मानवाचा वानरापासून नरापर्यंतचा प्रवास उत्क्रांतीवादाच्या आधारानी जवळजवळ आता सर्वमान्य झाला आहे. पण काही जण एका वेगळ्या मतप्रवाहाचे पुरस्कर्ते आहेत.त्यांच्या मते माणसाचं बिज परग्रहावरून आलेलं आहे.काहीजण असंही म्हणतात की माणूस ही सरमिसळ जमात आहे. पृथ्वीवरची मानव जमात आणि परग्रहावरची मानव जमात शरीरानी एकसारखी असल्यामुळे हा प्रवाह एकत्र कधी झाला हे कळायला वैज्ञानीक सिद्धांत अपूरे आहेत.पण परग्रहावरची ती मानव जमात आपल्यापेक्षा ऊच्चतम होती. आजही शुद्ध वाण कुठंतरी आहे.ते आपल्यापेक्षा श्रेष्ठआहेत.त्यांना ते कळलं नसावं अजूनही.वेगळेपणा कळेल तेव्हा काय होईल. ते आपले असतील का?आपली आई इथली की ...
युरी गेलरचं चरीत्र वाचल्यावर मलाही असंच वाटलं.अशी माणसं येतात तरी कुठल्या वाणातून? जर त्यांनी उद्या वेगळं व्हायचं ठरवलं तर?
कथा काल्पनीक आहे.कुणिही वैज्ञानीक कस लावू नये इतकी काल्पनीक ठेवली आहे.पण वेगळेपणाची जाण आली तर ?कथा किती मोठी आहे याचा अंदाज मलाही आज नाही. क्रमानी लिहिणं भाग आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वॉर्ड नंबर दहा:
सरीतानी एकदा परत अंदाज घेतला.आजची इमरजंसी फार हेवी नसेल बहुधा.साडेअकरा वाजता दोन ऍडमिशन .किरकोळ हेड इंज्युरी.सकाळी बॉसची फेरी झाल्यावर डिसचार्ज.
दहीहंडी होऊन गेली होती.रविवार म्हणजे कार ऍक्सीडेंट कमीच. आली केस तर पहाटेचं .नाईट सुपरचा राउंड दिड वाजता.सरीतानी बाबाला हाक मारली. आल्यापासून बाबा दिसलीच नव्हती.मरीयमला बघितल्यावर जरा बरं वाटलं.फारच शिकाउ पाठवली नव्हती.तसं पाहिलं तर न्युरोच्या वॉर्डला जरा बर्या मुली येतात. जनरल मेडीसीनची इमरजंसी असली तर दोन बाबा तरी लागतातच. न्युरोला एक जरी असली तरी पुरते.ट्रान्सफर सकाळी येतात.
बाबा ,ट्रे लेके आ.चार नंबर का बीपी अवरली है. दस का टेंपरेचर अवरली है.
सेरी.. मै देखता है.
बाबा गेल्यावर एक राऊंड घेतला. दोन नंबरची राईल ट्यूब जागेवर चिकटवली. तिची सगेवाली गाढ झोपली होती. तिला एक धक्क्का देत उठवून ती सोळा कडे गेली .
गुरुवारी तिला शंट टाकला होता. आता हळूहळू हुंकार देत रडत होती.
ताप आहे का?
आई असावी , तिनी मानेनीच नाही सांगीतलं.
टेबलजवळ आल्यावर आठवलं
आयाबाई कौन है रे?
ममता है स्टाफ.
ममता...तेरी जोडीवाली कौन हय आज?
रेखा है स्टाफ..रेखा पूरवा
सरीता आणखी रीलॅक्स झाली.दोन आयाबाई आहेत.
साईड रूम मध्ये पेशंट नव्हता.आय.सी.यू. दोन आठवड्यासाठी बंद होती.
इंजेक्शनचा स्टॉक बघितला. आय.व्ही. सेट ब्लडसेट पुरेशे आहेत की नाही परत अंदाज
घेतला. शरद पंड्या , नागपाल ,कारापूरकर सर तीन बॉस .फार काळजी घ्यावी लागते.ललीत पारीख रजीस्ट्रार. पै-रायतूरकर आणि नाईक हाउसमन. नो टेंशन .
काल लाँग ऑफ होता.आज झोप येण्याची शक्यता नव्हती.
