो. पाठीवरती नऊ किलो पेक्षा जास्त सामान होतं. दिल्ली वरून निघतानीच नऊ किलो होतं पण नंतर स्लीपिंग बैग मुळे अजून वजन वाढलं. आज जर चादर ट्रेक नाही केला तर आयुष्यभर याचा पच्याताप राहील कि हिवाळ्यात जाउन सुद्धा चादर ट्रेक वर चाललो नाही. दुसर्यांना हे पण सांगू शकणार नाही कि, चादर ट्रेक कसा असतो? त्यावर चालताना किती अडचणी येतात?

रात्री बर्फवृष्टी झाली नव्हती. त्यामुळे काल गेलेल्या गाड्यांचे चाकाचे ठसे अजून सुद्धा बर्फावर दिसत होते. मी काल संध्याकाळ पर्यंत ह्या रस्त्यांनी फिरलो होतो. त्यामुळे मला माहित होते कि, कोणत्या गेलेल्या गाड्यांचे कोणते ठसे आहेत ते. त्यानंतर त्यावरून अजून कोणतीच गाडी गेली नव्हती. कालच्या तुलनेने आज बर्फ कडक बनलेला आहे. भुसभुशीत नाही. त्यामुळे चालताना आवाज येत होता. आज उन पण चांगले पडले होते. बर्फावरून सूर्याचे किरणे परावर्तीत झाल्यावर ते शरीराची जास्त हानी करतात. शरीराचा उघडा असलेला भाग आणि डोळ्यांची जास्त हानी होते. मी हाथमौजे आणि माकड टोपी घातल्यामुळे शरीराचा बराचसा भाग झाकून गेला आणि राहिलेल्या उघड्या भागावर सन क्रीम लावली. चेश्म्यासाठी शंभर रुपये द्यावे लागले कारण परत येताना चिलिंग मध्ये थांबणार कि नाही हे ठामपणे सांगू शकत नव्हतो. जर तिलत वरूनच गाडी मिळाली तर चिलिंग मध्ये थांबायचा प्रश्नच नाही. रस्त्यामध्ये मला येणारे जाणारे भेटत होते. विचारायचे कि, एकटा आहेस का? आज कुठे जाणार? मी उत्तर द्यायचो कि, आज तिलत च्या गुहेत थांबणार आहे तर म्हणायचे कि, चांगली गोष्ट आहे.

ह्याच लोकांकडून माहित पडले कि, आज कोणताच ग्रुप लेह वरून आला नाही. म्हणजे मला तिलत मध्ये एकतच राहावे लागणार. हा काल एक ग्रुप आला होता पण ते आज नऊ दहा वाजता निघाले असतील आणि दहा पंधरा किलोमीटर पुढे गेले असतील. जर मी जोरात गेलो तर त्यांना पकडू शकतो. नंतर विचार केला कि आताशी तर बारा एक वाजले आहेत संध्याकाळ पर्यंत नक्कीच कोणता तरी ग्रुप येईल.

एका भल्या माणसांनी सांगितलं कि, जर सकाळी लवकर निघालात तर संध्याकाळ पर्यंत नेरक मध्ये पोहोचू शकता. हि माझ्यासाठी चांगली गोष्ट होती. मी ठरवलं कि सकाळी ५ वाजताच तिलत मधून निघायचे. उद्या किती हि कष्ट पडले तरी चालतील पण नेरक ला पोहाचायाचेच. कारण मी सलग दोन रात्री गुहे मध्ये राहू नाही शकत. स्वप्नात मला नेरक मध्ये दोन मोठ मोठ्या गाद्या दिसू लागल्या.

आज जास्तकरून लोक चादर ट्रेक वरून परत येत होते. रस्त्याच्या शेवटला तीन किलोमीटर पर्यंत नदी हि पूर्णपणे गोठलेली आहे. परत येणारे ट्रेकर तेथूनच आले होते. आता मला पण कमीत कमी तीन दिवस याच रस्त्यांनी चालायचे होते.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

चादर ट्रेक वरती पहिलं पाउल:

