कुणाच्यापुढे कोण झुकले बघा रे

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
21 Oct 2015 - 4:41 pm

कुणाच्यापुढे कोण झुकले बघा रे
कुणा बोलुनी कोण चुकले बघा रे

कुणी होत वाचाळ थयथय उगाच
कुणी शांत राहून ठेवीत जाच

कसे सिद्ध होईल श्रेष्ठत्व त्याचे
असे सैन्य नाठाळ ज्या राजियाचे

कृतीतून ठरते इथे कोण वाघ
मुखे बोंबलोनी करी काय सांग

एकीत असते रहस्य यशाचे
तुम्हाला महत्व न पटले अशाचे

तुम्ही स्वाभिमानात धन्य जहाला
तिथे एक चेहरा भुलवतो जगाला

असे वेळ हाती न वागा असे रे
कशाला करावे स्वतःचे हसे रे

इथे संधी सर्वांस आहे समान
भूतापरी हो जपा वर्तमान

जसा जन्मतः वाघ ना वाघ झाला
करोनीच हो दाखवा या जगाला

-अपूर्व ओक
ब्लॉग दुवा हा

भावकविताशांतरसकवितासमाजराजकारण

प्रतिक्रिया

याॅर्कर's picture

21 Oct 2015 - 4:56 pm | याॅर्कर

.

कंजूस's picture

21 Oct 2015 - 5:00 pm | कंजूस

अगदी योग्य वेळी.

द-बाहुबली's picture

21 Oct 2015 - 5:22 pm | द-बाहुबली

अब जाने भी दो...! म्हणतात ना सर्वात जवळचा मित्रच सगळ्यात धोकादायक शत्रु बनु शकतो विशेषतः जेंव्हा तो जास्त बलवान बनुन पलटतो तेंव्हा अशी अवस्था होतच असते.
:(
:)

पगला गजोधर's picture

21 Oct 2015 - 5:45 pm | पगला गजोधर

मार्मिक कविता म्हणू काय ?

तर्राट जोकर's picture

21 Oct 2015 - 6:00 pm | तर्राट जोकर

अपूर्व कविता आहे..... अगदी योग्य शब्दात. पण शब्दांची भाषा कळत नाही म्हणे तिकडे....!

भूमिपुत्रांच्या लढ्याला भुमिपुत्रांसोबत भूमीतच सोडून गेलेल्या (कट्टर) सामान्य शिवसैनिकांच्या प्रतिसादाच्या अपेक्षेत........

प्राची अश्विनी's picture

21 Oct 2015 - 6:22 pm | प्राची अश्विनी

समयोचित!

मीउमेश's picture

21 Oct 2015 - 7:02 pm | मीउमेश

खरंच सुंदर , योग्य शब्द रचना आणि अचूक भाष्य

मांत्रिक's picture

21 Oct 2015 - 7:39 pm | मांत्रिक

सहमत!

कविता१९७८'s picture

21 Oct 2015 - 11:20 pm | कविता१९७८

छान कविता

बाजीगर's picture

22 Oct 2015 - 3:15 am | बाजीगर

कुणाचे पद कोण हुकले बघा रे
कुणाचे खाते कोण मुकले बघा रे
कुणाचे बोलून तोंड सुकले बघा रे
कुणाचे कुठे काय दुखले बघा रे

चौथा कोनाडा's picture

23 Oct 2015 - 7:23 pm | चौथा कोनाडा

हे मस्तच !
:-)

शिव कन्या's picture

22 Oct 2015 - 5:35 am | शिव कन्या

कुणी शांत राहून ठेवीत जाच.....
खासच.
आवडली.

अभिजीत अवलिया's picture

22 Oct 2015 - 9:45 am | अभिजीत अवलिया

चांगली आहे कविता. मुळात एखादी व्यक्ती आपल्या वडिलांपुढे झुकत असेल तर तिने माझ्यापुढे पण झुकले पाहिजे हा अट्टाहास कशासाठी?

तिमा's picture

22 Oct 2015 - 10:51 am | तिमा

मान कर्तृत्वाने मिळतो.मागून मिळत नाही.

नाखु's picture

23 Oct 2015 - 9:41 am | नाखु

+११११ कवीतेला

अस्वस्थामा's picture

22 Oct 2015 - 3:23 pm | अस्वस्थामा

अरे वा.. मस्त हो वेल्लाभट भौ.. समयोचित तर आहेच (त्याबद्दल काही न बोललेलेच बरे असे वाटतेय आज काल), अजून एक म्हणजे मस्त चाल देखील लागतेय "असा बालगंधर्व आता न होणे" या गाण्याची. :)

सुमीत भातखंडे's picture

23 Oct 2015 - 10:30 am | सुमीत भातखंडे

समयोचित कविता.