साडे बाराला बाबा हळूच कानाशी लागली.सरीता हसली. नर्सच्या बॉयफ्रेंडला फार जागरणं करावी लागतात.बाबा बाहेर पीसीओ वर चिकटली.अर्धा तास असाच शांततेत गेला.थोड्या वेळानी बाहेर मोठमोठ्यानी बोलण्याचे आवाज आले.बाबा आत आली कामाला लागली.आवाजावरून सरीतानी ओळखलं होतं ललीतपारीख आलाय. रजीस्ट्रार आलाय म्हणजे ऍडमिशन असणारच.सोबत त्याचा रीडर बघून तिला जास्तच आश्चर्य वाटलं.व्हीआयपी ऍडमिशन असावी बहुतेक.
क्या स्टाफ आराम है ना आज.?
तुम्ही आलाय म्हणजे आराम संपला आमचा.
आज हाऊसमन कुठेय तुमचा?
स्टाफी मला एक सांगत्या पैची तू वाट का बघतेस?
सरीतानी दुर्लक्ष करून रीडरला विचारलं सर व्हीआयपी एडमिशन आहे का?
तो केस पेपर वाचता वाचता म्हणाला मलाही तोच प्रश्न पडतोय .
काय?
तू पै रायतूरकरची वाटका बघत्येयस?
सर काहीतरी काय?
त्याच्या राउंडची वेळ झाली म्हणून..
म्हणजे हा रोज राउंड पण घेतो?
खानोलकर आणि ललीत खदखदा हसायला लागले.
बाहेर किटलीचा आवाज आला.दिड वाजले .पँट्रीचा चहा आला होता.
चला चहा घे पटापट.ऍडमिशन ऑन द वे आहे.
सरीताचा प्रश्नार्थक चेहेरा पाहून खानोलकर म्हणाला.मेजर आहे हेड इंज्युरी.ब्लीडींग. ते नाही थांबलं तर शॉक. एक्सप्रेस हायवे .
ब्लड?
येउ दे तुझा हाउसमन. लिहील मेमो.
बाय द वे. आयाबाईला गायनॅकचा कॉल घेऊन पाठव .
आता हे काय?
सात महिन्याची प्रेग्नंसी आहे..
बरं झालं सर तुम्ही आलात
मी आलो कसला? या पोरांना रूम वर शिकवत होतो ..
आता आहे म्हणून आहे.
थांबू नारे ? हा प्रश्न ललीत साठी होता.
मालीक ही इमर्जंन्सी मी त्या हांगपळ्याला घेऊन पार नाही करणार .थांबा ना बॉस.
खानोलकर थांबणार हे सगळ्यांना माहिती होतं.
एव्हढं बोलता बोलता ओटीची ट्रॉली हळूच पाठीमगे येऊन उभी राहिली होती.
आवाज न करणारीट्रॉली फक्त ओटीची असते बाकी सगळ्या धडलधूक आवाज करत येतात.
पेशंट चाळीशीची बाई होती. बँडेज गुंडाळलं होतं. नाकात रायल ट्युब.आयव्ही.कॅथेटर.युरीन बॅग .एका हाताला आणखी एक कॅनुला लावूनच ठेवला होता.बाबा पुढे झाली .तिनी ओटीच्या नर्सकडून बूक घेऊन स्टाफ कडे दिलं.दोन्ही आयाबाई आल्या. ट्रॉली बेडजवळ घेऊन पेशंटला अलगद उतरवलं.ओटीचा आयव्ही सेट, चादर,मॅकींटॉश परत दिला.पेशंटचा सगेवाला पुढेपाठी घुटमळत होता.
आतापर्यंत कुणाचंच लक्ष त्याच्याकडे नव्हतं.
आयाबाईनी स्क्रीन लावला तेव्हा बिचारा मुकाट दूर उभा राहीला.
बाबानी एक स्पंजटॉवेल आणून चेहेर खसखसून पुसला. बाई जागृतीच्या सिमारेषेवर आली.
नरेश.. दोयग्मा ..दोयग्मा.आवाज खोलातून येत होता.
सगेवाल्यानी डोळे पुसून बाहेरूनच आवाज दिला .
सावली ,नरेश आयेगा.
खानोलकरनी खूण करून त्याला बोलावलं तेव्हा सरीतानी त्याचा चेहेरा पाहिला. माय गॉड ..काय निळे डोळे आहेत या माणसाचे..
