मुपीवरील माझ्या निवडक प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
11 Aug 2015 - 5:51 pm

मुपीवरील माझ्या निवडक प्रतिक्रिया

१.
मैत्री म्हणजे मैत्री असते, तुमची काय अन आमची काय...जवळपास सेमच असते. सिगारेट देऊन, तयार सबमिशन-फाईल घ्यायचं, साध सरळ बार्टर असतं, काय म्हणता? या ओळी चिल्लर वाटतात? मैत्रीच्या दृष्टीने थिल्लर वाटतात? असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे ! तरीसुद्धा, मैत्री म्हणजे मैत्री असते, तुमची काय अन आमची काय...जवळपास सेमच असते. कॅन्टीनमध्ये वन बाय टू करून मैत्री करता येते, वर्गातल्या प्रॉक्सी मधून मैत्री करता येते,इंजिनीरिंग ड्राइंग कॉपी करून मैत्री करता येते, झुंडीने रात्रभर जागून सबमिशन करता मैत्री येते, आजूबाजूच्यांच पाहून पेपर लिहिताना मैत्री करता येते, लिहिताना चुकलात तरी मैत्री करता येतं; मास्तरांना गंडवायला शिकलात तरी मैत्री करता येतं ! इंजिनीरिंगला गेलो कि डोक्यावर शिंग फुलू लागतात, जागेपणी म्याटिनीचे झोपाळे झुलू लागतात ! आठवतं ना, तुमची माझी प्लेसमेंट जेव्हा झाली होती, रूम सगळी बिअर भरली होती ! लाटांवर बेभान हो‌ऊन नाचलो होतो, तंगडीसकट बुडता बुडता वाचलो होतो ! बुडालो असतो तरीसुद्धा चाललं असतं, मित्रांनीच अलगद वर काढलं असतं !
मैत्रीबित्री झूट असतं, म्हणणारी माणसं भेटतात, मैत्री म्हणजे फॅड नुसतं, मानणारी माणसं भेटतात ! असाच एक जण चक्क मला म्हणाला, अमेरिकेत सेटल झालो तरी मैत्रीबित्री कधीसुद्धा केलं नाही !आमचं काही नडलं का? मैत्रीशिवाय अडलं का? त्याला वाटलं मला पटलं ! तेव्हा मी इतकंच म्हटलं, तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं ! मित्रं सोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने, एक सिगारेट अर्धी अर्धी ओढली असेल गोडीने ! भर दुपारी उन्हात कधी त्याच्यासोबत तासन तास फिरला असाल, बार्गेनिंग करत त्यांच्याबरोबर फ़शन स्ट्रीटमध्ये शिरला असाल ! मैत्रीकधी भांडतेसुद्धा !! रागान कधी गांडो म्हणते सुद्धा, किल्ली चोरून बाईक फिरवणे सुद्धा मैत्री असते, घाण घाण शिव्यासुद्धा मैत्री असते, तरीसुद्धा मैत्री म्हणजे मैत्री असते, तुमची काय अन आमची काय...जवळपास सेमच असते.
*********************************************************************************
२.
कोमेजून गंजलेली एक लुना राणी,
उतरलेली ब्याटरी, त्यात सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नवे नाही,
सुरु कशी होऊ ब्रम्ह्या, मला स्पार्कच नाही
सांगायाचे आहे, या कवितेतून मला, दमलेल्या लुनाची कहाणी तुला,
आटपाट पुणेनगरी गर्दी होती भारी,
घामाघूम ब्रम्हे करी रोजचीच वारी,
रोज सकाळीच ब्रम्हे निघताना बोले,
लिफ्ट द्यायची काल राहूनीया गेले,
जमलेचं नाही काल मला जरी,
आज परी देणार मी बळेच-जोरी,
विद्यापिठ्मार्ग मध्ये मारू मग फेरी,
ख-या खु-या पोरीसाठी ४००० जरी,
विकेन मी जुन्याबाजारात मला,
दमलेल्या लुनाची कहाणी तुला,
असा कसा मालक देव लुनाला देतो,
हा लिफ्ट तर देतो वर ४००० देतो,
सर्विसिंग गेल्या माझ्या सगळ्या निसटून,
पळवे मला नुसता हा विद्यापीठातून,
जरी येते ओठी तुमच्या माझ्यासाठी हसे,
नजरेत तुमच्या काही अनोळखी दिसे,
मुक्तापिठातून लुना हरवेल का हो,
नंतर हा ब्रम्हे तुम्हा आठवेल का हो,
दाखविली मी या कवितेतून कला,
दमलेल्या लुनाची ही कहाणी तुला... ला ला ला....
**********************************************************
उरलेल्या सावकाश टाकेन प्रतिक्रियेत ….

