.
समजा तुम्ही अतिशय पट्टीचे खवय्ये आहात. चवदार व लजीज अन्न हा तुमचा विक पॉइंट आहे. बाजारात आलेली नवी "चटपटीत डिश" चाखण्यासाठी तुम्ही पैशाचा विचार करत नाही. तुम्ही स्वतःच्या खिशातले पैसे टाकुन खास "हॉटेलात" जाऊन त्या डिशचा आस्वाद घेता, कुठेतरी नेटवरुन त्याची पाककॄती उतरवुन हेऊन त्याचे घरगुती प्रयोग करुन पैसे वाचवण्याचा नतद्रष्टपणा तुम्ही करत नसता. योग्य मालाच्या व लायकीच्या पदार्थासाठी पाहिजेतेवढा पैसा मोजण्याची तुमची दानत व तयारी असते. पण तुम्ही सध्या आयुष्याच्या कंटाळवाण्या कालखंडातुन मार्गक्रमण करत आहात. काहीच तुमच्या मनासारखे होत नाही. जाईल तिकडे निराशा पदरी पडत आहे. दिवसेंदिवस रटाळ, टाकाऊ, बोगस, बेचव अन्नपदार्थ तुमच्या नशिबी येत आहेत, त्यामुळे जिभेला व मनाला एक प्रकारची बाभळी आली आहे.
त्यात आशेचा किरण म्हणजे गेले काही दिवस एका "प्रसिद्ध हॉटेल" कडुन भुतोनभविष्यती अशा "लज्जतदार, चवदार व जिभेचे पांग " फेडु शकणार्या एका "फुडफेस्टीवलची जाहिरात" पेपरातुन प्रसिद्ध होत असते. तुम्ही दररोज त्याची चवदार वर्णने पेपरातुन वाचत असता, त्या जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे खास झणझणीत पंजाबी स्टाईलचे, मराठमोठ्या साजाचे, मसलेदार मोगलाई पद्धतीचे, चायनीज चस्क्याचे व गुजराती मधुरपणाचे अनेक उत्तमोत्तम पदार्थ येथे तुमचे चोचले पुरवण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. तुमच्या नजरेत एक वेगळीच चमक येते, मनाला एक उत्साह वाटु लागतो, शरिराला एक तरतरी येते व तुम्ही त्या "खाद्यमहोत्सवात " आपले सीट बुक करण्यासाठी धाव घेता, तुमच्या समव्यसनी मित्रांना पण तुम्ही पटवता व तुमच्या भाग्याने तुम्हाला बुकिंग मिळते सुद्धा. तुम्ही छाती वीतभर जास्त फुगवुन त्या "बुकिंगची" आपल्या मित्रपरीवारात व इतर ओळखीच्या लोकात जाहीरात करता. काही लोक तुमच्याकडे " तुमची काय बाबा ऐश आहे, आमचे एवढे भाग्य कुठले " असे आसुयेचे उद्गार काढुन त्यांच्या दुर्भाग्याची हळहळ व्यक्त करतात तर काही जाणकार लोक "त्यात काय दम नसतो बाबा, आपली घरची मीठभाकरी बरी" असा निराशेचा सुर काढतात. पण तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रीयेकडे लक्ष द्यायला वेळ नसतो व तुम्ही त्या मानसीक स्थीतीतही नसता. आता तुमच्या रक्तात त्या "खाद्यमहोत्सवाचे खुन सवार झाले असते" व डोक्यात त्याची नशा चढलेली असते.
मग तो सुदीन उजाडतो, तुम्ही अतिशय उत्साहाने त्या "कार्यक्रमस्थळी" जाता. वातावरण एकदम भारलेले आहे. आधी जाहीरात केल्याप्रमाणे सर्व पदार्थांची रेलचेल आहे. अनेक प्रतिष्ठीत व मोठ्ठी मंडळी जेवणासाठी रांगा लाऊन शिस्तीत उभी आहेत. तुमचाही नंबर येतो, तुम्ही तुमच्या जागेवर बसता व तोंडाला पाणी सुतलेल्या अवस्थेत आपल्या समोर डिश येण्याची वाट पाहता. शेवटी तो "सोनीयाचा क्षण" येतो, राजेशाही पोशाख केलेले वाढपी तुमच्यासमोर झाकलेली "सो कॉल्ड लज्जतदार डिश " आणुन ठेवतो. तुम्ही आधाशीपणाने त्याचे झाकण काढुन फेकता व वखवखलेल्या नजरेने त्या डिशकडे पाहता ....
