(पहा वेळ झाली!)

डॉ.श्रीकृष्ण राऊत यांची 'कशी वेळ आली?' ही छोटी गजल वाचून आमच्यावर आलेली एक बिकट वेळ अंगावर काटा उभी करुन गेली! Nail Biting Timeout

पहा 'वेळ' झाली!
'ठमा' क्रूर आली!

पळे भीत 'रिंकू';
लपेटून शाली.

करा बंद गाणी;
कुठे ती पळाली?

बिछान्यात माती
बुटांची मिळाली.

कशी ही विचारे;
सदर्‍यास लाली?

मिळे चोप 'रंग्या';
घरी कोतवाली!

चतुरंग

अरे बाप रे!!

आता खरा चोप मिळतोय बहुतेक! मागच्या अठवड्यातले विडंबन ते तसे, आताचे हे असे!

रेवती

पहा 'वेळ'

पहा 'वेळ' झाली!
'ठमा' क्रूर आली!

पळे भीत 'रिंकू';
लपेटून शाली.

रिंकु होणार तर तुमची Wink
'ठमा' क्रूर आली! लैच भारी .. देव वाचवो तुम्हाला !

(अवांतरः मिपाकट्ट्याला प्राजु, शितल वैगेरेंची तुमच्या खटल्याशी ओळख झालीच असेल. फोन करुन खुशाली घ्यायला लावावी म्हणतोय.)