पेशंटच्या नातेवाईकानी पाठलाग करणे हे सार्वजनीक हॉस्पीटलच्या नर्सला काही वेगळा अनुभव नसतो. त्याचा इलाज पण रामबाण असतो. मावशीबाईला सांगीतलं की दुसर्या दिवशी पॉट देऊन ती नाहीशीच होते. पेशंट रडकुंडीस आला की पाठलागी नातेवाईकाला सगळं निस्तरायला लागतं. पाठलाग संपतो.
पण हा काहीतरी वेगळाच अनुभव होता. त्यानी ओळख पण दाखवली नाही. रस्ता पार करून निळ्कंठेश्वराच्या समोर जेव्हा ती आली तेव्हा मागून हाक आली.
सिस्टर.. एक मिनीटं..
हवेत वेताची छडी फिरवल्यावर जसा आवाज येतो तसा आवाज , नव्हे आज्ञाच.
ती पाठी वळली. नजरेला नजर देऊन पाहीली.शक्यच झालं नाही. दोन धगधगणारी बुबुळं.
वेंकटेश काय बोलला तुमच्याशी?
तिला काहीएक कळलं नाही. नजरबंद शिकार. दंश करायला फणा सज्ज.
दोयुग्मा बद्दल काय सांगीतलं?
उत्तर दे लवकर्..प्रश्न कानात येउन निष्फळ होतं होते.
मला काही नाही कळत ... परत एकदा प्रश्नांची फैर .आता थोडी घाई .शिकार्याचं लक्ष विचलीत पण शिकारीचं पाउल मंत्रमुग्ध जागीच स्थिर.
थांब एक मिनीट.अंगावरून गरम हवेचा झोत गेल्यासारखं वाटलं.
प्रश्न आदळून विरत होते. काचेच्या कंच्यावर कंचा आपटून जसा टिचल्याचा आवाज येतो हुबेहुब तसंच
टच् टच्च. आता आणखी एकदा आघात झाल तर ठिकर्या ठिकर्या उडणार.
निळकंठेश्वराच्या देवळात घण्ण घंटा वाजली.एक हाक आली सरीता... सरुताई...
सरीता भानावर आली. समोर भावेकाकू उभ्या होत्या.
अगं काय खुळ्यासारखी बघतेयस..
बाई ..बाई.. चल घरी .तब्येत ठिक नाही का तुझी.
तो माणूस दिसेनासा झाला होता.
सारखं मागे वळून बघावसं वाटत होतं पण धीर होत नव्हता.
घरी पोहचल्यावर महाराजांच्या फोटो समोर उभं राह्यलावर बरं वाटलं.
तुमचा मी भार वाहीन नव्हे हे अन्यथा वचन माझे
पुन्हा एकदा आठवून पाहीलं.तिनं काहीच उत्तर दिलं नव्हतं.
मनावरचे आक्रमण थोपवून ती यशस्वी झाली होती.
सुधीर मन.देवा आभारी आहे मी तुझी
दुपारी शांत झोप लागली.
---------------------------------------------------------------------------------------------
श्रीकांत सोमण. वझलवार कॉलेजचे भाषा विषयाचे प्रमुख.भाषा विषय विज्ञानासारखा तर्कनिष्ठेने शिकवणारे शिक्षक. नावालाच वझलवारचे शिक्षक .देशभर दौरे.आजचे लेक्चर वर्षभरात होणार्या दोन पैकी एक .तीन तासाच्या लेक्चरनंतर तीन तास शंकासमाधान.
मराठीतील गूढ कविता ...सकाळी साडेनउपासून आज सुरुवात झाली आहे...
" मुका चाफा कसा फुलून येतो. देहासक्ती संपलेला संन्यासी आहे का चाफा?
पानन् पान गळून गेल्यावर चाफा कसा फुलतो. चाफाच का?
हे फुलणं फक्त कावळ्यालाच का दिसावं?"