पण हाय रे कर्मा ऽऽऽऽऽ
त्या गाढवांनी वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचे अन्नपदार्थ एकाच ताटात वाढण्याचा मुर्खपणा केल्याने त्याच्या चवीचा पार बँड वाजला असतो. सरमिसळ झाल्याने त्याची वेगळी चव अशी लागत नाहीच. जाहीरात केल्याप्रमाणे झणझणीत पंजाबी स्टाईलचे, मराठमोठ्या साजाचे, मसलेदार मोगलाई पद्धतीचे, चायनीज चस्क्याचे व गुजराती मधुरपणाचे अनेक उत्तमोत्तम पदार्थ खरेच तेथे असतात पण त्यांची सरमिसळ झाल्याने तुमचा अपेक्षाभंग होतो. तुम्ही पट्टीचे खाणारे असल्याने असल्या "भेसळीची" तुम्हाला सवय नसते त्यामुळे " श्रीखंड, चायनीज मंचुरीअन, पंजाबी पराठा व तंदुरी चिकन, खमणठोकणा, मटनाचा तांबडा रस्सा, हक्का न्युडल्स, वांग्याचे भरीत" असे उत्तमोत्तम पदार्थ एकाच बैठकीत एकाच ताटात व एकाच वेळी खाण्यास तुमचा तात्वीक विरोध असतो. खल्लास ऽऽऽऽऽ . तुमच्या मुडचा पार बोर्या वाजला असतो, आता भरल्या ताटावरुन उठण्यास तुमची तयारी नसते कारण "मोजलेले बक्कळ पैसे व जनलज्जा", त्यामुळे तुम्ही कशीबशी डिश संपवता व आयोजकांना शिव्या देत बाहेर पडता. त्याच तीरमिरीत आयुष्यात पुन्हा कधी असल्या कार्यक्रमाला जाण्याची [ व न पाळली जाणारी ] शप्पथ तुम्ही घेता. त्यानंतर ह्या अनुभवानंतर मित्रात झालेले तुमचे हसे वेगळेच ...
एकंदरीत खिशाला चाट बसवणारा व मनोसोक्त मनस्ताप देणारा हा अनुभव ठरतो ...
नक्की चुक कोठे झाली ?
तुमच्या साईडने तर तुम्ही अगदी अचुक आहात, मग नक्की बिघडले काय ?
ह्याचे उत्तर आहे " कुटलीही पुर्वचौकशी न करता अन्नपदार्थावर भुलुन आयोजकांवर ठेवलेला अंधविश्वास" ....
ह्याला काही उत्तर नसते तुमच्याकडे कारण हा तर तुमचा "वीक पॉईंट" !!!
नेमके हेच "सिंग इज किंग" नामक सध्या "सो कॉल्ड गाजत असलेल्या व यशाचे अनेक विक्रम उद्धवस्त " करणार्या चित्रपटाबाबत घडते. त्यातल्या कलाकारांच्या पुर्वपुण्याईला भुलुन व प्रचंड जाहीरात होत असलेल्याने व त्यात दाखवलेल्या दॄष्यांना भुलुन तुम्ही पदरमोड करुन पिक्चरला जाता हीच ती "घोडचुक" ...
आता थोडेसे स्टोरी बद्दल, मुळात सगळ्यात मोठ्ठी बोंबाबोम्ब इथेच असल्याने मी काय लिहणार हा प्रश्न आहे.
तरीपण जनरीती प्रमाणे काही तरी लिहावेच लागेल ...