तिलत सुमडो च्या आधी दोन किलोमीटर वर जिथे रस्ता संपतो तिथूनच गाडया परत वळतात. तिथून पुढे जाण्यासाठी नदी वर उतरून चालत जावे लागते. नदीवर उतरण्यासाठी येणाऱ्या जाणार्या लोकांनी पायवाटा पाडल्या आहेत. खाली उतरणे अवघड नाही. पण काल पडलेल्या बर्फामुळे जास्त कठीण जात होतं. कसं तरी खाली उतरलो आणि चादर वरती पहिलं पाउल टाकलं. बर्फावर उन पडल्यावर त्याचे पाणी होऊन बर्फावरून वाहू लागतं. त्यामुळे तो बर्फ एकदम काचे सारखा दिसतो आणि गुळगुळीत झाल्याने घसरून पडायची जास्त भीती असते. पण कालच्या झालेल्या बर्फवृष्टी मुळे भूर भुरा बर्फ वरती पसरला होता. त्याने घसरडे कमी झाले होते.

उन पडले होते. डोळ्यांना चेश्मा लावला होता नाहीतर कधीच आंधळा झालो असतो. अचानक पायाखाली काहीतरी मोकळ्या ह्याच्यावर पाय दिल्यागत आवाज आला. नंतर कळले कि, इथे बर्फाची जाडी कमी आहे आणि त्याखाली हवा होती त्यामुळे असा आवाज आला. पण मला हे तेवढ्या जागे पुरतेच जाणवले. पण त्याने घाबरून सोडले हे मात्र नक्की.

बर्फ हे पाण्यापेक्षा हलक असतं. त्याची घनता हि पाण्यापेक्षा कमी असते. त्यामुळे ते पाण्यावर तरंगतं. जेव्हा आपण पाण्यापासून बर्फ बनवतो तेव्हा तुम्ही फ्रिज मध्ये बघितलं असेल कि बर्फ झाल्यावर तो ट्रे च्या बाहेर पण आलेला दिसतो. तळ पासून तो उंच झालेला असतो. याचा अर्थ असा कि, पाण्याच जेव्हा बर्फ बनतो तेव्हा तो पसरतो. हाच नियम नदीला पण लागू होतो. जेव्हा नदीच्या पाण्याचा बर्फ बनतो तेव्हा तो पण पसरतो आणि जर नदीच पात्र अरुंद असेल तर दबाव येउन खूप तोड फोड होते. नदी पात्रावर भेगा पडतात. काही ठिकाणी छोट्या ज्वालामुखी सारख्या रचना किंवा आकृत्या तयार होतात. ग्लेशियरसारख्या एवढ्या मोठ्या भेगा नव्हत्या. पण इंचा इंचाच्या जरी असल्या तरी त्या पार करायला मला भीती वाटत होती.

एका ठिकाणी तर काही मीटर पर्यंत पायवाट बनलेली होती. असे वाटत होते कि, कोणी तरी खोदून ठेवलंय. काचे सारख्या बर्फाचे बरेच तुकडे तिथे पडलेले दिसले. मला भीती होती कि, तिथे नक्कीच बर्फाची जाडी कमी असणार. डोक्यात विचार चक्र सुरु झाले कि, तिथे जर पाय ठेवला आणि नदीत पडलो तर...मग मी त्या खोदलेल्या पाय वाटे ऐवजी दुसरा रस्ता शोधू लागलो. जसा मी त्या पायवाटेच्या बाहेर पाय टाकू लागलो तसा बर्फाचा चर चर आवाज झाला आणि बर्फाचे तुकडे होऊन एक फुट पाय माझा खाली गेला. मी मोठ्याने ओरडलो पण माझे ऐकणारे तिथे कोणीच नव्हते. पाय बाहेत काढला मग मला कळाले कि इथे खोदलेला सारखा बर्फ का आहे ते. निसर्गाचा सगळा खेळ माझ्या लक्षात आला.

इथे बर्फाचे खूप थर आहेत. सर्वात वरचा थर हा एक इंच एवढा मोठा आणि मग त्या खाली चार पाच इंच मोकळी जागा. परत त्या खाली मोठा बर्फाचा थर. जसा मी वरच्या थरावर पाय ठेवला तसा बर्फ तुटून पाय खाली गेला आणि परत खालच्या थरावर जाउन अडकला. इथे सारखे लोकांचे पाय पडून वरचा बर्फचा थर हा खोदलेल्या बर्फ सारखा वाटू लागला. मग थोडा धीर आला कि, वरचा थर जरी तुटला तरी खालचा थर सुरक्षित आहे. त्यामुळे घाबरण्यासारखे काही नाही.

एका ठिकाणी बर्फामध्ये दोन फुट व्यास असलेलं कुंड दिसलं. त्यामध्ये पाणी दिसत होतं. त्याच्या शेजारी पायांचे ठसे पण दिसले. कोणीतरी येउन तिथे बर्फावर बसून पाणी पिले होते. माझी बाटली पण खाली झाली होती. पण पुढे भरू या हिशोबाने पाणी नाही भरले. पण त्याचा पश्चतावा मला पुढे झाला.

एक वेगळेच वातावरण तयार झाले होते. वातावरणात थंडी होती तर नदीच पाणी गरम. दोघांच्या मध्ये गोठलेला बर्फाचा थर. हवा आणि पाण्याच्या संघर्ष्या मध्ये बर्फाच्या थराचे हाल होत होते. जिथे हवा जास्त थंड तिथे बर्फाचा थर मोठा आणि जिथे पाणी जास्त गरम तिथे बर्फाचा थर बारीक किंवा काहीच नाही. या दोघांच्या संघर्श्याचा फायदा अप्रत्यक्षपणे मला मिळत होता. मला वाटत होते कि, रस्त्यामध्ये हवा जास्त थंड पाहिजे त्यामुळे बर्फाचा थर पण मोठा राहील आणि मी सुरक्षित राहू शकतो.

तिलत सुमडो. सुमडो हे दोन नद्यांच्या संगमाला म्हणतात. इथे पण जांस्कर नदीला दुसरी नदी येउन मिळते. जांस्करच्या त्या पलीकडे कैम्प साइट आहे. जिथे ट्रेकर तंबू लावतात. माझ्याकडे तर तंबू नव्हता त्यामुळे माझे डोळे एका गुहेच्या शोधात होते. जास्त वेळ नाही लागला गुहा शोधायला. गुहा नदीच्या वरच्या बाजूला होती. त्याच्या तोंडाजवळ चार फुट उंच दगडाची भिंत होती. एक झटक्यात वर चढलो आणि बराच वेळ दम खात बसलो. हि मध्यम आकाराची गुहा होती. पाच सहा लोक आरामशीर झोपू शकले असते. तिथे आत राख आणि अर्धवट जळलेले लाकडाचे तुकडे पडले होते. गुहेच्यावरती धुराच्या जाळ्या होत्या आणि भिंती काळ्या पडल्या होत्या.

बाटली मध्ये तर पाणी नव्हतं. खाली दोन्ही नद्या पूर्णपणे गोठलेल्या होत्या. त्यामुळे पाणी भेटण्याची शक्यता खूप कमी होती. काही वेळा पूर्वी कुंड दिसलं होतं. तिथच पाणी भरून घ्यायला पाहिजे होतं. गुहेच्या बाहेर भुरा बर्फ पडला होता. तोच मग बाटलीत भरून घेतला आणि बाटली स्लीपिंग बैग मध्ये घुसवून ठेवली तेवढंच प्यायला दोन घोट पाणी तयार झाले.

मी तीन वाजायच्या आसपास इथे पोहोचलो होतो. चांगले उन पडले होते. अजून दोन तास चालून मी पुढे जाऊ शकलो असतो. पण पुढे गुहा मिळणार कि नाही ह्या भीतीने इथेच थांबलो. अजून पर्यंत मला आशा होती कि कोणता तरी ग्रुप येईल. तेवढीच मला सोबत होईल. पण जस जसा वेळ निघून जाऊ लागला तसं कोणीच नाही आलं. म्हणून मनात भीती वाटू लागली. माणूस हा पण किती विचित्र प्राणी आहे. शहरात असताना चारी बाजूनी माणसे घेरलेली असतात तरी घाबरतो आणि एकटा सामसूम ठिकाणी असताना पण घाबरतो. इथे लांब लांब पर्यंत कोणीच नव्हतं. आता रात्री मला एकटेच इथे राहावे लागणार या विचाराने मी अस्वस्थ झालो.

या भागात हिम लांडगा आणि कोल्हे फिरतात असे ऐकले होते. त्यामुळे अजूनच भीती वाटू लागली. मी परत जायचा विचार करू लागलो. आता निघालो तर दोन तासात काठमांडू म्हणजे मारखा-जांस्कर च्या संगमा पर्यंत पोहोचू शकतो. तिथेच रात्री थांबू. परत विचार केला नको. बघू पुढे काय होईल ते.

स्लीपिंग बैग घुसून आडवा पडलो. माझ्या जवळ कोणतीच मैट्रेस नव्हती. शून्य पेक्षा कमी तापमानाला जमीन पण गार पडली होती. पूर्ण रात्रभर माझ्या खालची जमीन थंडच राहिली. पूर्ण रात्रभर नदी मध्ये दगड पडण्याचा आवाज येत होता. त्यामुळे पूर्ण रात्रभर भीती गेलीच नाही. सारखं वाटायचं कि, लांडगा गुहेच्या दिशेने येतोय. त्याच्या वरती चढण्याच्या नादात दगड खाली नदी मध्ये पडतायेत आणि त्याचाच आवाज मला येतोय. जसा वेळ निघून जात राहिला तसी मला याची सवय झाली आणि भीती पण कमी झाली.

समोर उंच पर्वतावरती संध्याकाळी साडे सहा पर्यंत उन होतं. त्यानंतर सुद्धा अंधार पडलाच नाही. कारण आज शुक्ल पक्ष मधली नवमी का दशमी होती. त्यामुळे सुर्य जायच्या आधी चंद्र उगवला आणि संपूर्ण घाटी मध्ये उजेड ठेवण्याची जबाबदारी त्यानी घेतली.

स्लीपिंग बैग विकासच होतं. त्याने मेरठ मधून अकराशेला घेतल होतं. त्यामध्ये घुसल्यावर त्याची खराबी दिसू लागली. ते माझ्यापेक्षा खूप छोटं होतं. खूप कष्ट करून त्याची चैन आतून बंद करू शकलो. परत त्यात आतमध्ये पाण्याची बाटली ठेवावी लागली. मोबाइल पण आत ठेवावा लागला. कैमराला आत जागाच राहिली नव्हती म्हणून बाहेर एवढी थंडी असून सुद्धा कैमरा बाहेरच ठेवला.

रात्री एक वाजता माझे डोळे उघडले. मी थंडीनी थर थर कापत होतो. डोक्यावरती दोन माकड टोपी , हातामध्ये हातमौजे, खाली दोन गरम लोवर आणि त्यावर एक पैंट, वरती अंगात तीन गरम इनर, एक गरम विणलेलं शर्ट त्यावर मोठं जैकेट घातलं होतं. बूट पण काढले नव्हते. तसाच स्लीपिंग बैग मध्ये घुसलो होतो. तरी पण पायाची बोटे इतकी थंड पडली होती कि त्यांना सवेंदनाच राहिल्या नव्हत्या. हा बैग मध्ये अजून सुद्धा गरम कपडे होते पण ते घालण्यासाठी मला जैकेट काढावे लागले असते. आणि ते मी काढण्याचा विचार हि करू शकत नव्हतो.

थंडी वाजते म्हणून मी कुशीवर झोपलो. त्यामुळे जमिनीच्या संपर्कात असलेले शरीराचे क्षेत्रफल कमी झाले. हाथाना छातीच्या जवळ घेतले त्यामुळे त्यांच्यात गर्मी आली. बुटा वरून परत दोन पाय मौजे घातले. मग थोडा आराम मिळाला आणि चांगली झोप लागली.

पाच वाजता डोळे उघडले. मग कालचे आठवले कि आपल्याला तर पाच वाजता निघायचे आहे. तरच संध्याकाळ पर्यंत नेरक पर्यंत जाऊ शकतो. पण आता शरीराला इतका आराम मिळाला होता कि कोणत्याही परिस्थितीमध्ये बाहेर पडूशी वाटत नव्हते. उठून चालायची तर लांबची गोष्ट आहे. आयुष्यात कधी अंगावर एवढे कपडे घातले नव्हते जे आज घातले होते. परत डोळे बंद करून तसाच झोपून गेलो.

