आमिर आणि शाहरुख

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
25 Nov 2015 - 9:31 am

मन्नतसारख्या किल्ल्यात राहताना किंवा बुलेट प्रूफ व्ह्यानीटी व्ह्यान मधून फिरताना किंवा सतत आसपास दहा-दहा अंगरक्षक बाळगताना जर तुम्हाला या देशात असुरक्षित वाटत असेल तर मेला' आणि 'रा वन' सारखे अत्याचार भोगताना प्रेक्षकांच्या सुरक्षेचा कधी विचार केला का रे तुम्ही दोघांनी? आमिर...अरे बायको म्हणतेय म्हणून देश सोडून जायचंय तुला!...नाही म्हणजे खरच देशातली असुरक्षितता हे कारण आहे की बायको पासून सुरक्षा हे कारण आहे ? तिची फारच इच्छा असेल तर इराक,सिरीयाला घेऊन जा तिला एकदा.आपल्याकडे जुन्या काळात हत्तीवरून साखर वाटायचे की नै तसे विमानातून बॉम्बगोळे वाटतात तिथं. हवं तर फ्रांसला घेऊन जा. आयफेल टॉवर शेजारची जागा फार स्वस्तात मिळतेय म्हणे आजकाल! फूटबॉलची मैदानं पाडून गावागावात आता लष्करी छावण्या बांधणार आहेत म्हणे... नाहीतर अमेरिकेत जाऊन ये. तिथले कस्टमवाले शाहरुखच्या फार ओळखीचे आहेत ना..दरवेळी आस्थेने चौकशी करतात त्याची. 'माय नेम इज खान अँड आय एम नॉट अ टेररिस्ट' हा डायलॉग ऐकल्याशिवाय सोडतच नाही त्याला. तसं तर पाकिस्तानात जायला सुद्धा काही हरकत नाहीये पण ते मुहाजिर वगैरे लफडं संभाळून घे बाबा. किरणवहिनींना मुंबईत मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते ना...पाकिस्तानात तर झेड सिक्युरिटी दिलीये म्हणे शाळांना आजकाल. मागल्यावर्षी नाही का दीडशे निष्पाप मुलांना ठार मारण्याची किरकोळ घटना घडली तिथे ! बाकी कशाकश्शाची म्हणून चिंता नाहीये पाकिस्तानात..ऑस्ट्रेलीयात अधूनमधून भारतीयांवर गोळीबार होत असतो नाहीतर तिथे जा असं सुचवलं असतं..

नाही तर एक काम करा ना...अंटार्क्टिका खंडातच जाऊन राहा...एकदम सुरक्षित !!!

http://chinarsjoshi.blogspot.in/

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

26 Nov 2015 - 3:21 pm | संदीप डांगे

अहो, प्रश्न तुम्ही कहानी रचून सांगण्याचा नाहीच आहे. स्नॅपडील ही साबण देणारी, जास्त लोक कुठे खरेदी करतात, वैगेरे जे मुद्दे तुम्ही मांडत आहात ते खरे असतील किंवा आहेतही पण त्या 'बदमाशपणा'चा आमीरच्या वक्तव्याशी कसा संबंध आहे तेच मला समजत नाही.

म्हणजे एखाद्या बॉम्बस्फोटात १० 'निरपराध' माणसे मारली गेली असा शब्दप्रयोग असतो तेव्हा ती त्या बॉम्बस्फोटाच्या बाबतीत 'निरपराध' म्हटलेली असतात. त्या घटनेशी, घडवून आणण्याशी काहीही संबंध नसतांना मारली गेली आहेत म्हणून निष्पाप, निरपराध. त्या मरणार्‍यांमधे कुणी आपल्या सुनेला हुंड्यासाठी जाळून मारलेलं असेल, तर आपण असं म्हणणार का "बरा झाला मेला ते, नाहीतरी कुठे निरपराध होता तो?" या पार्श्वभूमीवर आमीरच्या वक्तव्यांवरून लोक स्नॅपडीलला विरोध करत आहेत, त्या स्नॅपडीलला मी निरपराध म्हटलं तर तीच कशी बदमाश कंपनी आहे हे सिद्ध करण्याचा आटापिटा का व्हावा असा माझा स्पष्ट प्रश्न आहे.

बघितलं तर हा एक पॅटर्न दिसून येतो. जो कोणी विरोधात असेल, त्याचा, त्याच्याशी संबंधीत प्रत्येक बाबीचा पंचनामा करून ती व्यक्ती, संस्थाच कशी बिनमहत्त्वाची, बिनकामाची आहे हे ठासून सांगण्याचा ट्रेंड आलेला आहे. एखाद्याचं समर्थन करायचंच म्हटल्यावर समर्थक कुठल्याही थराला जाऊ शकतात हे सगळीकडे दिसून येतंय. तिथे आपल्या खिशाला, अंगाला, डोक्याला त्रास होणार नाही असे बालीश विरोध करून काहीतरी केल्याचं समाधान मिळवुन देशभक्त असल्याचे सिद्ध करण्याचा अतिशय केविलवाणा प्रयत्न चालला आहे.

गॅरी ट्रुमन's picture

26 Nov 2015 - 4:47 pm | गॅरी ट्रुमन

पण त्या 'बदमाशपणा'चा आमीरच्या वक्तव्याशी कसा संबंध आहे तेच मला समजत नाही.

परत एकदा-- विरोध स्नॅपडीलला नाही तर आमीरला आहे. तुम्ही जनमेजयाची इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा ही गोष्ट वाचली असेलच. त्याच पध्दतीने "स्नॅपडीलाय स्वाहा आमीराय स्वाहा" असे म्हणा हवे तर. आक्षेप आहे आमीरसारखी मंडळी त्यांना मिळालेले पैसे आणि प्रसिध्दी याच्या जोरावर माज करून वाटेल ते बोलतात त्याला. त्यांच्या माजाचा हा स्त्रोत बंद करा मग स्नॅपडीलवर राग असायचे काही कारण नाही.

संदीप डांगे's picture

26 Nov 2015 - 5:26 pm | संदीप डांगे

सुंदर लॉजिक आहे.

sagarpdy's picture

26 Nov 2015 - 7:00 pm | sagarpdy

अर्थात.
१. आमिर च्या वक्तव्याची फळ त्याच्यापर्यंत या ना त्या मार्गाने पोहाचावालीच पाहिजेत. फक्त सोशल मिडीयावर बोंबा मारून काहीच उपयोग नाही. त्यामुळे snapdeal काढून टाकण्याचे मी समर्थन करेन. अन्य मार्ग उदा. चित्रपट व अन्य जाहिराती उत्पादनांवरील बहिष्कार देखील जरूर वापरावे. लोकांना प्रथम snapdeal सुचलं कारण ते काढून टाकण व त्यामागील भूमिका प्ले स्टोर वर व्यक्त करण अतिशय सोपे आहे.
२. snapdeal ने जर आमिरच्या चांगल्या प्रतिमेचा फायदा घेतला आहे तर त्याच्या वाईटपणाचा तोटाही सहन केलाच पाहिजे. हा व्यवसायातील रिस्क चा भाग आहे.
३. snapdeal ने त्यांची ब्रांड व्ह्याल्यु कशी टिकावी हे त्यांच्या मार्केटिंग विभागाचे काम आहे. "चिंता करतो विश्वाची" मोड मध्ये जाण्याची गरज नाही.

यापलीकडे snapdeal हि भारतीय कंपनी आहे म्हणून त्यांना वाईट परीक्षणे देणे व अनइंस्टाल करणेबाबत :
१. स्वदेशी हि फार जुनी कल्पना आहे मान्य, पण सुजाण ग्राहकाने एखादी कंपनी केवळ स्वदेशी आहे म्हणून खरेदी करणं हा मूर्खपणा आहे.
२. snapdeal कडून बाहेर पडलेले ग्राहक बव्हांशी flipkart कडेच वळतील, किमान मी तरी तसे केले असते. Amezon हि कंपनी जरी परदेशी असली तरी बहुतेकसे विक्रेते देशातीलच आहेत. त्याचबरोबर कंपनीस जो कमिशन चा भाग मिळतो त्यातील काही भाग नक्कीच भारतीय IT कामगारांच्या खिशात जातो. त्यामुळे "देशभक्तानो स्वदेशी कंपनी आहे म्हणून snapdeal काढू नका" हा वाद घालू नये.

ट्रेड मार्क's picture

26 Nov 2015 - 9:58 pm | ट्रेड मार्क

१००% सहमत.

स्नॅपडील वर बहिष्कार ही त्यावेळेला सहज जमणारी गोष्ट होती म्हणून लोकांनी केली. बाकी त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार वगैरे नंतर येतील अशी अशा करतो.

अशाच फक्त, कारण आपल्या लोकांची स्मरणशक्ती फारच कमी आहे. चित्रपटातल्या हिरोला बाकी कश्यापेक्षाही जास्त महत्व देण्याची पण मानसिकता आपल्याकडे आहे. मी एकट्यानी बघितला वा नाही बघितला तर असा काय फरक पडणार आहे असं वाटणारे पण बरेच लोक आहेत. फारफार तर "दंगल"ला जरा कमी प्रतिसाद मिळेल पण त्यापुढे काही होईल असं वाटत नाही.

भंकस बाबा's picture

26 Nov 2015 - 5:11 pm | भंकस बाबा

इस्राईल पलेस्टिनिना मारतो म्हणुन भारतातील मुस्लिम दुकानदारांनी कोकाकोला व् पेप्सी कंपनीची शीतपेय आपल्या दुकानात ठेवायचे बंद केले होते. अगदी मुस्लिम रेस्टारेंट मधेहि ही शीतपेय मिळत नव्हती. कारण काय तर अमेरिका इस्राईलवर नियंत्रण ठेवत नाही. अमेरिका इस्राईलला पाठिंबा देते. कप्पाळ!
तर आमच्या आमिरभायना उभे केले पाहिजे होते सांगायला की याचा कोककोलाचा काही संबध नाही.
आमिर कोककोलाचा ब्रांड अम्बेसेडर आहे ना? मग जो आमच्या अल्पसंख्यक भौनि गोंधळ घातला असता की यंव रे यंव ! धोबिपछाड़च घातला असता. बाकी ते धोबीघाट पिक्चर कोणाला समजल का हो भाऊ?
मला माजे पैशे परत पायजे व्हते.

