आमिर आणि शाहरुख

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
25 Nov 2015 - 9:31 am

मन्नतसारख्या किल्ल्यात राहताना किंवा बुलेट प्रूफ व्ह्यानीटी व्ह्यान मधून फिरताना किंवा सतत आसपास दहा-दहा अंगरक्षक बाळगताना जर तुम्हाला या देशात असुरक्षित वाटत असेल तर मेला' आणि 'रा वन' सारखे अत्याचार भोगताना प्रेक्षकांच्या सुरक्षेचा कधी विचार केला का रे तुम्ही दोघांनी? आमिर...अरे बायको म्हणतेय म्हणून देश सोडून जायचंय तुला!...नाही म्हणजे खरच देशातली असुरक्षितता हे कारण आहे की बायको पासून सुरक्षा हे कारण आहे ? तिची फारच इच्छा असेल तर इराक,सिरीयाला घेऊन जा तिला एकदा.आपल्याकडे जुन्या काळात हत्तीवरून साखर वाटायचे की नै तसे विमानातून बॉम्बगोळे वाटतात तिथं. हवं तर फ्रांसला घेऊन जा. आयफेल टॉवर शेजारची जागा फार स्वस्तात मिळतेय म्हणे आजकाल! फूटबॉलची मैदानं पाडून गावागावात आता लष्करी छावण्या बांधणार आहेत म्हणे... नाहीतर अमेरिकेत जाऊन ये. तिथले कस्टमवाले शाहरुखच्या फार ओळखीचे आहेत ना..दरवेळी आस्थेने चौकशी करतात त्याची. 'माय नेम इज खान अँड आय एम नॉट अ टेररिस्ट' हा डायलॉग ऐकल्याशिवाय सोडतच नाही त्याला. तसं तर पाकिस्तानात जायला सुद्धा काही हरकत नाहीये पण ते मुहाजिर वगैरे लफडं संभाळून घे बाबा. किरणवहिनींना मुंबईत मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते ना...पाकिस्तानात तर झेड सिक्युरिटी दिलीये म्हणे शाळांना आजकाल. मागल्यावर्षी नाही का दीडशे निष्पाप मुलांना ठार मारण्याची किरकोळ घटना घडली तिथे ! बाकी कशाकश्शाची म्हणून चिंता नाहीये पाकिस्तानात..ऑस्ट्रेलीयात अधूनमधून भारतीयांवर गोळीबार होत असतो नाहीतर तिथे जा असं सुचवलं असतं..

नाही तर एक काम करा ना...अंटार्क्टिका खंडातच जाऊन राहा...एकदम सुरक्षित !!!

http://chinarsjoshi.blogspot.in/

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

शलभ's picture

26 Nov 2015 - 9:35 am | शलभ

सहमत

sagarpdy's picture

26 Nov 2015 - 10:09 am | sagarpdy

मस्त, एक नंबर

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Nov 2015 - 11:05 am | डॉ सुहास म्हात्रे

शांतपणे दिलेला मुद्देसूद संदेश !

अर्थात व्यक्तीगत हितसंबांधांवर चालणे-बोलणे असणार्‍यांना तोही आवडणार नाहीच म्हणा ! :)

या क्लिपच्या नंतर येणारी क्लीपही रोचक आहे ! :)

टाटा स्काय ला का विरोध नाही? टीव्ही सोडणं जमत नाही म्हणून? :D

जे.जे.'s picture

26 Nov 2015 - 8:01 am | जे.जे.

करा कि. कोण नको म्हणतय.

तुम्हाला जसा जमेल तस करा.

sagarpdy's picture

26 Nov 2015 - 10:10 am | sagarpdy

आम्ही videocon घेतला :)

माहितगार's picture

26 Nov 2015 - 9:12 am | माहितगार

वन इंडीया डॉट कॉमच्या या वृत्तात अमिरच्या मोदींविषयी असलेल्या जळफळाट आणि भरतंचा साद्यंत इतिहास दिसतो आहे. एकुण अमिरची भूमिका राजकीय अधिक वाटते त्याची भूमिका राजकीय आहे हे त्याने एकदा स्विकारले तर तो काय म्हणाला हे लोक जास्त मनावर घेणार नाहीत.

amol gawali's picture

26 Nov 2015 - 9:38 am | amol gawali

nice

मोगा's picture

26 Nov 2015 - 10:24 am | मोगा

http://drabhiram.blogspot.in/2015/11/blog-post_25.html

हे वाचून आनंद झाला

मोगा's picture

26 Nov 2015 - 10:25 am | मोगा

http://drabhiram.blogspot.in/2015/11/blog-post_25.html

हे वाचून आनंद झाला

बटाट्याच्या चाळीच्या भाडेकरुंची वार्षिक बैठक (उदाहरणार्थच आहे)
सोकाजीनाना त्रिलोकेकर: साला या चालीत नुसती घाण साला. लोक पन रॉटन साला. नो कल्चर. साला बाबलीबाई म्हणत होती की असल्या उकिरड्यात राहण्यापेक्षा चाळ सोडून जाऊया. बाबलीबाई ट्रू बोलते साला.. आमच्या कम्युनिटीच्या पोरांना या घाटी लोकांच्यात फ्यूचरच नाय अन सेफ्टी पन नाय. डर्टी फॅमिलीज साला एकजात. नुस्ता भांडन करते अन बेगरसारखी घाणेरडी राहणारी पब्लिक. साला मी पन म्हंटला चाल सोडायला पायजे साला.
एच्च मंगेशराव: ओ. तुम्हाला काय त्रास झाला हो चाळीकडून आजपर्यंत. चाळीने तुम्हाला सेक्रेटरीपण केलेलं की गेल्यावर्षी.
अण्णा पाबशे: एवढा त्रास आहे तर बिर्‍हाड आवरा आणि जावा मफतलाल पार्कात राहायला.
आचार्य बाबा: आपण त्रिलोकेकरांची मनःस्थिती समजून घेतली पाहिजे. ते आपले बांधवच आहेत. त्यांनी चाळीच्या सर्व कार्यक्रमांसाठी किती कष्ट घेतले आहेत ते आपण लक्षात घेतलं पाहिजे.
काशिनाथ नाडकर्णी: कसले कष्ट केलंतीत हो या त्रिलोकेकरान्..?? खजिनदार होण्यासाठी धडपड नुसती.. आणि आम्ही कष्ट नाय केले तर काय झोपा काढल्या?
जनोबा रेगे: ए त्रिलोकेकर. गप रे. वशाड मेलो.
गुप्ते: खेचा रे त्याला. याच्याशी इतकी वर्षं चांगले वागलो आणि आमच्याच तोंडावर थुंकतोय. फेका याला चाळीबाहेर.
...
सोकाजी त्रिलोकेकर: साला मी भर्डाचा स्टुडंट हाय. घाबरत नाय. हेडक्लार्कला तापवतो साला.. माईंड युअर ओन बिझनेस म्हणून सांगतो.. तोंडावर.. मी आणि बाबलीबाय कधी चाल सोडून गेलो नाय अन जानार पन नाय. पन साला या चालवाल्या कुत्र्यांनी बघा लगेच कसा भुंकायला बिगीन केला. आय टेल यू.. यू आर प्रूव्हिंग माय पॉईंट साला..सांगून ठेवतो साला..
...............................
या प्रकाराला म्हणतात होलसेलमधे उचकवून लायकी काढणे.

माहितगार's picture

26 Nov 2015 - 1:32 pm | माहितगार

अगदी खरंय ! आधी वाचून स्मायली टाकणार होतो तुमच्या शेवटच्या वाक्यामुळे विचार बदलला.

अनिरुद्ध.वैद्य's picture

26 Nov 2015 - 1:38 pm | अनिरुद्ध.वैद्य

हे भारी जमलंय

प्रसाद१९७१'s picture

26 Nov 2015 - 2:53 pm | प्रसाद१९७१

मस्त जमलय गवि. पण शेवट बदला ना जरा.

धाग्याचा केजरु होणार असे दिसते आहे !

असो. त्या आधी माझी भूमिका स्पष्ट करतो.
व्यक्तीश: आमिर खान हा माझा अत्यंत आवडता अभिनेता आहे. त्याच्या कलागुणांवर मी जीव ओवाळून टाकेल.
सामाजिक जीवनात सुद्धा आमिर अत्यंत सेन्सिबल आहे यात वाद नाही. मुळात त्याला सामाजिक प्रश्नांची जाण आहे किंवा ते जाणून घेण्याची इच्छा आहे. त्याच्या वैयक्तिक जीवनात तो काय करतो,कोणाशी लग्न करतो, कोणाशी काडीमोड घेतो याच्याशी मला काडीमात्र घेणेदेणे नाही. फक्त...जियो और जिने दो..!
त्याची बायको त्याच्या घरी त्याच्याशी काय बोलते त्याने मला काहीही फरक पडत नाही जोपर्यन्त्त आमिर ती गोष्ट त्यांच्यापुरती मर्यादित ठेवतोय तोपर्यन्त्त. भर जगासमोर जर आमिर ती गोष्ट मांडत असेल आणि जर वो मेरे मुल्क का मामला असेल प्रतिक्रिया येणारच.

'माझ्या बायकोला या देशात असुरक्षित वाटते. तिला मुलांची काळजी वाटते. आपण दुसऱ्या देशात जायचे का असे ती म्हणाली. पण मी तिला समजावले आणि भारतात आपण सुरक्षित आहो असे सांगितले' असं जर आमिर बोलला असता तर आमच्यासारखे कितीतरी जण त्याची आरती करायला गेले असते.

पण आमिर तसे म्हणाला नाही. कालही पत्रकार परिषद घेऊन स्वत: च्या भूमिकेचे त्याने समर्थन केले. जर आमिर त्याच्या भूमिकेवर ठाम असेल तर मीसुद्धा माझ्या विरोधावर ठाम आहे (अर्थात त्याने आमिरला शष्प फरक पडत नाही हे मला ठाऊक आहे.)

हो पण आमिरचा राग कोणत्यातरी कंपनीवर काढायचा, आमिरला आई-बहिणीवरून शिव्या द्यायच्या हा शुद्ध बावळटपणा आहे.
आमिर तुझ्यावरील प्रेमापोटी सांगतो..तू जे बोललास ते पटण्यासारखं नाही. आणि चारचौघात बोललास हे विसरण्यासारखं नाही.

संदीप डांगे's picture

26 Nov 2015 - 4:33 pm | संदीप डांगे

सहमत. यापेक्षा जास्त सेन्सिबल प्रतिक्रिया या धाग्यावर दिसत नाही.

अंटार्टिकात जाऊन राहायला तुम्हीच सांगितलाय ना ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Nov 2015 - 5:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

आपण दुसऱ्या देशात जायचे का असे ती म्हणाली. पण मी तिला समजावले आणि भारतात आपण सुरक्षित आहो असे सांगितले' असं जर आमिर बोलला असता तर त्याला संध्याकाळी घरी गेल्यावर घराचे दरवाजे बंद झालेले दिसले असते. =)) =))

राग आमिरवरच काढाला आहे कंपनीवर नाही. फक्त तो रोग त्याचापर्यंत पोहोचण्यासठी काही कंपन्याना माध्यम बनल्या आहेत.

उलट या कंपन्यांनी जर लोकांच्या मताचा आदर केला तर त्यांचाच फायदा आहे.

कंपनीने या घटनेकडे संधी म्हणुन पाहील्यास त्यांना ब्रँडीग साठी पुन्हा आमिर कडे जाण्याची गरजच पडणार नाही!

माहितगार's picture

26 Nov 2015 - 8:07 pm | माहितगार

@ चिनार काही वाक्य वेगळ्या क्रमाने मांडतो आहे.

आमिर तुझ्यावरील प्रेमापोटी सांगतो..तू जे बोललास ते पटण्यासारखं नाही. आणि चारचौघात बोललास हे विसरण्यासारखं नाही.

जर आमिर त्याच्या भूमिकेवर ठाम असेल तर मीसुद्धा माझ्या विरोधावर ठाम आहे (अर्थात त्याने आमिरला शष्प फरक पडत नाही हे मला ठाऊक आहे.)

हो पण आमिरचा राग कोणत्यातरी कंपनीवर काढायचा, आमिरला आई-बहिणीवरून शिव्या द्यायच्या हा शुद्ध बावळटपणा आहे.

आता अमिर खानने त्याच मुलाखतीत Sudhir Chaudhary, Editor of ZEE news यांना दिलेल्या उत्तराचा काही अंश कॉपीपेस्ट करतो आहे.

.....Unfortunately, as human beings a lot of us do have double standards. Human beings are complex creatures. I wish and hope we could be like machines and could be calibrated into reacting in appropriate manner each time and who know what is appropriate and who decides what is appropriate. So, the fact is that, these are things that will happen. As you rightly pointed out that it should not happen. Ideally, whether it’s media, whether it’s a politician or whether it’s common people.
.....

माहितगार's picture

26 Nov 2015 - 8:47 pm | माहितगार

@ चिनार, वरचा प्रतिसाद अमिरखानचे शब्द अमिरखानच्याच तोंडावर कसे मारले जाऊ शकतात हे दाखवण्यासाठी दिला. पण कदाचित फर्स्टपोस्ट मध्ये आलेला R Jagannathan यांचा लेख Aamir Khan clearly played to a script, and it does not do him credit तुम्हाला वाचण्यास अधिक आवडेल का ते पहावे.

मन्नतसारख्या किल्ल्यात राहताना किंवा बुलेट
प्रूफ व्ह्यानीटी व्ह्यान मधून फिरताना किंवा सतत
आसपास दहा-दहा अंगरक्षक बाळगताना जर
तुम्हाला या देशात असुरक्षित वाटत असेल तर मेला'
आणि 'रा वन' सारखे अत्याचार भोगताना
प्रेक्षकांच्या सुरक्षेचा कधी विचार केला का रे
तुम्ही दोघांनी?>>>>>>>>>जान ले ली रे इन चित्रपटाने!!!!

पद्माक्षी's picture

26 Nov 2015 - 11:19 pm | पद्माक्षी

निदान यांना कळाले तरी कि लोकांना हा असहिष्णुतेचा मुद्दा मान्यच नाही आहे. बहुसंख्य लोकांना पटलेलाच नाही आहे.

आमिर कसा ढोंगी आहे हे पण लोकांना कळले. त्यामुळेच त्याला चोपला पण जास्त.

याॅर्कर's picture

27 Nov 2015 - 2:53 pm | याॅर्कर

कि माझी बायको किती अडाणी आहे हे आमिरला जगजाहिर करून दाखवायचं होतं.पण लोकांनी किरणपेक्षा आमिरलाच जास्त झापलं.
.
.
.
.
.
बादवे, परफेक्टनिस्ट लोकांची एकापेक्षा अधिक लग्ने कशी होऊ शकतात? वैवाहिक आयुष्यात परफेक्ट नसावा कदाचित.

संदीप डांगे's picture

27 Nov 2015 - 3:01 pm | संदीप डांगे

तुमचे लग्न झालेले नाही म्हणून असं म्हणताय. वैवाहिक आयुष्यात कोणी एक परफेक्ट असल्याने 'जमतं' ह्या अविवाहित लोकांच्या फ्याण्टसी ;-)

याॅर्कर's picture

27 Nov 2015 - 3:27 pm | याॅर्कर

कोणी एक परफेक्ट असून चालत नाही.किंवा नवरा-बायको दोघेही परफेक्ट असले तरीही त्यांचे चांगलं जमेल असही नाही.कारण त्यांचा तथाकथित परफेक्टपणा काही गोष्टींबाबत एकमेकांच्या प्रतिकूल सुद्धा असू शकतो.
.
.
.
.
तूर्तास अजून चार वर्षे तरी सुखी आहे मी.
बाकि, मी अविवाहित आहे हे कचं कललं?

कोण हा आमिर ? असे काय म्हणाला तो ? मला एकु कमि येते ना?

अक्षय१'s picture

28 Nov 2015 - 1:24 pm | अक्षय१

Sagli Chuk mediachi ahe ..amir bolla ek ..te mith masala lavun cchaple..tyamule issue motha kela.. tasech kiran raochi chuk ahe tyat amirla bolnyasarkhe nahiye..

गामा पैलवान's picture

30 Nov 2015 - 8:08 pm | गामा पैलवान

नुकताच दैनिक लोकमतच्या कचेरीवर हल्ला झाला. आयसिसचा पैसा हे व्यंग्यचित्र असहिष्णु आहे म्हणे!

बातमी : http://www.bbc.com/hindi/india/2015/11/151129_maharshtra_lokmat_newspape...
व्यंग्यचित्र इथे बघायला मिळेल : http://www.dnaindia.com/india/report-marathi-daily-attacked-for-pubishin...

-गा.पै.

संदीप डांगे's picture

30 Nov 2015 - 8:23 pm | संदीप डांगे

आता मुस्लिम अडकले.... च्यायला आयसिस तो लोगो वापरून कत्लेआम करतंय ते ह्यांना चालतंय पण पेपरने छापलं तर भावना दुखावतात. आयसिसचा इस्लामशी संबंध नाही पण त्याच्यावर व्यंग केलं तर हल्ला? अब य लोग गये कामसे.

एक एकाच्या पार्श्वभागावर तोच लोगो गरम सळयांनी प्रिंट करावा. घोड्यांवर करत तसा. बसा म्हणा कुरवाळत.

होबासराव's picture

30 Nov 2015 - 8:14 pm | होबासराव

ह्यावर आयबीएन लोकमत चे धडाडिचे पत्रकार निखिल वागळेंचे मत जाणुन घ्यायला आवडेल.

होबासराव's picture

30 Nov 2015 - 8:18 pm | होबासराव

इस बीच, एमआईएम के विधायक इम्तियाज जलील ने कहा है, कि इस कार्टून के कारण मुस्लिम समुदाय की भावनाएं आहत हुई है.

असले लोक जर फक्त धर्माच्या आधारावर निवडुन येणार असतिल आणि त्यांचा धर्म हाच जर फ॑क्त क्वालिफिकेशन असेल तर ....ये तो होना हि था. खरच किति असहिष्णु झालाय भारत :)

होबासराव's picture

30 Nov 2015 - 8:20 pm | होबासराव

इसि बात पर मिपा के सतरंजी चोर अपनी २ डुआयडी मिपा को वापिस करेंगे :)

तुडतुडी's picture

1 Dec 2015 - 2:34 pm | तुडतुडी

असले लोक जर फक्त धर्माच्या आधारावर निवडुन येणार असतिल आणि त्यांचा धर्म हाच जर फ॑क्त क्वालिफिकेशन असेल तर ...

मुसलमान आधी मुसलमान असतो . मग भारतीय , फ्रेंच वगेरे .त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीवरून जाळपोळ , दंगली केल्या तरी ती असहिष्णुता होत नाही . फक्त हिंदूंनी थोडा आवाज चढवला की ती असहिष्णुता होते .

लोकमत फक्त हिंदुन्विरोधी बातम्या छापतं. त्यांचा प्रत्येक संपादकीय लेख हा हिंदुन्विरोधात गरळ ओकणारा असतो . ते फक्त कोन्ग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया छापतात . हिंदूंची बदनामी करणारी बातमी पहिल्या पानावर ठळक अक्षरात येते . पण मुस्लिमांच्या चुका मात्र शेवटच्या पानावर छोट्याश्या बातमीत छापलेल्या असतात .आता समजेल त्यांना मुस्लिम कसे असतात ते . मी त्यांच्या संपादकांना इमेल पाठवलं होतं. पण महाशयांनी उत्तर पाठवायचे कष्ट घेतले नाहीत . आज महाराष्ट्रात सगळ्यात भंगार वृत्तपत्र कुठलं असेल तर लोकमत .

शिवसेनेने काही वर्षांपूर्वी लोकमतच्या कार्यालयात तोडफोड केली होती तेव्हा मी शिवसेनेला शिव्या घातल्या होत्या . पण आत्ता मला सेनेची भूमिका बरोबर होती असं वाटतंय . त्यानंतर ह्या वृत्तपत्राचा खप एकदम घातला . त्यामुळे त्यांना ती चेच्क ची स्कीम चालू करावी लागली . वर्षातून ४ गिफ्ट्स देणार होते . सुरवातीला १ च गिफ्ट दिलंय. बाकीचे ३ त्यांचा बाप देणार का . आता लोकमतला पुन्हा वाईट दिवस येणार .

होबासराव's picture

11 Jan 2016 - 5:52 pm | होबासराव

इतना सन्नाटा क्यो है भाई
आता मालदा (पश्चिम बंगाल) इथे घात्लेल्या धुडगुसा बद्द्ल कोणिच काहि बोलतांना दिसत नाहि ना पुरस्कार वापस करताना. ये गठ्ठा मतदान भि अजिब फंडा है ! तीकडे तो तमाशा चालला होता आणि ईकडे हा सुब्रम्हण्यम स्वामी पुन्हा राम मंदिराचा ईश्यु सुरु करतोय....

विकास's picture

11 Jan 2016 - 11:28 pm | विकास

याला म्हणतात tolerance ! ;)