बंगाली मातीचा साजरा बुरूज

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
10 Jan 2016 - 11:57 am

एखादी क्रिकेटची बातमी खुपच हौशी क्रिडा रसिक असाल तर फुटबॉलची बातमी, कधी मधी राजकारणाच्या निमीत्ताने-कम्युनीस्ट किंवा आजकाल ममता बॅनर्जी- अल्पसा उल्लेखाच्या बातम्या फारफारतर बांग्लादेशींची घुसपैठ या पलिकडे 'कलकत्ता' आणि 'पश्चिम बंगाल' हा विषय तुमच्या माझ्या सर्वासामान्य मराठी माणसाच्या फारसा नजरेस येत नाही.

विचारवंत आणि रॅशनलीस्ट असलेल्या बंगाली बाबूंनी गेली ३० ३५ वर्षे कम्युनीस्टांना लोकशाही मार्गाने स्वत:हून वाहून दिली होती म्हटल्यावर पश्चिम बंगाल मधला सेक्युल्रीझमचा झेंडा चांगलाच गाढ असेल आणि ब्राह्मोस्माज - विवेकानंदांची ते रबिंद्रनाथ टागोरांची पुरोगामी प्रतिमा आणि पश्चिम बंगाल बद्द्ल अस्मादिकांचा (गोड गैर)समज तसा मागच्या वर्षा भरात मुंडा आदिवासींच्या जात पंचायतींच्या बातमी तुटला. माणसांनी खांद्यावरून रिक्षा ओढणे हा अमानुष वाटणारा प्रकार मानवाच्या समानतेच्या हक्कांबद्दल संवेदनशील कम्युनीश्टांना कसा काय चालतो अशा प्रकारचा प्रश्न पडत असे पण बाकी पश्चिम बंगालबद्दल काही माहिती नसल्याने असे प्रश्न पडलेच सहसा मनातच राहुन जातात. याच कलकत्त्यात हुगळी नदीच्या काठी कधी काळी ७०-८० च्या दशका पर्यंत कारखानदारीने व्यस्त राहीलेला 'मातीचा बुरुज' बंगालीत 'माटीआ बुर्ज' नावाचा भाग आहे त्याचे इंग्रजी स्पेलींग मात्र Metiabruz https://en.wikipedia.org/wiki/Metiabruz कारखानदारीने व्यस्त म्हणजे कामगार चळवळींच्या माध्यमातून 'पुरोगामी' कम्युनीस्ट विचार तिथल्या घरा घरात पोहोचला असावयास हवा. एकवेळ गरिबी चालेल पण कामगारांची पिळाणूक खासकरून बाल कामगारांची पिळाणूक असावयास नको अशी माझी किंवा तुमची अपेक्षा असेल. 'शतरंज के खिलाडी' फेम नवाब वाजीद अली शहा ज्यांच्या अवध राज्याने १८५७ मध्ये नानासाहेब पेशव्यांच्या खांद्याला खांदा देऊन ब्रिटीशांचा मुकाबला केला त्या वाजीद अली शहाचे वंशज ब्रिटीशांच्या मेहरबानीने 'मातीच्या बुरुजा'त येऊन राहते झाले तेथे त्या 'मातीच्या बुरुजात स्थायीक लोकांच्या देशप्रेमाबाबत तुमच्या माझ्या मनात शंका येण्या सारखे काही कारणच शिल्लक असावयास नको नाही का ? त्यात मागच्या एन डी ए सरकारात मंत्री राहीलेल्या ममता दीदी आणि त्यांचा तो बांग्लाद्शी निर्वासितांबद्दलचा आक्रोश अश्या या ममता दिदींच्या पुतण्याच्या लोकसभा कार्यक्षेत्रात हा 'मातीचा बुरुज' भाग येतो म्हणजे सारे कसे आदर्श आणि आलबेल असावयास हवे.

पण मराठीतली एक म्हण मातीच्या बुरुजाला लागू पडते म्हणजे ती म्हणजे मातीचा बुरुज साजरा दिसेल पण दुरुनच अगदी कलकत्त्यातला बंगाली माणूस स्वत: मात्र 'माटिआ बुर्ज' शब्द 'टी' च्या एवजी 'फी' हे अक्षर मनात गृहीत धरून वाचत असावा. नवाब वाजीद अली शहा राहीलेल्या मातीच्या बुरुजाच्या देशप्रेमी इतिहासाला ओहोटी लावण्याचा जो काही डाव (१९०५) ब्रिटीशांनी खेळला असेल त्याचे फळ मुस्लीम लीगने मातीच्या बुरुजाची लॉयल्टी आपल्याकडे आहे हे १९४७ च्या आधीच सिद्धकरून दिले. मुस्लीम लिगी द्विराष्ट्री चळवळी करताचा पैसा उभाकरण्यात मातीच्या बुरजातून उभा केलेला पैसाही बऱ्यापैकी कामी आला असावा. असा हा मातीचा बुरुज स्वातंत्र्योत्तर काळानंतर पाहता पाहता गुन्हेगारी शब्दाशी परिचीत झाला असावा. ममता दीदींनी एन डीए सोडून कम्युनीस्टांना शिंगावर घेताना बंगाली मायनॉरिटींना जी आश्वासने दिली त्यांना मायनॉरीटीज सुद्धा लाजल्या असाव्यात. अशा वातावरणात मातीच्या बुरुजातील लोक राष्ट्रगीत (जनगणमन म्हणण्यास नकार देते झाली तर ती बातमी होणार नाही परंतु त्यांच्याच धार्मीक शाळेचा मुख्याध्यापक स्वत:च्या समाजाचा मार खाऊनही राष्ट्र गीत विद्यार्थ्यांना शिकवू इच्छितो, मुलींच्या शिक्षणाची बाजू हिरहिरीने मांडतो हि मात्र नोंद घेण्या जोगी बातमी निश्चीतपणे असू शकते. त्याच्या बाजूने तथाकथीत सेक्युलर पश्चिम बंगाल उभा टाकण्यास यशस्वी झाला नाही तरीही.

असे नाही की बंगाली मातीत अल्पसंख्य समुदायात पुरोगामी दृष्टीची माणसे घडत नाहीत, कुणी राष्ट्रगीत म्हणाले नाही तर आभाळ कोसळते ते लगेच राष्ट्रद्रोही होतात असेही नसावे. राष्ट्रगीत म्हणजे ज्या मातीत कदाचित मागच्या चार पिढ्या जगल्या आहेत आणि आपल्या पुढच्या चार पिढ्या जगणार आहेत त्या मातीचा आदर व्यक्त करणे आहे. हा कॉमन सेन्स असावा. हा आदर एकाच विशीष्ट शब्दात व्यक्त झाला पाहीजे असे नाही दुसर्‍यांनी लिहिलेले शब्द जड जात असतील तर (तसे ते जड जाण्यास काही कारण नसावे तरीही) स्वतःचे चार शब्द लिहिलेत तरीही चालू शकते. असो.

मुख्य प्रश्न शिल्लक राहतो तो हा की, स्वांतत्र्योत्तर भारतात जी आम्ही संवैधानीक राजकीय व्यवस्था बर्‍यापैकी यशस्वीपणे राबवत आणली आह त्यात समुदायांमध्ये परस्पर विश्वास निर्माण होण्यासाठी नेमके काय कमी पडले/ते आहे, मांडीला मांडी लावून राजकारण करणारी मंडळी आपल्या सहकर्मींमर्फत विवीध समुदायात परस्पर विश्वासाचा संदेश पोहोचवण्यास का कमी पडली/त आहेत. उणीव आमच्या राजकीय व्यवस्थेत आहे की आमच्या राजकारण्यांच्या जबाबदारीच्या भावनेत ?

संदर्भ यादी

http://www.telegraphindia.com/1100520/jsp/calcutta/story_12468806.jsp
http://www.telegraphindia.com/1110714/jsp/opinion/story_14237607.jsp
https://en.wikipedia.org/wiki/Metiabruz
http://www.telegraphindia.com/1110714/jsp/opinion/story_14234363.jsp
http://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-3022164/Islamic-h...
http://www.huffingtonpost.in/2016/01/05/kazi-masum-akhtar_n_8915324.html
http://www.hindustantimes.com/ht-view/mamata-s-votebank-politics-takes-b...
https://books.google.co.in/books?id=E8SGAwAAQBAJ&pg=PA216&dq=Metiaburuz&...
https://en.wikipedia.org/wiki/Diamond_Harbour_(Lok_Sabha_constituency)
https://books.google.co.in/books?id=eUq9heKpjEIC&pg=PA70&lpg=PA70&dq=Mat...
http://www.milligazette.com/Archives/15062001/25.htm
http://food.ndtv.com/food-drinks/the-awadhi-food-etiquette-nothing-befor...

समाजराजकारणमाध्यमवेधलेखमत

प्रतिक्रिया

कालीमातेला नेवेद्य बळी बकरे कोंबडे अजूनही देतात का?माशांचा बळी चालतो का?'खालच्या' वर्गााला अजूनही करवंटीत चहा देतात का?

माहितगार's picture

11 Jan 2016 - 2:28 pm | माहितगार

करवंटी म्हणजे कोणती नारळाची का ?

कलकत्त्यातील लोक चहाच्या टपर्‍यांवर कप/ग्लास इतरांचे उष्टावलेले (स्वच्छ धुतलेले असले तरीही) असतात म्हणून मातीच्या गडू/छोट्या मटक्यातून चहा पितात असे समजून होतो. त्यात वर्गाचाही संबंध असल्यास कल्पना नाही. बंगाली पब्लिकला स्वतःची पाण्याची बाटली वगैरे बहुधा याच कारणाने शेअर करणे आवडत नसावे. अर्थात ही माझी व्यक्तिगत निरीक्षणे खुप कमी सँपलवर अवलंबून अशी होती म्हणून चुकीची असल्यास कल्पना नाही.

धर्मराजमुटके's picture

11 Jan 2016 - 7:55 pm | धर्मराजमुटके

अवांतर : उत्सुकांनी 'माटीआ बुर्ज' भागातील वर्णन असलेली, स्वातंत्र्यप्राप्तीच्या आसपासच्या काळाचे वर्णन असलेली 'ब्लड ब्रदर्स" ही एम. जे. अकबर यांची (मराठी अनुवाद : विश्राम ढोले, राजहंस प्रकाशन) कादंबरी वाचावी.

महाजनांच्या बंगल्यावर जाणारा इतर नोकरवर्ग म्हणजे खालचा वर्ग.आतल्या भागात अजूनही प्रथा आहे म्हणतात.तो माणूस आपली करवंटी ठेवलेली काढून त्यातून चाइ पिऊन पुन्हा एका जागी ठेवतो.बंगालमध्ये ढोंग फार आहे.काही कथांमध्येही आहे.बिहारचा दक्षिण भागही असाच आहे.