मुक्तकविडंबनमौजमजाप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

11 Aug 2015 - 5:54 pm | पगला गजोधर

लुनावाला गावात आला, की लुनाची टूरटूर ऐकायला यायची व लांबूनही कानावर पडली तरी कान टवकारायचे. लुनावाला ब्रम्हे आला म्हणून बायकाही एकमेकींना सांगायच्या. त्यात आमच्या पोद्दारम्याडम, शेजारीपाजारी असायच्या. जिकडून टूरटूर ऐकू आली त्या दिशेनं आम्ही धावत सुटायचो. त्याला शोधून काढायचो. मग त्याच्याबरोबर एका टोकाकडून दुसऱ्या टोका कडं, आशेभरल्या मनानं फिरत राहायचो. वाटत होतं, म्याडम आपल्याला लिफ्ट घेऊन देईल. ब्रम्हेच बोलणे, लुना चालवणं आम्ही मन लावून पाहत असू. मग पोद्दारम्याडम आमच्या त्याला लुनावरून आम्हाला चक्कर मारायला लावायची. ते बघून बघून स्वारी खूष व्हायची. शेवटी आम्ही त्याला आमच्या रूमवर घेऊन यायचो. आमच्या म्याडम त्याला चहा, पाणी, जेवण द्यायची. त्याने ४००० दिले नाही तर मग आमचं मोठ्यानं भोकांड पसरणं.. नंतर म्याडमचा त्याच्या पाठीत धपाटा. मग ब्रम्हे म्हणायचा, "ताई' (तो आमच्या म्याडमला "ताई' म्हणायचा) कशाला मारता व मग आमच्या हातात ४००० सरकवायचा. आज तो जिवंत आहे की नाही माहीत नाही. तेव्हाचा हा गावगाड्याचा जणू नातेवाईकच. आज मात्र हरवला आहे.

पगला गजोधर's picture

12 Aug 2015 - 10:24 am | पगला गजोधर

बा देवा म्हाराजा मुषकवाहना गणेशा, बा देवा म्हाराजा केशवराज हे आई भारतदेवते म्हाराजा...आणि भूमीच्या राखणदारा... आज पगला गजोधरने गार्‍हाणं मांड्णाचो ठरवलो हा म्हाराजा.. या मातीतील लोकांनी आपल्या पद्धतीनं जमात तशी भारतीमायची सेवा केल्यानी म्हाराजा.. तुझ्या भुमीत शेतकर्यांनी शेती करायची म्हाराजा.. पण म्हाराजा ह्या शेतीक सुरुवातीपासूनच किलेसाचा ग्रहण लागला हा म्हाराजा... दुष्काळापासून ते अत्म्हत्येपर्यंत आणि बेण्यापासून ते बाजारापर्यंत ... सगळ्याच गोष्टीत बळीराजाका उत्तर देताना नाकीनाऊ येतत म्हाराजा.. पन तुझ्या कृपेने आजपर्यंत इलेल्या सगळ्या संकटाचो सामनो तुझ्या लेकरांनी केल्यानी हा म्हाराजा.. या भूमीत मनात कोण वाईट घेवन हय येयत असात, तर तेची बुद्धी परावर्तीत कर म्हाराजा.. हय प्रत्येक शेतकरी ह्यो जरी आमचो पावनोच असलो तरी तो पोशिंदा म्हणानच वागांदे म्हाराजा.. मनी इप्सीलेलो शेती येवस्थीत पार पाडांदे..वडाची साल पिंपळाक लाव, पिपळांचे साल वडाक लाव... दुष्काळाचा इस्कोट कर म्हाराजा..पावसाच्या सरी वर सरी यंदाही तुझ्या हातांन दे रे म्हाराजा...आणि हो महाराजा ..आणखी ऐक गाऱ्हाण .. प्रत्येकावर प्रतिक्रिया देणारयाला 'नक्षलवाद्या'सारखं अन लेखाच्या लेखकाला 'नक्षलग्रस्ता' सारखं न वागवता सगळ्यांच लोकांना सदबुध्दी देऊन या मुक्तपीठरुपी 'नक्षलप्रांतात' ही सुख नांदु दे...रे म्हाराजा... व्हय महाराजा ... या जालावरच्या माझ्या सगळ्या मित्र मंड्ळीना असाच सुखात ठेव.... तुझी कृपादृष्टी त्यांच्यावर राहु दे रे म्हाराजा ... व्हय महाराजा (मागितल्या शिवाय आपला देव नवसाला पावतो हे कसं कळायचं .... खरं की नाही मंडळी....)

पगला गजोधर's picture

11 Aug 2015 - 5:56 pm | पगला गजोधर

प्रतिक्रियेतून जात, धर्म, प्रांत, राजकीय पक्ष, यावरुन वाद घालणाऱ्या माझ्या मुक्तपीठवाल्या मित्रांसाठी ...
एवढंच ना? भांडण करू… एवढंच ना?
आमचं हसं, आम्ही करू, घेऊन हेका एकटेच राहू, एवढंच ना?
माणुसकीला कोण? सहिष्णुतेला कोण? स्वतःला डोळसपणे बघताय कोण?
शब्दाला शब्द, गुद्द्याला गुद्दा, डोळ्याला डोळा भिडवतच राहू, एवढंच ना?
बोलण्याला मिटर होतंच कधी? वादाला व्याकरण होतंच कधी?
खुन्नसचा सोस, शिव्यांचे कोश, तिरकस प्रतिसाद अनुभवत लिहू, एवढंच ना?
जातीचे चष्मे नव्हते कधी ? धर्माची झापड नव्हती कधी ?
भाषेचा अडसर नव्हता कधी ? प्रांताचे कुंपण नव्हते कधी ?
भारताचा तिरंगा, कामकऱ्याचा घाम, जवानांचे रक्त विसरून जाऊ , एवढंच ना?
वाचलंत तर द्याल, तुमचीच ‘राय’ , टाळलंत तर टाळाल, आम्हाला काय?
स्वत:च कवि, स्वत:च वाचक, स्वत:च समिक्षक होवून लिहू, एवढंच ना? पगला गजोधर

पगला गजोधर's picture

11 Aug 2015 - 5:58 pm | पगला गजोधर

शंकरराव, तुम्ही राहात असलेल्या गावच्या सुरक्षेबद्दल, तुमच्या कळकळीचे कौतुक, राहत असलेल्या गावामध्ये आपली जबाबदारी पाळणे हा सुद्धा सद्गुण, महात्मा फुले हे सुद्धा पुणेकरच, यांच्या शिक्षण प्रसाराला कर्मठ पुणेकरांनी विरोध केला होता, पण म. फुल्यांनी पुणेकरांना नावे ठेवण्यापेक्शा, इथे व्हाल्यू addition केली, दाभोलकारांसमोर अशाच धर्ममरतडांनी अनंत अडथळे आणले होते; पण खरा पुणेकर म्हणून त्यांनी नेहमीच काँट्रिब्यूट केले, सावित्रीबाईंना छळणा-या याच शहराने पुढे ‘विद्येचे माहेरघर’ म्हणून लौकिक मिळवला. लोकमान्य टिळकांनी ख्रिस्ती धर्मगुरूंच्या उपस्थितीत चहा घेतला म्हणून त्यांना प्रायश्चित्त घ्यायला लावणा-या या शहरात पन्नासेक वर्षानी तोच चहा ‘अमृततुल्य’ ठरला. त्यामुळे पुण्यात नुसता फ्ल्याट घेतलेल्यानो, आपण सोडून सगळे वाईट हा विचार सोडा आणी दुसर्यांना नावे ठेवण्यापेक्शा काय शिकता येण्यासारखा आहे ते पहा. नुसतीच उपभोग घेण्याची प्रवृत्ती (काँट्रिब्यूट न करण्याची प्रवृत्ती) ह्यामुळे जो र्‍हास होत आहे त्याचे कित्येक दृष्य परिणाम सभोवती आधीच दिसत आहेत. …पगला गजोधर

पगला गजोधर's picture

12 Aug 2015 - 10:18 am | पगला गजोधर

समाजाचं काहीदेणं लागतो, ही जाणीव बोचत होती, म्हणून मी, सदु, दादू, दादा, दास वैगरे मुलांचा सुटीमध्ये खेळवर्ग घ्यायचे ठरवले, पण दास नाना वाड्यातील पोपा बाईंचा विद्यार्थी, नेहमी असंबद्ध तुटक तुटक कविता करायचा, संगीत खुर्ची खेळताना ऐका खुर्चीतच बसून राहायचा, दादा बाराव्या मजल्यावरून कारंजी उडवायचा, बारा(मजल्या वरचा) काकाचा फ्ल्याट असल्याने करायचा, नंतर काकांनी बुकलून काढला, काकांना बाल्कनीत झाडं लावायला आवडायचं, सदु दादू खेळण्यापेक्षा भांडायचे, दादूला आवडायचा वडा, तर सदूला चिकनसूप, दादुच्यापप्पांनी सदूला चित्रं काढायला शिकवली म्हणून एकदा दादू खेळताना पडला तर सदुन त्याला आपल्या सायकलवरून डबलसीट घरी आणल, आजही भांडण झालं कि नेहमी दोघ हे बोलून दाखवतात. कोणाचच खेळांत लक्ष्य नसायचं, शेजारचे गुज्जू उन्कल तर सारखे म्हणायचे, एकदा मला सोसायटीचा अध्यक्ष करा, बघा खेळवर्गला कसा पुढे नेतो, पण ७ वितला राघू म्हणाला कि हे उन्कल फेकू आहेत, मला अध्यक्ष करा, मम्मा म्हणते कि मी खूप हुशार आहे, मी म्हणालो त्यापेक्षा मी मुपी मध्ये कॉमेंट लिहितो. ..

पगला गजोधर's picture

14 Aug 2015 - 9:08 am | पगला गजोधर

मुख्याध्यापकपदाच्या निवडणुकीतील, शिक्षक आजही डोळ्यांसमोर येतात. गणिताचे मोहनसर तर मौनीच होते, ट्रस्टीचां मुलगा राघू इच्छुक होता, तो म्हणायचा गरीब विद्यार्थ्यांना ह्या शाळेत शिक्षणाचा अधिकार देवू, फुकट चॉकलेट, केक वाटू, पण तो फक्त ७वि पास होता, रामदाससर तर कुठेही असंबद्ध तुटक कविता करत सुटायचे, राजसर तर अमराठी विद्यार्थ्यांवर खार खाऊन असायचे, पण ते म्हणायचे की मला नको तर मनोसरांना होऊ देत, मनोसर बघतील ह्या अमराठी विद्यार्थ्यांच्याकडे मनोसरांची गावातल्या मुकेसभाई, अडानिभाई दुकानदारांशी दोस्ती, ते म्हणायचे कि मला मुख्याध्यापक करा, बघा शाळेच्या पैश्यातून दुकानातील गाईड पोरांना वाटतो, १०० % पास निकाल, दुकानपण चालेल अनि पोरेही पास, केम ! पाटलाचा पुतण्यासरतर म्हणायचे, च्याईला ह्या पोरांच्या निकालाच्या पोहऱ्यात काय आम्ही काय कारंजी लावायची का ? आम्ही म्हणतो त्याला करा नाहीतर नळाला MSeal लावतो, मऊसर म्हणाले, होतात मुलांच्या हातून चुका, तर काय लगेच नापास करायला हवं का ? आम्ही म्हणालो, कोणीका होईना, आप ल प्रगतीपुस्तक कोरंच राहणार…. पगला गजोधर

आदिजोशी's picture

11 Aug 2015 - 6:02 pm | आदिजोशी

हे नक्की काय आहे?

आदूबाळ's picture

11 Aug 2015 - 6:06 pm | आदूबाळ

ओह ते तुम्हीच काय.

मूळ लेखाच्या लिंकापण द्या की.

टवाळ कार्टा's picture

11 Aug 2015 - 6:12 pm | टवाळ कार्टा

मुपिचे दळण मुपिवरच दळावे...त्यांनाच घरचा अहेर मिळेल....मिपावर कशाला??....अश्शी प्रतिक्रिया अज्जून कश्शी नै आली...श्या पूर्वीचे म्मिपा र्हैले नै अता... =))

पण या रचना त्याच्याच आहेत ना? मग तो कुठेका पेस्टवेना? आणि तशाही संदर्भाशिवाय समजतातच न या रचना? अणि ज्याला लु.ब्र. म्हैत नैत तो मराठी तरूणच नव्हे!!!

पगला गजोधर's picture

12 Aug 2015 - 10:14 am | पगला गजोधर

आधी मी मुपिवर द्यायचो प्रतिक्रिया, पण 'पगला गजोधर' हे नाव घेऊन नंतर काही लोक अयोग्य असभ्य प्रतिक्रिया द्यायला लागल्यावर मी प्रतिक्रिया देणे बंद केले व मिपावर वावर सुरु केल.