बोका-ए-आझम's picture

26 Nov 2015 - 6:53 pm | बोका-ए-आझम

माझ्या प्रतिसादात लिहिलेला नाही. ही लबाडी (फोनऐवजी साबण देण्याची) त्यांच्या लाॅजिस्टिक्स पार्टनरची असेल पण जबाबदारी तर स्नॅपडीलची आहे की नाही? आणि म्हणूनच त्यांना आमीरसारख्या credibility असलेला brand ambassadorची गरज लागली.

जो कोणी विरोधात असेल, त्याचा, त्याच्याशी संबंधीत प्रत्येक बाबीचा पंचनामा करून ती व्यक्ती, संस्थाच कशी बिनमहत्त्वाची, बिनकामाची आहे हे ठासून सांगण्याचा ट्रेंड आलेला आहे. एखाद्याचं समर्थन करायचंच म्हटल्यावर समर्थक कुठल्याही थराला जाऊ शकतात हे सगळीकडे दिसून येतंय. तिथे आपल्या खिशाला, अंगाला, डोक्याला त्रास होणार नाही असे बालीश विरोध करून काहीतरी केल्याचं समाधान मिळवुन देशभक्त असल्याचे सिद्ध करण्याचा अतिशय केविलवाणा प्रयत्न चालला आहे.

हे तर सगळीकडेच होतंय. इथे मिपावरही होतंच की. असहिष्णुता वाढल्याचं सांगून पुरस्कार परत करण्याचं जे ढोंग इतक्या दिवसांपासून चालू आहे ते दुसरं काय आहे? का एका पक्षाची किंवा त्याच्या विचारसरणीला मानणाऱ्यांची त्यावर मक्तेदारी असावी असं तुमचं मत आहे? सगळेजण, माध्यमंसुद्धा हेच तर करताहेत. त्यामुळे कुणीही इतरांवर बोटं रोखू नयेत. उरलेली तीन बोटं स्वतःवर रोखली जातात हे लक्षात ठेवावं.

अनिरुद्ध.वैद्य's picture

26 Nov 2015 - 1:26 pm | अनिरुद्ध.वैद्य

एकेकाळी आमिरच ऐकून स्नॅपडीलवरून घेणारया लोकांनी आमिरचच ऐकून स्नॅपडीलवरून विकत घेण बंद केल.
असो.

संदीप डांगे's picture

26 Nov 2015 - 12:42 am | संदीप डांगे

@गॅरी ट्रुमन,

इथे भारतीय खरोखरच सहिष्णु असल्यामुळे आमीरसारख्यांनी असा कितीही आततायीपणा केला तरी अशी प्रतिक्रिया भारतात उमटायची शक्यता कमी.
कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा थांबत नाही. "शक्यता कमी, शक्यता कमी" करत आपण आज इथे आलो आहोत, पाच वर्षे संपेपर्यंत कुठे असू याचा अंदाजच लावूयात...

आमिर आजकल लुधियाना में फिल्‍म दंगल की शूटिंग कर रहे हैं। वह एमबीडी रैडिसन ब्‍लू होटल में ठहरे हैं। बुधवार को इस होटल के बाहर शिवसैनिक प्रदर्शन करने पहुंचे। उन्‍होंने आमिर के लिए ‘मुल्‍ला’, ‘मुसल्‍ला’, ‘कुत्‍ता’ जैसे शब्‍द इस्‍तेमाल किए और उनके फोटो भी जलाए। वहीं शिवसेना के पंजाब अध्‍यक्ष राजीव टंडन ने आमिर को थप्‍पड़ मारने वाले शख्‍स को हर एक थप्‍पड़ के बदले एक लाख रुपए देने का एलान भी कर दिया।

-
See more at: http://www.jansatta.com/national/shiv-sena-protest-in-ludhiyana-punjab-a...

ओके. आता तुमचा मुद्दा जास्त स्पष्ट कळला. अहो मग इतका प्रच्छन्न मार्ग का निवडता आहात टिका करायला. सरळ सरळ मोदि सरकार पद्धतशीरपणे सहिष्णुतेची वाट लावत आहेत असं बोला कि.

संदीप डांगे's picture

26 Nov 2015 - 3:01 am | संदीप डांगे

झालं बोलून...?

आता खालील मुद्द्यांबद्दल तुमचे मतही द्या:

१. मागच्या महिन्यात नारायन मूर्तींनी देशात वातावरण बिघडत असल्याचे म्हटले तेव्हा किती देशभक्त इन्फोसिस कर्मचार्‍यांनी इन्फोसिसचा राजीनामा मूर्तींच्या तोंडावर फेकून मारला?

२. आमिरखान काहीही बरळू दे. त्यात स्नॅपडील ही भारतीय कंपनी व त्यांच्या भारतीय कर्मचार्‍यांचा नक्की काय दोष?

३. शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांचे असे बक्षिस जाहीर करणे योग्य आहे काय?

४. भाजपाच्या मंत्र्यांनी गेल्या काही महिन्यांत जी बेजबाबदार वक्तव्ये केली त्यांना आपण किती महत्त्व देता?

५. जे आमिरच्या वागण्या-बोलण्यातली विसंगती दाखवत आहेत त्या दांभिक लोकांच्या वागण्यातली विसंगती दाखवणे म्हणजे 'अमिरखानला समर्थन व भाजपला विरोध असणे' असा समज का आहे?

५. हे 'मोदिसरकार' काय प्रकार आहे?

६. देशात फक्त 'भारतसरकार' नावाची शासनव्यवस्था आहे जीचे धोरणकर्ते पाच वर्षांसाठी नागरिकांनी निवडून देतात. ती ज्या कारणासाठी निवडून दिली आहे त्याबद्दल योग्य काम करत नसेल तरी नागरिकांनी टिका करू नये असे तुमचे मत आहे काय?

आणि जमलं तर माझ्या बाकीच्या प्रतिसादावर पण प्रतिसाद द्या. सोयीचा एकच शब्द धरून टेमपास करायचा असेल तर चलु द्या अत्मकुंथन....

अर्धवटराव's picture

26 Nov 2015 - 4:53 am | अर्धवटराव

माझं मत कितीही आणि कुठल्याही प्रश्नावर विचारलत तरी सद्यः सरकारच्या पाच वर्षातील कार्यक्रमासंदर्भातली तुमची मतं कळायची ति कळलीच ना. "मोदी सरकार भारताचं एका आगभट्टीत रुपांतर करतय" एव्हढं सिंपल वाक्य टंकायला तुम्ही या आणि इतर धाग्यावर इतका उदंड प्रतिसाद प्रपंच का केला हेच कळत नाहि.

झालं बोलून...?
आता खालील मुद्द्यांबद्दल तुमचे मतही द्या:

आमचं बोलुन न बोलुन काय होणार आहे ? तुमची अ‍ॅक्च्युअल मतं कळायला इतकी पळापळी का करावी लागली हेच कोडं आहे. असहिष्णु वातावरणाचा परिणाम असावा बहुदा.

. मागच्या महिन्यात नारायन मूर्तींनी देशात वातावरण बिघडत असल्याचे म्हटले तेव्हा किती देशभक्त इन्फोसिस कर्मचार्‍यांनी इन्फोसिसचा राजीनामा मूर्तींच्या तोंडावर फेकून मारला?

मला नाहि माहित. तशी माहिती काढायचा मी प्रयत्न पण केला नाहि. आणि तसा राजीनामा वगैरे देण्यात काहि पॉइंट आहे असंही मला वाटत नाहि.
तुम्ही तुमची मतं प्रच्छनपणे का मांडलीत याचा या प्रश्नाची काय संबंध आहे हे ही कळलं नाहि.

२. आमिरखान काहीही बरळू दे. त्यात स्नॅपडील ही भारतीय कंपनी व त्यांच्या भारतीय कर्मचार्‍यांचा नक्की काय दोष?

स्नॅपडील वगैरेचा काहिच दोष नाहि.
तुम्ही तुमची मतं प्रच्छनपणे का मांडलीत याचा या प्रश्नाची काय संबंध आहे हे ही कळलं नाहि.

३. शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांचे असे बक्षिस जाहीर करणे योग्य आहे काय?

शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची असली मतं मोदी सरकार आल्यानंतर बनली आहेत कि काय? शिवसेनेच्या मतांना योग्यायोग्यतेची लेबलं तशीही क्वचीतच लावली जातात.
तुम्ही तुमची मतं प्रच्छनपणे का मांडलीत याचा या प्रश्नाची काय संबंध आहे हे ही कळलं नाहि.

४. भाजपाच्या मंत्र्यांनी गेल्या काही महिन्यांत जी बेजबाबदार वक्तव्ये केली त्यांना आपण किती महत्त्व देता?

शुण्य महत्व. तसंही त्याचा व्हायचा तो परिणाम झाला आहेच. त्यांनी जर सुधारणा दाखवली नाहि तर पुढेही व्हायचे ते परिणाम होतिलच. हि अशी बेजबाबदारीची विधानं मोदी सरकार आल्यामुळे सुरु झाली असं मला नाहि वाटत. ते पहिलेही होत होतं राजकारणात.
तुम्ही तुमची मतं प्रच्छनपणे का मांडलीत याचा या प्रश्नाची काय संबंध आहे हे ही कळलं नाहि.

५. जे आमिरच्या वागण्या-बोलण्यातली विसंगती दाखवत आहेत त्या दांभिक लोकांच्या वागण्यातली विसंगती दाखवणे म्हणजे 'अमिरखानला समर्थन व भाजपला विरोध असणे' असा समज का आहे?

तुम्ही जे काहि टंकलय त्यावरुन मी माझं मत बनवलं. बाकि कुणी कुणाचे खरे-खोटे बुरखे फाडावे हे माझ्या हाती नाहि.
तुम्ही तुमची मतं प्रच्छनपणे का मांडलीत याचा या प्रश्नाची काय संबंध आहे हे ही कळलं नाहि.

५. हे 'मोदिसरकार' काय प्रकार आहे?

भौ, शब्दांचा कीस पाडुन वकिली थाटाने आर्ग्युमेण्ट करायची फार काहि हौस नाहि मला. आणि म्हणुनच तुम्ही तुमची मतं प्रच्छनपणे का मांडलीत याचा या प्रश्नाची काय संबंध आहे हे कळलं नाहि.