तर त्याचे असे आहे की चित्रपटाचा नायक "हॅप्पी सिंग [ अक्षयकुमार ] " पंजाबातल्या एका कुठल्याश्या खेड्यात रहात असतो. तो लहानपणापासुनच थोडासा अर्धवट, महामुर्ख, अडाणी, बालीश, लाडोबा व तरीही इतरांच्या मदतीला धावून जाणारा, गावकऱ्यांच्या खोड्या करणारा काहीसा साधाभोळा, थोडास बनेल, मोकळा ढाकळा शीख तरुण आहे. आता एवढ्या भुमीका तो एकाच वेळी कशा सांभाळतो हा एक प्रश्न आपल्याला पडतो पण दिग्ददर्शक असल्या मुलभुत भावनेतुन दुर जाऊन अतिशय उच्च पदाला पोहचल्याने त्यांना हा प्रश्न पडला नसावा. त्याचा एक मित्र "रंगीला [ ओम पुरी ] ", हा हॅप्पी पेक्षा किंचीत कमी पण तसाच अर्धवट, महामुर्ख, अडाणी, बालीश. ह्या दोघांनी आपला " महान कॄत्यांनी" गावकर्यांना पुरते हैराण केले असते व ते बिचारे हतबल झाले असतात. पण मुळात हे दोघे "लाडोबा" असल्याने त्यांना कुणी समजावुन सांगण्याचा वा समज देण्याचे दुष्कॄत्य करत नाही व ह्यांचे चाळे चालु राहतात. ह्यांच्या हाताला काम व डोक्याला ताण नसल्याने ह्यांना अनेक अफाट कल्पना सुचत असतात, त्यातल्या एका प्रसंगात हॅप्पी सिंग एक कोंबडी पकडण्यासाठी निम्मे गाव खाली झोपवतो व त्यांच्या नुकसानीची पर्वा न करता " कोंबडी पकडली की नाही" असा आव आणुन ताठ मानेने फिरक असतो. गावकरी ह्यांना काहीतरी कारण काढुन गावाबाहेर हकलुन देण्याच्या संधीच्या शोधात असतात. त्यच्यामध्ये ह्यांचे चाळे चालुच असतात व इकडे आपली कवटी सरकत असते. कारण कुठल्याही अंगविक्षेपाला वा पाचकणाला पोट धरुन हासायला आपण काही युपी/बिहारचे भैय्या प्रेक्षक किंवा नवज्योतसिंग सिद्धु नसतो.
असो.
त्याच्यादरम्यानच त्यांच्यांच गावचा एक सुपुत्र "लकी सिंग [ सोनु सुद - चांगला कलाकार आहे बिचारा ] " हा ऑस्ट्रेलियात जाऊन डॉन बनला असतो व त्याचे तिकडे ११ भाई गँग्स व ११ देशातल्या पोलीसांशी चांगलेच वाजले असते. त्यातुनच त्याच्यावर एक "खुनी हल्ला" होतो, तो जखमी होतो, ती खबर एकडे पंजाबातल्या गावात येते, त्याचे वडील आजारी पडतात व लकीला परत आणा असा हट्ट धरतात. गावकर्यांनी ही चांगली संधी वाटते, ते "हॅपी व रंगीला" यांना ह्या कामगिरीवर पाठवतात व आयुष्यात कधीही गावाची वेस न ओलांडलेले दोघे डायरेक्ट ऑस्ट्रेलियाला निघतात...
इथपर्यंत आपण पिक्चर कसाबसा सहन करु शकतो ...
त्यानंतर जो मुर्खपणाचा कळस सुरु होतो त्याला तोड नाही आणि उत्तर तर नाहीच नाही ...
त्या प्रवासाच्या दरम्यान ह्या २ अर्धवट गाढवांचे तिकीट दुसर्याशी अदल्याबदल झाल्याने ते इजिप्तला जातात व तिकडे "पटकथेच्या मागणीनुसार" त्यांना "सोनिया [ कतरिना कैफ ] " भेटते. आता हे इजिप्तला कसे जातात? त्यांना सोडते कोण ? तिकडे त्यांची व्यवस्था काय ? व्हिसाचे काय ?असले मला पडनारे क्षुल्लक [ यात्री, बरोबर आहे ना शब्द ? ] त्यांना पडत नाहीत व ते त्याची काळजीही करत नाहीत. असो. त्यानंतर त्यांना मधीच आठवते की आपल्याला तर ऑस्ट्रेलियाला जायचे होते, मग पुन्हा गाडी ऑस्ट्रेलियात पोहचते व ह्यापुढचा समस्त गाढवपणा, हैदोस, पाचकळपणा हा ऑस्ट्रेलिया ह्या देशी घडतो [ व आपल्याला मस्त "देशी" पिऊन शांत झोपावे अशी इच्छा होते ]....