लेखण्या भरभर चालत होत्या . सौंदर्याशास्त्राच्या अंगानी कवितेचे रसग्रहण . वर्षातले एकुलते एक लेक्चर असते.
हिरवी पानं पोक्त पिवळी होतात तेव्हा त्यांना कळत असतं का की जीवन क्रमाचा हा शेवटचा टप्पा आहे?
त्यांच्या मागे नवीन कोंब उभा आहे. नाटकाच्या स्टेजवरच्या विंगेत नट वाट बघत असावा तसा?
नाही. हे वाक्य गाळा .आपण आता सौंदर्यतर्क करतो आहे. हे स्वातंत्र्य तर्कसंगतीत आपल्या आहे पण कवीच्या नाही.सरसर वर्ग पुढे जातो आहे.
****
चला सतारीचे बोल पहा.
... सतारीचे बोल... दिडदा ..दिडदा...का दिडदा दिडदा
कारण ही कविता तराणा आहे .
तराणा कसा?
चला परत एकदा भावनांची पेशकारी बघा शास्त्रीय संगीताच्या अंगाने.
आधी नोमथोम.गायक आपली ओळख साधर्म्याच्या अंगाने पटवतो आहे.
मग आलापी ..ओळखीचा पहिला टप्पा..
मूड बनला? चला ताबा घ्या मनाचा...
अंतरा ..खात्री पटली
आता दृत..रागीणीच्या बरोबरीनी ताना... पट्टे.
आता तराणा
शब्दांची गरज संपली आहे
सायुज्यता .साधर्म्य सगळं मागे पडलं आहे,फक्त सरूपता..
क्रेसेंडो..
जर सतारीचे बोल सजायचे असतील तर कविता संगीताच्या अंगाने वाचा.
ही छुपी कळ कविजवळच असते.
प्राचीन आणि अर्वाचीन असा फरक नाही
बघा समर्थांची आरती
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी
संख्या चंद्रकळा गुणे..
काय अर्थ लागतोय का?
सोळाव्या वर्षी विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले..
विद्यार्थी मोहीनी मुग्ध..
*****
स ..सर..
दारात शिपाई उभा आहे..
तुमचे पाहुणे आलेत.
सोमण एकदा डोळे पुसतो..उत्कटतेने बोलताना हा एक मोठा अडथळा.
पंधरा मिनीटानी भेटू या.
मनमोहन अग्रवाल उभे होते. सोमणांना पाहून ते पुढे आले.
नमस्कार. माझं काम झालंच असेल.
सोमण काही जास्त न बोलता एक बॉक्स पुढे करतो. ह्यात सोळा सीडीज आहेत.चार कोरकूंच्या .
मला एक उलगडा कराल का?
अग्रवाल काही न बोलता खिशातून एक बंद पाकीट काढून सोमणच्या हातात देतात.
एक लाख पंचेचाळीस हजार.आतापर्यंत कापलेल्या कराचं प्रमाणपत्र सोबत आहेच.
या संस्थेचा कायम स्वरूपी पत्ता नाहीये का?
माफ करा सर पण त्यांना आताच सगळी माहिती देण्यात रस नाही.
त्यातून तुमच्या कामाची थोरवी ऐकून ते आलेत म्हणजे...काही कमी वाटल्यास तुम्ही मला सांगण्यात संकोच करू नका.
नाही पैशाचा काहीच प्रश्न नाही..मला एक उत्सुकता होती की...
वाक्य संपायची वाट न बघता वकील साहेब चालायला लागले होते.
सोमणचा मूड खराब झाला होता.
जवळजवळ चौतीस आदिवासी भाषांचा तौलनीक अभ्यास ..
किंमत रुपये सव्वा तीन लाख.
काल बायको म्हणाली ते खरेच.
कुणी दिले असते असे पैसे.
****
सोमण वर्गावर परत आला विषय पुढे सुरु झाला......
शब्द म्हणजे मनावर एक आघात. या आघाताचे उठलेले तरंग म्हणजे विचार .एका नविन शब्द समूहात.