मला वाटतं मुक्तपीठवर नोंदणी कंपल्सरी नाही, बरोबर ना? कुणीही उठून काहीही नावाने प्रतिसाद देत राहतो. बर्‍याच वेळा चेष्टा मस्करीचं रूपांतर अत्यंत घाणेरड्या बेजबाबदार चिखलफेकीत होतं त्यामुळे.

मी वाचलंय हे सर्व. पण म्हटलं बघूया तुझ्या लक्षातंय का. मस्त आहे पगलवा. १ली तर लैच खंग्री.
आदिजोशींना लुनावाले ब्रह्मेंची लिंक दे. लु.ब्र. यांच्या पुण्याईवर आजपर्यंत मुपी चालत आलंय.

कंजूस's picture

11 Aug 2015 - 6:44 pm | कंजूस

मुपी =?

मुक्त विहारि's picture

11 Aug 2015 - 9:49 pm | मुक्त विहारि

हा एक अभ्यासाचा विषय आहे.

लुनावाले ब्रम्हे. http://www.esakal.com/esakal/20130122/4824005995910158145.htm

पावसकर पोदार मॅडम...http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5106388708596651190&Sectio...(%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0)

घाटात फुटला घाम..http://www.esakal.com/esakal/20100719/4711632484305432417.htm

बनाना बोट... http://www.esakalglobal.com/NewsDetails.aspx?NewsId=5380818249547306815&...(%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0)

फार गहन विषयांवर इथे चर्चा होते.

मुविजी अहो सप्तर्षि बैंचं मांजर राहिलंच की! त्ये बी लै फ्येमस है मुपीवर...

मुक्त विहारि's picture

11 Aug 2015 - 10:14 pm | मुक्त विहारि

जमल्यास कुणी पाठवली तर उत्तम

शिवाय बालमोहन अमेरिकावले पंण राहिले आहेत.

श्रीरंग_जोशी's picture

11 Aug 2015 - 10:34 pm | श्रीरंग_जोशी

करमणूक मांजराची.

बालमोहन अमेरिकावले - मी आजवर वाचले नाही. दुवाही पटकन मिळत नाहीये.

असो, एकावर एक फ्री दुवा - लळा मुक्या जिवांचा... (लाडू कावळा).

मुक्त विहारि's picture

11 Aug 2015 - 10:39 pm | मुक्त विहारि

अजून एक मस्त लेख होता...

घरातली/परसातली बाग....

बाद्वे,

इतर सगळ्या लेखांपेक्षा ब्रम्हे मात्र नंबर-१

जडभरत's picture

11 Aug 2015 - 10:57 pm | जडभरत

धन्यवाद त्या मांजराचं रेकाॅर्ड आहे डिस्लाईक्स मिळवण्यात!!!

आजही ते मांजर लोकांची तितकीच करमणूक करतंय!!! पुन्हा एकदा वाचून हसतच बसलोय. नशीब त्या बैंचे. इतक्या लोकांना हसवायचे भाग्य मिळाले.

श्रीरंग_जोशी's picture

11 Aug 2015 - 11:34 pm | श्रीरंग_जोशी

लाडू कावळा लेखावरच्या तेव्हाच्या प्रतिक्रिया आता दिसत नाहीयेत. एकाहून एक धमाल प्रतिक्रिया होत्या.

रषातु's picture

11 Aug 2015 - 10:30 pm | रषातु

ani ti nachnari lift pan rahili ki ho....:-)

धर्मराजमुटके's picture

11 Aug 2015 - 11:28 pm | धर्मराजमुटके

घाटात फुटला घाम लेखावरील प्रतिक्रिया वाचून मला डायबिटीसचा हार्टअटॅक आला. एवढं भयानक विनोदी बरेच दिवसात वाचनात आलं नव्हतं.

१ नंबर . लुनाच्या कवितेसाठी . ब्रह्मे चे मानायला पाहिजेत हा . केवढी करमणूक केलीय त्यांनी . मला १ मैत्रीण पण मिळाली होती ब्रह्मेमुळे .

अत्रुप्त आत्मा's picture

14 Aug 2015 - 9:56 am | अत्रुप्त आत्मा

@कोमेजून गंजलेली एक लुना राणी,
उतरलेली ब्याटरी, त्यात सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नवे नाही,
सुरु कशी होऊ ब्रम्ह्या, मला स्पार्कच नाही >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif