मिसळपावावर मी भूत बनून वावरत होतो त्याचा हा पुरावा. मी येऊन गेलो तरी मिसळ पाव ला त्याची खबर लागली नाही. सदस्य म्हणून ही आणि पाहुणा म्हणून ही.
विचार केला बघुया भूत बनून लेख लिहिता येतो का? ;)
मिसळपाव पंचायत समिती आणि संहिता संचालकहो,
मी काही चुका काढण्याकरीता किंवा मिसळपावच्या तांत्रिक गोष्टींमध्ये काही त्रूटी दाखविण्यासाठी हे लिहित नाही आहे. फक्त माझा एक मजेशीर अनुभव लिहिला. उगाच गैरसमज नको :)
प्रतिक्रिया
25 Nov 2007 - 4:04 am | प्रियाली
काही विशिष्ट वेळासाठी स्वस्थ(idle) राहिल्यास सदस्याला मृत्यू येतो. त्यानंतर आत्मा जेव्हा मिसळपावाच्या ओढीने परततो तेव्हा 'आपलेच मरण पाहिले म्या आपुल्याच डोळा' अशी अनुभूती येते आणि आपण देहविरहीत अवस्थेत वावरतोय याचा साक्षात्कार होतो. पुनश्च हालचाल केल्यावर आपला पुनर्जन्म होतो हे वेगळे सांगणे न लगे. ;-)
ड्रुपलवर आधारित बाकीची संकेतस्थळेही अशीच झपाटलेली आहेत.
(मांत्रिक नं.१) प्रियाली.
25 Nov 2007 - 8:58 am | देवदत्त
छान शब्दांत माहिती दिलीत. :D
फक्त तोच देह पुन्हा मिळतो हे कळल्याने आनंद वाटला. नाही तर त्याला मग, पांडगो ईलो रे.. प्रमाणे कुणी घर देता का घर असे म्हणत, किंवा वपुंच्या कथेतील एकबोटे प्रमाणे परवानगी घ्यावी लागली असती.
(अघळपघळ मधील हॅम्लेटच्या बापाचे भूत) देवदत्त
(आमचा व्यासंग इतपतच ;) )
30 Nov 2007 - 2:14 pm | धोंडोपंत
देवदत्तानूं,
पांडगो इलो रे बा इलो........
हा हा हा हा हा......
पन, एक पांडगो इलो हा .
मायझवो, खयसून इलो ते ठाव नाय. त्यांका काय होया, ते पन ठाव नाय.
आपला,
(मांत्रिक) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
25 Mar 2008 - 9:09 pm | सृष्टीलावण्या
पण.... मच्छिंद्र कांबळी व इतर स्वर्गस्थ मराठीप्रेमी साहित्यिक मात्र आवर्जून मिपावर येत असतील...
>
>
मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...
25 Nov 2007 - 8:19 am | विसोबा खेचर
मांत्रिक प्रियालीशी सहमत...
आपला,
(पिंपळावरचा मुंजा परंतु प्रियालीचा मित्र) तात्यावेताळ.
27 Nov 2007 - 1:23 am | सर्किट (not verified)
मिसळपावावर मिसळीची शिते सर्वत्र पडलेली असताना भुते जमली नाहीत, तरंच आश्चर्य !
- (भूतनाथ) सर्किट
25 Mar 2008 - 9:24 pm | चतुरंग
त्यात चिंतित होण्यासारखे काही नाही!
चतुरंग
25 Mar 2008 - 9:31 pm | llपुण्याचे पेशवेll
अहो आपण भूत बनून आलात . मी तर पूर्वी एकदा २ देह धारण केले होते मि.पा. वर. आणि २ वेगवेगळे देह नव्हे तर अगदी शेम टू शेम तेच देह. पण २-२.
पण सध्या एकाच आत्म्याने २ देह धारण करायची सुविधा मि.पा. ने बंद केली आहे असे वाटते. (ह.घ्या.)
पुण्याचे पेशवे
25 Mar 2008 - 9:33 pm | चतुरंग
चतुरंग
26 Mar 2008 - 12:21 am | llपुण्याचे पेशवेll
आणि भूतपण आरशासमोर आल्यावर लई घाबरले बघा.... कारण त्यालाही आरशात भूत दिसले.
पुण्याचे पेशवे
1 May 2008 - 8:48 pm | देवदत्त
आज पुन्हा भूताटकी झाली. >:)
प्राजुंच्या ताटव्यावर प्रतिक्रिया लिहिली. नंतर कुठल्यातरी लेखात बघत होतो. पाहतो तर लिहिले होते,
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा. :?
म्हणजे मला बाहेर हाकलले होते, कार्यक्षम असतानाही. [(
म्हणून येण्याची नोंद केली तर सदस्य सूचीमध्ये माझे नाव दोन वेळा दिसले. :O
(आता मला वाटते, नवज्योत सिद्धू आणि शत्रुघ्न सिन्हा ह्यांना बोलवावे लागेल, भूताला खामोश म्हणण्यासाठी :-C )
1 May 2008 - 11:17 pm | वरदा
माझही आत्ताच...भूताला पाहायला आले आणि पाहिलं, 'प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा'. आणि परत लॉग इन केलं तर माझं नाव दोन दोन वेळा....