ती आणि मी (भयकथा)

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
17 Sep 2015 - 12:25 pm

मी:
तिचं घर कसं भणंग. एकटं. मुख्य वाड्यापासुन जरासं दुर.
तिचे म्हातारे आईबाप, थोरले भाऊ, त्यांच्या बायका पोरं वाड्यात राहायचे. ही बाहेरच्या खोलीत. एकटीच. बिनलग्नाची.
रात्री जेवणानंतर घरामागच्या झाडीत मशेरी घासत फिरण्याची तिला विचित्र सवय होती.
तिची आणि माझी पहीली भेट इथलीच.
एका रात्री ती मला अशीच एकटी दिसली.
जवळ जावुन मी तिची विचारपुस केली.
घडाघडा बोलली. खरतरं मी तिच्यापुढे एक अनोळखी बाई होते. पण पहिल्या भेटीतच तिनं आयुष्यभराचं रडगाणं माझ्यासमोर सुरु केलं.
माझ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत कितीतरी वेळ एकटीच बोलतच राहीली. थोडी चक्रमच वाटली.
पण मला तिची दया आली. तिला आधार द्यावा वाटला.
तिच्या भणंग खोलीत मी अधुन मधुन जात असे.
खोली जुनाट वासानं भरलेली असायची. करमणुक म्हणुन मी तिला खोदुन खोदुन पुर्वायुष्याविषयी विचारायचे. तरुन वयात ती म्हणे कोणाबरोबर पळुन गेलेली होती. पण त्याच्याबद्दल ती चकार शब्द काढत नव्हती.
एक विचित्र वासना तिच्या डोळ्यात सदैव दाटलेली असायची. घरामागच्या झाडीत ती बहुदा एखाद्या वाट चुकलेल्या तिऱ्हाईताच्या प्रतिक्षेत असायची.
मला तिचे दु:ख जाणवायचे. तिच्या भणंग आयुष्यात जराही गोडवा नव्हता.
पण माझ्या येण्याने तिला थोडी माणसात आल्याची जाणीव व्हायची. आमच्या हसण्या खिदळ्याण्याने त्या खोलीत क्षणभर का होईना सौख्य नांदायचे.
मी ही अशीच बिनलग्नची. मुलबाळ नसलेली. समदु:खी.

ती:
समोरच्या वाड्यात एक कुटुंब राहते. त्यातली एक बाई शेजारच्या खोलीत राहते. एकटीच. बिनलग्नाची.
रात्री ती बाई माझ्या घरामागच्या झाडीत फिरायची.
मशेरी घासण्याच्या बहाण्याने मी सुद्धा त्या झाडीत जावुन तिच्यावर नजर ठेवायचे.
एकदा तिने मला बघितलेच. जवळ येऊन माझी विचारपुस केली.
एक विचित्र वासना तिच्या डोळ्यांत आढळली.
वाट चुकलेल्या एखाद्या तिऱ्हाईताच्या प्रतिक्षेत बहुदा ती असावी.
मला तिची दया आली. तिला आधार द्यावा वाटला. माझ्या आयुष्याची कर्मकहाणी तिच्यापुढे मांडली. माझे काहीच ऐकुण न घेता काहीबाही विचारत राहीली. थोडी चक्रमचं वाटली. मी तिला घरी बोलावले.तिच्याशी गप्पा मारल्या. माझ्या असण्याने तिच्या भणंग आयुष्यात थोडा गोडवा आला. पुढे येतच राहीली.
मी ही अशीच बिनलग्नाची. मुलबाळ नसलेली. समदु:खी.

उपसंहार:
रात्र झाली आहे. समोर एक वाडा ऊभा आहे. त्याला लागुनच एक लहानशी खोली आहे.पाठीमागे झाडी आहे. तिथे एक बाई मशेरी घासत बसलेली आहे. बहुदा वाट चुकलेल्या एखाद्या तिऱ्हाईताच्या प्रतिक्षेत.

कथासमाजजीवनमानलेखप्रतिभा

प्रतिक्रिया

जेपी's picture

17 Sep 2015 - 12:34 pm | जेपी

भयकथा ?

असो समजली नाही.

जव्हेरगंज's picture

17 Sep 2015 - 12:43 pm | जव्हेरगंज

याला भयकथा म्हणावे की गुढकथा की रहस्यकथा की अजुन काही मलाही माहीती नाही.

बाकी कथा अशी सहजासहजी कळणार नाही.:) बघा थोडा विचार करुन. नतर विस्कटुन सांगतोच.

प्यारे१'s picture

17 Sep 2015 - 1:07 pm | प्यारे१

भयकथा नाही.

दोन (की अधिक) वेगवेगळ्या दृष्टीकोनांतून (त्यातही स्वतःला केंद्रस्थानी ठेवून) तेच चित्र कसं वेगवेगळं दिसतं हे दाखवलं आहे. छान प्रयोग आहे.

मागे लोकप्रभा मध्ये अशी एक चौकट यायची छोटीशी. दोन किंवा अधिक लोक आपापसात संवाद करत असतात त्यावरुन त्रयस्थ व्यक्ती त्यांच्याबद्दल अंदाज बांधत असणार असा. उदा. एका मुलामुलीमध्ये मुलगा जोराजोरात बोलत असतो आणि मुलगी ऐकत असते. कधी थोडं बोलते. तिसर्‍याला ते एक कपल वाटतं. मध्येच भाऊ बहीण, ऑफिस मध्ये काम करणारे सहकारी असंही. खरंतर ती त्याची काऊन्सेलर असते. आणि तो तिचा पेशंट. असं काहीसं.

पर्स्पेक्टीव्ह भिया पर्स्पेक्टीव्ह

द-बाहुबली's picture

17 Sep 2015 - 1:07 pm | द-बाहुबली

स्प्लिट.

जव्हेरगंज's picture

17 Sep 2015 - 1:19 pm | जव्हेरगंज

म्हटलं कथा सगळ्यांच्या डोक्यावरुन चालली की काय.!
पण एखादा 'हँडपावर' असतोच :)
थँक्यू.!

चांदणे संदीप's picture

17 Sep 2015 - 2:54 pm | चांदणे संदीप

'मी' मेलीय का? नक्की काय झालय इथे?

जव्हेरगंज's picture

17 Sep 2015 - 3:01 pm | जव्हेरगंज

ऊत्सुकता सध्या ताणवुन ठेवतो.
गरज पडल्यास स्पष्टीकरण देतो.
तो पर्यंत पहा काही अर्थ निघतोय का.!

diggi12's picture

11 Sep 2024 - 11:49 pm | diggi12

अर्थ?