२० जानेवारी २०१३
परत सकाळी नऊ वाजता डोळे उघडले. जांस्कर नदी हि दोन पर्वतांच्या अरुंद जागेतून वाहते त्यामुळे बारा वाजायच्या आत उन यायचा प्रश्नच नाही. लांब पर्वतावर्ती मात्र उन पडलेलं दिसून येत होतं. आता जर मी नेरक कडे निघालो तर संध्याकाळ पर्यंत पोहोचणे अशक्य होतं. म्हणजे पुढची रात्र परत थंडीत कापत गुहेत काढावी लागणार होती. शरीराणे तर बंड केले. शरीराच्या प्रत्येक भागाला माहित होते कि, आज रविवार आहे आणि दुपारी एक वाजता चिलिंग वरून लेह ला बस जाते. इथून चिलिंग ला पोहोचायला साडे तीन तास लागतील. आता नऊ वाजलेत. त्यामुळे लगेच सामान बांधायला घेतले आणि चिलिंग ला जाण्यासाठी तयारी सुरु केली.

जेव्हा मी साडे नऊ वाजता गुहेतून निघालो तसे नेरक कडून तीन लोक येताना दिसले. विचारले तर ते सकाळीच पाच वाजता वरच्या कैम्प कडून निघाले होते. खरोखरच देव काही माणसाना वेगळीच भारी माती वापरून बनवतो. त्यांचा लक्ष आज तिलत मध्ये थांबायचं होतं. एका स्तानिक गाईड न मला विचारलं कि कुठे जाणार? मी सांगितलं कि, लेह पर्यंत. चिलिंग मधून एक वाजता गाडी पकडायची आहे. म्हणाला कि, आमचा एक ग्रुप लेह वरून येणार आहे. माहित नाही त्यांची गाडी कधी येईल ते. तुम्हाला अजून नऊ ते दहा किलोमीटर चालावे लागेल चिलिंग मध्ये पोहोचण्यासाठी जर आमची गाडी लवकर आली तर आणि तुम्ही रस्त्यात भेटले तर तुम्हाला पण आम्ही गाडी मध्ये घेऊन जाऊ. मी म्हटलं धन्यवाद !!

काल जेव्हा चादर वर चालून गुहे मध्ये गेलो होतो त्या पेक्षा आज चादर ची जाडी जास्त मोठी होती. कारण रात्रीच्या थंडी मुळे. रस्ता तोच होता काल जिथून मी आलो होतो. पण आज मला कसलीच भीती वाटली नाही. जिथून मी नदीवर उतरलो होतो ती जागा कधी आली ते कळलेच नाही. रस्त्यावर उन पडले होते. सूर्याकडे तोंड करून वीस मिनिटं तसेच थांबलो. आता बोटामध्ये रक्त प्रवाह सुरु झाला होता. त्यांची मधालि चेतना आता जागृत झाली होती.

चादर ट्रेक वर फोटो काढणे हे खूप जिकीरीचे काम आहे. हातावरती दोन दोन हाथमौजे असतील. त्यात बोटे सुन्न पडली असतील तर फोटो काढण्यासाठी हाथ मौजे काढावेच लागतात. सुन्न बोटानेच कॅमेराचे बटन दाबावे लागते. आपण जेव्हा इंटरनेट वर चादर ट्रेक चे सुंदर फोटो पाहतो. त्यावेळी त्या फोटोग्राफार चे आभार मानावे हवेत. चादर ट्रेक चे फोटो कोणत्या परिस्थितीमध्ये काढले जातात ते आज मला कळाले.

चादर ट्रेक तसं पाहिला गेला तर १०० किलोमीटर पेक्षा लांब आहे. पदुम पर्यंत येउन जाउन २०० किलोमीटर पेक्षा जास्त होतं. जास्त करून लोक नेरक पर्यंत जातात जे येउन जाउन ८० किलोमीटर च्या आसपास आहे. मी फक्त तिलत सुमडो पर्यंतच गेलो जे येउन जाउन चार किलोमीटर आहे. तरी पण मला आनंद आहे कि चादर ट्रेक करणाऱ्यांच्या यादीत माझा समावेश झाला.

हा लेख हिंदी मध्ये वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
चादर ट्रेक पर गुफा में एक रात
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्षणचित्रे :


चिलिंग गांव


मी ह्याच घरात थांबलो होतो.


गोठलेली जास्कर नदी आणि त्यावर ट्रेकिंग करणारी लोक


लाकडाच्या चौकटी वरून सामान ओढलं जातं


चादर


दबावामुळे ज्वालामुखी उद्रेक सारखी रचना तयार झाली आहे.


समोर तिलत सुमडो आहे.


समोर नदीच्या थोडे वर एक सपाट जागा दिसतेय तिथेच तिलत सुमडो कैम्प साइट आहे. फोटो गुहेतून झूम करून काढला आहे. फोटो दिसायला साधारण असला तरी माणूस कैम्प साईट वर मुंगी सारखा दिसतो


नदीला भेग पडली आहे


गुहेतून काढलेला अजून एक फोटो.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अंतरजालावरून चादर ट्रेक चे काही सुंदर फोटो:

--------------------------------------------------------------(क्रमशः)-------------------------------------------------------------

मागील भागात जाण्यासाठी...

.....पुढील भागात जाण्यासाठी

प्रतिक्रिया

सुंदर फोटो आहेत. एकदातरी चादर ट्रेक करायलाच हवा!

यशोधरा's picture

22 Mar 2016 - 8:57 pm | यशोधरा

सुरेख! एकदा तरी हा ट्रेक पदरात पडावा रे देवा!

दिपक.कुवेत's picture

24 Mar 2016 - 1:31 pm | दिपक.कुवेत

सुरेख. ट्रेक नाहि झाला तरी किमान मला नुसतं जाउन रहायला आवडेल. ट्रेक साठि नाहि पण बर्फ अनुभवायला मी नक्किच जाणार (हे देवा माझी ही ईच्छा लवकर पुर्ण कर रे बाबा!)

अशक्य भारी आणि धैर्याचं काम आहे हे.

अजया's picture

24 Mar 2016 - 5:09 pm | अजया

बापरे! ग्रेट _/\_

अतिशय उत्तम लेख आणि थरारक अनुभव

रमता जोगी's picture

29 Mar 2016 - 1:19 pm | रमता जोगी

राजकुमार, तुम्ही अनुवाद केलेले नीरजजींचे सायकलवरून लदाख वाचलं होतं फक्त त्यावेळेस फक्त वाचत होतो, आयडी नव्हता घेतला. तुमच्या मित्राचं याबाबतीत कौतुक आहे म्हणजे सायकलवरून सोलो सफर केली म्हणून. कारण अल्टिट्यूडचा त्रास व्हायला लागला की मनात खूप निगेटीव्ह विचार यायला सुरुवात होते अश्या परिस्थितीत कोणीतरी बरोबर असणं गरजेचं वाटतं.

काही काही गोष्टी खटकतात पण मला. म्हणजे आपली ट्रिप किंवा काही म्हणा ही इकॉनॉमिकल करण्याच्या नादात आवश्यक असणार्‍या गोष्टींनाही तुमचे मित्र फाटा देतात असं मला वाटतंय. माझं मत चुकीचंही असू शकेल याची मला पूर्ण कल्पना आहे. चादर ट्रेक हा रिस्की ट्रेक आहे. हल्ली या ट्रेकलाही लोकांनी प्रचंड डोक्यावर घेतलं आहे. मध्ये याबद्दल हिमालयन क्लबमध्ये एक छान पोस्ट एका जाणकाराने लिहिली होती. तुम्ही डोंगरावर जाता म्हण्जे ट्रेकर म्हणवून घेतलंत तरी त्यात खूप प्रकार असतात. हाय अल्टिट्यूड ट्रेक हे कसोटी पाहाणारे ट्रेक असतात. ते करायच्या आधी आपण त्यासाठी फीट आहोत कां हेही आजमावणं तितकंच गरजेचं आहे. दुनिया करतेय म्हणून मी पण करतो असं म्हट्लं तर ते जिवावर बेतणंही ठरु शकतं. अश्या रिस्की ट्रेकला कोणालाही बरोबर न घेता केवळ पैसे जास्त सांगतात म्हणून एकटंच जाणं हे कितपत योग्य आहे? तसंच पुरेशी साधनं न घेता (इथे मी उधार घेतलेल्या स्लिपींग बॅगबद्दल बोलतोय) अश्या ठिकाणी जाऊ नये. कोणावरही वेळ सांगून येत नाही. असो....

सगळ्या पॉझिटीव्ह प्रतिसादांमध्ये निगेटिव्ह प्रतिसादाबद्दल क्षमस्व पण अगदीच रहावलं नाही.

