✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आमिर आणि शाहरुख

च
चिनार यांनी
Wed, 11/25/2015 - 09:31  ·  लेख
लेख
मन्नतसारख्या किल्ल्यात राहताना किंवा बुलेट प्रूफ व्ह्यानीटी व्ह्यान मधून फिरताना किंवा सतत आसपास दहा-दहा अंगरक्षक बाळगताना जर तुम्हाला या देशात असुरक्षित वाटत असेल तर मेला' आणि 'रा वन' सारखे अत्याचार भोगताना प्रेक्षकांच्या सुरक्षेचा कधी विचार केला का रे तुम्ही दोघांनी? आमिर...अरे बायको म्हणतेय म्हणून देश सोडून जायचंय तुला!...नाही म्हणजे खरच देशातली असुरक्षितता हे कारण आहे की बायको पासून सुरक्षा हे कारण आहे ? तिची फारच इच्छा असेल तर इराक,सिरीयाला घेऊन जा तिला एकदा.आपल्याकडे जुन्या काळात हत्तीवरून साखर वाटायचे की नै तसे विमानातून बॉम्बगोळे वाटतात तिथं. हवं तर फ्रांसला घेऊन जा. आयफेल टॉवर शेजारची जागा फार स्वस्तात मिळतेय म्हणे आजकाल! फूटबॉलची मैदानं पाडून गावागावात आता लष्करी छावण्या बांधणार आहेत म्हणे... नाहीतर अमेरिकेत जाऊन ये. तिथले कस्टमवाले शाहरुखच्या फार ओळखीचे आहेत ना..दरवेळी आस्थेने चौकशी करतात त्याची. 'माय नेम इज खान अँड आय एम नॉट अ टेररिस्ट' हा डायलॉग ऐकल्याशिवाय सोडतच नाही त्याला. तसं तर पाकिस्तानात जायला सुद्धा काही हरकत नाहीये पण ते मुहाजिर वगैरे लफडं संभाळून घे बाबा. किरणवहिनींना मुंबईत मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते ना...पाकिस्तानात तर झेड सिक्युरिटी दिलीये म्हणे शाळांना आजकाल. मागल्यावर्षी नाही का दीडशे निष्पाप मुलांना ठार मारण्याची किरकोळ घटना घडली तिथे ! बाकी कशाकश्शाची म्हणून चिंता नाहीये पाकिस्तानात..ऑस्ट्रेलीयात अधूनमधून भारतीयांवर गोळीबार होत असतो नाहीतर तिथे जा असं सुचवलं असतं.. नाही तर एक काम करा ना...अंटार्क्टिका खंडातच जाऊन राहा...एकदम सुरक्षित !!! http://chinarsjoshi.blogspot.in/
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
31209 वाचन

💬 प्रतिसाद (216)

प्रतिक्रिया

.

मोगा
Wed, 11/25/2015 - 18:58 नवीन
जे मला देशद्रोही म्हणतात, त्यांना मला सांगायचं आहे की, भारतीय असल्याचा मला अभिमान आहे आणि या वस्तूस्थितीसाठी मला कोणाच्याही परवानगीची किंवा प्रमाणपत्राची आवश्‍यकता नाही.
  • Log in or register to post comments

सहमत

मोगा
Wed, 11/25/2015 - 19:01 नवीन
मा. जनाब आमीरखानच्या या वाक्याशी सहमत. खुदा उनको खुश रखे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा

खुदा आपको (म्हणजे ह्या सतराव्या आय डि ला) जल्द हि दोजख ले जाये

होबासराव
Wed, 11/25/2015 - 19:57 नवीन
खुदा आपको (म्हणजे ह्या सतराव्या आय डि ला) जल्द हि दोजख ले जाये, नाहि तर मिपाचे खुदा (संम) को ये करना पडेगा
  • Log in or register to post comments

कोण आमीर? कोण शारुक? धन्यवाद.

रेवती
Wed, 11/25/2015 - 21:04 नवीन
कोण आमीर? कोण शारुक? धन्यवाद.
  • Log in or register to post comments

+१

मम्बाजी सर्वज्ञ
Wed, 11/25/2015 - 21:26 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

असहिष्णुता वाढली म्हणजे नक्की काय झालंय?

