(...आदिम घास...)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
27 Aug 2008 - 12:47 am

हा थरकाप उडवणारा...आदिम ध्यास.. हीच आमच्या आदिम घासामागची प्रेरणा! ;)

...आदिम घास...
================================
अमूर्त अनाकलनीय कवितांपासून.. लपूनछपून..
स्वत:ला वाचवत.. फिरत होतो,
अगदी तेव्हापासून! मी टाळत होतो...
प्रत्येक असह्य कविता...

जीवघेण्या प्रतिकांतून..
उपमांच्या कराल जबड्यांतून..
थरकाप उडवणार्‍या रुपकांपासून.. दूर..
दुबळ्या वाचकासारखं जगत..!

त्याच विडंबनाच्या ध्यासापोटी..
दुर्बल वाचकाचा लेखक झाला..
लेखकाचा झाला विडंबक...
लेखणीत चळ, शब्दात घोळ असलेला...
चक्रम.. विक्षिप्त..!

आणि त्या बरोबरच जन्माला आली..
वक्रोक्तीतली हूल... सर्वभक्षकत्वाची खाज..!
स्वार झाली... किंचाळणार्‍या कवितेवर..
पिसाळलेल्या ओळी काबूत घेत..
गोंधळवणारी.. चक्रावणारी कवने मागे सोडत..
उगवत्या विडंबनाच्या दिशेने!!

कवी बदलले.. कविता ती.. तशीच..
अनाकलनीय.. प्रसिद्धीसाठीची...
शब्द बदलले.. घास तो.. तस्साच...
विडंबनाचा!!!.....

नवकवींचं बारसं जेवलेला 'चतुरंग';
आजही हुडकतोच आहे..
स्वतःहून अंगावर चढवलेल्या..
झुलींचा मुकुटांचा भार पेलत...
महाजालाच्या पसार्‍यात...
भावनेच्या आविष्कारासाठी..!!!
अस्वस्थ सर्जनाच्या कल्पनेनं..
बिचकत..दबकत आलेल्या कवींना!!!

वाचतालिहिता तोच आदिम घास घेऊन...
विडंबतोच आहे... एक दुस्सह विपन्न काव्य!!!

=====================================
चतुरंग.................................... २६-०८-२००८

कवितामुक्तकविडंबनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

केशवसुमार's picture

27 Aug 2008 - 1:01 am | केशवसुमार

रंगाशेठ,
तुमचा भावनाविष्कार एकदम आवडला..चालु दे..
(निवृत्त)केशवसुमार
स्वगतः रंग्या ने नुसताच घास घेतला... उखाणा कोण घेणार.. :W

सहज's picture

27 Aug 2008 - 8:19 am | सहज

विडंबन आवडले.

:-)

चतुरंग's picture

27 Aug 2008 - 9:45 pm | चतुरंग

घास आवडलेल्या तुम्हा दोघांचे मनापासून आभार! :)

(खुद के साथ बातां : रंग्या, हल्ली बर्‍याच लोकांच्या घशात घास अडकायला लागलाय, कच्चा माल 'नीट निवडत' जा! :B )

चतुरंग

भडकमकर मास्तर's picture

28 Aug 2008 - 9:13 am | भडकमकर मास्तर

आदिम घास मस्त...
आम्हाला तर तुम्ही विचित्र भयानक वेषभूषा करून ( उगवत्या कवितांचा घास घ्यायला भीती दाखवणे महत्त्वाचे :)) स्टेजवर ही कविता अगदी पर्फॉर्म करताना दिसायला लागलात.....

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/