तुलनेचा तराजू

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
26 Aug 2015 - 11:55 am

सततची आणि अंधपणे केलेली स्वतःची इतरांशी आणि इतरांच्या जीवनाशी केलेली तुलना द्वेषाचे आणि नाशाचे कारण बनते. आपण इतर दोन व्यक्तींमध्ये केलेली तुलना सुद्धा हेवा आणि लोभाला जन्म देते आणि त्या दोघांचीही अधोगती करवते.
तुलनेमुळे स्वतःचे दोष आणि इतरांचे गुण आपल्याला दिसत नाहीत.
तुलना केल्याने आपण स्वतःचा वेगळेपणा आणि स्वतंत्र अस्तित्व नकळत नाकारत असतो.
तुलना ही नेहेमी हक्काची केली जाते पण कर्तव्याची आणि कर्तृत्वाची केली जात नाही.
इतरांपेक्षा मी कसा चांगला होईन, इतरांपेक्षा मी स्वतःच्या स्वभावात जास्त बदल कसा घडवेल अशी तुलना दुर्दैवाने होत नाही. अशी तुलना लाभदायक ठरते.
इतरांना मिळालेल्या फळाची तुलना होते पण त्यांनी केलेल्या मेहेनतीची आणि सत्कर्माची तुलना दुर्दैवाने होत नाही.
तुलना जरूर करावी पण पूर्वीचे स्वतः आणि आताचे स्वतः अशी करावी. म्हणजे रोज स्वतःत सुधारणा करून कालपेक्षा किती स्वतःमध्ये सुधारणा झाली अशी तुलना करावी.

धोरणसुभाषितेविचारलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

चाणक्य's picture

26 Aug 2015 - 4:20 pm | चाणक्य

.

द-बाहुबली's picture

26 Aug 2015 - 5:20 pm | द-बाहुबली

हे महाभारताचे जीवन सार: भाग २ आहे की वैयक्तीक मत आहे ?

शंतनु _०३१'s picture

26 Aug 2015 - 6:16 pm | शंतनु _०३१

पायात मोडलेला काटा दिसत नसला तरी सलत असतो, स्वत:च्या चुकांकडे दुर्लक्ष , अथवा सत्य नाकारण्याची वृत्ती असेल तर अशी तुलना होतंच राहते