तर होते काय की ह्या गडबडीत त्या खर्या "किंग उर्फ लक्की" वर पुन्हा एक हल्ला होऊन तो जायबंदी होतो व त्यांच्यासमोर आता आपला नेता कोण हा प्रश्न पडतो. दुसरे कोणी "लायक" न सापडल्याने पुन्हा एकदा "पटकथेच्या मागणीनुसार" हे लोक "हॅप्पी सिंग उर्फ अक्षयकुमारला" नवा किंग म्हनुन घोषीत करतात. मला नाही झेपला हा प्रकार ? ४ शब्द सरळ बोलता येत नसलेला, अक्षरश : अर्धवट, महामुर्ख, अडाणी, बालीश हा "हॅप्पी सिंग" कुठल्या कर्तुत्वाने "किंग" होण्यास लायक होतो. फक्त डोक्यावर पगडी हा नॉर्म असेल तर "हरभजसिंगने" काय घोडे मारलेय ? [ तसा तो पण थोडा अर्धवट आहे म्हणा पण तो आपला विषय नाही.]
आता आम्ही सावरुन बसतो, डोक्याने अधु ब बुद्धीने अर्धवट असलेला "हॅप्पी" त्याच्या अंगच्या गुणामुळे काही तरी धमाल उडवुन देणार व ज्यासाठी आपण एवढे रुपडे मोजले तो "अफाट विनोदी शिन्स" पहायला भेटणार ...
पण नाही. सगळे मुसळ शेवटी केरातच !
पण मुळात गुंडगिरीला विरोध असणारा हॅप्पी हा किंग झाल्याझाल्या एकदम "बापु, भय्या, अम्मा, महाराज " टाईप वागायला लागतो व कुत्र्याचे वाकडे शेपुट सरळ [ म्हणजे त्या गुंडांना सुधरवायच्या ] करायच्या मागे लागतो. त्याला संधीही तशी मिळते. आरंभीच्या त्याच्या ऑस्ट्रेलियात हलाखीच्या काळात म्हणजे जेव्हा " लक्की खाऊ घालीना व पगडी भाई मागु देईना" अशी परिस्थीती असते तेव्हा त्याला मदत करणार्या [ फुलाचे दुकान चालवणार्या ] एका बाईच्या पोरीच्या सुखासाठी एक नवे नाटक तो उभारायचे ठरवतो. त्याच्या सुदैवाने [ अ आपल्या दुर्दैवाने] ती कन्या म्हणजे खुद्द "सोनिया" निघते. आता बोला ! काय बोलणार, ती तर पटकथेची मागणी, आपण हाताची घडी आणि कपाळावर बोट. त्यात भर म्हणुन ती बरोबर आपला बॉयफ्रेंड "पुनीत [ रणवीर शौरी , तोच तो थप्पडखाऊ अभिनेता. आठवा "अग्ली & पग्ली ". जाऊ दे, कशाला आठवताय, फुकट डोक्याला शॉट ] यालाही बरोबर आणते. मग त्या [ पुर्वाश्रमीच्या श्रीमंत ] बाई ची इज्जत जाऊ नये म्हणुन हा नवा किंग अख्ख्या गँगला एका पोरकट खेळात ओढतो व अख्ख्या पिक्चरचा खेळखंडोबा करतो.
इथुन पुढे मी माझे [ पगडी नसलेले ] डोके चालवण्याचा व वापरण्याचा निष्फळ प्रयत्न सोडला व "दाखविले किंगे तैसेची पहावे, चित्ती असु द्यावे असमाधान" ह्या उक्तीनुसार पुढचा चित्रपट पाहिला ...
नंतर जो प्रेमाचा त्रिकोण आणि त्यासाठीचा त्याग असा भंपक ड्रामा, जिकडे तिकडे फक्त सिंगच , किंग म्हणून कोणीच नाही, सोनिया आणि पुनितचं प्रेमप्रकरण व त्यात हॅप्पीच्या हितचिंतकांची लुडबुड व त्याला हॅप्पीने फटकारणे, काही अगम्य आणि अतर्क्य घटनातुन किंगच्या इरसाल आणि अस्सल गुंड साथ्यांचे मानसीक परिवर्तन, सोनियाला सच्च्या प्रेमाचा साक्षात्कार व तिच्या लग्नाच्या वेळी गोंधळात तिचे गडबडीने तिचा हॅप्पीशी होणार विवाह व तिनेही खेळकरपणे याला दिलेली मान्यता हे विनोद, प्रसंग मला नाही झेपले. मात्र ह्या घोळात पिक्चर "झोपला" हे नक्की ...
