.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हिवाळ्यातला लदाख - लेह प्रवेश, सिंधू दर्शन व चिलिंग कडे मार्गस्थ (भाग २)
मागील पानावरून ............
रोहतांग पार करून हिमालयात घुसलो. इथे इंचा इंचा वरती बर्फाचं साम्राज्य होतं. याच दरम्यान मला फोटो काढायला चान्स भेटला नाही. परत येताना प्रयत्न करील जास्तीच जास्त फोटो काढायचा.
जेव्हा हिमालय पार होऊन विमान लद्दाख च्या पर्वतावरती उडू लागलं. तेव्हा बर्फाचे प्रमाण खूप कमी होऊन उघडे बोगडे पर्वत दिसू लागले होते........
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१५ जानेवारी २०१३
लेहला उतरण्याच्या ५ मिनिट आधी घोषणा झाली कि, विमान बकुला रिन्पोछे विमानतळावर उतरणार आहे. कुशोक बकुला रिन्पोछे या नावावरूनच कळत होतं कि, आपण आता लद्दाखी जमिनी वर आलोय. कुशोक बकुला हे पिटुक गोनपा चे प्रमुख लामा होते. लेह विमानतळाच्या एका बाजूला लेह शहर आहे तर दुसर्या बाजूला पिटुक गोनपा आहे. पिटुक ला इंग्लिश मध्ये स्पिटुक (Spituk) असं लिहिलं जातं. तर काही लोक याला स्पिटुक मोनेस्ट्री पण म्हणतात.
जेव्हा विमान पावणे आठ वाजता लेह च्या रनवे वर लैंड होऊन थांबण्यासाठी पळत होतं तेव्हा परत घोषणा झाली कि आपण आपले मोबाइल चालू करू शकता. मला एवढी काही घाई नव्हती म्हणून मी चालू नाही केला. सव्वा तासापूर्वी मी २०० मीटर वर होतो आणि आता ३२०० मीटर उंचीवर आलो होतो. त्यामुळे शरीरावर फरक पडणार तर होताच. फरक तेव्हा पडला जेव्हा विमानाचा दरवाजा उघडला गेला. आता पर्यंत दिल्लीच्या वायुदाबावरती इथपर्यंत आलो होतो. विमान पूर्ण पणे बंद असल्याने काही जाणवले नाही. पण जेव्हा अचानक विमानाचा दरवाजा उघडला गेला तेव्हा दिल्लीची जड हवा निघून गेली आणि लेह ची हलकी हवा आत आली. हे मी सीट वरून उठून दरवाज्याकडे जात पर्यंत अनुभवत होतो.
घोषणा झाली कि बाहेर तापमान माइनस दहा डिग्री आहे. मी दिल्ली च्या तापमानाच्या हिशोबाने कपडे घातले होते पण जेव्हा बाहेर पडल्यावर समझले कि हे कपडे लेह साठी सुद्धा पर्याप्त आहेत. लद्दाख च्या जमिनीवर पाय ठेवल्या ठेवल्या कळाले कि, आपल्याकडे माइनस पच्चीस डिग्री तापमान सहन करेल एवढे कपडे आहेत. जेवढे कपडे मी अंगावर घातले होते त्यापेक्षा जास्त कपडे माझ्या बैगीत होते.
बाहेर पडल्यावर विकास ला फोन केला. विकास सीआरपीएफ मध्ये आहे आणि त्याची ड्युटी या वेळेस जेल मध्ये आहे. तो माझ्या आत्याचा मुलगा आहे. म्हणजे माझा आतेभाऊ. लेह च्या मुख्य चौका पासून चार पाच किलोमीटर लांब श्रीनगर रोड वर विमानतळ आहे तर मनाली रोड वर सात किलोमीटर लांब जेल आहे. टैक्सी वाल्यान १५० रुपये मागितले. मी विकासला सांगितलं कि दहा किलोमीटर साठी दीडशे रुपये नाही देणार. मग त्यांनी सांगितलं कि, विमानतळाच्या बाहेर येउन रस्ता क्रॉस कर तिथून दहा दहा रुपये घेतात लेह चौका पर्यंतचे. तिथून परत टैक्सी बदलून, परत दहा रुपये देऊन, तू जेल पर्यंत येऊ शकतोस.
सीआरपीएफ ची एक टुकडी विमानतळावर पण आहे. नंतर विकास च्या सल्ल्यानुसार सीआरपीएफ च्या जेवण पुरवणाऱ्या गाडी मध्ये बसून जेल मध्ये पोहोचलो.
आयुष्यात पहिल्यांदाच जेल मध्ये आलो आणि आल्या आल्या सरळ जेल मध्ये. तुम्ही जर विमानाने लेह ला येत असाल तर हा शरीरावर होणारा मोठा अत्याचार आहे. त्यात मी कमकुवत शरीराचा आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा अत्याचार खूप भयानक होता. मना नी तर हे परिवर्तन स्वीकार केलं होतं पण शरीरानी पण स्वीकार करण हि खूप मोठी गोष्ट आहे. मागे काही दिवशी दिल्ली मध्ये तापमान एक डिग्री च्या खाली गेलं होतं आणि दमटपणा शंभर टक्के. शंभर टक्के दमटपणा याचा अर्थ असा कि, हवेमध्ये यापेक्षा जास्त पाणी माऊ नाही शकत. त्यामुळे ओली कपडे वाळत नाहीत आणि वाळलेली कपडे बाहेर टांगून ठेवली तर त्यामध्ये लगेच ओलसरपणा येतो. रात्री धुके यामुळेच जास्त पडते. दिल्लीच्या थंडीची हीच मोठी अडचण आहे कि, किती हि वाळलेली कपडे घालून रस्त्यांनी चाला ती ओलसर होतातच. याच प्रमाणे दिल्लीचे तापमान जेव्हा एक डिग्री खाली झाले तेव्हा दोन्ही बाजूनी मार बसला. एकतर कमी तापमान आणि जास्त दमटपणा.
लद्दाख मध्ये मात्र असं नाही. हे वाळवंट आहे त्या कारणाने इथे दमटपणा कमी राहतो. ह्या दिवसात इथे दमटपणा हा फक्त पन्नास टक्केच होता. त्यामुळे कपडे ओलसर होण्याचा प्रश्नच नाही. हा पण थंडी खूप जोराची होती. पण रात्री धुके पडत नाही आणि बर्फ पण पडत नाही त्यामुळे दिल्ली ची थंडी आणि इथली थंडी मला सारखी वाटली.
इथे हवेचा दाब किती कमी आहे याचा अंदाज मला तेव्हा आला जेव्हा मी संध्याकाळी आपली पाण्याची बाटली भरण्यासाठी तिचे झाकण उघडले. तेव्हा ते जोरात उडून लांब जाउन पडले. पाण्याची बाटली दिल्ली मधेच खाली झाली होती. म्हणून त्यामध्ये पाणी नव्हते फक्त हवा होती. तीच भरलेली हवा घेऊन मी इथे आलो. पण बाहेरून हवेचा दाब कमी असल्याने आतून दाब वाढला आणि झाकण लांब पर्यंत उडाले. दिल्ली पेक्षा इथे ४०% हवेचा दाब हा कमी आहे. तुम्ही पण हा प्रयोग लेह ला आल्यावर करू शकता. फक्त झाकण उघडताना ते हळू हळू सैल सोडायचे. आता दोन दिवस मी इथेच पडणार आहे जोपर्यंत माझे शरीर इथल्या वातावरणाला अनुकूल होत नाही तोपर्यंत.
रात्री झोपताना माझ्या पायाचा पंजा झोपून गेला. पायाच्या दोन ते तीन बोटामधून मुंग्या येऊ लागल्या. खूप अस्वस्थ वाटू लागले. मग पाय हलवून हलवून पंज्याला जागे केले. नंतर काहीवेळाने पायाचा घोटा झोपी गेला. बापरे इथे कसले कसले आजार होतात कुणास ठाऊक. नक्कीच हवेचा दाब कमी असल्याने होत असणार.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१६ जानेवारी २०१३
दुसर्या दिवशी लेह मध्ये बहुतांश दुकाने बंद होती थोडीच दुकाने उघडी होती. विकास चा मित्र राजेद्र बरोबर एका ट्रेकिंग वाल्या दुकानावरती गेलो. चादर ट्रेक विषयी विचारणा केली तर खर्च सांगितला चोविस हजार रुपये. ते पण एक माणसाचा. माझ्या डोळ्या पुढे तर काजवे चमकू लागले. चक्कर येउन खाली पडायच्या आत तेथून आम्ही सटकलो. सगळे टूर ऑपरेटर एकमेकांना बांधलेले आहेत. त्यांचा ठरवलेला एक रुटीन आहे. त्यामुळे माझे कोणीच ऐकत नव्हते. माझा असं म्हणणं होतं कि मला फक्त एक स्लीपिंग बैग आणि एक पोर्टर पाहिजे जे चार दिवसाचा जेवण घेऊन जाऊ शकेल. जास्त सामान झालं तर त्याचा खर्च पण मी द्यायला तयार होतो. पण ते म्हणायचे कि, एक गाइड, दोन पोर्टर आणि एक हेल्पर शिवाय काम होणार नाही. चार दिवसाच्या ऐवजी सहा दिवस लागतील. त्यामुळे स्लीपिंग बैग बरोबर तंबू पण लागेल. मी आपल्या काळजावर दगड ठेऊन दहा हजार पर्यंत खर्च द्यायला तयार होतो. कारण थंडी मध्ये लडाखला सारखं सारखं येणं होतं नाही. पण माझं कुणीच ऐकलं नाही.
एका टैक्सी वाल्याबरोबर बोलणे झाले. तो मला उद्या चिलिंगला घेऊन जाणार होता. चिलिंग लेह पासून ७० किलोमीटर लांब आहे. जांस्कर नदीच्या किनारी वसलेलं आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१७ जानेवारी २०१३
सकाळी उठलो तसे सीआरपीएफ वाल्या मित्रांनी अंघोळ करायला सांगितली. म्हणाले कि गरम पाणी आहे अंघोळ करून घे. एवढ्या थंडीत कपडे काढायची माझ्या जीवावर आले होते. मी नाही म्हणून सांगितले. जेव्हा गरज पडेल आणि शरीर सांगेल तेव्हाच अंघोळ करणार. मग म्हणाले निदान फ्रेश तर हो. त्यांचे ऐकून गरम पाण्याने फक्त तोंड धुतले.
नाश्ता करून सिन्धु घाटीच्या दिशेने निघालो. थोडं पुढे गेल्यावर चोगलमसर आहे. लेह पासून चोगलमसर जवळ जवळ आठ किलोमीटर आहे. इथे पण लोक वस्ती खूप आहे असं वाटते कि हा पण लेह चा एक हिस्सा आहे. चोगलमसर नंतर लोक वस्ती दिसत नाही.
सिन्धु नदी हि मानसरोवर पासून सुरु होऊन ती कराची मध्ये संपते. पण वाहताना ती चीन, भारत व पाकिस्तान या तीन देशामधून वाहत जाते. पंजाब च्या पाच नद्या पैकी हि प्रमुख आहे तसेच लद्दाख ची पण ती प्रमुख नदी आहे.
मुम्बई चा एक मित्र चा आग्रह आहे कि, त्यासाठी मी सिन्धु नदीचे पाणी घेऊन येऊ. त्याला भारतातील सात नद्यांचा संग्रह करायचा आहे. आता त्याच्या जवळ गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, गोदावरी आणि अजून एक अश्या सहा नद्यांचा पाण्याचा संग्रह आहे. सातव्या रूपाने सिंधू नदीचे पाणी हवे आहे. मी प्रयत्न करील कि, त्याला सिंधू नदीचे पाणी घेऊन येईल. मला असे वाटते कि त्याने आपला संग्रह वाढवला पाहिजे त्यामध्ये प्रेमाचा प्रतिक चेनाब, मोहपाशसहित विपाशा म्हणजेच ब्यास, मानसरोवर वरून येणारी सतलज, पूर्वेकडील ब्रह्मपुत्र, बिहार ची शोक कोसी, अयोध्या ची सरयू, दक्षिने कडील गंगा कावेरी तसेच महानदी, चम्बल, काली, गण्डक, सोन, रावी, झेलम इ. या नद्यांचा सुद्धा समावेश केला पाहिजे.
थंडी मुळे सिंधू नदीचे किनारे गोठलेले होते. काही लोक त्या बर्फाच्या पाण्याने गाड्या धुवत होते. कसे काय धुवत होते काय माहिती. मला तर पाण्याची बाटली भरायला नाकी नऊ आले. साडे बारा वाजता परत जेल वरती आलो. बरोबर एक वाजता ड्राइवर इब्राहिम चा फोन आला. तो गाडी घेऊन आला होता. त्यावेळेस आम्ही जेवण करत होतो. जेल मधले काही लोक बाहेर जाऊन त्याला आत घेऊन आले. आता तो पण त्याच्या मित्रांना जाऊन सांगेल कि मी पण अर्धा तास का होईना जेल ची हवा खाऊन आलो.
दीड वाजता चिलिंग साठी निघालो. निघायच्या आधी विकास कडून स्लीपिंग बैग घेतली. विकास नि ती बैग ११०० रुपयाला मेरठ मधून खरेदी केली होती. एवढ्या पैश्यात एकदम हलक्या गुणवत्तेची बैग मिळते. तरी पण ती घेऊन निघालो. रस्त्यावरून एका दुकानातून कोल्ड क्रीम पण घेतली.
हिवाळ्यात लद्दाख चा संपूर्ण जगाशी संपर्क तुटतो. जोजीला व द्रास मध्ये बर्फवृष्टी होत असल्याने श्रीनगर ला जाणारा रस्ता बंद होतो. तर तिकडे रोहतांग, बारालाचाला, तंगलंगला वरती बर्फवृष्टीमुळे मनाली रस्ता पण बंद होतो. आणि याच बर्फवृष्टी मुळे पेंगोंग तलाव सारखे आकर्षण सुद्धा पाहता येत नाही.
