.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हिवाळ्यातला लदाख - चिलिंगवरून परतीचा प्रवास आणि लेह भ्रमंती (भाग ५)
मागील पानावरून ............
चादर ट्रेक तसं पाहिला गेला तर १०० किलोमीटर पेक्षा लांब आहे. पदुम पर्यंत येउन जाउन २०० किलोमीटर पेक्षा जास्त होतं. जास्त करून लोक नेरक पर्यंत जातात जे येउन जाउन ८० किलोमीटर च्या आसपास आहे. मी फक्त तिलत सुमडो पर्यंतच गेलो जे येउन जाउन चार किलोमीटर आहे. तरी पण मला आनंद आहे कि चादर ट्रेक करणाऱ्यांच्या यादीत माझा समावेश झाला.........
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२० जानेवारी २०१३
मी तिलत सुमडो मध्ये बर्फाच्या गुहेत रात्र काढून पुन्हा लेह च्या दिशेने निघालो. मला आधीच माहित होते कि, आज एक वाजता चिलिंग वरून लेह ला जाणारी बस आहे. तीन दिवस झाले होते बर्फ पडून. त्यामुळे बर्फ कडक झाला होता आणि त्यावरून गाड्या गेल्याने अजून कडक झाला होता. त्यावरून चालणे कठीण जात होते.
तीन किलोमीटर चालल्यानंतर रस्ता बनवणार्या कामगारांची वस्ती लागली. इथली कुत्री येणाऱ्या जाणार्यावर सारखी भुकत असतात. याआधी तीन वेळा या ठिकाणा वरून गेलो आहे. त्यामुळे मला माहित होतं कि पहिला तो काळा कुत्रा भूकायला सुरुवात करतो मग बाकीची कुत्री भूकतात. पण आज तो काळा कुत्राच कुठे दिसला नाही. त्यामुळे बाकीची कुत्री इकडे तिकडे पसरलेली होती. कोणच भुकल नाही. थोडे पुढे गेल्यावर काळू कुत्रा दिसला. मला बघितल्यावर एक दोन वेळा बाऊ बाऊ केलं पण त्याला साथ द्यायला कोणीच नसल्याने मग गप बसला.
माझ्या कडे काल पासून पाणी नव्हतं. रात्री भुरा बर्फ बाटली मध्ये गोळा करून बाटली स्लीपिंग बैग मध्ये ठेवली होती. ते फक्त दोन घोट पाणी किती दिवस पुरणार!! रस्ता बनवणे हे सैनिकाचे काम आहे. त्यामुळे एक सैनिक भेटला. त्याकडे पाणी मागितलं. त्याने लगेच गरम पाणी आणून दिलं. केरोसिनच्या शेगडी वरती गरम केलं होतं. त्यामुळे त्याला केरोसीन चा वास येत होता. तो केरळ चा राहणारा होता.
मी विचारलं कि, "अभी कोई ट्रक लेह जायेगा क्या?"
त्यांनी सांगितलं कि, "आधे घण्टे पहले गया है, अब कल जायेगा."
मग मी त्याला सांगितलं कि, "मुझे चिलिंग से एक बजे वाली बस पकडनी है."
तो म्हणाला कि, "चिलिंग जाने की क्या जरुरत है. बस तो यहां काठमांडू तक आती है."
चिलिंग इथून पाच ते साडे पाच किलोमीटर पुढे आहे. काठमांडू अर्धेच किलोमीटर पुढे आहे. मी त्याला धन्यवाद दिले आणि काठमांडू च्या दिशेने निघालो.
मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे कि जांस्कर नदी आणि मारखा नदी चा जिथे संगम आहे त्या ठीकानालाच काठमांडू म्हणतात. काही कामगारांची घरे तिथे आहेत आणि एका नेपाल्याचा चहा-पाण्याच दुकान पण आहे. पण हे ठिकाण मारखा घाटी मधील बर्याच गावांसाठी कामाचं ठिकाण आहे. आज बस येणार म्हणून खूप लांबून लांबून लोकं आली होती. जास्कर नदीवर एक तारेचा पूल आहे. त्यावरूनच लोकं येत होती. खूप गर्दी होती. अजून बस आली नव्हती. मग नेपाली दुकानात जाउन चहा पिउन घेतला.
बस आली. लगेच बस भरली पण. मी लगेच माझ्या आवडत्या सीट वरती कब्जा केला. बस च्या वरती सामान ठेवून लगेच बस लेहच्या दिशेने निघाली. रस्त्यामध्ये परत चिलिंग लागलं. अङमो पण तिथे बस ची वाट पाहत उभी होती. चिलिंगला बसला थांबली तेव्हा अङमो पण बस मध्ये चढली. तिला पण लेहला जायचे होते. माझ्याकडे तिचा चेश्मा पण होता जो तिच्याकडून एका अटी वरती १०० रुपयाला घेतला होता कि जर परत भेट झालीच तर चेश्मा देऊन १०० रुपये घेऊन जाइल. आता बस मध्ये अङमो पण होती विचार आला कि, हिला चेश्मा देऊन १०० रुपये घ्यावे . पण हा व्यवहार अङमो चा बहिणी बरोबर झाला होता. अङमोला याबद्दल काहीच माहित नव्हते. मग लेह ला उतरल्यावर चेश्मा परत दिला पण पैसे नाही मागितले.
संपूर्ण रस्त्यांनी बर्फ भेटला होता. रात्री इकडे चार ते पाच इंच पर्यंत बर्फवृष्टी झाली होती. तो बर्फ आता उन्हामुळे वितळत चालला होता. मोमो खायची खूप इच्छा होती. लेह बस स्थानका वरती उतरून मुख्य बाजाराच्या दिशेने निघालो. जास्त करून दुकाने बंद होती. एक हॉटेल उघडं होतं. तिथे छोले भटूरे आणि सामोसे मिळत होते. मोमो नव्हते. मग सामोसे खाऊन जेल च्या दिशेने निघालो.
जेल मध्ये सगळ्यांना माहित होते कि, माझी जायची तारीख २३ किंवा २४ आहे. पण मी तीन चार दिवस लवकर आलेलो पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. मग मी त्यांना उत्तर दिलं कि थंडी सहन होईना म्हणून लवकर आलो. लेह मध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मागच्या पेक्षा थंडी खूप वाढली होती. इथे थंडी मोजायचं काही साधन नव्हतं. लेह ला विमानतळावर जेव्हा उतरलो होतो तेव्हा वजा दहा तापमान होतं. तेव्हा मी तर हाथमौजे न घालता इकडे तिकडे फिरत होतो. पण आता मात्र घालावे लागणार होते. मी त्याचाच आधार धरून ठरवले कि,आज वजा पंधरा तापमान असणार.
मी जेल मध्ये होतो त्यामुळे तिथल्या काही दोन चार गोष्टी इथे सांगाव्या वाटतात. जेल हे अत्यंत संवेदनशील ठिकाण आहे. कैद्यांची बैरक हि सैनिकांच्या बैरक पासून १०० मीटर अंतरावर आहे. या जेलच्या सुरक्षाची जबाबदारी जम्मू-कश्मीर पोलिस आणि सीआरपीएफ सैनिक दोघे मिळून करतात. सकाळी नऊच्या दरम्यान कैद्यांना बाहेर काढले जाते. तिथे त्यांना छोटं मोठं काम दिलं जातं. खासकरून लाकडं तोडायचं काम. रात्री जाळण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
सीआरपीएफ च्या बैरकि मध्ये रॉकेल चे रूम हिटर होते. त्याचे आतून तापमान खूप जास्त असायचे म्हणून त्यावरती भाजी गरम केली जायची आणि चपात्या शेकल्या जायच्या. एक लाकडाचा हिटर पण होता त्यासाठी कोळसा लागायचा. लाईट वरचा हिटर पण होता.
बैरकी मध्ये खिडक्यांना काचा होत्या. पण आत मध्ये खूप लोकं असल्याने त्यांच्या गर्मी मुळे त्यावर बाष्प जमायचे. म्हणून दुपारपर्यंत गोठून काचे वरती बर्फ जमायचा.
दुसर्या दिवशी विकास नि अंघोळी साठी गरम पाणी आणून दिलं. मस्त पैकी ताजे तवाने झालो. दोन दिवस अंघोळ नव्हती मिळाली. अंघोळ झाल्या नंतर टॉवेल बाहेर अडकून ठेवला. तासाभरात टॉवेल मधल्या पाण्याचा बर्फ तयार झाला. मी लगेच बैरक मध्ये आणून वाळायला टाकला.
एक दिवस भारताची मैच होती. विरोधी टीमन खूप रन्स केल्या होत्या. हि मैच सीआरपीफ मधले दोन काश्मिरी सैनिक बघत होते. मुसलमान होते. इथे सीआरपीएफ मधले वरिष्ठ अधिकारी मुहम्मद युसुफ होते.
युसुफ नि सैनिकांना विचारलं कि,"बताओ, तुम्हें क्या लगता है? कौन जीतेगा?"
त्या दोघांनी पटकन सांगितलं कि, भारत हरणार.
त्यांचे उत्तर ऐकून युसुफ त्यांच्यावर रागानी ओरडले कि, "साले कश्मीरियों, तुम्हारे मुंह से कभी भी भारत के बारे में शुभ वचन नहीं निकल सकते. यहीं का खाते हो और यहीं का विरोध करते हो. बाकी भारत के मुसलमानों को उतना नहीं मिलता, जितना कश्मीर के मुसलमानों को, लेकिन ये रहेंगे हमेशा पाकिस्तान के साथ ही."
यावर ते दोघे सैनिक म्हणाले कि, पाकिस्तान मध्ये आमची भावंड राहतात. तिथे काही नातेवाईक आहेत.
वातावरण खूप गरम झालं होतं. दोन मुसलमान देशावरून भांडत होते. मला पण काही बोलायचे होते. पण नाही बोलू शकलो. कारण आपल्या कडे माणसापेक्षा धर्म मोठा आहे. मला जे बोलायचे होते ते युसुफ साहेबांनी सांगून टाकले. तरी पण एक बोलायचे होते ते पण राहून गेले.
"एक किताबघर में पड़ी गीता और कुरान आपस में कभी नहीं लड़ते,
और जो उनके लिए लड़ते हैं वो कभी उन दोनों को नहीं पढ़ते..."
मैच मध्ये भारतानी आपली चांगली पकड मिळवली होती. मग काश्मिरी सैनिक तिथून निघून गेले. मी जेल मधून लेह ला खूप वेळा येउन जाऊन केलं. इथे मारुति ओमनी हि टैक्सी सारखीच चालते. लेह पासून जेल पर्यंत पंधरा रुपये घेतात. मला जेव्हा लेह वरून जेल ला जायचं असतं तेव्हा मी कुणालाच विचारात नाही. फक्त चोगलम, चोगलम असा आवाज ऐकून चुपचाप टैक्सी मध्ये जाउन बसतो.
एकदा चादर आणायला गेलो. टैक्सी स्टैण्डच्या जवळच चादर चा बाजार आहे. एका दुकानावर्ती मोठी पश्मीना चादर पसंद पडली. त्याने किंमत सांगितली ३५०० रुपये. दुसर्या चादरीची किंमत अनुक्रमे २५००, २००० आणि १६०० रुपये माहिती पडली. मी मोलभाव करून ३५०० ची चादर २००० ला ठरवली. ती चादर पैक झाल्यावर मी पैसे द्यायला लागलो तितक्यात एक लद्दाखी बाई तिथे आली. तिने १६०० वाली चादर चा भाव विचारला. दुकानदार म्हणाला ४८० रुपये. ती बाई खूप जास्त भाव आहे असं म्हणत तिथून निघून गेली. मग काय माझं डोकच सटकला. जर त्या बाईन तिथे थांबून मोलभाव केला असता तर त्या दुकानदाराने ती चादर २०० ला पण दिली असती.
मी ती पैक केलेली चादर नाही घेतली.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्षणचित्रे :
मारखा घाटी वरून येणारी लोकं
मारखा घाटी वरून येणारी लोकं
लेह ला जाणारा रस्ता
लेह ला जाणारी बस
समोर मारखा आणि जास्कर चा संगम आहे.
सिन्धु आणि जांस्करचा संगम
लेह
लेह
वरती समोर डोंगर वरती खारदुंगला आहे.
लद्दाख
--------------------------------------------------------------(क्रमशः)-------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
26 Mar 2016 - 8:24 pm | प्रचेतस
हा भागही आवडला.
छायाचित्रे बघायला छान वाटतात पण तिथल्या लोकांचं जीवन ह्या जीवघेण्या थंडीत खूपच खडतर असणार.
26 Mar 2016 - 8:54 pm | एस
फार सुंदर लिहिलेय.
26 Mar 2016 - 11:03 pm | यशोधरा
इथे कधीतरी मी जाणार!
27 Mar 2016 - 2:53 pm | Ram ram
यवढे भारी फुटू पन यानी तेच्यावर नाव लिहेल है की भौ
27 Mar 2016 - 4:06 pm | राजकुमार१२३४५६
हल्ली कॉपी राईटचा जमाना आहे भाऊ !! :D