शब्दात बांधलेली भाषा त्याच रुपात परत उत्तर देते.ही भाषेची मर्यादा .
म्हणूनच नवी भाषा शिकणे लहानपणी जेव्हढे सोपे तेव्हढे मोठेपणी कठीण.
असेही काही मानव असतील ज्यांना भाषेशिवाय विचार करता येत असतील?एक स्मार्ट प्रश्न .
होय. पण त्याची ग्वाही देणं माझ्यासारखे भाषाशास्त्री देउ शकणार नाहीत. तो विज्ञानाचा विषय आहे
पण सर ज्या मानसीक स्तराची आपण चर्चा करतो आहे त्या स्तरावर भाषा विज्ञानच नाही का?
येस. खरं आहे पण एंडोर्समेंट कुठल्यातरी बोली भाषेतच मिळणार ना मग ....
वर्गात शांतता.
असो ..आज थांबू या इथे.
भाषाशास्त्राचा अभ्यास करताना तर्काचे बोट धरूनच फिरावे लागेल .आतापर्यंत चर्चेत आलेल्या कविता मायाबाजारासारख्या आहेत. तर्काबाहेरचा एक विचार मनाचा पट सहज उधळून टाकेल.
आता सोमणांना थांबावेसे वाटत होते. सोळा सीडीज मधले भाषाविज्ञान त्या अज्ञात राजकुमाराला भाषेशिवाय विचार करायला शिकवणार होते.या मुलांना ते शिकवणं शक्य नव्हतं .करारातला अविभाज्य भाग हेच सांगत होता की सव्वातीन लाखात त्यांनी ..
इतिहास काळात पैशाची नड असलेला गायक एखादा राग गहाण ठेवयचा तसंच.
(आणि म्हणूनच ज्या मुलाच्या जन्माची तयारी अग्रवाल वकीलाचे अशिल करत आहेत ते मूल बोलायला लागल्यावर भाषा हे बंधन नसेल.या मुलाचे मन एकाच वेळी अनेक विचार भाषेशिवाय करेल.)
---------------------------------------------------------------------------------------------------
नाईटला जायचं आहे या विचारानी सरीताच्या मनात परत एकदा खळबळ माजली. तो असेल का बाहेर उभा. एक सोपासा विचार केला.पै ला फोन केला. पै मेस मध्ये जेवत होता.
रात्री सगेवाल्यांचे पास चेक करू या. पास नसतील त्यांना बाहेर हाकलू या.पैनी सांगीतल्यावर ती रिलॅक्स झाली.केईएम च्या दहा नंबरला एक जिना डिन च्या ऑफीससमोरून जातो.या जिन्याचं एक रेप्युटेशन आहे. निर्ढावलेले वॉर्ड बॉईज सुद्धा रात्री हा जिना
टाळतात.सरीताला या भितीची भिती कधीच नव्हती. गेटवर आल्यावर तिनी सिक्युरीतीला सोबत घेतलं.वॉर्डच्या बाहेर रेंगाळणार्या सगळ्या सगेवाल्यांचे पास तपासले.दोघा-चौघांना हाकलून दिले.तो मात्र कुठचं दिसत नव्हता.तो उंच माणूस कोपर्यातल्या पीसीओवर बोलत होता. सरीताला पाह्यल्यावर तो पुढे आलाच.
तुमचा सासरा कुठे आहे?
ते येणार नाहीत.
बरं आहे . नाहीतर आज आम्ही फटकवणारच होतो त्यांना. स्टाफच्या मागे मागे...सिक्युरीटीचा चौगुले म्हणाला.
मला कल्पना आहे.ते इथं पाऊल पण टाकणार नाहीत.मी माफी मागतो.
प्रकरण बंद झालं.
एक गोष्ट सरीताच्या लक्षात आली की हा माणूस फार प्लेन बोलतो आहे.दोन वेगळे किंवा छुपा अर्थ असलं असं काहीच त्याच्या बोलण्यात नाही.
चौगुलेची पाठ वळल्यावर पुन्हा त्याला बोलावलं.
तुमची बायको फार सिरीयस आहे. हे लक्षात घेउन मी तक्रार करत नाही आहे ...पण
आणि हो आज मी तुम्हाला प्रार्थना करायला ...वाक्य अपूर्णच राहीलं. खानोलकर, पारेख, पै ,नाईक सगळी न्युरो मंडळी वॉर्डात घाईघाईत आली.सावलीच्या बेड जवळ कोंडाळं करून चर्चा सुरु झाली.
आश्चर्य म्हणजे मेडीसीनचा सिनीयर , रेडीओलॉजीचा सिनीयर पण त्यांना जॉईन झाले होते.
खानोलकरनी सुरुवात केली. अर्धवट कान देत सरीता पण ऐकायला लागली.सावलीचा नवरा कोंडाळ्याच्या मागे शांतपणे उभा राहीला होता.संध्याकाळी सगळे रिपोर्ट आले होते.
पै सकाळी बॉस काय म्हणाले?
एलेक्ट्रोलाईट इस्पेशली मॅग्नेशिअम , झिंक देखो. मॉनीटर करो.
व्हाय?
पै नी या प्रश्नाची तयारी केली होती.
कारण Magngesium acts as a catalyst conductor in the synapses of the brain's memory centers.
फाईन.स्कॅन दाखव. ..
ट्युबलाईटच्या प्रकाशात प्लेट धरून खानोलकरनी दाखवलं.लूक ..इथं दिसतय पहा convex, lens-shaped याला म्हणायचं extracerebral hemorrhage
Epidural hematoma (EDH) पै नाईक जीवाचे कान करून ऐकत होते .दुसर्या युनीटचे सिनीअर लक्ष देऊन बघत होते
आता सूलीनी प्लेट हातात घेतली..येस. यु आर राईट.
स्टाफ वॉमीटींग किती आहे?
मी आल्यापासून नाही. ओव्हर देताना स्टाफनी पण काही नोट केलं नाहीये. सरीतानी सांगीतलं
Epidural hematoma कवटीच्या आत प्रेशर तयार करतं.म्हणजे एडीमा ?
वेल , सो फार ,कमी आहे.
ब्लीडींग बंद आहे. गूड.
कमॉन बॉईज फास्ट रिव्हिजन करू या
नो leaking cerebrospinal fluid ..
नो बेसीलर फ्रॅक्चर सगळे जण एका सुरात म्हणाले..
नो संकन आईज ऑर नोज्
non-indicative maxillar fracture ..
मेंदूवर सूज नाही ,रक्त थांबलं आहे. पाणी वाहत नाही और..ऑल व्हायटल ..ओके.
decompressive craniectomy प्रश्नच येत नाही
पै आता रंगात आला होता
पण मग आपण काय करायचं काय . ही आपोआप बरी होणार आणि घरी जाणार..
खानोलकरनी एक दयार्द्र नजर टाकली.
गायनॅकच्या सिनीअरकडे टक लावून बघतोस त्यापेक्षा अल्ट्रा साउंड बघा..
सरीताच्या हातून इंजेक्शन बल्ब पडला..खळ् कन फुटला..
सगळे टारगटासारखे हसले.
सूलीनी अल्ट्रा साउंडचे रीपोर्ट दाखवले. प्लेसेंटा जागेवर आहे. बेबी हेल्दी आहे.
आय डोंट सजेस्ट...
मेडीसीनचा सिनीअर पुढे झाला.
(खानोलकरची टीम लीडर म्हणून कामगीरी कौतुक करण्यासारखी होती.
एका वेळेस तीन टीमच्या सिनीअरना हाताशी धरून ठेवणं कठीण असतं.)
पेशंट सरफेसवर आला की मेमरी लॉस शक्य आहे..
मला वाटतं pemoline मॅग्नेशियम रायलट्युब मधून देऊ या का?