हिवाळ्यात एकाच अशी जागा आहे जिथे जाता येऊ शकते आणि आपण मज घेऊ शकतो ती म्हणजे - गोठलेली जांस्कर नदी. अत्याधिक थंडी मुळे जांस्कर नदी पूर्ण पणे गोठून जाते. याच गोठलेल्या नदीवरून तेथील स्थानिक लोक ये जा करतात तर काही साहसी पर्यटक ट्रेकिंग करतात. नदीवर जमलेल्या बर्फाला बर्फाची चादर म्हणतात आणि या जमलेल्या बर्फाच्या चादरीवरून चालत जाण्याला चादर ट्रेक म्हणतात. हा ट्रेक फक्त हिवाळ्यातच केला जातो. माझं हिवाळ्यात लडाखला येण्याच उदिष्ट म्हणजे हे चादर ट्रेक करणंच होतं.
लेह वरून निघाल्यानंतर श्रीनगर रोड वरती रस्त्यामध्ये पहिले पत्थर साहिब गुरुद्वारा लागतं. मी गाडीत बसूनच ड्राइवर ला विचारले कि, आत जायला बूट काढावे लागतील का? तर तो हा म्हणला. मी म्हटलं थांबू नको सरळ चल. पुढे मैग्नेटिक हिल नावाचा डोंगर आला. या डोंगरामध्ये चुम्बकीय गुणधर्म आहेत असे म्हणतात. तिथे गाडी न्युट्रल मध्ये उभी केली असता डोंगराकडे खेचली जाते. पण तिथे आधीच खूप गाड्या थांबल्या होत्या. तिथे रस्त्यावर आखलेले निशाण दिसलेच नाही. थोडे थांबलो फोटो काढले आणि पुढे निम्मू कडे निघालो.
निम्मू मध्ये सिन्धु आणि जांस्कर या नद्यांचा संगम आहे. आम्हाला आता श्रीनगर रोड सोडून जांस्कर किनार्यावरून जाणारा रस्ता पकडायचा होता. आम्ही त्या रस्त्याने निघालो. तिथून अजून सुद्धा चिलिंग २८ किलोमीटर लांब आहे. जिथे मला आज थांबायचे होते. उद्या चादर ट्रेक सुरु करायचा आहे. ह्यावेळेस जास्त हिस्स्या मध्ये सिंधू नदी गोठलेली होती. सिंधू नदी रुंदी ला मोठी असल्याने पूर्ण पणे गोठत नाही. त्याच्या उलट जांस्कर नदी रुंदीला छोटी असल्याने पूर्ण पणे गोठली जाते.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्षणचित्रे :
सिन्धु घाट
गोठलेले सिंधू नदीचे किनारे
चोगलमसर जवळ एक बौद्ध मन्दिर
जेल मध्ये
गुरुद्वारा पत्थर साहिब
लेह-श्रीनगर रोड
निम्मू-चिलिंग रोड
निम्मू- सिन्धु व जांस्कर चा संगम
--------------------------------------------------------------(क्रमशः)-------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
15 Mar 2016 - 2:44 pm | एस
पुभाप्र!
16 Mar 2016 - 5:42 am | यशोधरा
मला कधी जायला मिळणार इथे..
16 Mar 2016 - 4:15 pm | अजया
मलाही!
पुभाप्र पुभाप्र
16 Mar 2016 - 2:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर ! पुभाप्र.
16 Mar 2016 - 3:29 pm | मितान
दोन्ही भाग सुंदर !!!
16 Mar 2016 - 4:15 pm | अजया
कॅलिग्राफी फार सुंदर.एस भाऊ का कलाकार?
16 Mar 2016 - 4:26 pm | प्रचेतस
जबराट सुरुवात आहे गोठलेल्या लडाखची.
16 Mar 2016 - 4:32 pm | सतिश पाटील
मजा आली वाचायला
16 Mar 2016 - 7:27 pm | राजकुमार१२३४५६
धन्यवाद !!
16 Mar 2016 - 10:49 pm | बोका-ए-आझम
रौद्र आणि सुंदर! धन्यवाद राजकुमारजी हे लिखाण मराठीत आणण्यासाठी!
16 Mar 2016 - 10:49 pm | बोका-ए-आझम
रौद्र आणि सुंदर! धन्यवाद राजकुमारजी हे लिखाण मराठीत आणण्यासाठी!
18 Mar 2016 - 2:02 pm | Ram ram
Lay chikat disto paishala gadya
18 Mar 2016 - 5:19 pm | पैसा
अतिशय सुंदर!