(चरस गांजा अता मिळाल्या)

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जे न देखे रवी...
14 Aug 2015 - 4:49 pm

चरस गांजा अता मिळाल्या देई चिलम तुला
आजपासुनी घ्यावे अधिक तू ताज्या गवताला*

करुन रोल कागदाला त्यात सोडी तू अफिमा
आग पेटवून आणि घे तू शांत उरात धुमा
लपून कश ते मारुन कर या निर्मल दाहि दिशा
रात्री ऐशा अमर करुनि घे तव दिन शयनाला

दारु जशी गुत्त्यात, नस जशी राहे बटव्यात
बीडि जशी ओठांत, गुटखा हा बघ या गालांत
पाल जशी कच्चीत, रसाळ किमाम माव्यात
हृदयी तू साठवी ही नशा डोइत कश भिनला

--(निर्व्यसनी) स्वामी संकेतानंद

*गवत*= ग्रास

आरोग्यदायी पाककृतीसंस्कृतीकलापाकक्रियाविडंबनऔषधोपचार

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

14 Aug 2015 - 4:59 pm | प्रचेतस

खी खी खी =)) मस्तच.

बाकी 'अता' हा शब्द काळजाला भिडला.

वेल्लाभट's picture

14 Aug 2015 - 5:04 pm | वेल्लाभट

विडंबन छान !!!

बाबाजी की बूटी....

गाणं आठवलं. क्लास आहे ते गाणं... शब्दही, संगीतही.

द-बाहुबली's picture

14 Aug 2015 - 5:53 pm | द-बाहुबली

हेच बोलतो.. जय हो बाबाजीकी... बाबाजीकी जय हो.

स्वामी संकेतानंद's picture

17 Aug 2015 - 12:12 pm | स्वामी संकेतानंद

मी हे गाणे ऐकले नव्हते. तुमचा प्रतिसाद वाचून विडिओ डाउनलोड केला. मस्त आहे गाणे. अगदी गांजेकस!!

प्यारे१'s picture

14 Aug 2015 - 5:31 pm | प्यारे१

खिक्क्!
स्वामीजी की जय हो...

पैसा's picture

14 Aug 2015 - 5:39 pm | पैसा

ढिस्क्लेमर लिहायची वेळ आली का रे?

स्वामी संकेतानंद's picture

14 Aug 2015 - 5:42 pm | स्वामी संकेतानंद

इधरकु लोगाँ मेकु पैचानते नै इसलिए।

बाबा योगिराज's picture

14 Aug 2015 - 5:52 pm | बाबा योगिराज

शामकु किदर आउ???? ;-)

अत्रुप्त आत्मा's picture

14 Aug 2015 - 6:00 pm | अत्रुप्त आत्मा

__/\__ :-D

मस्तच! डोळ्यासमोर बेफिकीरपणे कश मारणारा हिप्पी उभा राहतो. पण हे खरेच शाक्त स्वामी वाटतात! म्हणजे त्यांचे सध्याचे धागे बघून. दोन महत्वाचे पंचमकार कव्हर केलेयत.

स्वामी संकेतानंद's picture

17 Aug 2015 - 12:11 pm | स्वामी संकेतानंद

पण हे खरेच शाक्त स्वामी वाटतात! >> मग काय! आहेच मी शाक्त स्स्वामी;)
( गंमतीचा भाग जाऊ द्या, पण महाकालेश्वर आमचे कुळदैवत आहे. )

श्रीरंग_जोशी's picture

14 Aug 2015 - 8:01 pm | श्रीरंग_जोशी

लै भारी हो स्वामीजी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Aug 2015 - 12:45 am | डॉ सुहास म्हात्रे

'दम'दार विडंबन !

विडंबन असेल तर कृपया 'प्रेर्ने'चाही दुवा द्यावा.

स्वामी संकेतानंद's picture

17 Aug 2015 - 3:34 pm | स्वामी संकेतानंद

आमची प्रेरणा >> http://www.aathavanitli-gani.com/Song/Tini_Sanja_Sakhe

हे गाणेकोणत्या चालीवर गावे हे लीवायला पाहीजे होते.

स्वामी संकेतानंद's picture

17 Aug 2015 - 3:35 pm | स्वामी संकेतानंद

या गाण्याच्या चालीवर >> http://www.aathavanitli-gani.com/Song/Tini_Sanja_Sakhe