ट्रेड मार्क
Wed, 11/25/2015 - 22:26 नवीन
भारतात गल्लोगल्ली खून पडत आहेत का बलात्कार होत आहेत? का अल्पसंख्याकांना घराच्या बाहेर पडायची चोरी झालीये? का या High profile मंडळींना रोज धमक्यांचे फोन येतात, का तथाकथित हिंदू तालिबानचे लोक यांच्या घराबाहेर धिंगाणा घालतात? नक्की कसली भीती वाटतेय? पेपर उघडायची पण भीती वाटते यांना कुठले पेपर वाचतात कोण जाणे, सिरीया, इराण, फ्रान्स किंवा पाकिस्तानचे पेपर वाचतात बहुतेक. सोशल मेडिया वर लोक बोलतात ते आवडत नाही म्हणून भीती वाटते? फक्त लोक बोलतात म्हणून अख्खा भारत देश असहिष्णू झाला? बहुतेक बीफ खायला मिळत नाही म्हणून अस्वस्थ झाले असावेत. मेडियाची पण चूक आहेच. संदर्भ सोडून फक्त एक शब्द किंवा एक वाक्य दाखवत राहतात, शीर्षक काय देतात आणी बातमी काय देतात काही ताळतंत्र नाही. आजच म. टा. मध्ये बातमी आहे शीर्षक - ए. आर. रेहमाननी पण आमिरला पाठींबा दिला. पण खाली बातमीत त्यानी रझा अकादमीनी त्याच्यावर फतवा काढला ते सांगितलं आणी समाजाच्या त्या वर्गाकडून असहिष्णुता वाढली असं म्हणाला. सगळा मूर्खपणा चालला आहे. जगापुढे भारताची प्रतिमा खराब करण्याचा डाव आहे. आधीच पाश्चात्य लोकांना वाटतं आपण फार मागासलेले आहोत त्यात आणि ह्या फालतू गोष्टी ऐकून काय होणार दुसरं.
  • Log in or register to post comments

..

मोगा
Wed, 11/25/2015 - 22:51 नवीन
नुसता फ्लायओव्हर मर्जीविरूध्द बांधला तर देश सोडून दुबईत जाऊन राहीन म्हणणारे "देशद्रोही" मधे येत नाही वाटते तेव्हा जगात देशाची प्रतिष्ठा वाढते की काय ! ..... अरे हो ! ईसरलोच की ! साहेब , बाजपेयी , मोदीजी यांच्यशी जवळीक असलेल्या व्यक्ती देशद्रोही कशा असतील ?
  • Log in or register to post comments

ये क्या हाल बनाये रखा है अपना

मम्बाजी सर्वज्ञ
Wed, 11/25/2015 - 22:56 नवीन
ये क्या हाल बनाये रखा है अपना. कुछ लेते क्यो नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा

:) तुमची ( स)मरणशक्ती फारच दगा देते काय

चैतन्य ईन्या
Wed, 11/25/2015 - 22:59 नवीन
:) तुमची ( स)मरणशक्ती फारच दगा देते काय ?? त्या वर लोकांनी त्यांना बाहेर जा असे सांगितले होते. आठवते का? म्हणा तुम्ही शहजोगे आहात त्यामुळे असे काही आठवणार नाही तुम्हाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा

.

मोगा
गुरुवार, 11/26/2015 - 19:05 नवीन
परदेशात जाईन असे नुसते बोलून बसलेला आमीर आणि परदेशात जाईन असे धमकावून फ्लायओवरचे काम बंद पाडून विकास कार्यात खीळ घातलेली कोकिलाबेन यातलं नेमकं देशप्रेमी कोण , द्रोही कोण , तटस्थ कोण हे समजेना झालय. जरा सांगाल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य ईन्या

लता आणि आमीरची तुलना?

बोका-ए-आझम
गुरुवार, 11/26/2015 - 19:59 नवीन
फ्लाय ओव्हर लता मंगेशकरांच्या घरासमोरून जाणार होता. आणि तिथल्या ९०% नागरिकांचं तिथे फ्लाय ओव्हर नको असं म्हणणं होतं. आणि त्यात सर्वधर्मीय लोक सामील होते. पारशीही होते, जे अल्पसंख्यांकांमध्येच येतात. त्यांनी सरकारला जे पिटिशन दिलं त्याला सरकारने वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या म्हणून तिथल्या रहिवाशांच्या मदतीसाठी लता मंगेशकर आणि आशा भोसले या पुढे आल्या. त्यांच्या हस्तक्षेपामुळे सरकारने निर्णय बदलला, जे करायची सरकारला काहीही गरज नव्हती. पण सरकारने तरीही जर लताबाईंचं म्हणणं ऐकलं असेल तर ती सरकारची चूक आहे. ते म्हणू शकत होते की गेलात उडत. आणि देशद्रोह याची तुमच्या म्हणण्यानुसार व्याख्या मान्य करणं आमच्यावर बंधनकारक नाही. आणि आमीरला देशद्रोही असं कुणीही म्हटलेलं नाही. त्याच्याविरूध्द F.I.R. दाखल झालाय तो फालतूपणा आहे. तुम्हीही आज लताबाईंविरुद्ध F.I.R. करु शकता. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा

लता आणि आमीरची तुलना?