शेवटी तर असा गोंधळ उडतो की "किंग" कुठेच दिसत नाही , सगळीकडे फक्त आणि फक्त पगडीवाले "सिंग" च दिसतात.
त्यामुळे आपली डोक्याची पगडी सटकुन सिनेमागॄहात कुठेतरी हरवते ...
शेवटी एकदाचा [ कसाबसा ] सिनेमा संपल्यावर आपण आपली अकलेची पगडी जी तिकीट काढताना मोठ्ठ्या सन्मानाने घातली होती ती आता कुठे हरवली याचा विचार करत चित्रपटगॄहाच्या बाहेर पडतो.
माझा चित्रपटाच्या दिग्दर्शकाला, निर्मात्यांना व कलाकारांना एकच छोटा प्रश्न आहे की " एवढा टाकाऊ, टुकार, भंगार पत्रा लोखंड, पाचकळ, पुचाट सिनेमा तुम्ही कशाच्या जोरावर हिट म्हणता ? पगडी न घालणार्या बिनडोक मिडीयाला हाताशी धरुन अवाढव्य उत्पन्नाचे आकडे तोंडावर फेकले की सिनेमा चांगला कसा ठरु शकतो ? पब्लिकचे [ विना पगडेआवाले ] डोके काय पेंड खायला जाते का एवढे उत्पन्न मिळवुन द्यायला ?"
तात्पर्य : हा "सिंग" नावाचा "किंग" आपल्याला चांगलाच "हिंग" लाऊन जातो ...
---[ विना पगडीवाला किंग ] छोटा डॉन
प्रतिक्रिया
27 Aug 2008 - 8:11 pm | छोटा डॉन
लेखात ज्या ज्या ठिकाणी "पगडी, सिंग वा कुठल्या धर्माचा उल्लेख" जर झाला असेल तर तो फक्त "सिंग इज किंग" ह्या सिनेमावर टिका करण्यासाठीच आहे. मनातुन आम्हाला "सर्व धर्मांविषयी" अतिशय आदर आहे.
वरची सगळी मते ही फक्त वैयक्तीकरित्या माझी आणि माझीच आहेत, इतक कुणाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करु नये ...
स्वगत : कसले डिस्क्लेमर आणि कसले काय ? क्रमशः लिखाणामुळे चक्क २ दिवस मागे पडलेला लेख पुढे आणण्याच्या युक्त्या ह्या. येवढं न समजायला पब्लिक काय "हॅप्पी सिंग" आहे काय ?
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
27 Aug 2008 - 8:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
स्वगत पण भारीच! :-)
28 Aug 2008 - 12:28 am | टारझन
काय बे डॉण्या .. एवढ भयताड पिक्चर आहे हे .. आधी नाय का सांगता आलं ... मी "व्हाट हॅपन्स वेगास" ला डावलून हे १.५ जीबीच खुसपाट डाउनलोडवलं ... साला .. तुम्ही अंमळ उशीर केलात ..
असो .. शिफ्ट्+डिलीट मारतो आहे... हल्ली डोक्याचे ताप वाढलेत. बरं पिक्चर बघायच्या आधी सांगितलं ...
पिक्चर चं आणि जेवणाच्या डिशचं अगदी चपलख सांगड घातलीस .. आणि पिक्चर बकवास असलं तरी विश्लेषणात बोर होणार नाही याची काळजी घेतल्याबद्दल धन्यू...
=)) जबरा ...
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
27 Aug 2008 - 8:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्त डान्या! मी पिच्चर पाहिला नाहीये, इच्छा नव्हतीच आता तर फुकट दाखवला तरीही विचार करेन!
क्षुल्लक [ यात्री, बरोबर आहे ना शब्द ? ]
...." श्रीखंड, चायनीज मंचुरीअन, पंजाबी पराठा व तंदुरी चिकन, ....
=))
पिच्चर भिकार असेल तरीही अगदीच टाकाऊ नाही कारण त्याच्यामुळेच एवढी टोलेबाजी वाचता आली! ;-)
27 Aug 2008 - 8:24 pm | रेवती
एवढेच या सिनेमा बद्दल म्हणू शकते. मी १५ मिनिटात सिनेमा बंद केला.