वेल्लाभट's picture

23 Oct 2015 - 10:56 am | वेल्लाभट

सगळ्यांचेच अनेक आभार...

अस्वस्थामा, मी खरं तर मनाच्या श्लोकांच्या च्या मीटर मधे लिहिली आहे.

अस्वस्थामा's picture

23 Oct 2015 - 3:32 pm | अस्वस्थामा

कुठला श्लोक हो? चाल कळेल काय ? मी पहिल्यांदा वाचताना जी लय माझ्या डोक्यात आली त्याशिवाय मी दुसरी कल्पू शकत नाहीय.. :)

वेल्लाभट's picture

23 Oct 2015 - 4:40 pm | वेल्लाभट

मना सज्जना भक्तिपंथेचि जावे
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे

?

अस्वस्थामा's picture

23 Oct 2015 - 8:30 pm | अस्वस्थामा

आयला .. स्वारी, मी "मनाच्या" हा महत्वाचा शब्द वाचला नव्हता राव.. :))
अता जुळतंय..

निनाव's picture

23 Oct 2015 - 2:58 pm | निनाव

वाअह .. अप्रतिम. खूप काहि सुचक आहे. लय बद्द्ध आहे.

बॅटमॅन's picture

23 Oct 2015 - 3:12 pm | बॅटमॅन

बरी आहे, जरा वृत्त गंडलेय अधूनमधून तेवढं सुधारा जमल्यास.

(भुजंगप्रयात वृत्तात ४ य गण, अर्थात् ल-ग-ग हा प्याटर्न चारवेळेस रिपीट होतो.)

एक एकटा एकटाच's picture

23 Oct 2015 - 3:49 pm | एक एकटा एकटाच

वाह

सतिश पाटील's picture

23 Oct 2015 - 5:52 pm | सतिश पाटील

अर्ध्या हळकुंडाने पिवळी
झाली कमळाबाई
मीच तुझ्यापेक्षा मोठी,
सांगती बोंबलून

झोळी पडली कमी
इतुके दिले जनांनी
पचवू कैसे हे सारे
तीस न कळे

हाताचे बोट धरून
कोणी केले उभे
दिला कोणी आसरा
फरक आता न पडे

आधी टेकले माथे मातोश्रीला
सोडून लज्जा आणि लाज
आता वाढली मस्ती
आणि चढला माज

पाकडे जाहले मित्र
देशभक्ती झाली सैल...
कितीही फुगला बेडूक
होत नाही बैल.

आपल्याला आस लई काव्य गिव्य लिवाय येत न्हाई,
पर कवितेला कवितेने दिलेले लोकशाही मार्गाने उत्तर , आस समजा बुवा

पैसा's picture

23 Oct 2015 - 7:17 pm | पैसा

वेल्ला, राजकारण ही शिवी वाटते हल्ली. राजकारणावर फक्त उदासबोधच लिहिता येईल.

श्रीगुरुजी's picture

23 Oct 2015 - 11:16 pm | श्रीगुरुजी

कृतीतून ठरते इथे कोण वाघ
मुखे बोंबलोनी करी काय सांग

कालच्या शिवसेनेच्या सभेत बोलताना रामदास कदम म्हणाले की "गिरीश बापट म्हणतात की शिवसेना धाकटा भाऊ असून आम्ही मोठा भाऊ आहोत. आम्ही धाकटा भाऊ नसून तुमचा बाप आहोत.". जनतेने भाजपच्या तुलनेत निम्म्या जागा देऊन, भाजपकडून इतकी अवहेलना होऊन सुद्द्धा यांच्या फुशारक्या कायम आहेत.

या फुशारक्या आणि वरील पंक्ती मस्त जुळतात.

मोगा's picture

25 Oct 2015 - 8:56 am | मोगा

सेना ... गंगदत्त बेडूक

भाजपा ... साप

विवेकपटाईत's picture

25 Oct 2015 - 12:40 pm | विवेकपटाईत

विधानसभानिवडणूकीच्या वेळी परिस्थिती ओळखली असती ५०% तैयार झाले असते तर तर आज मुख्यमंत्री झाले असते. आता व्यर्थ आरडाओरडा करण्यात काय अर्थ. वेळ निघून गेली कोण वाघ आणि कोण बिबट्या हे जनतेने ठरवून दिले आहे.

तर्राट जोकर's picture

29 Oct 2015 - 2:50 pm | तर्राट जोकर

शिसेला बिबट्या बोले तो बहुत ज्यादा हो गया...

विशाल कुलकर्णी's picture

30 Oct 2015 - 11:37 am | विशाल कुलकर्णी

मस्तच रे भाऊ