६. देशात फक्त 'भारतसरकार' नावाची शासनव्यवस्था आहे जीचे धोरणकर्ते पाच वर्षांसाठी नागरिकांनी निवडून देतात. ती ज्या कारणासाठी निवडून दिली आहे त्याबद्दल योग्य काम करत नसेल तरी नागरिकांनी टिका करू नये असे तुमचे मत आहे काय?

भारत देशातल्या सरकारबद्दल थोडीफार जुजबी माहिती मला आहे. नव्याने करुन देण्याबद्दल धन्यवाद. नागरीकांनी टीका जरुर करावी, तशी ति करतातच. तुम्हाला जे सुचवायचं आहे ते सरळ सरळ टंकण्याऐवजी आडमार्गाने का गेलात हेच फक्त कळत नाहिए. असो. त्याचंही काहि फार कुतुहाल नाहि.

आणि जमलं तर माझ्या बाकीच्या प्रतिसादावर पण प्रतिसाद द्या. सोयीचा एकच शब्द धरून टेमपास करायचा असेल तर चलु द्या अत्मकुंथन....

आत्मकुंथन काय? बरं. मूळ मुद्दा टाळलात. ते ही स्वाभावीक आहे. हे कुंथन वगैरे अलंकारांनी प्रतिसाद देण्याचा आता कंटाळ येतो. असो.

गॅरी ट्रुमन's picture

26 Nov 2015 - 11:08 am | गॅरी ट्रुमन

मागच्या महिन्यात नारायन मूर्तींनी देशात वातावरण बिघडत असल्याचे म्हटले तेव्हा किती देशभक्त इन्फोसिस कर्मचार्‍यांनी इन्फोसिसचा राजीनामा मूर्तींच्या तोंडावर फेकून मारला?

साहेब जरा फ्लॅशबॅक करायचे का? या चर्चेत असा मुद्दा आला होता की अमेरिकेला सतत नावे ठेवणारे लोकच परत अमेरिकेत जायला धडपडत असतात ते ढोंग आहे. त्यावरच तुमचा प्रतिसाद होता---अशा भारतीयाला कामानिमित्त अमेरिकेत जावे लागत असेल तर त्यात काय ढोंगीपणा आहे? . वास्तविक अमेरिकेत जावेबिवे कोणालाही लागत नसते. तर असे लोक कधी अमेरिकेत जायला मिळते यावर टपून बसलेले असतात. आणि अमेरिकेत गेले नाही तर यांच्या घराचे ई.एम.आय भरायला पैसे कुठून येणार हा प्रश्न नसतोच मुळी कारण भारतातील नोकरी चालूच असते आणि जो मिळायचा तो पगार मिळतच असतो.आणि तरीही तुम्ही म्हणता की "अशा भारतीयाला कामानिमित्त अमेरिकेत जावे लागले तर त्यात ढोंगीपणा काय"?

नारायणमूर्ती जे काही बोलले ते मान्य नाहीच. पण त्याचबरोबर नारायणमूर्तींमुळे देशाची मान जगात उंचावली हे पण बरेचसे लोक मान्य करतीलच (याविषयी चर्चा अन्य धाग्यावर झाली आहे.त्याची पुनरावृत्ती इथे नको). तेव्हा नारायणमूर्ती जे काही बोलले त्यामुळे राजीनामा फेकून मारावा अशी अपेक्षा करण्यासाठी तितका आधार आहे असे वाटत नाही. आणि समजा तशी अपेक्षा करायला काही आधार आहे हे गृहित धरू. तसे असेल तर जगातील जवळपास सर्व वाईट गोष्टींसाठी अमेरिकेला जबाबदार धरून दिवसरात्र अमेरिकेच्या नावाने बोटे मोडणार्‍या लोकांनीच "कामानिमित्त जावे लागले तर त्यात काय बिघडले" हे म्हणणे आणि त्याचवेळी नारायणमूर्तींच्या एका वाक्यामुळे "देशभक्तांनी" राजीनामा द्यावा अशी अपेक्षा करणे ही आणखी मोठी विसंगती आहे हे नक्कीच.

गॅरी भाऊ जाहिरात क्षेत्रात काम करण्याना सरकारी पुरस्कार मिळतात का हो?
माहितीसाठी विचारल सहज

संदीप डांगे's picture

26 Nov 2015 - 3:37 pm | संदीप डांगे

जिथली चर्चा तिथे करावी म्हणता आणि स्वतःच इथली तिथली अर्धवट ठिगळे इथे आणून जोडताय... चांगलंय.

माझा अमेरिकेच्या परराष्ट्रधोरणाला असलेला विरोध, नारायणमूर्तींचे आणि अमिरचे एकसारखे वक्तव्य, स्नॅपडील अनइन्स्टाल करणारे 'देशभक्त', यांचा मेळ कसा घातला बॉ तुम्ही...? हे म्हणजे लैच हुच्च झालं. जरा अजून इस्कटून सांगा.

गॅरी ट्रुमन's picture

26 Nov 2015 - 4:36 pm | गॅरी ट्रुमन

हे म्हणजे लैच हुच्च झालं. जरा अजून इस्कटून सांगा.

आज जरा थोडा जास्तच वेळ आहे म्हणून इस्कटून सांगतोच.

पायरी १: तुमच्या सारख्यांचा अमेरिकेला अगदी जोरदार विरोध आहे, अमेरिकेने लक्षावधी लोकांना ठार मारले आहे इत्यादी इत्यादी. त्याउलट कुणाही 'देशभक्ताचा' नारायणमूर्तींच्या एका वाक्याला विरोध असला तरी तुमच्यासारखे अमेरिकेला जितका जोरदार विरोध करतात त्याच्या कित्येक पटींनी कमी विरोध नारायणमूर्तींचा 'देशभक्तांनी' केला होता हे मिपावरील मागची चर्चा बघता समजायला हरकत नसावी. विशेषतः अमेरिकेला ह**** वगैरे वेगवेगळ्या चर्चेत अगदी फ्रीली म्हटले गेले होते (तुम्ही तसे म्हणणारे नव्हतात हे पण आताच स्पष्ट करतो). त्याउलट नारायणमूर्तींच्या त्या वाक्याला विरोध करूनही त्यांच्याविषयी आदर व्यक्त केलेले अनेक मिपाकर होते (मीपण त्यातलाच एक) हे पण समजून यायला हरकत नसावी. म्हणजेच तुमच्यासारख्यांचा जितका अमेरिकेला विरोध आहे त्याच्या कित्येक पटींनी कमी विरोध 'देशभक्तांचा' नारायणमूर्तींना आहे असे म्हणायला हरकत नसावी.

पायरी २: मागच्या चर्चेत कुणीतरी म्हटले की अमेरिकेला इतका विरोध असूनही हे लोक अमेरिकेत जायला जीवाचा आटापिटा का करतात. त्यावर तुम्हीच म्हटलेत--"कामानिमित्त अमेरिकेत जावे लागले तर त्यात काय बिघडले". वास्तविक अमेरिकेत कोणाला जावेबिवे कोणाला लागत नाही आणि असे लोक अमेरिकेत जायला अगदी एका पायावर तयार असतात ही गोष्ट तूर्तास बाजूला ठेऊ. म्हणजे अमेरिकेला इतका प्रचंड विरोध असूनही परत अमेरिकेत जायला आटापिटा करणे ही तुम्हाला विसंगती वाटत नाही.

पण तुम्ही अमेरिकेला करता त्याच्या कित्येक पटींनी कमी विरोध नारायणमूर्तींना 'देशभक्त' करत असूनही आणि नारायणमूर्तींच्या कर्तुत्वाविषयी इन जनरल आदर असूनही किती देशभक्तांनी राजीनामा दिला असेही तुम्ही विचारता.

म्हणजे एखाद्याचा एखाद्या गोष्टीला (अमेरिकन सरकारला) १०० एकक विरोध असेल आणि त्याच गोष्टीला सुसंगत कृत्य (त्याच अमेरिकन सरकारकडून व्हिसा मिळावा यासाठी आटापिटा करणे) त्याने केले तर त्यात काय बिघडले आणि दुसर्‍याचा अन्य कोणत्या गोष्टीला (नारायणमूर्तींचे एक वाक्य) १ एकक विरोध असेल आणि त्या गोष्टीला सुसंगत कृत्य (त्याच नारायणमूर्तींनी स्थापन केलेल्या कंपनीत नोकरी करणे) त्याने केले तर मात्र राजीनामा का देत नाही हा प्रश्न??? ही बात काही हजम झाली नाही.

असो.

संदीप डांगे's picture

26 Nov 2015 - 4:45 pm | संदीप डांगे

इथवर कळले, पुढे? म्हणजे नारायणमूर्तींच्या सारखेच वक्तव्य आमिरखानने केले तर तो ज्या कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आहे त्या कंपनीला जाणून बुजून त्रास होईल असे कृत्य करणे ह्यामागचे काय लॉजिक? अमेरिका पटत नसुन कामानिमित्त तिथे जाणारे, नारायणमूर्तींची विधान अजिबात पटत नसूनही देशाअभिमानापेक्षा पोटापाण्याची जास्त काळजी असल्यामुळे राजीनामा न देणारे, स्वतःच्या पार्श्वभागाला काहीच त्रास होत नसल्याने स्नॅपडीलचे अ‍ॅप सोडणारे यांच्यात काय समान वा विरोधी धागा दिसतोय ते अजूनही कळत नाही.

माफ करा, मी काही तुमच्यासारखा फार उच्चविद्याविभूषित नाही तेव्हा इतकं समजावून सांगितले तर हे ही सांगा.

गॅरी ट्रुमन's picture

26 Nov 2015 - 5:11 pm | गॅरी ट्रुमन

म्हणजे नारायणमूर्तींच्या सारखेच वक्तव्य आमिरखानने केले तर तो ज्या कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आहे त्या कंपनीला जाणून बुजून त्रास होईल असे कृत्य करणे ह्यामागचे काय लॉजिक?