राजकुमार१२३४५६'s picture

29 Mar 2016 - 2:39 pm | राजकुमार१२३४५६

तुमचं म्हणण अगदी योग्य आहे. निरज यांची प्रत्येक ट्रीप हि इकॉनॉमिकल असते. ते प्रत्येक ठिकाणी पैसे वाचवायचे बघतात. पण त्याचे नुकसान पण आहे, आता कसे ते बघा.

चादर ट्रेक हा १०० किलोमीटर चा आहे. पण निरज यांनी फक्त २ किमी पार केला. म्हणजे तो ट्रेक नाही केल्या सारखा आहे. मी याचा नकाशा बनवून चादर ट्रेक च्या पेज वर टाकला आहे. जर नीरज यांनी जास्त पैसे देऊन एखादा माहितीगार आणि साहित्य बरोबर नेले असते तर ते किमान नेरक पर्यंत तरी गेले असते. जे ४० किलोमीटर चे अंतर आहे. मग तुम्ही विमानाने जाउन , एवढे पैसे खर्च करून, तिथे एवढे दिवस राहून, जर २ किमी चे अंतर पार करत असाल तर नाही गेलेले बरे असे माझे मत आहे. येणाऱ्या प्रतीक्रीयावर मी त्यांच्याशी चर्चा करत असतोच. यावर हि चर्चा करेन. एखाद्याला, तू जास्त पैसे खर्च करून ट्रेक काढीत जा असे सांगणे पण चुकीचे आहे. शेवटी ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.

वेल्लाभट's picture

29 Mar 2016 - 3:01 pm | वेल्लाभट

कधी जाणं होईल इथे कोण जाणे!

हा ट्रेक करायचाय राव!!

मी आजतागायत महाराष्ट्रात अनेक ट्रेक केले आहेत. पण तुम्ही धन्य आहात हो ......तुम्हाला साष्टांग नमस्कार....लेहसाराख्या ठिकाणी ते ही हाडे गोठवणार्या थंडीत आणि महत्वाचे म्हणजे अगदी निर्जन स्थळी अश्या वातावरणात तुम्ही एकट्याने रात्र काढलीत या साठी माझा तुम्हाला मानाचा मुजरा....!

[काही काही गोष्टी खटकतात पण मला. म्हणजे आपली ट्रिप किंवा काही म्हणा ही इकॉनॉमिकल करण्याच्या नादात आवश्यक असणार्‍या गोष्टींनाही तुमचे मित्र फाटा देतात असं मला वाटतंय. माझं मत चुकीचंही असू शकेल याची मला पूर्ण कल्पना आहे. चादर ट्रेक हा रिस्की ट्रेक आहे. हल्ली या ट्रेकलाही लोकांनी प्रचंड डोक्यावर घेतलं आहे. मध्ये याबद्दल हिमालयन क्लबमध्ये एक छान पोस्ट एका जाणकाराने लिहिली होती. तुम्ही डोंगरावर जाता म्हण्जे ट्रेकर म्हणवून घेतलंत तरी त्यात खूप प्रकार असतात. हाय अल्टिट्यूड ट्रेक हे कसोटी पाहाणारे ट्रेक असतात. ते करायच्या आधी आपण त्यासाठी फीट आहोत कां हेही आजमावणं तितकंच गरजेचं आहे. दुनिया करतेय म्हणून मी पण करतो असं म्हट्लं तर ते जिवावर बेतणंही ठरु शकतं. अश्या रिस्की ट्रेकला कोणालाही बरोबर न घेता केवळ पैसे जास्त सांगतात म्हणून एकटंच जाणं हे कितपत योग्य आहे? तसंच पुरेशी साधनं न घेता (इथे मी उधार घेतलेल्या स्लिपींग बॅगबद्दल बोलतोय) अश्या ठिकाणी जाऊ नये. कोणावरही वेळ सांगून येत नाही. असो..]

रमता जोगी यांचा हा प्रतिसाद मला ही पटण्या जोगा वाटतो. नाही म्हटले तरी साहस आणि सुसाइट यात अगदी बारीक रेषे एव्हडेच अंतर असते हो ...मी हे अनुभवले आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Mar 2016 - 11:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

छोटा असला तरी अपुर्‍या तयारीने केलेला भन्नाट ट्रेक ! अप्रतिम फोटो !!

पूर्ण तयारी न करता अश्या सफरी करणे धोक्याचे (अश्या ट्रेकमधे जीवघेणेही) ठरू शकते, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे... त्याच्याशी १००% सहमत.