बोका-ए-आझम
गुरुवार, 11/26/2015 - 20:00 नवीन
फ्लाय ओव्हर लता मंगेशकरांच्या घरासमोरून जाणार होता. आणि तिथल्या ९०% नागरिकांचं तिथे फ्लाय ओव्हर नको असं म्हणणं होतं. आणि त्यात सर्वधर्मीय लोक सामील होते. पारशीही होते, जे अल्पसंख्यांकांमध्येच येतात. त्यांनी सरकारला जे पिटिशन दिलं त्याला सरकारने वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या म्हणून तिथल्या रहिवाशांच्या मदतीसाठी लता मंगेशकर आणि आशा भोसले या पुढे आल्या. त्यांच्या हस्तक्षेपामुळे सरकारने निर्णय बदलला, जे करायची सरकारला काहीही गरज नव्हती. पण सरकारने तरीही जर लताबाईंचं म्हणणं ऐकलं असेल तर ती सरकारची चूक आहे. ते म्हणू शकत होते की गेलात उडत. आणि देशद्रोह याची तुमच्या म्हणण्यानुसार व्याख्या मान्य करणं आमच्यावर बंधनकारक नाही. आणि आमीरला देशद्रोही असं कुणीही म्हटलेलं नाही. त्याच्याविरूध्द F.I.R. दाखल झालाय तो फालतूपणा आहे. तुम्हीही आज लताबाईंविरुद्ध F.I.R. करु शकता. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा

...

मोगा
गुरुवार, 11/26/2015 - 22:19 नवीन
ज्याच्या घरासमोरून फ्लाय ओवर जातो त्याला विचारून फ्लाय ओवर व्हायला लागले तर कुठलाच फ्लाय ओवर होणार नाही. फ्लाय ओवरच्या वेळी पूर्ण ट्रॅफिकला कितपत सोय होते ते सरकार बघते. ..... आमीरखानचे वक्तव्य हे नुसते वक्तव्य होते , पण फ्लायओवरबाबत धमकीचा सूर लावून इतरांच्या सोयीकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या सामाजिक प्रतिष्ठेचा वापर केला गेला. ....... गीर्वाणवाणी उर्फ संस्कृत भाषेत एक न्याय दिलेला आहे ... पात्र श्वान न्याय ( नेमके नाव माहीत नाही. हे नाव मी आतापुरते वापरतोय. ) हा न्याय असे बोलतो की मनुष्य डिप्लोमॅटिक असतो. एका लहान पात्रात कुत्र्याने तोंड घातले तर त्या पात्रातील सर्वच अन्न फेकून देतात. पण पात्र अगदी मोठे असेल तर कुत्रे स्पर्शलेले थोडेच अन्न टाकून उरलेले सर्व शुद्ध मानावे. ..... कोकिळाबाई , मुन्नभाई ही मोठी पात्रे ... म्हणून दोषास्पद वाक्ये वगळून उर्वरीत व्यक्ती शुद्ध . आमीरखान , रहमान इ ही लहान पात्रे ... म्हणून ते , त्यांचे घर , त्यांचा धर्म , त्यांचे चित्रपट .... सर्वच टाकावू ! .... संस्कृत भाषेचा व त्यातील सुसंस्कृत न्यायाचा विजय असो. !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

तुम्ही करा एफ.आय.आर. फाईल लताबाईंवर!

बोका-ए-आझम
Fri, 11/27/2015 - 00:30 नवीन
थांबवलंय का कोणी ? आणि ९०% लोकांना जर फ्लाय ओव्हर नको असेल तर तो न बांधणं हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून बरोबरच आहे. शिवाय लताबाईंपुढे झुकायची तत्कालीन सरकारला काय गरज होती? पण तसं झालं. एकट्या लता मंगेशकरांनी त्या फ्लाय ओव्हरला आक्षेप घेतला नव्हता. आक्षेप घेणाऱ्यांंमध्ये नगररचना तज्ञ चंद्रशेखर प्रभू, वास्तुतज्ञ जयंत टिपणीस, हफीज काँट्रॅक्टर आणि चार्ल्स कोरिया यासारख्या मान्यवरांचा (ज्यांना इन्फ्रास्ट्रक्चर या विषयात काही कळतं) समावेश होता. हे तुम्हाला माहित नसेलच म्हणा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा

धमकी

प्रदीप
Fri, 11/27/2015 - 19:36 नवीन
लताबाईंनी दिलेली नव्हती. आशाबाईंनी तसे म्हणाल्याचे आठवते. बाकी चालू दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

हा माणूस काँट्रॅडिक्टरी

पुष्करिणी
Wed, 11/25/2015 - 22:54 नवीन
हा माणूस काँट्रॅडिक्टरी विधानं करण्यात अतिशय पटाइत आहे, देल्ही बेली प्र्मोट करतो आणि एआय्बी रोस्टला विरोध करतो. सतत अंगरक्षक घेउन फिरणार्या बाईला जर असुरक्षित वाटत असेल तर तिला मानसोपचाराची गरज नये, अजिबात वेळ दवडू नये.
  • Log in or register to post comments

हेच म्हणते. कै नै. सगळे नीट

रेवती
गुरुवार, 11/26/2015 - 00:35 नवीन
हेच म्हणते. कै नै. सगळे नीट चालले आहे म्हणून सूख दुखतेय. त्याचा इलाज बहुतेक दुसर्‍या देशात असेल तर त्याला आपण काय करणार? हे वक्तव्य किरणचे आमीरशी लगीन होण्याऐवजी कोण्या कमी पैसेवाल्याशी झाले असते तर तिला परदेशी जाऊन रहायचे डोहाळे लागले असते का? आमीरही बायकोचे म्हणणे कुठल्याशा समारंभात सांगतो म्हणजे त्याला आता परदेश परवडणेबल झालाय. भारतातील प्रोजेक्टस येऊन जाऊन करू असे दिसतेय. तसे नसते तर "क्या बात कर रही हो क क क किरन! यहाँ नही तो कहाँ जायेंगे? पैसे कौन कमायेगा. अब चूप करो. जाओ, मेरेलिये दाल रोटी बनाओ" अशी ड्वायलॉगबाजी झाली असती ना! ;) आणि त्याला जर दुसर्‍या देशात रहायचा (मराठी) परवाना मिळाला असेल व जाणे जोपर्यंत कायदेशीर आहे तोपर्यंत त्याला कोणीच काही म्हणू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

तशीही किरण राव तेलुगु

रेवती
गुरुवार, 11/26/2015 - 00:38 नवीन
तशीही किरण राव तेलुगु घराण्याशी संबंधित असल्याने परदेशी जाण्याचा तिला हक्कच आहे असेही म्हणते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हायला हा गुल्टी अँगल लक्षातच

पुष्करिणी
गुरुवार, 11/26/2015 - 15:38 नवीन
हायला हा गुल्टी अँगल लक्षातच आला नै...किरणबाईसाहेबांची मानसिक कुचंबणा आत्ता कुठे कळली मला. त्यांना फारच असहिष्णुता सहन करायला लागतेय. नवर्‍याची परिस्थिती ही अशी, बाहेरचे सिनेमे इकडे आणून कॉपी मारायचे आणि पोटभरायचं.इकडून तिकडे( म्ह्ण्जे भारत सोडून कुठही ) समजा गेलं तरी पोटापाण्याचं काय..तो तरी काय करणतो; गांजलाय बिचारा बायकोच्या भुण्भुणीला. आता कुणाकडं तरी मन मोकळं करणारच की, बिचारा बोलला त्या पत्रकाराकडे..सहानुभूती दाखवायचं सोडून किती तो त्रास देतायत त्याला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मला आता रावबाईंची काळजी

पुष्करिणी
गुरुवार, 11/26/2015 - 15:52 नवीन
मला आता रावबाईंची काळजी वाटायला लागलीये, त्यांचा दीरानं ( तोच तो 'मेला' मधला त्यालाही paranoid schizophrenia होता ) अमिरविरूद्ध बळजबरीनं नको ती औषध देण्याबद्दल तक्रार केली होती आणि घरातून पळून गेला होता. त्यामुळे राव बाईंच्या माहेरच्यांनी किंवा महिला संघटनांनी रावबाईंकडे ताबडतोब लक्ष द्यावं ही इनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