उद्या नागपाल सर आले की तुला कॉल देतो..
या ड्रगचे इंडीकेशन काय आहेत?
यार बच्चू है पेटमें पारेखचा सूर काळजीचा होता.
हम्म .. खरं आहे.. सिस् pemoline असेल का?
फार्मा ला विचारते सकाळी.. सरीता म्हणाली.
पण द्यायचं का?
सगेवाल्याची परवानगी घ्या.
तो उंच माणूस पुढे आला . सर...as late as Sep 2004 the US army still admits to dispensing pemoline for ADD and "narcolepsy" and when they say narcolepsy, they mean pep pills. Basically, soldiers are expected to perform at abnormal rates for abnormal periods.
सगळी टीम एक क्षण गप्प झाली ..
आपण कोण?
मी व्यंकटेश प्रसाद.एक पातळ बिझिनेस कार्ड त्यानी खानोलकरच्या हातात दिलं .
सायनो लॅब्ज .न्यु मेक्सीको.
आय डोंट बिलीव्ह धिस...
मेडीसीनचा सिनीअर म्हणाला गेल्या महीन्यात पुण्याला आगाखान मध्ये तुमचं सेमीनार होतं .
मिस्टर आय ऍम सॉरी डॉक्टर प्रसाद काल पासून तुम्ही इथे आहात पण ..
इट्स ओके. लाईन ऑफ ट्रीटमेंट जशी असायला हवी तशी होती ..वेल आय हॅड सम पर्सनल प्रॉब्लेम टू डील..
प्रसादनी हलकेच हाक मारली
सिस् माय अपोलॉजीज.
सरीताला काय बोलावं ते कळेना.
सर कॅन वी हॅव प्रीविलेज ऑफ डिनर टूगेदर...
सम अदर डे.अ डे बीफोर डिसचार्ज परहॅप्स..
सगळे आनंदात आपापल्या होस्टेलच्या दिशेनी गेले.
सावलीचे पल्स चेक करण्याच्या निमीत्तानं सरीता पुढे झाली .
सर आय ऍम सॉरी..
सिस् नेवर माईंड त्रिभुवन मूर्ख आहे.
सरीताकडे बघून प्रसाद हसले.
नो हार्ड फीलींग्ज
नजरेला नजर देणं कठीण झालं सरीताला.ती त्यांच्या कडे बघून हसली. आता जराजरा नीट निरखून पाह्यल्यावर तिला कळलं की प्रसाद एक देखणा ..
सिस् टाईम टू प्रे.
काल रात्रीची तिला आठवण झाली.
सर ती घंटी वाजवू नका.प्लीज सर .. त्या आवाजानी झोप येते.
काल मी मनाई केली होती ती घंटी वाजवायला.
त्याचा चेहेरा पडला .
मॅडम या घंटीचा आवाज येणं शक्य नाही. खिशातून घंटी बाहेर काढून त्यानी दाखवली.त्या घंटीला टोला नव्हता.
मग रात्री मला किणकिण ऐकू येत होती ती कशी?
कसं शक्य आहे.?
या घंटीचा आवाज फक्त...माय गॉड.. आता आवाजात आश्चर्य आलं.
आता बघा
त्यानी घंटी हातात दिली.
ओके हलवून बघा..
आला आवाज ?नाही ना?
मॅडम आवाज फक्त दोयुग्मांना ऐकू येतो.
आता बघा , त्यानी हातातली घंटी एका वेगळ्याच प्रकारे फिरवली.
किण्..किण ..
आला आवाज .होय येतोय आता आवाज.
मॅडम हे शक्य नाही. परत ऐका.
येतोय आवाज
होय येतोय. त्याचे डोळे विस्फारले.
याचा अर्थ तुम्ही पण..दोयुग्मा..
सरीताला खुळचटपणाचा राग आला .
मॅडम इकडे लक्ष द्या...आवाज वेगळा आला.
