स्वस्तात लेह २०१६

राजकुमार१२३४५६'s picture
राजकुमार१२३४५६ in भटकंती
27 Mar 2016 - 5:08 pm

स्वस्तात लेह २०१६

युथ होस्टेल असोसियान ऑफ इंडिया हि ना नफा ना तोटा यावर चालणारी संस्था आहे. ती ट्रेकर साठी वेगवेगळे ट्रेक भारतभर आयोजित करते. तसेच फैमिली असणार्यांसाठी पण ती ट्रेक चे आयोजन करते. यावेळी पण लेह साठी बुकिंग चालू झाली आहे. बहुतेक जागा बुक झाल्या आहेत थोड्याच शिल्लक आहेत. त्यांचे नियम, अटी आणि फायदे पुढील प्रमाणे.

1) तो प्रथम युथ होस्टेल असोसियान ऑफ इंडिया चा मेंबर असावा. मेंबरशिप ऑनलाइन पण मिळवू शकता. फी वर्षाला २२० रुपये आहे. या लिक वर जावा http://yhaindia.org/individual-membership-application.php

२) फैमिली म्हणजे नवरा बायको आणि त्यांची दोन मुलं. दोन्ही मुलांचे वय १२ वर्ष्याच्या आत पाहिजे. जर जास्त असेल तर प्रत्येकी १००० रुपये जास्त घेतात.

३) लेह साठी ७५०० रुपये फी आहे. हि फी संपूर्ण फैमिली ( नवरा+बायको+२ मुले) साठी आहे. यात ५ दिवस ४ रात्री राहणे, रोज तीन टाईम जेवण (बाहेर गेल्यावर जेवणाचा डबा भरून देतात) , इन्सुरन्स आणि सल्ला समाविष्ट आहे. बुक करण्यासठी पुढील लिक पहा http://yhaindia.org/adventure-programme.php?id=204&ty=s

४) कॅम्पीन बुक झाल्यावर तुम्हाला स्वताच्या खर्चाने त्यांच्या लेह मधील बेस कॅम्प वर यायचे आहे. त्यांचा पत्ता INTERNATIONAL YOUTH HOSTEL ,LEH

५) तिथे चार पाच दिवस फिरण्याचा गाडीचा खर्च आपला असतो. लेह मध्ये एकूण १२ फैमिली येतात . तुम्ही दुसर्या फैमिली बरोबर मिळून गाडी ठरवू शकता. पैश्याची बचत पण होते.

६) तिथे तुम्हाला पूर्ण पणे स्वातंत्र असते. युथ होस्टेल असोसियान ऑफ इंडिया फक्त राहणे , खाणे आणि सल्ला देते. तुम्ही तुमच्या मर्जीने कुठे हि फिरू शकता.

७) हे कॅम्पीन असल्याने काही वस्तू आपल्या सोबत न्यावे लागतात जेवणाचे ताट, ग्लास, टॉवेल, चमचा आणि जेवणाचा डबा.

८) येथे सकाळी ४ वाजल्या पासूनच जेवण बनवायला सुरुवात होते आणि अंघोळी साठी गरम पाणी हि मिळते. त्यामुळे जर तुम्ही ८ वाजताच बाहेर पडला तरीही सोबत जेवणाचा डबा मिळतो. त्यामुळे तुम्ही पूर्ण दिवस भर फिरू शकता. पण संध्याकाळी ६ ला परत होस्टेल वर येणे गरजेचे आहे.

होस्टेल चे काही फोटो :
a

aa

aaa

a

a

a

a

प्रतिक्रिया

रुस्तम's picture

27 Mar 2016 - 5:12 pm | रुस्तम

खूप छान माहिती ...

उगा काहितरीच's picture

27 Mar 2016 - 6:09 pm | उगा काहितरीच

धन्यवाद . उपयुक्त माहिती.

एस's picture

27 Mar 2016 - 6:39 pm | एस

वाखुसाआ. धन्यवाद.

प्रसाद गोडबोले's picture

29 Mar 2016 - 11:51 am | प्रसाद गोडबोले

खुपच महत्वाची माहीती !!

सनावृता मंडळाच्या सर्व सभासदांना येते चर्चेस येण्याचे अन लवकर लेह लडाख पेंगाँग लेक प्लान करच्याचे आवाहन करण्यात येत आहे !

नाखु's picture

29 Mar 2016 - 12:53 pm | नाखु

धन्यवाद.

प्रगो म्या मेंबर्शीप घ्येतली आणि तीबी तहह्यात वाली !!!(त्या बद्दल एक मस्तानी मजकडून तुला)

अता पुढील बोलणी समक्ष भेटीत.

बाबा योगिराज's picture

29 Mar 2016 - 12:43 pm | बाबा योगिराज

वाखु साठवलेली आहे.

पैसा's picture

29 Mar 2016 - 2:08 pm | पैसा

अतिशय उपयुक्त धागा!