भेकडपणा

हुप्प्या
गुरुवार, 11/26/2015 - 01:18 नवीन
मला मोदी सत्तेवर आलेले आवडलेले नाहीत असे म्हणायचे धाडस नाही म्हणून मग असहिष्णूता वगैरे ढोंगी आणि पोकळ सबबी सांगून देशाची हालत खराब असल्याची बोंब मारणे चालू आहे. त्यातही बायको असे म्हणाली मी नाही अशी एक ढाल आहेच! आपल्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन अक्षरशः खोर्‍याने पैसा मिळवणार्‍या ह्या लोकांना आता हा पूर्ण देश असहिष्णू वाटू लागला. ज्या थाळीत खाल्ले त्यातच थुंकण्याचा हा प्रकार आहे. काही वेळा आपण आपल्या धर्माकरता पुरेसे काही करत नाही आहोत. पोटापाण्यासाठी जे काही करतो ते इस्लाम हराम समजतो अशी काही अपराधी भावना असल्यामुळे कदाचित असा शॉर्टकट घेऊन आपल्या "पापाची" भरपाई करण्याचा हा प्रयत्न असावा. कदाचित. एक उदाहरणः बँकेत काम करणारे धार्मिक मुस्लिम लोक अशा अपराधी भावनेने पछाडलेले असतात. व्याज ही इस्लामच्या लेखी पूर्ण हराम असणारी गोष्ट जिच्यावर आपण आपण उदरनिर्वाह केला ह्याची एक टोचणी ह्या लोकांना असते. मग त्यातून उतराई होण्याकरता अतिरेकी दानधर्म करून आपले पाप धुवायचा हे लोक प्रयत्न करतात. कारण अंतर्मुख होऊन "खरोखरच व्याज घेणे आणि देणे इतके वाईट आहे का?" असा विचार करण्याची त्यांची धमक नसते.
  • Log in or register to post comments

मला मोदी सत्तेवर आलेले

शलभ
गुरुवार, 11/26/2015 - 09:34 नवीन
मला मोदी सत्तेवर आलेले आवडलेले नाहीत असे म्हणायचे धाडस नाही म्हणून मग असहिष्णूता वगैरे ढोंगी आणि पोकळ सबबी सांगून देशाची हालत खराब असल्याची बोंब मारणे चालू आहे.
+११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

सहमत आहे

गॅरी ट्रुमन
गुरुवार, 11/26/2015 - 11:14 नवीन
मला मोदी सत्तेवर आलेले आवडलेले नाहीत असे म्हणायचे धाडस नाही म्हणून मग असहिष्णूता वगैरे ढोंगी आणि पोकळ सबबी सांगून देशाची हालत खराब असल्याची बोंब मारणे चालू आहे.
सहमत आहे. असहिष्णुता-असहिष्णुता म्हणून कोल्हेकुई करणारे सगळेच लोक याच गटात मोडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

एका शिख व्यक्तीचे वक्तव्य

विकास
गुरुवार, 11/26/2015 - 01:45 नवीन
एका शिख व्यक्तीचे वक्तव्य - कुठल्याही पद्धतीचा आक्रस्ताळेपणा न करता केलेले खालील वक्तव्य जरूर पहा...
  • Log in or register to post comments

भारी संदेश आहे.

रेवती
गुरुवार, 11/26/2015 - 02:02 नवीन
भारी संदेश आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

जबरदस्त....

यश राज
गुरुवार, 11/26/2015 - 02:31 नवीन
सुन्दर संदेश .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सणसणित चपराक. अगदी मुद्देसूद

संदीप डांगे
गुरुवार, 11/26/2015 - 03:05 नवीन
सणसणित चपराक. अगदी मुद्देसूद विवेचन. (फक्त ते 'स्नॅपडीलचा बहिष्कार' नावाचं निर्बुद्ध प्रकरण सोडलं तर....)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

स्नॅपडीलचा बहिष्कार

जे.जे.
गुरुवार, 11/26/2015 - 06:03 नवीन
स्नॅपडील हि भारतिय कंपनी जरी असली तरी त्यांचे सगळे प्रॉड्क्टस काही भारतिय नाहीत. थोडक्यात 'मेक इन ईन्डीया शी काही संम्बध नाही. आणी स्नॅपडील ला स्वतः ची काळजी असल्यास त्यान्नी आंंमिर ला ब्रॅन अ‍ॅम्बेसेर्डर ठेवु नये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

@विकासराव

मदनबाण
गुरुवार, 11/26/2015 - 07:05 नवीन
@विकासराव हा संदेश इथे शेअर केल्या बद्धल धन्यवाद. प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाच्या मनातली भावना अगदी योग्य पद्धतीने सांगितली गेली आहे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- में कुडी अनजानी हुं... ;) :-Zor
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

बाणाशी

नाखु
गुरुवार, 11/26/2015 - 09:23 नवीन
तंतोतंत सहमत. एकच व्यक्ती खुपत असल्याने हे चालू आहे हे ढळढळीत सत्य आहे आणि त्यामुळेच खरोखरीचा अन्याय असेल तर त्याला विनाकारण राजकीय रंग दिला जाऊ शकतो हा मोठा धोका आहे. उदा: एखाद्याने गरीब आणि "गावी जायला पैसे नाहीत" असे सांगीतले म्हणून तुम्ही मदत केली आणि तो इसम बोगस्,तोतया निघाला तर पुढच्या वेळी खरोखरच्या गरजवंताला मदत केली जाणार नाही. त्याच प्रमाणे पोटशूळ असल्यासारखे हस्तीदंती,पेज ३ रथींना, भाडोत्री-लाभार्थी साहीत्यीकांना हाताशी धरून चिखल फेक/देशाची प्रतीमा भंजन करण्यापेक्षा जिथे जिथे सरकार चुकते,किंवा फसलेल्या,रूतलेल्या योजनांचा पंचनामा करा,मोदी सरकार दिलेल्या अश्वासनाशी विपरीत निर्णयाची+अंंमल बजावणीची चिरफाड करा. तुमचा मुद्दा रास्त आणि ठोस असेल तर वेगळ्या टी आर पी ची गरज नाही. पण जागतीक पातळीवर आप्ल्याच विनाकारण चिखल्फेक करण्याचा करंटेपणा करू नये. (याचा अर्थ सर्व आलबेल आहे असे नाही पण रंगवीले जाते तितके भयाण चित्रही नाही हे नक्की) दुख्ते फक्त खुप्ते नसलेला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

सहमत

शलभ
गुरुवार, 11/26/2015 - 09:35 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मस्त, एक नंबर

sagarpdy
गुरुवार, 11/26/2015 - 10:09 नवीन
मस्त, एक नंबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

शांतपणे व मुद्देसूद संदेश !

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 11/26/2015 - 11:05 नवीन
शांतपणे दिलेला मुद्देसूद संदेश ! अर्थात व्यक्तीगत हितसंबांधांवर चालणे-बोलणे असणार्‍यांना तोही आवडणार नाहीच म्हणा ! :) या क्लिपच्या नंतर येणारी क्लीपही रोचक आहे ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

टाटा स्काय ला का विरोध नाही?

अत्रे
गुरुवार, 11/26/2015 - 07:53 नवीन
टाटा स्काय ला का विरोध नाही? टीव्ही सोडणं जमत नाही म्हणून? :D
  • Log in or register to post comments

करा कि... कोण नको म्हणतय...

जे.जे.
गुरुवार, 11/26/2015 - 08:01 नवीन
करा कि. कोण नको म्हणतय. तुम्हाला जसा जमेल तस करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे

आम्ही videocon घेतला :)

sagarpdy
गुरुवार, 11/26/2015 - 10:10 नवीन
आम्ही videocon घेतला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे

वन इंडीया डॉट कॉमच्या या

माहितगार
गुरुवार, 11/26/2015 - 09:12 नवीन
वन इंडीया डॉट कॉमच्या या वृत्तात अमिरच्या मोदींविषयी असलेल्या जळफळाट आणि भरतंचा साद्यंत इतिहास दिसतो आहे. एकुण अमिरची भूमिका राजकीय अधिक वाटते त्याची भूमिका राजकीय आहे हे त्याने एकदा स्विकारले तर तो काय म्हणाला हे लोक जास्त मनावर घेणार नाहीत.
  • Log in or register to post comments

nice

amol gawali
गुरुवार, 11/26/2015 - 09:38 नवीन
nice
  • Log in or register to post comments

..

मोगा
गुरुवार, 11/26/2015 - 10:24 नवीन
http://drabhiram.blogspot.in/2015/11/blog-post_25.html हे वाचून आनंद झाला
  • Log in or register to post comments

..

मोगा
गुरुवार, 11/26/2015 - 10:25 नवीन
http://drabhiram.blogspot.in/2015/11/blog-post_25.html हे वाचून आनंद झाला
  • Log in or register to post comments

बटाट्याच्या चाळीच्या

गवि
गुरुवार, 11/26/2015 - 13:02 नवीन
बटाट्याच्या चाळीच्या भाडेकरुंची वार्षिक बैठक (उदाहरणार्थच आहे) सोकाजीनाना त्रिलोकेकर: साला या चालीत नुसती घाण साला. लोक पन रॉटन साला. नो कल्चर. साला बाबलीबाई म्हणत होती की असल्या उकिरड्यात राहण्यापेक्षा चाळ सोडून जाऊया. बाबलीबाई ट्रू बोलते साला.. आमच्या कम्युनिटीच्या पोरांना या घाटी लोकांच्यात फ्यूचरच नाय अन सेफ्टी पन नाय. डर्टी फॅमिलीज साला एकजात. नुस्ता भांडन करते अन बेगरसारखी घाणेरडी राहणारी पब्लिक. साला मी पन म्हंटला चाल सोडायला पायजे साला. एच्च मंगेशराव: ओ. तुम्हाला काय त्रास झाला हो चाळीकडून आजपर्यंत. चाळीने तुम्हाला सेक्रेटरीपण केलेलं की गेल्यावर्षी. अण्णा पाबशे: एवढा त्रास आहे तर बिर्‍हाड आवरा आणि जावा मफतलाल पार्कात राहायला. आचार्य बाबा: आपण त्रिलोकेकरांची मनःस्थिती समजून घेतली पाहिजे. ते आपले बांधवच आहेत. त्यांनी चाळीच्या सर्व कार्यक्रमांसाठी किती कष्ट घेतले आहेत ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. काशिनाथ नाडकर्णी: कसले कष्ट केलंतीत हो या त्रिलोकेकरान्..?? खजिनदार होण्यासाठी धडपड नुसती.. आणि आम्ही कष्ट नाय केले तर काय झोपा काढल्या? जनोबा रेगे: ए त्रिलोकेकर. गप रे. वशाड मेलो. गुप्ते: खेचा रे त्याला. याच्याशी इतकी वर्षं चांगले वागलो आणि आमच्याच तोंडावर थुंकतोय. फेका याला चाळीबाहेर. ... सोकाजी त्रिलोकेकर: साला मी भर्डाचा स्टुडंट हाय. घाबरत नाय. हेडक्लार्कला तापवतो साला.. माईंड युअर ओन बिझनेस म्हणून सांगतो.. तोंडावर.. मी आणि बाबलीबाय कधी चाल सोडून गेलो नाय अन जानार पन नाय. पन साला या चालवाल्या कुत्र्यांनी बघा लगेच कसा भुंकायला बिगीन केला. आय टेल यू.. यू आर प्रूव्हिंग माय पॉईंट साला..सांगून ठेवतो साला.. ............................... या प्रकाराला म्हणतात होलसेलमधे उचकवून लायकी काढणे.
  • Log in or register to post comments

अगदी खरंय ! आधी वाचून

माहितगार
गुरुवार, 11/26/2015 - 13:32 नवीन
अगदी खरंय ! आधी वाचून स्मायली टाकणार होतो तुमच्या शेवटच्या वाक्यामुळे विचार बदलला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

:D

अनिरुद्ध.वैद्य
गुरुवार, 11/26/2015 - 13:38 नवीन
हे भारी जमलंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मस्त जमलय गवि. पण शेवट बदला

प्रसाद१९७१
गुरुवार, 11/26/2015 - 14:53 नवीन
मस्त जमलय गवि. पण शेवट बदला ना जरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