त्याचे कपडे मळले होते , खोचलेला शर्टा अर्धवट बाहेर आला होता.कफची बटनं तुटली होती. पण चेहेर्यावर एक विलक्षण तेज होतं.
ओळख नसूनही ओळखीचा चेहेरा वाटतं होता.
आता परत मोठ्यानी हसण्याचा आवाज आला.
घ्या हाउसमन आला तुमचा. खानोलकर म्हणाला.
ललीत पेपर पाहण्यात मग्न होता.
पोलीस रिपोर्ट कुठे आहे?
आणलाय मी . पै म्हणाला.साले हवालदार सगेवाल्याला पाठवा म्हणतात.
ओ, सगेवाले इकडे या बाहेर हवालदार उभा आहे त्याला भेटा.
तो उंच माणूस बाहेर गेला.
ते आलेत हं.सरीताला नाटकी आवाजात पै म्हणाला.
डॉ.पै ,आपले रीडर इथे आहेत. ..सरीतानी नाटकी आवाजात उत्तर दिलं.
आयाबाईंच काम संपलं होतं.
खानोलकरनी आवाज दिला. सिस, ये इंजेक्शन स्टॅट.
चलो बॉईज काम पे आ जाव.तिघंही पेशंटच्या बेड जवळ उभं राहून हलक्या आवाजात बोलायला लागले.रात्रीचे अडीच वाजले होते.
वॉर्ड मध्ये शांतता आणि टेंशन जाणवायला लागलं.दूर कुठेतरी रडण्याचा आवाज आला.चार पाच बायकांचा बोलण्याचा आवाज आला...आणि बंद झाला.
फॅनचा आवाज अचानक वाढला.
नाईट सुपर हातात टॉर्च घेऊन वॉर्ड मध्ये आली.
कशी हाय हेवी का लाईट?
सरीतानी तिघांकडे बोटदाखवलं?
तिला बघून खानोलकर हसला.परत चर्चेत मग्न झाला.
बाहेर हिचा सगेवाला आहे का?
हो असेल . हवालदार सांगत होता.
काय?
काही नाही ..सांगते नंतर..
पेशंट कडे लक्ष दे .उद्या सांगते बाकी..
ललीतनी आवाज दिला
स्टाफ गायनॅकला कॉल पाठवला का?
होय सर.
...आणि त्या रीलेटीव्हला बोलाव , ब्लड आणि सर्जरी फॉर्म वर सही घे.
आत्ता?
हां आत्ता
सेक्शन घ्यायला लागेल बहुतेक.
लगबग सुरु झाली .
चारचे ठोके वाजले.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
13 Aug 2008 - 8:49 pm | रामदास
चुकला नेहेमीप्रमाणे. अंशात गणित चुकलं .वाचा.
13 Aug 2008 - 10:40 pm | एक
गोष्टी मला नेहमीच आवडतात. ही पण आवडते आहे (मुख्य म्हणजे "माणसाचं बिज परग्रहावरून आलेलं आह" हा मला आवडणारा सिद्धांत आहे)
पण या गोष्टीतली भाषा समजायला थोडी अवघड गेली..
हॉस्पीटल-मेडीकल टर्म्स फारशा माहित नसल्यामुळेच असेल्..अश्या टर्म्सचा थोडासा खुलासा कराल का?
उ.दा. रिडर म्हणजे काय? रिडर, हाऊसमन रेजिस्त्रार यांचे रोल्स काय आणि त्यात कोणकोणाचा सिनियर असतो हे काहीच माहित नाही, म्हणून थोडं अवघड जात आहे.
रसभंग होत नसेल तर खुलासा द्या. नाहीतर एखाद्या डॉ. मित्राला गाठतो..
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..
14 Aug 2008 - 6:08 am | रामदास
>रिडर, हाऊसमन रेजिस्त्रार यांचे रोल्स काय आणि त्यात कोणकोणाचा सिनियर असतो हे काहीच माहित नाही, म्हणून थोडं अवघड जात आहे.
रीडर सिनीअर पीजी केलेला असतो. ही जनरली रेसिडेंट पोस्ट नसते.
रजीस्ट्रर आणि हाउसमन पोस्ट-ग्रॅड. विद्यार्थी असतात.
हाउसमन सगळ्यात ज्युनीयर .