रेवती
27 Aug 2008 - 8:28 pm | प्रियाली
मी हा टुकार चित्रपट पाहण्याचा प्रयत्न केला आहे.
थर्ड डिग्री द्यावे लागणारे गुन्हेगार असतात त्यांना असे चित्रपट दाखवावे.
असो, परिक्षण वाचले नाही अद्याप, टोलेबाजी असल्यास वाचावे म्हणते. तेवढेच जखमेवर मलम!
28 Aug 2008 - 3:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> मी हा टुकार चित्रपट पाहण्याचा प्रयत्न केला आहे.
केवढं हे धाडस!
>> थर्ड डिग्री द्यावे लागणारे गुन्हेगार असतात त्यांना असे चित्रपट दाखवावे.
असं ऐकलंय इराकमधे टॉर्चर म्हणून अमेरिकन सैनिक इराकी लोकांना मेटलिका सारखं हेवी मेटल म्युझिक ऐकवतात (आणि स्वतः नाचतात त्यावर)!
>> असो, परिक्षण वाचले नाही अद्याप, टोलेबाजी असल्यास वाचावे म्हणते. तेवढेच जखमेवर मलम!
(अजून वाचलं नसलंस तर) जरूर वाच! मी सॉलिड्ड एन्जॉय केलं परीक्षण.
(छोटी) अदिती
27 Aug 2008 - 8:30 pm | शितल
परिक्षण छान केले आहेस.
लेखाची सुरूवात तर अगदी फक्कड झाली आहे.
मी अजुन हा मुव्ही पाहिला नाही.
पण तु़झा लेख वाचुन तर आता असे वाटते तो मुव्ही फक्त सरदारजींसाठीच बनविला असावा. ;)
27 Aug 2008 - 8:37 pm | अनामिक
अगदि भिक्कार आहे असे आधिच कळले होते, त्यामुळे पाहिला नाही. आणि आता वाचलेल्या परिक्षणानंतर तर अजिबात ईच्छा नाही.
27 Aug 2008 - 8:47 pm | मोकाट वळू
अगदि नखशिकान्त सहमत आहे......
27 Aug 2008 - 10:00 pm | मेघना भुस्कुटे
डॉन्या,
या सिनेमासंदर्भातला मोठ्ठा विनोद म्हणजे माझी मराठी रूममेट अस्सल मराठी शिव्या घालत अर्ध्या सिनेमातून उठून आली. माझ्या एका पंजाबी कलीगची त्यावरची प्रतिक्रिया - 'अरे, उसे समझ में नहीं आया होगा, वोह मराठी है ना!'
यावरूनच मी सिनेमाच्या लायकीचा अंदाज बांधला!
भारतातला अप्रतिम विनोदी सिनेमा 'जाने भी दो यारों' बनवणार्या कुंदन शाहचं हे 'सिंग इज किंग'बद्दलचं चिंतन. मनोरंजक आणि खरंच चिंतनीय आहे -
http://passionforcinema.com/comedy-films-today/
27 Aug 2008 - 10:20 pm | छोटा डॉन
असाच शॉट इकडे बेंगलोरात घडला.
एका कलिगला माझी पिक्चरबद्दलची "जहाल मते" सांगताच तो खवळला व त्याने सेम हाच डायलॉक टाकला.
त्यावर हाईट म्हणजे त्याने मला पंजाबीतुन २-४ शिव्या घाउन " आधी ह्याचा अर्थ समजुन घे व मग पिक्चर बघायचे धाडस कर" असे सुनावले.
आपण काय ऐकतोय का ? मी पण मग "अस्सल मराठी साजांची काही स्तुतिसुमने " त्याच्यावर उधळली व सुनावले की "जर ह्याचा अर्थ तुला समजला असेल तर पुन्हा असले फालतु सल्ले देऊ नकोस" ...
पंजाबी समजणार्यांनाच पिक्चर समजेल व आवडेल अशी अपेक्षा करणे मुर्खपणाचे आहे.
कुंदन शहांनी ह्यापुढे ऑस्करचे ज्युरी म्हणुन काम करायला आता हरकत नाही, आजकाल त्यांच्या दॄष्टी फारच व्यापक, अभ्यासु आणि चौकस झाली आहे.
जय हो !
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
28 Aug 2008 - 2:23 pm | विजुभाऊ
पंजाबी समजणार्यांनाच पिक्चर समजेल व आवडेल अशी अपेक्षा करणे मुर्खपणाचे आहे.
कुंदन शहांनी ह्यापुढे .......
ह्या शहा लोकानी भाषा तरी किती बोलायच्या =)) कैच्या कैच
धमुशी पण्जाबीत बोलणारा गुज्जुभाई मराठी विजुभौ
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
27 Aug 2008 - 10:12 pm | भाग्यश्री
भिक्कार पिक्चर ! फार अपेक्षा न ठेवताच पाहायला बसले होते, तरी अपेक्षाभंग झाला! किती तो आचरटपणा!? एकाही जोकला हसू आले नाही.. किरण खेरने तर निवृत्ती घ्यावी आता.. असली डोक्यात जाते ना? ओम पुरीने कसा साईन केला हा पिक्चर?
वाईट चिडचिड झाली होती! हल्ली हिंदी पिक्चर्स पाहणे कमीच झालंय , तेच बरं!
27 Aug 2008 - 10:25 pm | एक
सगळा पिक्चर पंजाबीत. एक शब्द कळेल तर शप्पथ.
27 Aug 2008 - 10:27 pm | ऋषिकेश
डॉनजी ;)
खुमासदार लेखन आवडले.
आधीच मित्रांकडून (तेही आश्चर्य म्हणजे अमराठी मित्रांकडून) मिळालेल्या सल्ल्यानुसार चित्रपट न पाहिल्याचा (आसूरी )आनंद होतोय
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
27 Aug 2008 - 10:31 pm | प्रभाकर पेठकर
डॉन साहेबांच्या 'सिनेप्रिक्षान' वरून असे वाटते की निर्माता आणि दिग्दर्शकाची ' आधीच मर्कटं, त्यात मद्य प्याला, तशात विंचवाने दंश केला' अशी अवस्था झाली असणार आणि त्यामुळे हा चित्रपट जन्माला आला.
27 Aug 2008 - 11:55 pm | बेसनलाडू
चित्रपटाकडून अपेक्षा काहीच नव्हती; फक्त कतरीनाला (तिचा अभिनय नव्हे ;) ) पाहण्यासाठी चित्रपटाला पाहिले ;) :D
(सलमान)बेसनलाडू
28 Aug 2008 - 12:06 am | विसोबा खेचर
डॉन्या, फक्कड परिक्षण रे!
त्या गधड्या कात्रीला हिंदीत एक वाक्यही धड बोलता येत नाही!
28 Aug 2008 - 12:30 am | टारझन
कोन कंबख्त जाता है कत्री का खत्री अभिनय देखने ... हम तो जाते है उसका दिदार करने ...
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
28 Aug 2008 - 2:36 pm | आनंदयात्री
मस्त परिक्षण डानराव !
आवडले !
28 Aug 2008 - 3:08 pm | अनिल हटेला
डॉन भो !!!
पिक्च्र रद्दड असला म्हुन काय झाल ....
परीक्षण एक्दम जोरदार .....
५ * एक्दम ...................
आम्ही पण झक मारली पार डबल पैसे घालून शी डी मागवली ...
आणी बघत बघता समजले हा मूव्ही आपणासाठी नोहे....
हा किंग लोकासाठी च आहे.....
असो .........
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
28 Aug 2008 - 3:29 pm | मनस्वी
सावध केल्याबद्दल धन्यवाद.
असेच अगम्य चित्रपट बघून वेळोवेळी सावधानतेचा इशारा तुझ्याकडून अपेक्षित आहे.
अवांतर : 'जनलज्जा' शब्द प्रथमच वाचला.. मजेशीरच आहे.
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
28 Aug 2008 - 6:06 pm | ब्रिटिश टिंग्या
डानराव,
लै भारी परिक्षण! इनफॅक्ट नजीकच्या काळात वाचण्यात आलेले सगळ्यात बेस्ट परिक्षण! :)
कॅटरीनाचा चित्रपट असल्याने बघावाच लागला......अक्षयकुमार 'अशा' चित्रपटात काम करु शकतो ह्यावर विश्वास बसला नाही!
जावेद जाफरीनेही स्वत:ला वाया घालवले आहे.
असो, नुकताच "मान गय मुघल-ए-आजम" हा तद्दन टुकार विनोदी चित्र(आ)पट बघितला. या चित्रपटाचेही परिक्षण आपलेकडून अपेक्षित आहे!
(कॅटरीना-मल्लिका प्रेमी) टिंग्या
28 Aug 2008 - 8:31 pm | लिखाळ
परिक्षण मजेदार.
मी काही दिवसांपूर्वी एका फुकट चित्रपट दाखवणार्या संकेतस्थळावर हा चित्रपट पहायला सुरुवात केली होती. कोंबडी पकडणे कार्यक्रम झाल्यावर काही कारणाने पुढचा चित्रपट पाहिला नाही. वाचलो म्हणायचो ! नशीब बलवत्तर होते तर ! :)
--लिखाळ.
28 Aug 2008 - 8:33 pm | प्रियाली
नश्शीबवान हो! ;) मी रणवीर शौरी घरात येईपर्यंत पाहिले. विकतची डोकेदुखी.
परिक्षणाने जखमेवर मलमपट्टी झाली. ;)
28 Aug 2008 - 9:00 pm | छोटा डॉन
रणवीर शौरी म्हणजे तोच ना "थप्पडखाऊ " अभिनेता, हा पिक्चर बघायच्या आधीच "९९ थपडा व १ [कसाबसा] किस" असलेला " पग्ली आनि अग्ली" हा शिनेमा पाहिला होता. त्यात ह्याचा रोल बघुन कीव आली ...
पैशासाठी "नितीमत्ता" किती ढासळावी ह्याचे उत्तम उदाहरण आहे हे ...
बाकी कुणी हाणामार्या फेम होते, कुणी रडुबाई फेम होते, कुणी किस फेम होते [ कोण बरे तो लब्बाड, ओळखला असेलच ना ], कुणी डान्स फेम होते तर कुणी क..क्..क्...किरन फेम होते ...
पण हा कर्मदरिद्री "थप्पड फेम" झाला. धन्य आहे ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
28 Aug 2008 - 9:44 pm | प्रियाली
पाहिलेला नाही त्याचे फर्मास परिक्षण लिहिणार का? की यापेक्षा बरी कामं आहेत ;)
दोन्हींपैकी कोणतेही उत्तर आवडेल.
28 Aug 2008 - 10:42 pm | छोटा डॉन
>>पाहिलेला नाही त्याचे फर्मास परिक्षण लिहिणार का? की यापेक्षा बरी कामं आहेत
परिक्षण !!!
नको गं बाई, असले उलटे धंदे करायला सध्या वेळ नाही ...
आयुष्यातल्या काही "मुर्खपणामुळे घडलेल्या चुका" शक्य तितक्या लवकर विसरणेच आरोग्याला मानवते ...
तशी अगदी वेळ आलीच तर मी लेखन वगैरे सगळे सोडुन "गोरक्षण समितीचा कार्यकर्ता " बनुन वर्गण्या गोळा करत फिरेन किंवा "दुधाच्या बाटल्या" घरपोच पोहचवायचा किफायतशीर धंदा सुरु करेन.
अशा कामात कमीत कमी इज्जत तरी आहे, त्या "अग्ली और पग्ली" मध्ये काय "फतरं इज्जत" आहे ?
काय म्हणतेस ?
गोरक्षण समितीचा कार्यकर्ता - छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
28 Aug 2008 - 8:46 pm | संदीप चित्रे
पण डॉन .. सिनेमाची आणि जेवणाची सांगड मस्त घातलीयस...
कुठलाही हिंदी सिनेमा मी अर्धवट बंद करत नाही त्यामुळे 'सिंग इज किंग' बघीन असं वाटतंय.
('अल्ला मेहरबान तो गधा पहेलवान' ह्या सिनेमाची व्हिडियो कॅसेट आणलेला) संदीप :)
29 Aug 2008 - 8:32 am | मदनबाण
डॉन्या मस्तच चिर-फाड केली आहेस रे.. :)
थोडक्यात सिंगचे १२ वाजले आहेत... :)
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
29 Aug 2008 - 12:40 pm | स्वाती दिनेश
परीक्षण फस्क्लास! वाचून करमणूक झाली आणि सिनेमा न पाहण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब..
स्वाती