तिसर्‍यांदा-- स्नॅपडीलवर मुळातला राग नाहीच. राग आहे आमीरखानवर. तेव्हा त्रास आमीरला व्हावा ही इच्छा. असले उलटेसुलटे बोलणार्‍या आमीरला स्नॅपडीलने हाकलले तर ठिक नाहीतर "इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा" या न्यायाने स्नॅपडीलही भरडली जाणारच. इलाज नाही.

शब्दबम्बाळ's picture

26 Nov 2015 - 5:36 pm | शब्दबम्बाळ

स्नॅपडीलचे अ‍ॅप सोडणारे चुकीचे का बरोबर हे ठरवता येणे सोप्पे नाही.
पण काही लोक केवळ डिलीट करण्यार्या लोकांना विरोध म्हणून ५ स्टार रेटिंग देत आहेत! त्यांना तरी काय बोलणार!

मुळात ग्राहकाला अ‍ॅप डिलिट करण्याचा अधिकार आहे आणि ते करण्याची कारणे देण्यास तो बांधील नाही.
आमिर खाननेही त्या मुलाखतीत सांगितले कि शांततेने होणार्या कुठल्याही विरोधास त्याचा पाठींबा आहे. मग असे करणाऱ्या लोकांना चुकीचे कोणत्या दृष्टीकोनातून ठरवायचे.

खरेदी करण्यासाठी इतरही भारतीय कंपनी आहेत त्यामुळे तोही मुद्दा नाही.

कोणास ठाऊक, कदाचित या प्रकरणातून कंपन्यांना नवीन धडा मिळेल आणि कराराचे काही नवीन नियम तयार होतील!

ऊद्या एखादी ओफर सुरु केली कि लोक पुन्हा खरेदी करतील स्नॅपडील वरुन.

या प्रकरणांमुळे त्यांना प्रसिद्धी मात्र जोरदार मिळाली आहे.

प्रसाद१९७१'s picture

26 Nov 2015 - 5:01 pm | प्रसाद१९७१

मला एक कळले नाही नारायण मूर्तीं चा राग आला तर राजीनामा का फेकायचा? उलट त्याच्याच कंपनीत राहुन त्यांना त्रास द्यायचा ना. राजीनामा दिला तर फावेलच की असली संधीसाधू बडबड करणार्‍यांची.

संदीप डांगे's picture

26 Nov 2015 - 5:28 pm | संदीप डांगे

जो न्याय स्नॅपडील ला तोच इन्फोसिस ला. सिम्पल लॉजिक आहे.

पण तिथे पोटापाण्याचा प्रश्न असल्याने सामान्य माणसास अंगास फार तोशीस न लागू देणारे उपाय हवे असतात.

हुप्प्या's picture

27 Nov 2015 - 1:37 am | हुप्प्या

असंतोष आमिरखानविरुद्ध आहे. आणि स्नॅपडीलने तो आपला प्रतिनिधी म्हणून भक्कम पैसे देऊन नेमला आहे. आणि जो काही असंतोष आहे तो आमिरखानला प्रतिनिधी नेमण्याविरुद्ध आहे. स्नॅपडीलचे नोकरदार रस्त्यावर यावेत म्हणून नाही. जे उद्योग आमिरखानच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन (योग्य ती किंमत चुकवून) आपले उखळ पांढरे करायला बघतात त्यांनी ह्याकरता जागरूक असलेच पाहिजे की ह्या व्यक्तीने समाजात काय उचापती केल्या आहेत.
मायकेल फ्लेप्स हा अत्यंत लोकप्रिय क्रीडापटू. त्याच्या विक्रमानंतर अनेक ब्रेकफास्ट सिरियलवाल्यांनी त्याला पैसे देऊन आपल्या उत्पादनाची जाहिरात करायला बोलावले. पण नंतर हा मद्यपान करुन कार चालवत असताना पकडला गेला. एकदा ड्रग वापरताना आढळला. तात्काळ हे जाहिराती करार रद्द करून टाकले गेले. तीच गोष्ट टायगर वूड्स नामक प्रसिद्ध गोल्फ खेळाडूची झाली.
इन्फोसिस आणि नारायण मूर्ती हे नाते आणि स्नॅपडील आणि आमिरखान ह्या नात्यात मोठा फरक आहे. मुर्तींनी इन्फोसिस घडवण्यात सिंहाचा वाटा उचललेला आहे. त्यामुळे मूर्तींच्या वादग्रस्त विधानाबरोबर त्यांचे मोठे योगदान हेही विचारात घेतले पाहिजे. उलट स्नॅपडीलचा आमिरखानशी संबंध एका व्यवहारापुरताच आहे. आणि देशाविरुद्ध असे गरळ ओकणार्‍याला त्याची सजा मिळायला हवी आणि त्याकरता स्नॅपडीलने काहीतरी करावे ह्या विचाराने हा बहिष्कार होतो आहे.
जर स्नॅपडीलच्या प्रवक्त्याने तत्परतेने आमिरखानच्या वक्तव्याचा निषेध केला असता तर कदाचित इतका असंतोष उसळला नसता.

गॅरी ट्रुमन's picture

26 Nov 2015 - 10:36 am | गॅरी ट्रुमन

कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा थांबत नाही. "शक्यता कमी, शक्यता कमी" करत आपण आज इथे आलो आहोत, पाच वर्षे संपेपर्यंत कुठे असू याचा अंदाजच लावूयात...

मजाच म्हणायची. तुम्ही त्या चार्ली हेब्डो हत्याकांडासारख्या अश्लाघ्य गोष्टीला कसलीतरी प्रतिक्रिया म्हणून एका अर्थी त्याचे समर्थन करणार आणि भारतात आमीरसारख्याच्या वक्तव्याविरूध्द त्याला थप्पड मारायला लाख रूपये इनाम द्यायची घोषणा केली (ज्याचे मी तरी कधीच समर्थन करू शकणार नाही) तर भारतातील परिस्थिती वाईट झाली असे म्हणणार? एकच मापदंड लावा हो.

प्रसाद१९७१'s picture

26 Nov 2015 - 11:01 am | प्रसाद१९७१

खरे तर समाज सेवक आमिर खान ने चौकात उभे रहायला पाहिजे थप्पड मारुन घ्यायला. किती गरजू लोकांना १-१ लाख मिळतीत. अशी समाजसेवे ची संधी कशी कोणी सोडू शकतो?

संदीप डांगे's picture

26 Nov 2015 - 11:25 am | संदीप डांगे

त्यावेळेस हल्ल्याचा विरोध करणार्‍यांची भूमिका अमिरच्या बाबतीत चक्क उलटी का झाली?

हे कसे काय समजले नाही.

आमिर भंजाळला आहे ते नाही दिसतं का?

आणि मग सामान्य माणूस म्हणुन निषेध कसा करायचा ते सुचवा

स्नॅपडीलला असा काय फरक पडतो यामूळे उद्या त्यांनी ओफर्स सुरु केल्या कि लोक पुन्हा इन्स्टऑल करतील.

तुम्ही तुमच बोला लोकंच काय घेउन बसलात.

संदीप डांगे's picture

26 Nov 2015 - 5:25 pm | संदीप डांगे

अच्छा म्हणजे लोकांमधे आमिर येत नाही असे म्हणायचे आहे काय?

नया है वह's picture

26 Nov 2015 - 5:32 pm | नया है वह

तुम्ही आम्ही सुद्धा येतोच

पण आमिर बद्दल असलेला रोष प्रभाविपणे आणि त्याला समजेल असा व्यक्त करण्यासठी काय मार्ग सुचवाल?

कपिलमुनी's picture

26 Nov 2015 - 6:58 pm | कपिलमुनी

असलेला रोष प्रभाविपणे आणि त्याला समजेल असा व्यक्त करण्यासठी काय मार्ग == अ‍ॅपवापसी

असलेला रोष प्रभाविपणे आणि त्याला समजेल असा व्यक्त करण्यासठी काय मार्ग== अ‍ॅवार्ड वापसी

शब्दबम्बाळ's picture

25 Nov 2015 - 2:24 pm | शब्दबम्बाळ

खरतर आमिर आणि शाहरुखचे मुद्दे मिसळून चालणार नाही...

शाहरुखची मुलाखत राजदीप सरदेसाई घेत होते त्यामुळे अर्थातच त्यांना त्या मुद्द्यावर शाहरुखचे मत हवे होते.
शाहरुख म्हणाला होता कि "Intolerance वाढतोय पण तो जगात सगळीकडे वाढतोय फक्त भारतात नाही. आणि आपल वय आता इतक झाल आहे(हे त्याने मान्य तरी केलंय! ;) ) कि आपण शांतपणे त्याकडे बघू शकतो. पण तरूणांच रक्त सळसळत असते त्यामुळे मग प्रतिक्रिया येतात"
यात फारस चुकीच काही वाटत नाही पण नंतर त्याला वेगवेगळे रंग देण्यात आले.

आता आमिर!
आमिर ने मुलाखतीच्या सुरुवातीलाच सांगितल कि 'पत्रकारितेसाठी सध्याचा काळ कठीण आहे!' खरतर याच वाक्यावर मला आश्चर्य वाटल(आतंकवाद्याला सहानुभूतीच्या बातम्या पहिल्या पानावर कशा येतात बुवा मग?) आणि पुढे त्याने अगदी भ्रमनिरास केला. काही प्रश्नांना तर गुळमुळीत उत्तरे दिली.

त्याने मांडलेले काही मुद्दे:
१. आतंकवादाला धर्म नसतो आपण हिंदू, इस्लामिक दहशतवाद असे नाही म्हटले पाहिजे.
२. जो हातात कुराण घेऊन कत्तल करतो तो मुसलमान नाही. (खरा मुसलमान कोण, हे कोण ठरवणार? याचे मात्र काही स्पष्टीकरण नाही)
3. त्याच्यामते देशातील वातावरण गेल्या ६ ते ८ महिन्यात असहिष्णू होत असलेले दिसत आहे
४. सेन्सोर बोर्डाचे वर्तन देखील गेल्या ६ ते ८ महिन्यातच बदलले आहे. (जेम्स बोंड चा किसिंग सीन...)
५. कर्नल महाडिक यांच्या घरी बरेच राजकारणी गेले नाहीत कारण प्रत्येकाचे आपापले अजेंडे असतात आणि कोणीच पर्फ़ेक्ट नाही त्यामुळे अशा गोष्टी घडत राहतात. (हे सगळे राजनेता दादरीच्या वेळी गेले पण महाडिक यांच्या घरी संरक्षण मंत्रीच गेले बाकी कोणी नाही असे का? या प्रश्नाचे उत्तर!)
६. किरणला हल्ली वर्तमानपत्र उघडायला देखील भीती वाटते! (हे खूपच अति झाले, हे ऐकून असे वाटले जणू भारतात सगळे लोक एकमेकांची कत्तल करत आहे आणि पानेच्या पाने याच्या बातम्यांनी भरून जात आहेत!)
७. भारतात काही मुस्लिम संघटना इसीस ला विरोध करत आहेत.

शब्दबम्बाळ's picture

25 Nov 2015 - 5:35 pm | शब्दबम्बाळ

दुव्याबद्दल धन्यवाद!
मला जेवढे शक्य झाले तेवढे मुद्दे लिहिले! :)

सभ्य माणुस's picture

25 Nov 2015 - 2:39 pm | सभ्य माणुस

मला अस वाटतय की अमिर ने बरच social work केलय. नर्मदा बचाव आंदोलन किंवा सत्यमेव जयते सारखे कार्यक्रम हे सर्व त्याचे देशाबद्दल आस्था असण्याचे उदाहरणे आहेत. लोकशाही असणार्या देशाचा एखादा नागरीक जर त्याला देशातील काही बाबी पटत नसतील आणि तो उघडपणे बोलत असेल तर त्यात प्रोब्लेम काय?? लगेच त्याला पाकिस्तान कडे बोट दाखवायची काय गरज आहे?? कुणालाही "तू पाकिस्तानात जा" हे बोलणारे आपण कोण?
आजपर्यंत अनेकान्नी पुरस्कार माघारी करुन नाराजी दाखवली पण लोकान्नी एवढी "नाटक" दाखवली नव्हती. मग आमिर खानलाच वेगळा न्याय का?

माहितगार's picture

25 Nov 2015 - 3:04 pm | माहितगार

दोन लॉजीकल फॉलसी (तार्कीक उणीवा) आहेत.

"डॉ.स्मीथ एवढे नावाजलेले हृदयरोग तज्ञ आहेत, म्हणून त्यांना जुगार खेळण्याकडे डोळे झाक करावी' हे जस तार्कीक उणीवेच आहे तसच 'अमीरखानने अमुक एवढी कामे केलीत म्हणून त्याचे तर्कसुसंगत नसलेले विधान स्विकारले जावे' हे ही तार्कीक उणीवेचे आहे.

पहिली तार्कीक उणीव अमीर-किरण राव यांच्या अतीरंजीत विधानातच होती, एका प्रचंड मोठ्या रिकाम्या कागदावर एक दोन रंगाचे थेंब पडले आहेत त्या वरून संपूर्ण कागदाचा रंग ठरवता येत नाही, पण नेमकी हीच तार्कीक उणीव अमीर खानच्या विधानात आहे. किंवा जी काही असहीष्णूता आहे ती आधी पासून आहे ती गेल्या काही महिन्यात वाढली हे म्हणणे सांख्यिकीला धरून ठरण्याची शक्यता कमी आहे. बहुधा FTII आणि इतर डाव्या कलाकारांकडून आलेला दबाब (हि राव बाई मुळची बंगालात वाढलेली हे ही लक्षात घ्यावे) आणि एकतर्फी इंग्रजी माध्यमांचे एकांगी प्रसिद्धीच्या परिणामातून घरात बसून त्या राव बाईने काही बाही विचार केला असेल नवर्‍यासमोर बोलून दाखवला असेल, पण १९९२ - ९३ चा काळ आता पेक्षा कठीण होता तेव्हा यांना काहीच वाटले नाही आपापले आयुष्य सुखेनैव कंठले आणि आता सध्या वस्तुतः उत्तरप्रदेश कर्नाटकातल्या काही घटनांपलीकडे काही विशेष समस्या नाहीत तेव्हा केवळ राजकीय भूमिकेतून केलेल्या प्रचारास बळी पडून काही बाही केलेले विधान वाटते.

तिसरी गोष्ट एकाच प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी पुरेसे समतोल उत्तर दिलेले नव्हते. सुधीर, तवलीन सिंघ या पत्रकारांनी खोदल्यानंतर गुळमूळीत सारवासारव केल्या सारखी उत्तरे देणे अमिरखानकडून अभिप्रेत होते असे वाटत नाही.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

25 Nov 2015 - 3:14 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

योग्य प्रतिसाद दिला आहेस रे सभ्य माणसा.आमीरने जरा अतिरंजित वर्णन केले पण ह्या फिल्लमबाज मंडळींना फार मनावर घ्यायचे कारण नाही.
उद्या आमीर व मोदी ह्यांची भेट झाली व हास्तांदोलन करतानाचे फोटो प्रसिद्ध झाले तर काय करायचे ? मग दंगल चित्रपट बघायचा का? असा ह्यांचा सवाल.
आमीर मुरलेला अभिनेता आहे. काश्मीरी पंडितांच्या हक्कासाटी तो जर जंतरमंतरला धरणे धरून बसेल व मग बघा दंगल चित्रपट कसा चालतो ते.

भंकस बाबा's picture

25 Nov 2015 - 3:54 pm | भंकस बाबा

दाऊद इब्राहिम ने देखिल सो कॉल्ड सोशल वर्क़ केले आहे, मग....
आमिर खान सिनेसृष्टित काम करतो. तेथे कोणाकडून पैसा येतो हे गुपित नाही आहे .सत्यमेव जयते मधे आमिरने वैदकीय व्यवसायावर ताशेरे ओढले होते मग एक एपिसोड तो चित्रपट व्यवसायातील अनिष्ट प्रथावर का नाही बनवु शकला?
पाकिस्तान पाठवण्याची भाषा बोलली गेली कारण आमिरनेच देश सोडण्याची भाषा केलि आहे. मग त्याला पर्याय नको?

उद्या मी ट्विटर अथवा अन्य साईटवर असहीष्णूतेबद्दल काही संदेश टाकला तर मला कितीसा भाव मिळणारे. माणसाची मुळात प्रसिद्धी जास्त तितकी त्याची विधाने गाजणे व त्यावर प्रतिकिया मिळण्याचे प्रमाण जास्त. बाकी "पाकिस्तानात जा" हा निव्वळ मूर्खपणा आहे. snapdeal वाले पोळले या प्रकारात, पण लोकांची हि गांधीगिरी करण्याची शक्कल आवडली आपल्याला.

माझ्या मते - आता या असहिष्णुता प्रकरणाचा कंटाळा आला आहे. काही दिवसापूर्वी लोकं काहीसे गंभीर होते याबद्दल. हल्ली हि अशी प्रतिक्रिया मिळतेय. अजून काही काळात "रोज मरे त्याला कोण रडे" हा प्रकार होऊ शकेल. साहित्यिक, अभिनेते व अन्य वैचारिक मंडळीनी फार लवकर त्यांचा हुकुम संपवलाय.

जाता जाता :

आजपर्यंत अनेकान्नी पुरस्कार माघारी करुन नाराजी दाखवली पण लोकान्नी एवढी "नाटक" दाखवली नव्हती. मग आमिर खानलाच वेगळा न्याय का?

आजपर्यंत एवढ्या दंगली, धार्मिक मारामाऱ्या बोंबाबोंब झाली. पण मोदी सरकारच्या काळातच पुरस्कार परत का केले जातात ?

कौशिकी०२५'s picture

25 Nov 2015 - 3:57 pm | कौशिकी०२५

नर्मदा बचाव आंदोलन ठिक आहे. पण सत्यमेव चे एपिसोड पैसे न घेता केलेत का?

प्रसाद१९७१'s picture

25 Nov 2015 - 4:05 pm | प्रसाद१९७१

नर्मदा बचाव आंदोलन ठिक आहे

ह्या आंदोलनात ह्या चोरानी नक्की काँट्रीब्युशन दिले हे कोणी सांगू शकेल का? कीती दिवस आयुष्यातले दिले? उगाच काय कौतुक करताय?

त्यातही मुळाशी जायचे तर ते आंदोलन बरोबर तरी होते का?

बोका-ए-आझम's picture

26 Nov 2015 - 2:39 pm | बोका-ए-आझम

आमीरने नर्मदा बचाव आंदोलनाला पाठिंबा दिला (२००६ सालची गोष्ट असेल) तेव्हा भाजप कार्यकर्त्यांनी त्याचा फना हा चित्रपट गुजरातमध्ये प्रदर्शित होऊ दिला नाही. तेव्हा नरेंद्र मोदीच गुजरातचे मुख्यमंत्री होते. पण देशात काँग्रेसचं राज्य होतं. त्यामुळे देशात असहिष्णुता वगैरे नव्हती पण आता मोदी पंतप्रधान आहेत आणि भाजपची सत्ता देशात आहे, मग लगेच असहिष्णुता वाढली. अस्सल मुंबईकर भाषेत - पियेला है क्या असं विचारावंसं वाटतं आमीरला.

प्रभाकर पेठकर's picture

26 Nov 2015 - 2:44 pm | प्रभाकर पेठकर

तेंव्हा गुजराथ मध्ये असहिष्णुता होती.

नर्मदा आंदोलन हा कोणत्या चित्रपटासाठी publicity stunt असणार हो. बहुतेक रंग दे बसंती.

भंकस बाबा's picture

25 Nov 2015 - 4:03 pm | भंकस बाबा

लोकांना आमिरला नरकात जा असे बोलायचे होते, पण लोकांच्या मते आमिरचा अपराध कदाचित् जरा जास्त मोठा आहे

काय सोशल वर्क केलय आमिर खानने ?
सत्यमेव जयते च्या प्रत्येक एपिसोडसाठी ३ कोटी मानधन घेतल होत त्याने ,आणि 'नर्मदा बचाव ' आंदोलनात त्याचे काहीही योगदान नाही , फ़क्त आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता
लोकशाहीत जसा आमिर खानला देशाचा नागरिक म्हणून त्याच मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे तसाच त्याच्या वक्तव्याचा निषेध करण्याचा अधिकार या देशातील इतर जनतेला आहे
'नाटक ' लोकांनी नाही आमिर खानने केलीत

इरसाल's picture

25 Nov 2015 - 2:42 pm | इरसाल

ल्या भो ल्या आते !