हॉस्पीटलच्या टिपीकल इमरजंसी नाईटचे हे वर्णन आहे.
युरी गेलर
अतीमानवी शक्तीचं युरी गेलर हे एक उदाहरण आहे. हा माणूस स्टीलचे काटेचमचे दोन बोटानी वळून टाकतो.गोष्ट लिहिण्यापुरता त्याचा रेफ. दिला आहे.
14 Aug 2008 - 10:54 am | II राजे II (not verified)
युरी गेलर
अतीमानवी शक्तीचं युरी गेलर हे एक उदाहरण आहे. हा माणूस स्टीलचे काटेचमचे दोन बोटानी वळून टाकतो.गोष्ट लिहिण्यापुरता त्याचा रेफ. दिला आहे.
शक्यतो नाही .... युरी ट्रीक्स वापरत होतो....
हा दुवा पहा... युटूब चा ;)
http://in.youtube.com/watch?v=M9w7jHYriFo
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
14 Aug 2008 - 8:13 am | अनिल हटेला
वाचायला सुरुवात केली ,
पण थोडस जड जातये ......
कारण संभाषण नेमक कोन कुणाशी करतये हे लवकर लक्षात येत नाही ...
आणी टर्म्स सांगितल्या बद्दल धन्यवाद ....
बाकी गुंतवुन ठेवणारी कथा आहे...
पू भा प्र......
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
14 Aug 2008 - 8:47 am | डॉ.प्रसाद दाढे
मस्त सुरूवात रामदासजी! ता॑त्रिकदृष्ट्यासुद्धा अचूक आहे (अर्थात त्यात काय नवीन आहे असे कुणी म्हणेल :)
14 Aug 2008 - 9:08 am | डॉ.प्रसाद दाढे
हाऊसमन (हा फक्त ग्रॅजुएट)- ज्युनिअर रेसिड॑ट- सिनीअर रेसिड॑ट- चीफ रेसिड॑ट (हे पोस्ट ग्रॅज्युएशन करणारे अनुक्रमे पहिल्या, दुसर्या व तिसर्या वर्षाचे विद्यार्थी असतात)-लेक्चरर (हा फ्रेश पास आउट एम.डी वा एम.एस) - असोसिएट प्रोफेसर (पाच वर्षे अनुभव) - प्रोफेसर (आठ वर्षे अनुभव) -हेड ऑफ डिपा. अशी चढती भाजणी असते. अर्थात ही रचना टिची॑ग इन्स्टिट्यूट्मधली असते.
सिनीअर रजिस्ट्रार हे पीजी केलेले लोक॑ असतात जे सुपर स्पेशालिटी से॑टरमध्ये अनुभवासाठी काम करतात. (जसे की टाटा मेमोरियल)
रामदासजी॑नी त॑तोत॑त वर्णन केल॑ आहे, मला माझे न्यूरो आयसीयू मधले दिवस (जास्तकरून रात्रीच) आठवले. मी ते॑व्हा सिनीअर रेसिडे॑ट होतो.
14 Aug 2008 - 9:22 am | आनंदयात्री
अन बाबा म्हणजे काय ??
14 Aug 2008 - 9:25 am | रामदास
शिकाउ नर्स. स्टाफ म्हणजे फुल ट्रेंड नर्स.
14 Aug 2008 - 9:23 am | आनंदयात्री
रामदास काका इंटरेश्टिंग आहे सुरुवात !
14 Aug 2008 - 11:30 am | बिपिन कार्यकर्ते
सुरुवात छान आहे. लवकर लवकर टाका.
बिपिन.
14 Aug 2008 - 12:30 pm | अरुण मनोहर
रामदास, तुमच्या गोष्टीवेल्हाळ स्टाईलचा हा नमुना पण आवडला.
पण पीसीजेसी सारखे पहील्याच झटक्यात उत्सुकता भुताने झपाटले नाही. असे वाटले तुम्ही देखील काय होईल ते पहू असे म्हणत घडवत घडवत चालत आहात.
पण नो प्रॉब्लेम. दुसऱ्या तिसऱ्या भागात भुत झपाटेल बहुदा.
वाट पहात आहोत.
14 Aug 2008 - 3:10 pm | विदुषक
रामदास काका
तुम्हाला नक्की किति विषयतिल ज्ञान आहे हो ?
पोलिस , आता तर मेडीकल ...........
मजेदार विदुषक