जर तुम्ही म्हणता ते खरं असेल तर ..यु आर द ब्लेस्ड वन
आता पुढे येउन त्यानी रस्ता अडवला.डोळे चेहेर्याकडे रोखून तो स्तब्ध झाला.
नाव बी सिरीयस. काल जर आवाज ऐकू आला असेल तर त्यामुळेच तुम्ही आज त्रिभुवनच्या हल्ल्यात वाचलात .
कोण त्रिभुवन ? कसला हल्ला?
त्रिभुवन ? माझे सासरे.
निळेडोळे आणखीनच गडद झाले.
तुम्हाला रस्त्यात ज्यानी गाठलं तो त्रिभुवन. तो हल्ला मानसिक पातळीवर होता.
तुमची स्मरण शक्ती ताब्यात घेउन त्यानी काही शोधायचा प्रयत्न केला. असफल झाला.
काल रात्री ह्या किणकिणाटाने एक फायरवॉल बनवली आहे तुमच्या मनात.त्रिभुवनचे सगळे प्रयत्न बाउंन्स झाले ते या फायर वॉलमुळे.
सी धिस सरफेस .
त्यानी हातातली घंटी दाखवली. याच्या सरफेस वर चांदीचे नॅनो पार्टीकल आहेत.
ही अशी फिरवली तर वेव्हज येतात पण त्या फक्त ट्रेंड ब्रेनलाच.
अदरवाइज नॅचरल दोयुग्मांना.
सिस् आय ऍम सो हॅपी . यु आर वन ऑफ अस.
प्रसादच्या निळ्या डोळ्यांच्या मोहेनीतून बाहेर यायला सरीताला बराच वेळ लागला.
अजून नाईटचे सात दिवस बाकी आहेत आनि आजच्या रात्रीचे सात तास.
प्रसाद , मला आज झोपायचं नाही आहे.
अपरीचीत माणसाशी का एव्हढी सलगी? तिच्या मनानी दटावलं. पण मन ऐकेनाच.
बाहेरच्या कॉरीडार मधून कुणितरी ट्रांझीस्टर घेउन जात होतं.
तिचं आवडतं गाणं.
नैनमे सखी शाम समाए.
----------------------------------------------------------------------------------------------
क्रम पुढे चालू...
प्रतिक्रिया
25 Aug 2008 - 10:13 pm | रामदास
http://www.misalpav.com/node/3116
http://www.misalpav.com/node/3022
तिसर्या भागात बराच भाग मेडीकलचा आहे. थोडं हळू हळू वाचा.
26 Aug 2008 - 12:10 am | चतुरंग
वाचतो आहे. मेडिकल मधले डीटेल्स देण्याचे तुमचे कौशल्य लाजवाब!
एक खिळवून ठेवणारा प्रवाह! येऊदेत भराभर!
चतुरंग
26 Aug 2008 - 12:40 am | प्राजु
मेडिकल चे डिटेल्स.. थोडे जड जाताहेत. पण लेखन उत्कंठावर्धक आहे.
एक सुचना वजा सजेशन देऊ का.. संवाद हे कोणी म्हंटले याचे नीट डिटेल्स देता आले तर पहा. वाचताना गोंधळ नाही होणार..
म्हणजे..
मॅडम इकडे लक्ष द्या...आवाज वेगळा आला.
जर तुम्ही म्हणता ते खरं असेल तर ..यु आर द ब्लेस्ड वन
आता पुढे येउन त्यानी रस्ता अडवला.डोळे चेहेर्याकडे रोखून तो स्तब्ध झाला.
नाव बी सिरीयस. काल जर आवाज ऐकू आला असेल तर त्यामुळेच तुम्ही आज त्रिभुवनच्या हल्ल्यात वाचलात .
कोण त्रिभुवन ? कसला हल्ला?
त्रिभुवन ? माझे सासरे.
हाच पॅरा..
तो उंच माणूस : मॅडम इकडे लक्ष द्या...आवाज वेगळा आला. जर तुम्ही म्हणता ते खरं असेल तर ..यु आर द ब्लेस्ड वन
आता पुढे येउन त्यानी रस्ता अडवला.डोळे चेहेर्याकडे रोखून तो स्तब्ध झाला. म्हणाला, "नाव बी सिरीयस. काल जर आवाज ऐकू आला असेल तर त्यामुळेच तुम्ही आज त्रिभुवनच्या हल्ल्यात वाचलात ."
सरिता : कोण त्रिभुवन ? कसला हल्ला?
तो उंच माणूस : त्रिभुवन ? माझे सासरे.
असा वाचायला आणि समजायला सोपा जातो.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
27 Aug 2008 - 6:02 pm | विसोबा खेचर
प्राजुच्या मुद्याशी सहमत...
बाकी रामदासराव, लेखन केवळ उत्तम!
तात्या.
26 Aug 2008 - 1:31 am | नारायणी
प्राजुशी १००% सहमत.
26 Aug 2008 - 2:50 am | एक
पुढच्या भागांची प्रचंड उत्सुकता आहे.
26 Aug 2008 - 6:53 am | मेघना भुस्कुटे
आता धीर धरणं कठीण आहे. प्लीज लवकर लवकर टाका.
26 Aug 2008 - 9:26 am | आनंदयात्री
रंगलीये स्टोरी !! येउद्या अजुन.
प्राजुशी सहमत, पण ते नंतर करा, म्हणजे आधी तुमच्या मनात जसे येते तसे उतरवा मग एक सेकंड इटरेशन करा !
-
(रामदास दोयुग्माचा फ्यान)
आंद्या दोयुग्मा
26 Aug 2008 - 11:23 am | डॉ.प्रसाद दाढे
हे काहीतरी वेगळेच राक्षस रसायन दिसत॑य.. डोके हळूहळू काम करत॑य. रामदासजी फारच पोहोचलेले लेखक आहेत!
26 Aug 2008 - 4:20 pm | चिमणी
पण हा दोयुग्मा काय प्रकार आहे?
तुम्ही खूप छान लिहिता आहात. अगदी खिळून रहायला होते. पण कधीकधी नक्की कोण बोलतं आहे आणि कोणाबद्दल बोलणे चालू आहे ते कळत नाही. थोडे मागे येऊन परत २-३दा वाचावे लागते. यात थोडा रसभंग होतो.
28 Aug 2008 - 8:07 am | मदनबाण
वाचतो आहे ,,पुढचा भाग लवकर येऊ ध्या..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
28 Aug 2008 - 12:54 pm | अनिल हटेला
आयला मस्त मजा येते अस काही वेगळ वाचायच म्हटल्यावर !!
येउ देत पूढील भाग भराभर !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
26 Jul 2012 - 2:41 pm | विजुभाऊ
.
16 Aug 2012 - 1:58 pm | एकुजाधव
काय जबरा लिहिलय राव.
30 Apr 2013 - 2:18 pm | स्मिता चौगुले
पुढ्चे भाग कुठे आहेत? कोणी धागे देवु शकेल का?
28 Mar 2016 - 12:41 am | Rahul D
पुढ्चे भागाचे धागे कोणी देवु शकेल का?
21 Dec 2018 - 8:22 pm | माधुरी विनायक
पुढचे भाग..??
23 Dec 2018 - 6:27 am | विजुभाऊ
बरे झाले हे लिखाण वर आणलेत.
रामदास काका खरेच खूप छान ल्हितात.
28 Dec 2018 - 4:54 pm | सविता००१
नजरेतून सुटून गेलं होतं. आत्ता वाचले तिन्ही भाग. काका, पुढचे भाग???????
25 Jul 2019 - 1:48 am | diggi12
Pudhche bhag kevha
25 Jul 2019 - 2:08 pm | विजुभाऊ
धन्यवाद हा धागा वर आणल्याबद्दल
14 Mar 2023 - 11:07 pm | amit_m
Next?