प्रभू-प्रसाद's picture

25 Nov 2015 - 4:07 pm | प्रभू-प्रसाद

किरण राव म्हणते - आमच्या मुलान्च्या सुरक्षित भविष्यासाठी भारत सोडून गेल पाहिजे...
.
आणि
.
शहीद कर्नल महाडीक यान्च्या पत्नी म्हणतात - " भारत मातेच्या सुरक्षेसाठी मी माझा मुलगा आणि मुलगी भारती सैन्यात पाठवणार."

बेंगलोरच्या इम्रान नावाच्या एका इमामाचे भारतात मुस्लिम सुरक्षीत असल्याबद्दलचे आणि अमिरखानच्या वाक्यावर टिका करणारे स्टेटमेंट आले आहे.

तिमा's picture

25 Nov 2015 - 4:32 pm | तिमा

आपल्या देशांत हे सरकार आल्यापासून अचानकपणे असहिष्णुता खूपच वाढली आहे. त्यावर एकच उपाय आहे. हे आत्ताचे सरकार पाडा आणि राहुलचे सरकार आणा. मग बघा, कशी चुटकीसारखी सहिष्णुता परत प्रथापित होईल. त्यानंतर जगभरातल्या सर्व निर्वासितांच्या रांगा आपल्याच देशाकडे वळतील. इतकं , अगदी कडेवर घेऊन कौतुक, दुसर्‍या कुठल्या देशांत होणार ?

पैसा's picture

25 Nov 2015 - 5:08 pm | पैसा

परवा मणिशंकर अय्यर पाकिस्तानात जौन सांगत होते की!

पैसा's picture

25 Nov 2015 - 5:09 pm | पैसा

जरा मोठासा लेख लिहायचा होतास ना तुझ्या नेहमीच्या इश्टाईलमधे!

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्या दिवसापासून नव्हे तर सत्तेवर त्यांची आणि त्यांच्या पक्षाची मांड घट्ट होत आहे याची खात्री पटल्यापासून अनेकांना देशात असहिष्णुता वाढल्याचा साक्षात्कार होऊ लागला आहे.गेल्या 8-10 महिन्यांत तसे वाटण्याजोग्या काही घटना निश्चितच घडल्या असून कोणत्याही निकषांवर त्या समर्थनीय ठरू शकत नाहीत.
विचारवंतांनी, प्रतिभावंतानी, साहित्यिकांनी कलावंतांनी त्यांना पूर्वीच्या सरकारने दिलेले विविध पुरस्कार परत करून आपला निषेधही नोंदविला आहे. पण कोणतीही गोष्ट एका विशिष्ट मर्यादेबाहेर गेली की तिला राजकारणाचा वास आल्याविना राहत नाही.आमिर विचाराने, आचाराने, अभिनयाने आमिर आहे, श्रीमंत आहे अशी पक्की धारणा असणार्यांनाही आता नाव सोनुबाई… या म्हणीची आठवण झाल्यास त्यांना दोष देता येणार नाही.

जातवेद's picture

25 Nov 2015 - 5:28 pm | जातवेद

Here is the actor’s statement in its entirety:

“First let me state categorically that neither I, nor my wife Kiran, have any intention of leaving the country. We never did, and nor would we like to in the future. Anyone implying the opposite has either not seen my interview or is deliberately trying to distort what I have said. India is my country, I love it, I feel fortunate for being born here, and this is where I am staying.

Secondly, I stand by everything that I have said in my interview.
To all those people who are calling me anti-national, I would like to say that I am proud to be Indian, and I do not need anyone’s permission nor endorsement for that.
To all the people shouting obscenities at me for speaking my heart out, it saddens me to say you are only proving my point.

To all the people who have stood by me, thank you. We have to protect what this beautiful and unique country of ours really stands for. We have to protect its integrity, diversity, inclusiveness, its many languages, its culture, its history, its tolerance, it’s concept of ekantavada, it’s love, sensitivity and its emotional strength.

I would like to end my statement with a poem by Rabindranath Tagore, it’s a prayer really :
Where the mind is without fear and the head is held high,
Where knowledge is free,
Where the world has not been broken up into fragments,
by narrow domestic walls,
Where words come out from the depth of truth,
Where tireless striving stretches its arms towards perfection,
Where the clear stream of reason has not lost its way,
Into the dreary desert sand of dead habit,
Where the mind is led forward by thee,
Into ever-widening thought and action,
Into that heaven of freedom, my father, let my country awake.
Jai Hind.
Aamir Khan.”

माहितगार's picture

25 Nov 2015 - 7:40 pm | माहितगार

जिथ पर्यंत रविंद्रनाथ टागोरांची कविता आहे, मी सुद्धा दोन-चार महिन्यातून एकदातरी क्वोट करत असतो. अमिर त्याचे इंटरव्ह्यू मधले स्टेटमेंट बदलत नाही आहे. त्याच्या सबंध इंटरव्हूचा टेक्स्ट किमान दोन वेळा वाचून झाला आहे. त्याच्या (आणि किरण रावांच्या) ज्या तर्कदोषयुक्त विधानावर वस्तुस्थितीस धरून नसलेले अतिरंजीत आणि बेजबाबदारपणाचा आक्षेप नोंदवला जातो आहे तो आक्षेप मांडताना कसलेही डिस्टॉर्शन होत आहे असे वाटत नाही. आधी लोकांना उचकवून आलेल्या उलट प्रतिक्रीयांना यू आर प्रूव्हींंग माय पॉइंट म्हणणे म्हणजे पुन्हा एकदा स्वतःचे टाळण्याजोगे विधान उगाळणे आहे, जे अमिरने टाळले असते तर त्याचा मान राहीला असता.

अनिरुद्ध.वैद्य's picture

27 Nov 2015 - 12:06 am | अनिरुद्ध.वैद्य

हे म्हणजे आधी उचकवायचं आणि मग म्हणायचं
... माझा मुद्दा लोकांनी प्रुव्ह केला!
.. फेस्बुकी तत्वज्ञानाहून साभार.

संजय पाटिल's picture

1 Dec 2015 - 12:43 pm | संजय पाटिल

To all the people shouting obscenities at me for speaking my heart out, it saddens me to say you are only proving my point.>>>
Exactly!! now it is clear that what is your point..

मोगा's picture

25 Nov 2015 - 5:57 pm | मोगा

काय गंमत आहे.

रोज पेपर वाचला की भारतातील असुरक्षिततेची जाणीव होते. हे होते म्हणूनच आम्ही अमेरिकेला / लंडनला / गल्फला आल , असे परदेशी लोक वारंवार बोलतात / लिहितात.

त्याना कुणी देशद्रोही म्हटले नाही.

एका मुसलमान आमीरच्या हिंदू बायकोने आज हेच वाक्य म्हटले तर ती आणि तिचा नवराही देशद्रोही ..

वा रे सहिष्णुता !

मम्बाजी सर्वज्ञ's picture

25 Nov 2015 - 6:53 pm | मम्बाजी सर्वज्ञ

मोगा शेठ, याचे कारण सोपे आहे. ज्यांना बाहेर जायला आवडले ते गेले. ते भारत कुठे तरी कमी पडला म्हणून नाही, बाहेरच्या देशात काही तरी आवडले म्हणून. हा हिरो तिथेच बसून पैसा कमवून तिथल्याच लोकांना जोडे मारणार असेल तर कुठून तरी प्रतिक्रिया येणारच न?
बाय द वे, २६/११ आणि तत्सम घटना इतक्या वेळा घडल्या देशात. त्या वेळी कुठे गेली होती असहिष्णुतेची जाणीव?

अत्रे's picture

25 Nov 2015 - 6:22 pm | अत्रे

मला देशाचा अभिमान असून माझा किंवा माझ्या पत्नीचा देश सोडण्याचा कोणताही विचार नाही, नव्हता आणि नसेल, असे अभिनेता आमीर खान याने प्रसारमाध्यमांना आज (बुधवार) पत्र लिहून खुलासा केला आहे.

आमीर खान याने देशातील वाढती असहिष्णुता, पुरस्कार वापसी यांसारख्या विषयांवर सोमवारी दिल्लीतील रामनाथ गोयंका पुरस्कार सोहळ्यात चिंता व्यक्त केली आहे. या वक्तव्यानंतर त्याच्यावर चौफेर टीका होत आहे.

आमीर खान याने प्रसारमाध्यमांसाठी पत्र लिहून आज खुलासा केला आहे. पत्रामध्ये त्याने म्हटले आहे की, 'सर्वांत आधी मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे, माझा किंवा माझ्या पत्नीचा देश सोडण्याचा कोणताही विचार नाही, नव्हता आणि नसेल. जे कोणी अशा गोष्टी पसरवत आहे, त्यांनी एकतर माझी मुलाखत पाहिली नाही किंवा जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. भारत माझा देश आहे, मी देशावर अतिशय प्रेम करतो आणि ही माझी मातृभूमी आहे. दुसरी गोष्ट, मुलाखतीदरम्यान मी जे काही म्हटलं, त्यावर मी ठाम आहे. जे मला देशद्रोही म्हणतात, त्यांना मला सांगायचं आहे की, भारतीय असल्याचा मला अभिमान आहे आणि या वस्तूस्थितीसाठी मला कोणाच्याही परवानगीची किंवा प्रमाणपत्राची आवश्‍यकता नाही.'

'मी माझं मत व्यक्त केलंय त्याबद्दल मला घाणेरड्या शिव्या दिल्या जात आहेत, त्यांना मी एवढंच सांगेन की, मी जे म्हटलं ते तुम्ही खरं करुन दाखवत आहात. आणि ज्यांनी माझी साथ दिली त्यांचे मी आभार मानतो. आपल्याला या सुंदर आणि अतुल्य भारताला सुरक्षित ठेवायचं आहे. या देशाच्या एकतेला-विविधतेला, संस्कृतीला-सभ्यतेला, अखंडता आणि इतिहासाला सुरक्षित ठेवायचं आहे', असेही आमीर म्हणाला. (सकाळ)

विकास's picture

25 Nov 2015 - 7:06 pm | विकास

अमिर (सॉरी टू से, पण, बायकोच्या नावा आडून) पहील्यांदा म्हणाला - भारतात असुरक्षित वाटते...

परीणाम - आमिरकडे परत लक्ष गेले, पब्लिसिटी मिळाली. कदाचीत याचा उपयोग पुढच्या निवडणुकात तिकीट मिळायला होईल... वास्तवीक त्याने पब्लिकच्या कॉमेंट्सकडे ढुमकून पाहीले नसते....

पण नंतर स्नॅपडील प्रकरण घडले आणि कुठेतरी कान पिळले गेले म्हणून आता उपरती होऊन देशप्रेम + उसन्या अवसानाने माझे म्हणणे कायम आहे असे म्हणायची वेळ आली झालं!

खैरलांजी सारखे घॄणास्पद प्रकरण घडले तरी ज्यांना असहिष्णूता दिसली नाही, सत्यमेव जयते वगैरे म्हणत जनतेच्या भावनांशी खेळत तीन तीन कोटी स्वत:च्या खिशात घालताना काही वाटले नाही, त्यांनी आता गमजा माराव्यात आणि त्याला आपण भाव द्यावा...

मोगा's picture

25 Nov 2015 - 6:58 pm | मोगा

जे मला देशद्रोही म्हणतात, त्यांना मला सांगायचं आहे की, भारतीय असल्याचा मला अभिमान आहे आणि या वस्तूस्थितीसाठी मला कोणाच्याही परवानगीची किंवा प्रमाणपत्राची आवश्‍यकता नाही.

मोगा's picture

25 Nov 2015 - 7:01 pm | मोगा

मा. जनाब आमीरखानच्या या वाक्याशी सहमत.

खुदा उनको खुश रखे

खुदा आपको (म्हणजे ह्या सतराव्या आय डि ला) जल्द हि दोजख ले जाये, नाहि तर मिपाचे खुदा (संम) को ये करना पडेगा

कोण आमीर? कोण शारुक?
धन्यवाद.

मम्बाजी सर्वज्ञ's picture

25 Nov 2015 - 9:26 pm | मम्बाजी सर्वज्ञ

+१

भारतात गल्लोगल्ली खून पडत आहेत का बलात्कार होत आहेत? का अल्पसंख्याकांना घराच्या बाहेर पडायची चोरी झालीये? का या High profile मंडळींना रोज धमक्यांचे फोन येतात, का तथाकथित हिंदू तालिबानचे लोक यांच्या घराबाहेर धिंगाणा घालतात? नक्की कसली भीती वाटतेय?

पेपर उघडायची पण भीती वाटते यांना कुठले पेपर वाचतात कोण जाणे, सिरीया, इराण, फ्रान्स किंवा पाकिस्तानचे पेपर वाचतात बहुतेक. सोशल मेडिया वर लोक बोलतात ते आवडत नाही म्हणून भीती वाटते? फक्त लोक बोलतात म्हणून अख्खा भारत देश असहिष्णू झाला? बहुतेक बीफ खायला मिळत नाही म्हणून अस्वस्थ झाले असावेत.

मेडियाची पण चूक आहेच. संदर्भ सोडून फक्त एक शब्द किंवा एक वाक्य दाखवत राहतात, शीर्षक काय देतात आणी बातमी काय देतात काही ताळतंत्र नाही. आजच म. टा. मध्ये बातमी आहे
शीर्षक - ए. आर. रेहमाननी पण आमिरला पाठींबा दिला. पण खाली बातमीत त्यानी रझा अकादमीनी त्याच्यावर फतवा काढला ते सांगितलं आणी समाजाच्या त्या वर्गाकडून असहिष्णुता वाढली असं म्हणाला.

सगळा मूर्खपणा चालला आहे. जगापुढे भारताची प्रतिमा खराब करण्याचा डाव आहे. आधीच पाश्चात्य लोकांना वाटतं आपण फार मागासलेले आहोत त्यात आणि ह्या फालतू गोष्टी ऐकून काय होणार दुसरं.

मोगा's picture

25 Nov 2015 - 10:51 pm | मोगा

नुसता फ्लायओव्हर मर्जीविरूध्द बांधला तर देश सोडून दुबईत जाऊन राहीन म्हणणारे "देशद्रोही" मधे येत नाही वाटते तेव्हा जगात देशाची प्रतिष्ठा वाढते की काय !

.....

अरे हो ! ईसरलोच की ! साहेब , बाजपेयी , मोदीजी यांच्यशी जवळीक असलेल्या व्यक्ती देशद्रोही कशा असतील ?

मम्बाजी सर्वज्ञ's picture

25 Nov 2015 - 10:56 pm | मम्बाजी सर्वज्ञ

ये क्या हाल बनाये रखा है अपना. कुछ लेते क्यो नाही?

:) तुमची ( स)मरणशक्ती फारच दगा देते काय ?? त्या वर लोकांनी त्यांना बाहेर जा असे सांगितले होते. आठवते का? म्हणा तुम्ही शहजोगे आहात त्यामुळे असे काही आठवणार नाही तुम्हाला

मोगा's picture

26 Nov 2015 - 7:05 pm | मोगा

परदेशात जाईन असे नुसते बोलून बसलेला आमीर

आणि

परदेशात जाईन असे धमकावून फ्लायओवरचे काम बंद पाडून विकास कार्यात खीळ घातलेली कोकिलाबेन

यातलं नेमकं देशप्रेमी कोण , द्रोही कोण , तटस्थ कोण हे समजेना झालय.

जरा सांगाल का ?

बोका-ए-आझम's picture

26 Nov 2015 - 7:59 pm | बोका-ए-आझम

फ्लाय ओव्हर लता मंगेशकरांच्या घरासमोरून जाणार होता. आणि तिथल्या ९०% नागरिकांचं तिथे फ्लाय ओव्हर नको असं म्हणणं होतं. आणि त्यात सर्वधर्मीय लोक सामील होते. पारशीही होते, जे अल्पसंख्यांकांमध्येच येतात. त्यांनी सरकारला जे पिटिशन दिलं त्याला सरकारने वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या म्हणून तिथल्या रहिवाशांच्या मदतीसाठी लता मंगेशकर आणि आशा भोसले या पुढे आल्या. त्यांच्या हस्तक्षेपामुळे सरकारने निर्णय बदलला, जे करायची सरकारला काहीही गरज नव्हती. पण सरकारने तरीही जर लताबाईंचं म्हणणं ऐकलं असेल तर ती सरकारची चूक आहे. ते म्हणू शकत होते की गेलात उडत. आणि देशद्रोह याची तुमच्या म्हणण्यानुसार व्याख्या मान्य करणं आमच्यावर बंधनकारक नाही. आणि आमीरला देशद्रोही असं कुणीही म्हटलेलं नाही. त्याच्याविरूध्द F.I.R. दाखल झालाय तो फालतूपणा आहे. तुम्हीही आज लताबाईंविरुद्ध F.I.R. करु शकता. ;)

बोका-ए-आझम's picture

26 Nov 2015 - 8:00 pm | बोका-ए-आझम

फ्लाय ओव्हर लता मंगेशकरांच्या घरासमोरून जाणार होता. आणि तिथल्या ९०% नागरिकांचं तिथे फ्लाय ओव्हर नको असं म्हणणं होतं. आणि त्यात सर्वधर्मीय लोक सामील होते. पारशीही होते, जे अल्पसंख्यांकांमध्येच येतात. त्यांनी सरकारला जे पिटिशन दिलं त्याला सरकारने वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या म्हणून तिथल्या रहिवाशांच्या मदतीसाठी लता मंगेशकर आणि आशा भोसले या पुढे आल्या. त्यांच्या हस्तक्षेपामुळे सरकारने निर्णय बदलला, जे करायची सरकारला काहीही गरज नव्हती. पण सरकारने तरीही जर लताबाईंचं म्हणणं ऐकलं असेल तर ती सरकारची चूक आहे. ते म्हणू शकत होते की गेलात उडत. आणि देशद्रोह याची तुमच्या म्हणण्यानुसार व्याख्या मान्य करणं आमच्यावर बंधनकारक नाही. आणि आमीरला देशद्रोही असं कुणीही म्हटलेलं नाही. त्याच्याविरूध्द F.I.R. दाखल झालाय तो फालतूपणा आहे. तुम्हीही आज लताबाईंविरुद्ध F.I.R. करु शकता. ;)

मोगा's picture

26 Nov 2015 - 10:19 pm | मोगा

ज्याच्या घरासमोरून फ्लाय ओवर जातो त्याला विचारून फ्लाय ओवर व्हायला लागले तर कुठलाच फ्लाय ओवर होणार नाही. फ्लाय ओवरच्या वेळी पूर्ण ट्रॅफिकला कितपत सोय होते ते सरकार बघते.

.....

आमीरखानचे वक्तव्य हे नुसते वक्तव्य होते , पण फ्लायओवरबाबत धमकीचा सूर लावून इतरांच्या सोयीकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या सामाजिक प्रतिष्ठेचा वापर केला गेला.
.......

गीर्वाणवाणी उर्फ संस्कृत भाषेत एक न्याय दिलेला आहे ... पात्र श्वान न्याय ( नेमके नाव माहीत नाही. हे नाव मी आतापुरते वापरतोय. )

हा न्याय असे बोलतो की मनुष्य डिप्लोमॅटिक असतो. एका लहान पात्रात कुत्र्याने तोंड घातले तर त्या पात्रातील सर्वच अन्न फेकून देतात. पण पात्र अगदी मोठे असेल तर कुत्रे स्पर्शलेले थोडेच अन्न टाकून उरलेले सर्व शुद्ध मानावे.

.....

कोकिळाबाई , मुन्नभाई ही मोठी पात्रे ... म्हणून दोषास्पद वाक्ये वगळून उर्वरीत व्यक्ती शुद्ध .

आमीरखान , रहमान इ ही लहान पात्रे ... म्हणून ते , त्यांचे घर , त्यांचा धर्म , त्यांचे चित्रपट .... सर्वच टाकावू !

....

संस्कृत भाषेचा व त्यातील सुसंस्कृत न्यायाचा विजय असो. !

थांबवलंय का कोणी ? आणि ९०% लोकांना जर फ्लाय ओव्हर नको असेल तर तो न बांधणं हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून बरोबरच आहे. शिवाय लताबाईंपुढे झुकायची तत्कालीन सरकारला काय गरज होती? पण तसं झालं. एकट्या लता मंगेशकरांनी त्या फ्लाय ओव्हरला आक्षेप घेतला नव्हता. आक्षेप घेणाऱ्यांंमध्ये नगररचना तज्ञ चंद्रशेखर प्रभू, वास्तुतज्ञ जयंत टिपणीस, हफीज काँट्रॅक्टर आणि चार्ल्स कोरिया यासारख्या मान्यवरांचा (ज्यांना इन्फ्रास्ट्रक्चर या विषयात काही कळतं) समावेश होता. हे तुम्हाला माहित नसेलच म्हणा!

प्रदीप's picture

27 Nov 2015 - 7:36 pm | प्रदीप

लताबाईंनी दिलेली नव्हती. आशाबाईंनी तसे म्हणाल्याचे आठवते.

बाकी चालू दे.

पुष्करिणी's picture

25 Nov 2015 - 10:54 pm | पुष्करिणी

हा माणूस काँट्रॅडिक्टरी विधानं करण्यात अतिशय पटाइत आहे, देल्ही बेली प्र्मोट करतो आणि एआय्बी रोस्टला विरोध करतो.

सतत अंगरक्षक घेउन फिरणार्या बाईला जर असुरक्षित वाटत असेल तर तिला मानसोपचाराची गरज नये, अजिबात वेळ दवडू नये.

हेच म्हणते. कै नै. सगळे नीट चालले आहे म्हणून सूख दुखतेय. त्याचा इलाज बहुतेक दुसर्‍या देशात असेल तर त्याला आपण काय करणार? हे वक्तव्य किरणचे आमीरशी लगीन होण्याऐवजी कोण्या कमी पैसेवाल्याशी झाले असते तर तिला परदेशी जाऊन रहायचे डोहाळे लागले असते का? आमीरही बायकोचे म्हणणे कुठल्याशा समारंभात सांगतो म्हणजे त्याला आता परदेश परवडणेबल झालाय. भारतातील प्रोजेक्टस येऊन जाऊन करू असे दिसतेय. तसे नसते तर "क्या बात कर रही हो क क क किरन! यहाँ नही तो कहाँ जायेंगे? पैसे कौन कमायेगा. अब चूप करो. जाओ, मेरेलिये दाल रोटी बनाओ" अशी ड्वायलॉगबाजी झाली असती ना! ;) आणि त्याला जर दुसर्‍या देशात रहायचा (मराठी) परवाना मिळाला असेल व जाणे जोपर्यंत कायदेशीर आहे तोपर्यंत त्याला कोणीच काही म्हणू शकत नाही.

रेवती's picture

26 Nov 2015 - 12:38 am | रेवती

तशीही किरण राव तेलुगु घराण्याशी संबंधित असल्याने परदेशी जाण्याचा तिला हक्कच आहे असेही म्हणते. ;)

पुष्करिणी's picture

26 Nov 2015 - 3:38 pm | पुष्करिणी

हायला हा गुल्टी अँगल लक्षातच आला नै...किरणबाईसाहेबांची मानसिक कुचंबणा आत्ता कुठे कळली मला. त्यांना फारच असहिष्णुता सहन करायला लागतेय. नवर्‍याची परिस्थिती ही अशी, बाहेरचे सिनेमे इकडे आणून कॉपी मारायचे आणि पोटभरायचं.इकडून तिकडे( म्ह्ण्जे भारत सोडून कुठही ) समजा गेलं तरी पोटापाण्याचं काय..तो तरी काय करणतो; गांजलाय बिचारा बायकोच्या भुण्भुणीला. आता कुणाकडं तरी मन मोकळं करणारच की, बिचारा बोलला त्या पत्रकाराकडे..सहानुभूती दाखवायचं सोडून किती तो त्रास देतायत त्याला..

पुष्करिणी's picture

26 Nov 2015 - 3:52 pm | पुष्करिणी

मला आता रावबाईंची काळजी वाटायला लागलीये, त्यांचा दीरानं ( तोच तो 'मेला' मधला त्यालाही paranoid schizophrenia होता ) अमिरविरूद्ध बळजबरीनं नको ती औषध देण्याबद्दल तक्रार केली होती आणि घरातून पळून गेला होता. त्यामुळे राव बाईंच्या माहेरच्यांनी किंवा महिला संघटनांनी रावबाईंकडे ताबडतोब लक्ष द्यावं ही इनंती.

हुप्प्या's picture

26 Nov 2015 - 1:18 am | हुप्प्या

मला मोदी सत्तेवर आलेले आवडलेले नाहीत असे म्हणायचे धाडस नाही म्हणून मग असहिष्णूता वगैरे ढोंगी आणि पोकळ सबबी सांगून देशाची हालत खराब असल्याची बोंब मारणे चालू आहे. त्यातही बायको असे म्हणाली मी नाही अशी एक ढाल आहेच!
आपल्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन अक्षरशः खोर्‍याने पैसा मिळवणार्‍या ह्या लोकांना आता हा पूर्ण देश असहिष्णू वाटू लागला. ज्या थाळीत खाल्ले त्यातच थुंकण्याचा हा प्रकार आहे.
काही वेळा आपण आपल्या धर्माकरता पुरेसे काही करत नाही आहोत. पोटापाण्यासाठी जे काही करतो ते इस्लाम हराम समजतो अशी काही अपराधी भावना असल्यामुळे कदाचित असा शॉर्टकट घेऊन आपल्या "पापाची" भरपाई करण्याचा हा प्रयत्न असावा. कदाचित.
एक उदाहरणः बँकेत काम करणारे धार्मिक मुस्लिम लोक अशा अपराधी भावनेने पछाडलेले असतात. व्याज ही इस्लामच्या लेखी पूर्ण हराम असणारी गोष्ट जिच्यावर आपण आपण उदरनिर्वाह केला ह्याची एक टोचणी ह्या लोकांना असते. मग त्यातून उतराई होण्याकरता अतिरेकी दानधर्म करून आपले पाप धुवायचा हे लोक प्रयत्न करतात. कारण अंतर्मुख होऊन "खरोखरच व्याज घेणे आणि देणे इतके वाईट आहे का?" असा विचार करण्याची त्यांची धमक नसते.

मला मोदी सत्तेवर आलेले आवडलेले नाहीत असे म्हणायचे धाडस नाही म्हणून मग असहिष्णूता वगैरे ढोंगी आणि पोकळ सबबी सांगून देशाची हालत खराब असल्याची बोंब मारणे चालू आहे.

+११११

गॅरी ट्रुमन's picture

26 Nov 2015 - 11:14 am | गॅरी ट्रुमन

मला मोदी सत्तेवर आलेले आवडलेले नाहीत असे म्हणायचे धाडस नाही म्हणून मग असहिष्णूता वगैरे ढोंगी आणि पोकळ सबबी सांगून देशाची हालत खराब असल्याची बोंब मारणे चालू आहे.

सहमत आहे. असहिष्णुता-असहिष्णुता म्हणून कोल्हेकुई करणारे सगळेच लोक याच गटात मोडतात.

एका शिख व्यक्तीचे वक्तव्य - कुठल्याही पद्धतीचा आक्रस्ताळेपणा न करता केलेले खालील वक्तव्य जरूर पहा...

रेवती's picture

26 Nov 2015 - 2:02 am | रेवती

भारी संदेश आहे.

यश राज's picture

26 Nov 2015 - 2:31 am | यश राज

सुन्दर संदेश .

संदीप डांगे's picture

26 Nov 2015 - 3:05 am | संदीप डांगे

सणसणित चपराक. अगदी मुद्देसूद विवेचन. (फक्त ते 'स्नॅपडीलचा बहिष्कार' नावाचं निर्बुद्ध प्रकरण सोडलं तर....)

जे.जे.'s picture

26 Nov 2015 - 6:03 am | जे.जे.

स्नॅपडील हि भारतिय कंपनी जरी असली तरी त्यांचे सगळे प्रॉड्क्टस काही भारतिय नाहीत.

थोडक्यात 'मेक इन ईन्डीया शी काही संम्बध नाही. आणी स्नॅपडील ला स्वतः ची काळजी असल्यास त्यान्नी आंंमिर ला ब्रॅन अ‍ॅम्बेसेर्डर ठेवु नये

मदनबाण's picture

26 Nov 2015 - 7:05 am | मदनबाण

@विकासराव
हा संदेश इथे शेअर केल्या बद्धल धन्यवाद.
प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाच्या मनातली भावना अगदी योग्य पद्धतीने सांगितली गेली आहे. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- में कुडी अनजानी हुं... ;) :-Zor

नाखु's picture

26 Nov 2015 - 9:23 am | नाखु

तंतोतंत सहमत.
एकच व्यक्ती खुपत असल्याने हे चालू आहे हे ढळढळीत सत्य आहे आणि त्यामुळेच खरोखरीचा अन्याय असेल तर त्याला विनाकारण राजकीय रंग दिला जाऊ शकतो हा मोठा धोका आहे.

उदा: एखाद्याने गरीब आणि "गावी जायला पैसे नाहीत" असे सांगीतले म्हणून तुम्ही मदत केली आणि तो इसम बोगस्,तोतया निघाला तर पुढच्या वेळी खरोखरच्या गरजवंताला मदत केली जाणार नाही.

त्याच प्रमाणे पोटशूळ असल्यासारखे हस्तीदंती,पेज ३ रथींना, भाडोत्री-लाभार्थी साहीत्यीकांना हाताशी धरून चिखल फेक/देशाची प्रतीमा भंजन करण्यापेक्षा जिथे जिथे सरकार चुकते,किंवा फसलेल्या,रूतलेल्या योजनांचा पंचनामा करा,मोदी सरकार दिलेल्या अश्वासनाशी विपरीत निर्णयाची+अंंमल बजावणीची चिरफाड करा. तुमचा मुद्दा रास्त आणि ठोस असेल तर वेगळ्या टी आर पी ची गरज नाही.

पण जागतीक पातळीवर आप्ल्याच विनाकारण चिखल्फेक करण्याचा करंटेपणा करू नये. (याचा अर्थ सर्व आलबेल आहे असे नाही पण रंगवीले जाते तितके भयाण चित्रही नाही हे नक्की)

दुख्ते फक्त खुप्ते
नसलेला नाखु