धाग्याचा केजरु होणार असे

चिनार
गुरुवार, 11/26/2015 - 16:13 नवीन
धाग्याचा केजरु होणार असे दिसते आहे ! असो. त्या आधी माझी भूमिका स्पष्ट करतो. व्यक्तीश: आमिर खान हा माझा अत्यंत आवडता अभिनेता आहे. त्याच्या कलागुणांवर मी जीव ओवाळून टाकेल. सामाजिक जीवनात सुद्धा आमिर अत्यंत सेन्सिबल आहे यात वाद नाही. मुळात त्याला सामाजिक प्रश्नांची जाण आहे किंवा ते जाणून घेण्याची इच्छा आहे. त्याच्या वैयक्तिक जीवनात तो काय करतो,कोणाशी लग्न करतो, कोणाशी काडीमोड घेतो याच्याशी मला काडीमात्र घेणेदेणे नाही. फक्त...जियो और जिने दो..! त्याची बायको त्याच्या घरी त्याच्याशी काय बोलते त्याने मला काहीही फरक पडत नाही जोपर्यन्त्त आमिर ती गोष्ट त्यांच्यापुरती मर्यादित ठेवतोय तोपर्यन्त्त. भर जगासमोर जर आमिर ती गोष्ट मांडत असेल आणि जर वो मेरे मुल्क का मामला असेल प्रतिक्रिया येणारच. 'माझ्या बायकोला या देशात असुरक्षित वाटते. तिला मुलांची काळजी वाटते. आपण दुसऱ्या देशात जायचे का असे ती म्हणाली. पण मी तिला समजावले आणि भारतात आपण सुरक्षित आहो असे सांगितले' असं जर आमिर बोलला असता तर आमच्यासारखे कितीतरी जण त्याची आरती करायला गेले असते. पण आमिर तसे म्हणाला नाही. कालही पत्रकार परिषद घेऊन स्वत: च्या भूमिकेचे त्याने समर्थन केले. जर आमिर त्याच्या भूमिकेवर ठाम असेल तर मीसुद्धा माझ्या विरोधावर ठाम आहे (अर्थात त्याने आमिरला शष्प फरक पडत नाही हे मला ठाऊक आहे.) हो पण आमिरचा राग कोणत्यातरी कंपनीवर काढायचा, आमिरला आई-बहिणीवरून शिव्या द्यायच्या हा शुद्ध बावळटपणा आहे. आमिर तुझ्यावरील प्रेमापोटी सांगतो..तू जे बोललास ते पटण्यासारखं नाही. आणि चारचौघात बोललास हे विसरण्यासारखं नाही.
  • Log in or register to post comments

सहमत. यापेक्षा जास्त सेन्सिबल

संदीप डांगे
गुरुवार, 11/26/2015 - 16:33 नवीन
सहमत. यापेक्षा जास्त सेन्सिबल प्रतिक्रिया या धाग्यावर दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

अंटार्टिकात जाऊन राहायला

sagarpdy
गुरुवार, 11/26/2015 - 16:38 नवीन
अंटार्टिकात जाऊन राहायला तुम्हीच सांगितलाय ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

आपण दुसऱ्या देशात जायचे का

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 11/26/2015 - 17:39 नवीन
आपण दुसऱ्या देशात जायचे का असे ती म्हणाली. पण मी तिला समजावले आणि भारतात आपण सुरक्षित आहो असे सांगितले' असं जर आमिर बोलला असता तर त्याला संध्याकाळी घरी गेल्यावर घराचे दरवाजे बंद झालेले दिसले असते. =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

हो पण आमिरचा राग कोणत्यातरी कंपनीवर काढायचा!

नया है वह
गुरुवार, 11/26/2015 - 19:17 नवीन
राग आमिरवरच काढाला आहे कंपनीवर नाही. फक्त तो रोग त्याचापर्यंत पोहोचण्यासठी काही कंपन्याना माध्यम बनल्या आहेत. उलट या कंपन्यांनी जर लोकांच्या मताचा आदर केला तर त्यांचाच फायदा आहे. कंपनीने या घटनेकडे संधी म्हणुन पाहील्यास त्यांना ब्रँडीग साठी पुन्हा आमिर कडे जाण्याची गरजच पडणार नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

@ चिनार काही वाक्य वेगळ्या

माहितगार
गुरुवार, 11/26/2015 - 20:07 नवीन
@ चिनार काही वाक्य वेगळ्या क्रमाने मांडतो आहे.
आमिर तुझ्यावरील प्रेमापोटी सांगतो..तू जे बोललास ते पटण्यासारखं नाही. आणि चारचौघात बोललास हे विसरण्यासारखं नाही.
जर आमिर त्याच्या भूमिकेवर ठाम असेल तर मीसुद्धा माझ्या विरोधावर ठाम आहे (अर्थात त्याने आमिरला शष्प फरक पडत नाही हे मला ठाऊक आहे.) हो पण आमिरचा राग कोणत्यातरी कंपनीवर काढायचा, आमिरला आई-बहिणीवरून शिव्या द्यायच्या हा शुद्ध बावळटपणा आहे.
आता अमिर खानने त्याच मुलाखतीत Sudhir Chaudhary, Editor of ZEE news यांना दिलेल्या उत्तराचा काही अंश कॉपीपेस्ट करतो आहे.
.....Unfortunately, as human beings a lot of us do have double standards. Human beings are complex creatures. I wish and hope we could be like machines and could be calibrated into reacting in appropriate manner each time and who know what is appropriate and who decides what is appropriate. So, the fact is that, these are things that will happen. As you rightly pointed out that it should not happen. Ideally, whether it’s media, whether it’s a politician or whether it’s common people. .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा