अकादमी 8 :- ऑब्स्टकल आणि रूटमार्च

कैलासवासी सोन्याबापु's picture
कैलासवासी सोन्याबापु in जनातलं, मनातलं
22 Apr 2015 - 3:47 pm

अकादमी मधे प्रवेश करून आता नऊ महीने झालेले. पासआउट परेड उर्फ़ पीओपी साठी फ़क्त दोन महीने उरले होते. आता नवीन काही शिकवत नव्हते , फ़क्त जे काही शिकलोय त्याची तंगड़तोड़ प्रैक्टिस चालली असायची, आम्ही ओसी ही आता बरेच seasoned झालो होतो, आता वेध होते फ़क्त पीओपी चे, कारण त्या दिवशी आम्ही आमच्या घरच्याना भेटणार होतो, बरेचवेळी "पीओपी ला काय होईल??" ह्या विचारात मी अन माझे आसेतु हिमाचल जमलेले मित्र विचार करत असु. पीओपी च्या वेळी कोणाला काय काम मिळेल हे आम्ही बोलत असु. पण पीओपी च्या आधी एक दोन टेस्ट्स बाकी होत्या, एक म्हणजे ऑब्स्टकल कोर्स अन दुसरे म्हणजे रूट मार्च.

अकादमी ला परेड ग्राउंड शेजारच्याच रानात होता तो आमचा जंगल ऑब्स्टकल कोर्स, ट्रेनिंग सुरु झाल्यापासून आम्ही इथे वेगवेगळे अड़थळे पार करायचा अभ्यास करत असु, सुरुवातीला हे ऑब्स्टकल अगदी व्हेग अन रगड़ा टाइप वाटायचे, भारतात सर्वात कठीण ऑब्स्टकल कोर्सेज असणाऱ्या अकादमी म्हणजे मानेसर हरयाणा इथला एनएसजी अकादमी चा कोर्स अन पराकमांडो ट्रेनिंग स्कूल बेळगाव चा कोर्स, 33 ऑब्स्टकल कोर्स होते ते , आमचा तुलनेने थोड़ा छोटा 25 ऑब्स्टकल कोर्स होता. ऑब्स्टकल मधे डिच क्रौलिंग, टारज़न स्विंग, बर्मा ब्रिज (दोराचा एक प्रकारचा झूलता पुल), इत्यादी असंख्य हर्डल्स अन ऑब्स्टकल चे प्रकार असत. आजवर ऑब्स्टकल म्हणजे चिखलात कॉम्बैट ड्रेस घालुन लोळणे इतकेच आम्हाला माहिती होते. पण "टेस्ट" आमचे पुर्ण ट्रेनिंग झाले आहे का नाही हे जोखायला होती, अन ऑब्स्टकल सोबत होता तो "रूट मार्च". हे दोन्ही ही नाईट एक्सरसाइज असतात इतकेच आम्हाला माहिती होते बाकी काहीच नाही. अन आज उस्तादजी आम्हाला त्याची माहिती देत होते.

"ऑब्स्टकल और रुटमार्च, ये मेरा पसंदीदा काम है, मेरी कलाकृतियां माने तुम सब ओसी जंग में या कोई विपदा में कैसे डटे रहोगे इसका ट्रेलर मात्र है, और पिक्चर हिट करना है तो ट्रेलर मजेदार होना जरुरी होता है ऑब्स्टकल और रुटमार्च के डिटेल्ड इंस्ट्रक्शन्स आपको आपके कंपनी के उस्तादजी देंगे,

एकसाथ लाइन तोड़"

आम्ही शर्मा उस्ताद सोबत एका मोठया पिंपळाच्या झाडाबूडी परेड ग्राउंड च्या एका कोपर्यात पोचलो तेव्हा उस्तादजी ने आम्हाला खाली बसवले अन

"बैठे बैठे सावधान" ऑर्डर दिली आता आमचे उस्तादजी पेपटॉक द्यायला लागले,

"हा तो मेरे डेल्टाज, सब फिट?"

"यसssssसरssss"

"कोई तकलीफ???"

"नो सरssss"

"तो ठीक है, अब मैं आपको ऑब्स्टकल कोर्स और रुट मार्च टेस्ट के नियम बताऊंगा, एकहि बार बताऊंगा , इसीलिए इन्हें ध्यान से सुने और पूरी करवाई इन नियमो का पालन करते हुए होगी, कोई शक?"

"नो सरsssss" म्हणुन मी , गौड़ा, पुनीत , समीर , प्रियांशु, अनिल अन नामग्याल कानात प्राण आणून ऐकायला लागलो.

"ऑब्स्टकल और रूटमार्च दोनों रातको होंगे, कोई भी इंस्ट्रक्टर साथ में नहीं होगा, जितना सिखाया गया है सबकुछ इस्तमाल करना है.रूल्स बोहोत सरल है, कोईभी अपने कोईभी बडी को आधे रास्ते में नहीं छोड़ेगा, पुरी कंपनी पुरी करवाई करेगी, कोई भी ऑब्स्टकल छोड़ेगा नहीं, पुरे कोर्स को करना ही होगा, इसमें हम तुम्हारी टीम वर्क की क्षमताएं जाचेंगे, अगर किसी एक ओसी को एखाद ऑब्स्टकल नहीं जमता है तो उसे उसके पार लगाना बाकी कंपनी का जिम्मा होगा, इस तरह पुरा ऑब्स्टकल कोर्स खत्म करते हुए आप लोग अकादमी के आगरा गेट से बाहर निकलेंगे, वहाँ चेकपोस्ट लगेगा हर कंपनी का आने का टाइम और ओसीज की हालत देखने के लिए, अब आपको फूल किट लेडन हालत में एकसाथ एक रात में लगभग 40 किमी का फासला तय करना है, यह फासला तय करने के लिए आपको आपके रूट का एक एक मॅप दिया जायेगा, यहां पर भी एक ही ख्याल रखे , कोई साथी पीछे छुट न जाए डेस्टिनेशन पर पहुंचने के बाद आपको कॅन्टर से वापस अकादमी लाया जायेगा, ये करवाई पुरी निष्ठा और लगन से होगी, आपका पुरा असेसमेंट जब होगा उसमे यह करवाई के भी नंबर जुटेंगे, कोई ढिलाई नहीं बरती जायेगी, आप सब अगले महीने एक अफसर बनने वाले हो वैसेही आपका बर्ताव होगा, अगर कोई कंपनी यह नहीं कर सकती है तो वो उसके उस्ताद की बेइज्जती कहलाती है, ऐसी कंपनी पास आउट नहीं हो सकती, फेल होने पर आप लोगो को 3 चांस मिलेंगे, लगातार फेल होने पर आपकी सर्विस बुक्स की पहली पेज लाल रंग से रंगी जायेगी"

हे भयंकर तर्कट ऐकून मला घामच फुटला, आम्ही सगळे गपगार पडून एकमेकांकडे पाहु लागलो, आमची अस्वस्थता पाहून उस्ताद पुढे बोलले, अन ते जे काही बोलले त्या दमावर आजवर नोकरी झाली, कदाचित रिटायरमेंट पर्यंत ही होऊन जाईल. ते म्हणाले.

"डर गए क्या?? , डरो नहीं अगर तुम डरे तो उनका क्या होगा जो तुम्हारे दम पर सो रहे है. रोज अपने ऑफिस जा रहे है?, तुम ढाल दिए गये हो, कोई कमी नहीं है तुम लोगो में,तुमको लगेगा 40 किमी लंबा सफ़र है, पर मजबुत इरादों के सामने कुछ नहीं है वो, आजतक का रगड़ा, एड़ी पटकना, सलूट , वर्दी , राइफल यहाँ तक की जो खाना रोज खाते हो वो भी इसी पल के लिए था, अगर तुम्हे लगता है की 40 किमी अंतर पीठ पर 20 किलो वजन लादकर चलना नामुमकिन है तो एक बात समझ लो , सिर्फ फिजिकल ताकद से यह नहीं हो सकता, इसके लिए चाहिए मजबुत कलेजा, ऑब्स्टकल के बाद पहले 5 किमी चलने पर मौत भी सुन्दर लगेगी, बदन में दर्द होगा कीचड़ में सना यूनिफार्म होगा टखने और घुटने टूटने के कगार पर होंगे, पर दिल नहीं टूटेगा ,मुझे भरोसा है की तुम सब ये कर सकते हो! जाओ, और अपने शर्मा उस्ताद की लाज बचाओ, कोर्स ऐसा पुरा करो के चारो तरफ डेल्टा के सुरमा अफसरों का बोलबाला हो जाये, कोई शक???"

अन अख्ख्या ट्रेनिंग मधे कधीच ओरडलो नव्हतो इतक्या त्वेषाने आम्ही सात डेल्टा ओरडलो

"नोsssसरsssssssssss"

दिवसभर जसा वेळ मिळेल तसे आम्ही सगळे तयारी ला लागलो होतो, संध्याकाळी आम्हाला हलका नाश्ता दिला गेला, एक ग्लास दूध गुळ शेंगदाणा चिक्की अन एक सफरचंद. तो झाल्यावर आम्हाला "किट अप" करुन कोत उर्फ़ शस्त्रागारा समोर फॉलइन व्हायचे होते. फॉलइन व्हायच्या आधी आम्ही सगळ्यांनी एकमेकांना शुभेच्छा देऊ केल्या.फॉलइन झालो तेव्हा आम्ही सगळे बाय डिफ़ॉल्ट सीरियस म्हणा किंवा व्यग्र झालो होतो. आता एकेका कंपनी ला बोलवुन किट्स चेक करत होते, वजन करुन राइफल सोडून वजन 20 किलो भरायला हवे होते ते कमी पडल्यास तागड्यात तोलुन दगड भरले ज़ात होते किट बॅग मधे, त्या नंतर सगळ्यांना राइफल अन 3 मैगज़ीन दिले गेले, ती राइफल स्लिंग ने गळ्यात लटकवुन मैगज़ीन बॉडी वेस्ट च्या पॉचेस मधे खुपसुन हेलमेट चे स्ट्रॅप ताणुन आम्ही सावधान मधे उभे होतो, तितक्यात स्वतः अद्जुडेँट साहेबांची गाडी आली , जिप्सी मधून उतरलेले अद्जुडेँट साहेब सुद्धा कॉम्बेट ड्रेस मधे होते. परत एकदा कंपनी कमांडर्स ने नफरी दिली व बड़े उस्ताद ने

"श्रीमान 35 ओसी और 6 अदर रँक निरिक्षण में हाजिर है श्रीमान" केले व आदेश आल्यावर पुढची करवाई सुरु करणार इतक्यात आमचे डॉक उर्फ़ डॉक्टर मेजर राजेंद्र "मैड मेडिक" कुलकर्णी हज़र झाले! व्हीएस सरांना ग्रीट करून ते आमच्याकडे आले , ह्या इसमाला आम्ही खुद्द अद्जुडेँट ची भीति वाटायची त्याहुन जास्त घाबरायचो कारण पूर्ण ट्रेनिंग मधे एकाही ओसी ला ट्रेडिशनल औषध किंवा परेड मधुन सुट्टी न देता हे शिव्या अन "मेडिकल इंस्पेक्शन रूम" विजिट ने बरे करत, एकदा डीओ ड्यूटी टाळायला मी ह्यांच्याकडे गेलेलो तेव्हा टारज़न स्विंग मधे धड़पडून खांदा निखळलेला (किंवा तसे भासवणारा) मोसाय माझ्या पुढे होता लाइन मधे, तो चैंबर मधे गेला तेव्हा तो विव्हळत होता, मी हळूच डोकावून पाहिले तेव्हा डॉक्टर ने त्याला प्रेमाने विचारले

"क्या हुआ मोसाय??"

"सर हमारा कंधा टूट गयाssss" इवळत इवळत मोसाय बोलला

त्यांनी फ़क्त थोड़ी दाबून नेमकी डिस्लोकेशन जज केली अन मोसाय ला म्हणाले

"स्टूल पर पक्का बैठ" मोसाय ने आज्ञा पालन करताच ह्या खविसाने त्याच्या पावलांवर आपले पाय घट्ट रोवले अन कोपरापाशी धरून त्याच्या हाताला असा काही हिसका दिला की मोसाय जितका विव्हळत होता त्याच्या दहापट जोरात किंकाळी फोड़ता झाला!!!

"ओ माँ ssssssss बोकाचोदाsssssssss" वेदना एक्सप्रेस करायला मोसाय ने मातृभाषेचा आधार घेतला होता! त्याची ती किंकाळी होस्टेल पर्यंत खचित गेली असेल असे मला वाटले , मोसाय घेरी आल्यागत करत होता तेव्हा डॉक् ने त्याला तपसायच्या टेबल वर निजवले अन मागे वळले ते त्याचा "इलाज" पाहत गर्भगळीत झालेलो मी किलकिल्या दारातून त्याना दिसलो तसे ते शुद्ध मराठीत ओरडले

"तुला काय झाले रे भोसड़ीच्या??"

लड़बड़त थरथर करत हातभर फाटलेली कशीबशी सावरत मी जय हिंद वगैरे चे सोपस्कर केले अन तडमडत बोललो

"ते आपले ते नाही सर मला काही नाही ते आपले ह्याला घेरी येत होती म्हणुन सोबत आलो मी"

"हो?? ही नाजुक बार्बीडॉल अन तु हिचा राजकुमार का रे ??"

"......"

"मोसाय ये तेरे साथ आया था की मकरा सुझा है नया बोलो?"

वेदना आवरत कसा बसा मोसाय बोलला,

"न न नहीं सर में में मेरे साथ ही आया है वो"

"बापुसहेब, 20 पुशप , जल्दी"
मी 20 पुशप आवरे पर्यंत मोसाय चा खांदा सेट (?) झाला होता, त्याला एक पेन किलर देऊन डॉक् बोलले,

"भागो जल्दी यहाँसे दोनो, कल पीटी में मकरा किया तो याद रखो मैं गांडफाड़ रगड़ा लगाउँगा"

काहीही न बोलता विजारीत झुरळ घुसल्यागत आम्ही सुटलो!

दुसऱ्या दिवशी मोसाय चा हात बैक टू नॉर्मल आला होता, अन उगा दळभद्री आजारपण काढून डॉक कड़े कधीच जायचे नाही हा धड़ा आम्हाला सगळ्या गृप ला मिळाला होता.

तर असे हे आमचे "प्रेमळ डॉक्टर" आले म्हणजे आजची एक्सरसाइज भयंकर असणार असे आम्हाला वाटून गेले, अन विलक्षण ठंड आवाजात डॉक बोलले

"आज अगर इन खूबसूरत लड़कियो में से कोई चक्कर खा के गिर गया तो मैं उसका इलाज बोहोत प्यार से करूँगा"

ह्या डायलॉग सोबतच "आज मेलो तरी चक्कर येऊन , थकुन मरायचे नाही" असे आम्ही 3 वेळा स्वतःलाच बजावले

शेवटचा एड्रेस होता अद्जुडेँट साहेबांचा, जास्त पाल्हाळ न लावता व्हीएस सर म्हणाले

"u boys are my best creations,so go out tonight and prove ur mattle prove that you are fit to guard the frontiers of this great nation, prove that u r the finest, good luck boys"

अन आम्ही सज्ज झालो ,

"धावाsssssss" असा पुकारा होताच आम्ही भयंकर वेगात सुटलो होतो, पहिला ऑब्स्टकल "रोप लैडर" जमीनीत काटकोनात गाडलेले दोन उंच खांब जवळपास तीस फुट उंच ह्यांच्या दोन्ही बाजुला तंबु सारखी जाड दोराची जाळी, एका बाजुने चढायचे अन दुसऱ्या बाजुने उतरायचे, हे एक सोपे ऑब्स्टकल होते त्यामुळे आम्ही इतर कंपनीज ना समोर जाऊ दिले कारण कठिण ऑब्स्टकल साठी आमची स्ट्रेटेजी ठरली होती. सर्वात शेवटी डेल्टाज रोप लैडर ला झोंबले अन सरसर पलीकडे झाले, डिचेस पार करून आम्ही "वॉल" जवळ पोचलो, दहाफुट उंच वॉल मधे पाय ठेवायला खाच वगैरे काही नाही, सड्या अंगाने चढायची तर उडी मारून दोन्ही हाताच्या चार चार बोटांची ग्रिप भिंती च्या वर लावायची अन फ़क्त बोटांच्या जोरावर शरीर उचलून कोपरा पर्यंत वर गेले की कोपर भिंती च्या वर दाबून बॉडी उचलायची असे आम्ही करत असु पण आज अंगावर किट चे वजन होते, तेव्हा ते नजरअंदाज करून चालणार नव्हते, तेजु गुरुंग ची अल्फा कंपनी तेव्हा तिथेच होती अन ते ट्रेडिशनल मेथड ट्राय करत होते पण पर्यवसान फ़क्त हात अन गुढ़घे सोलण्यात होत होते, तेवढ्यात तिथे सांगे ची ऐको कंपनी ही पोचली! ह्यांच्यात किश्या अकलेने एडिसन, त्याने जवळ पडलेले वुडन लॉग्स शिडी सारखे वपरायचे ठरवले होते, ब्राव्हो अन चार्ली अजुन मागे होते . त्यांची ती कलाकारी सक्सेस झाली असती तर आम्हाला लीड घ्यायचा चांस मिळणे अवघड होते. अन तेव्हाच आम्ही आमची स्ट्रेटेजी वापरली .

मी गौड़ा कड़े पाहत डोळा मारला तसे गौड़ा ओरडला

"डेल्टा जय श्री कृष्णsssss" हा आमचा सांकेतिक शब्द होता, तो पुकारताच मी प्रियांशु अन पुनीत , दहिहंडी फोडायला उभारतो तसे उभे राहिलो अन गौड़ा परत ओरडला

"डेल्टाज चार्जsssss"

सर्वात उंच समीर तो फटकन वर चढ़ला आमची तिघांची सरासरी ऊंची 5'8" आमच्या खांद्यावर सहा फूटी सम्या म्हणजे तो छाती पासून वर होता भिंतीच्या. तो सरळ वर चढुन बसला भित्ताडावर त्याच्या मागुन अनिल , नामग्याल अन गौड़ा सरसर वर गेले आता खाली उरलो होतो आम्ही तिघे लगेच उतरंड तोडून आम्ही दोघे म्हणजे मी अन पुनीत एकमेकांचे खांदे धरून उभे राहिलो अन प्रियांशु गपकन वर गेला वरच्या चौघांनी त्याला बाहुल्यागत उचलले, आता मेन प्रश्न उरला मी अन पुनीत!. ही शक्यता आम्ही डोक्यात घेतलीच नव्हती! वर पोचलेले पाचही हतबल झाले होते तितक्यात माझ्या डोक्यात बल्ब पेटला, एका झटक्यात आम्ही दोघे वेगळे झालो, मी काय करतोय इकडे पुनीत कुतुहलाने पाहत होता, मी माझी पाठ भिंतीवर रेटून उभा राहिलो गुढ़घे थोड़े वाकवले , आता मी एखाद्या अर्ध्या फोल्ड केलेल्या खुर्ची सारखा उभा होतो. मी जोरात ओरडलो

"पुनीत देख क्या रहा है चढ़ जा"

त्याने डावा पाय माझ्या वकवलेल्या उजव्या गुढघ्यावर रोवला अन क्षणात उजवा पाय माझ्या डाव्या खांद्यावर ठेवुन वर सरकला तसे वरच्यांनी त्याला ही ओढुन घेतले, आता उरलो एकटा मी, मलाही ट्रेडिशनल पद्धतीने चढणे अवघड होते, तेव्हा जाटाने डोके लावले वरती गेलेला समीर भिंतीवरुन अर्धा खाली वाकला अन मागच्या पाचांनी त्याला जमेल तसे धरुन ठेवले आता तो 3 फुट खाली होता अन मला सातच फुट जायचे होते मी थोड़ा मागे जाउन धावत आलो अन जीव खाऊन उडी मारली ते माझ्या एल्बो पासून वर मी समीर चे एल्बो पकडले अन त्याने माझे !. जीव लावून त्याने मला वर ओढले अन काही सेकंदात सात डेल्टा भिंत सर केलेले होते, बाकी दोन कंपनीज आ वासुन पाहत होत्या तोवर आम्ही पलीकडे उड्या ठोकल्या होत्या.

पुढे वेगवेगळे ऑब्स्टकल पार करुन आम्ही टारज़न स्विंग ला पोचलो, टारज़न स्विंग म्हणजे दोन उंच चबुतरे मधेच पाण्याने भरलेला खड्डा सर्वात आधी प्रियांशु अन नामग्याल पलीकडे पोचले मग आम्ही एकेकाला झोका दिला व् पलीकडे पोचताच नामग्याल अन प्रियांशु त्यांना ओढुन घेत होते , अश्या पद्धती ने सिंपल स्ट्रेटेजी ने ऑब्स्टकल क्लियर केले होते, डिच क्रॉलिंग ने यूनिफार्म पार रेंदा झाले होते चिखलात, अन आमची कंपनी आगरा गेट ला पोचली, तिथे वॉकीटॉकी घेऊन बड़े उस्ताद बसले होते, आम्ही पोचताच आम्हाला त्यांनी एक एक ग्लूकोस चा पुडा अन एक वाटर सिपर दिले, तेव्हा आमचे टाइमिंग नोंदवताना बड़े उस्ताद मिश्किलपने हसत म्हणाले

"वॉल तो बड़ी मजेदार क्लियर की तुम लोगो ने!"

गौड़ा म्हणाला

"सर आप तो बोले थे कोई नहीं देखेगा" तसे हसत हसत उस्ताद बोलले

"बेटा भुलो नहीं आपको हमने ही रेकी सिखाई है!!, हर मोड़ पर एक उस्ताद देख रहा है"

आम्हाला उगा भाव चढल्यागत झाले तोवर उस्ताद ओरडले

"रुको नहीं बढ़ते रहो"

आता आम्ही नकाशे काढले अन दिलेले कोआर्डिनेट जज करायला लागलो टॉर्च च्या प्रकाशात. ते समजून घेतले अन आम्हाला कळले आम्हाला परत जिथे रेकी एक्सरसाइज झाला होता त्या ललितपुर च्या जंगल मधल्या कमांड एंड कण्ट्रोल सेण्टर ला पोचायचे होते. आम्ही दुड़क्या चाली ने सुटलो, जेव्हा आम्ही सुटलो तेव्हा तिथे गुरुंग अन मोसाय च्या कंपनी पोचल्या होत्या, आम्ही अंधारात शेतं कुरणे इत्यादी पालथी घालत होतो. अन जसे सांगितले होते तसेच होऊ लागले पायातुन कटकट आवाज यायला लागले दोन्ही पोटर्यात मणभराचे गोळे आले साधारण 15 किमी पुढे गेल्यावर डोळ्यातून पाणी यायला लागले , तेव्हा आम्ही मिळून ठरवले ज़रा आराम करावा, अन त्यानेच आमचा घात केला, अर्धा तास आराम करुन उठायचा यत्न करतो ते पाय लाकड़ागत स्टिफ झालेले अन मांडयात क्रेम्प्स आलेले होते, मागून आलेली एको कंपनी आमच्या पुढे निघाली तेव्हा आम्ही ठरवले आता हलायला हवे, आम्ही परत किट्स पाठीवर चढ़वु लागलो ते आमच्या पासून अर्धा किमी मागे टॉर्च दिसायला लागले, ती अल्फा कंपनी होती, त्यातला एकच टॉर्च आमच्याकडे धावत यायला लागला तेव्हा आम्ही कुतुहला ने थबकलो, तो अन्ना होता, तो धापा टाकत आला अन म्हणाला

"भाई ,हमारा पानी खत्म हो गया , गुरुंग के पैर में मोच है चल नहीं पा रहा पानी पिलाके चला रहे है, थोड़ी हेल्प कर दो"

मदत केल्यास बिना पाण्याचे अजुन 25 किमी जायचे म्हणल्यावर आमचे काही खरे नव्हते, पण अन्ना ही यार होता आमचा, अन हेच काय ते टीमवर्क असा विचार मनात आला, आम्ही एकमेका कड़े पाहिले अन झटक्यात मी गौड़ा ला बोललो

"दे देते है यार!!!"

एकमताने आम्ही चार लोकांचे ग्लूकोस पूड़े अन चार सिपर त्याच्याकडे सुपुर्त केले अन पुढे निघालो, आता आमच्याकडे फ़क्त 3 पाणी बोतल अन 3 ग्लूकोस होते, आम्ही चालता चालता रीथम पकडला अन हळूहळू

"we can do it ...we can do it" असा मन्त्र पुटपुटत चालू लागलो , 3.5 किलो ची राइफल आता 30 किलो ची भासत होती, पाठ कधीची बधीर झाली होती, घोटे अन गुढ़घ्याच्या जॉइंट्स ची लिमिट कधीच संपली होती.

टारगेट पासून साधारण 4 किमी दूर आम्ही आता एकही पाऊल उचलले तर हाडे खळखळत खाली पडतील असल्या अवस्थेला पोचलो होतो, ऐको टीम आधीच पुढे गेली होती, आम्ही परत एकदा ब्रेक घेतला तेव्हा प्रियांशु चक्क डोळे पांढरे करून उताणा पडला होता, त्याला लाइन वर आणायला उरला सुरला पाणी+ग्लूकोस साठा संपवला होता आम्ही. तो मोडला होता,

"यार मुझसे नहीं होगा मैंने डेल्टा की इज्जत मिटटी में मिला दी " वगैरे बोलत होता आता तो

ह्या सगळ्या प्रकारात हळूहळू आलेल्या ब्रावो अन चार्ली कंपनी सुद्धा पुढे गेल्या , फ़क्त जाता जाता मोसाय अन गिल आम्हाला आपला उरलेला पाणीसाठा देऊन गेले होते!

आम्ही अल्फा ला मदत म्हणून जितके पाणी दिले होते त्याच्या दुप्पट आता आम्हाला मिळाले होते! टीमवर्क चे फळ हे असे असते, त्यांना विचारले

"अबे इतने पानी का हम क्या करेंगे " तर दोन्ही कंपनीज ने आमचे खांदे धरुन विश्वास दिला होता

"अबे अन्ना ने हमको बताया तुम्हारा पानी खत्म हो सकता है और ये खुराना की हालत भी तो नाजुक है, रख लो कोई नहीं अभी 4 किमी ही तो है जल्दी उठो, हमारे डेल्टा भाईयो को रूट मार्च पुरा करते हुए देखना है हमें"

मित्रहो तो अत्युच्च क्षण होता ट्रेनिंग चा! आता आम्ही रूट मार्च काय तर ड्यूटी साठी जीव द्यायला ही मागेपुढे पाहणार नव्हतो, Goodwill had sealed our bonds with our coursemates and our duty one last time that night"

ब्रावो अन चार्ली कंपनी पुढे निघुन अर्धा तास झाला होता अन आता मागे राहिलेली अल्फा अमच्यापाशी आली , गुरुंग लंगड़त होता पण चालत होता!! साली गुरख्याची जातच मुंगळया वाणी चिवट!!

आम्हाला वाटले आता आम्ही लास्ट येणार पण तेवढ्यात तो भोळा सच्चा गुरखा बोलला,

"तुम लोग मेरे वजह से पीछे हुए दोस्तों, कोई अल्फा अपने डेल्टा भाइयो को पीछे नहीं छोड़ेगा, उठो डेल्टाज उठो!!! हम सब साथ चलेंगे"

मला हे लिहिताना ही डोळे ओलावत आहेत हे सांगायला आज एक कवडीची लाज वाटत नाही मित्रहो.

आता आम्ही टीमप झालो होतो, आता आम्ही 14 होतो, नाही नाही म्हणता म्हणता अन्ना ने गुरुंग चे बैकपैक काढून स्वतःच्या खांद्यावर घेतले, त्याची राइफल गौड़ा ने घेतली, पण मेन प्रॉब्लम होता खुराना, अन मी एक दिव्य करायचे ठरवले,

खुराणाचे बैकपैक अल्फा च्या एका गिरीश यादव नामक भावाने स्वतः उमेदवारी करुन उचलून घेतले, त्याची राइफल पुनीत ने घेतली , माझे बैकपैक माझा मित्र अन रूमी समीर ने घेतली अन माझी राइफल घ्यायला अनिल सरसावला नामग्याल ने स्वतः उरलेल्या पाण्याचे वाढीव वजन घेतले

अन

कसाबसा उभा राहिलेल्या प्रियांशु खुराना ला मी फायरमैन्स लिफ्ट दिली!!! सतत रगड़ा लागुन समीर ला खांद्यावर वागवायची शिक्षा आज अशी कामी येत होती,

अन आम्ही हळूहळू निघालो, थोड्या थोड्या अंतरात कोणीतरी मला प्रियांशु ला उचलतो अशी ऑफर द्यायचा पण मी नकार देताच परत मला चीयरअप करायचा.

होता होता आम्ही टारगेट जवळ पोचलो आता टारगेट फ़क्त 200 मीटर दूर होते अन आमच्या नजरेला एक विलक्षण दृश्य दिसले पुढे गेलेल्या सगळ्या टीम रस्त्याच्या दोन्ही बाजुला उभे राहून चीयरअप करत होत्या, स्वतः उस्तादजी त्यांच्या सोबत टाळ्या वाजवत उभे होते

"कमऑन डेल्टाज कमऑन अल्फा" च्या चियर्स कानावर येत होत्या, पण कोणीही सावरायला येणार नव्हते शेवटच्या पावला पर्यंत आम्हीच जायचे हा अलिखित नियम होता आता ड्यूटी अन आयुष्याचा

टारगेट पासून 50 मीटर होतो तेव्हा गुरुंग जोरात ओरडला

"कोई अल्फा दौड़ के आगे नहीं जाएगा, जिस डेल्टा की वजह से हम यहाँ पर है , पहले लाइन क्रॉस करने का हक़ सिर्फ उसका है "

आता समस्त अल्फा लाइन मधे उभे राहून आम्हाला "हॉनर" देत होते,

आम्ही शेवटची लाइन क्रॉस करायच्या आधी खुराना बोलला

"बापू मुझे निचे रखो" अन मी एकदाचे खुराना ला खाली ठेवले

तसे तो म्हणाला,

"पहले सब डेल्टा अंदर जाएंगे मैं अंदर आने वाला आखरी डेल्टा रहूंगा"

अन मी लाइन क्रॉस करणारा पहिला डेल्टा झालो, माझ्या मागे उरलेले डेल्टा इन झाले, त्यांच्या मगोमाग पुर्ण अल्फा कंपनी लाइन च्या आत आल्या नंतरच , तो तेजु गुरुंग नावाचा मानी गुरखा आत आला,

भीड़ गुंडाळुन उरलेले 33 लोक धावत आले! आता अद्जुडेँट साहेब उठले अन संथ पावले टाकत आमच्याकडे येत होते मी अन प्रियांशु जमीनीवर पडलो होतो अन अद्जुडेँट साहेबां पेक्षा दुप्पट वेगात धावून आले होते ते माझे शर्मा उस्ताद अन चक्क डॉक्टर सर.

"बापुसाहब आराम से पड़ा मत रह उठ के बैठ वरना पैर जकड जायेंगे" तश्या अवस्थेत ही उस्ताद चा आदेश आला तो न पाळणे शक्यच नव्हते मी धड़पड़त उठून बसलो , आता उस्ताद माझ्या पोटर्या चोळत होते न डॉक्टर सर पल्स घेऊ पाहत होते, मी सरांना म्हणले

"सर खुराना ला पहा सर तो खुप जास्त dehydrate झाला आहे सर"

सरांनी त्याला चेक केले अन अद्जुडेँट सरांकडे पाहून "ऑल वेल" चा थंब्स अप केला साधारण 20 मिनट्स मधे आम्ही लड़खडत उभे राहून आपापल्या पोजीशन ला फॉल इन झालो होतो , आम्हाला आरामसे बसवुन अद्जुडेँट साहेब बोलायला उठले

"आज मेरे लडाखे परफेक्ट हो गए, आज कोई एक बापूसाहब नहीं तो हर एक कंपनी ने टीमवर्क की मिसाल पेश की , अब तुम पास आउट के लिए तयार हो, अब तुम परफेक्ट हो....."

".....आज चाहती तो डेल्टा फर्स्ट आती पर उन्होंने अपने भाइयो के लिए पीछे रहना चुना, यही होता है वो सुवर्ण तत्व जिसे हम हमेशा कहते है ,'लीव नो मॅन बिहाइंड' और इसीलिए मैं सोचता हूँ की जो पोजीशन डेल्टा की इनिशियल टाइम में थी उन्हें वही रैंक दिया जाए, उन्हें सेकंड रैंक दिया जाए"

सरांच्या ह्या वाक्याचे स्वागत सगळ्या कंपनीज ने टाळ्या वाजवुन केले, सांगे च्या ऐको ची पोरे ही आली स्वतः सांगे अन किश्या म्हणाले

"यार हम रैंक में फर्स्ट है पर जीते तुम हो, जब हम पहले अल्फा को मिले तो उनको पानी दे दिया था, और तुम्हारे पास रुके नही क्यों की तुम वैसे भी तेज थे , वी आर सॉरी यार"

तेव्हा गौड़ा म्हणाला
"कोई नहीं सांगे तुझे क्या भगवान् बताता हम बिना पानी के है? और वैसे भी तुम दूर से निकले थे, उपरसे , भोसड़ीके चिंके दोस्तों को सॉरी बोलेगा?"

निःशब्द होऊन आम्ही कैंटर ला चढत होतो अन आमची फाइनल अत्युच्च फिजिकल अन सायकोलॉजिकल टेस्ट आम्ही क्लियर केली होती.

कथाअनुभव

प्रतिक्रिया

अजया's picture

22 Apr 2015 - 4:17 pm | अजया

डोळ्यात पाणी आलं आज वाचताना.

बाबा पाटील's picture

22 Apr 2015 - 8:01 pm | बाबा पाटील

अंगावर काटा उभा केलात,साष्टांग दंडवत तुम्हाला.तुम्ही तिथे आहात म्हणुन आम्ही सुखाची झोप घेतोय. खर तर प्रत्येक शाळेच्या १२ वीच्या बॅचचा सेंडऑफ तुमच्या सारख्यांच्या व्याख्यानाने व्हायला हवा.आजची तरुण पिढी नक्की सेनादलाकडे वळेल.

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Apr 2015 - 2:30 pm | कैलासवासी सोन्याबापु

बाबा,

आम्ही भाषणे द्यायला लाख तयार होऊ एक वेळ! पर भाषणे देणारे खादीधारी बंदुक पकडायला नाही की हो राजी होणार!!! :P

सस्नेह's picture

27 Apr 2015 - 8:00 am | सस्नेह

डोळ्यात पाणी आणि अंगावर रोमांच !!

मृत्युन्जय's picture

22 Apr 2015 - 4:19 pm | मृत्युन्जय

क्रमशः नाही?????????????

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Apr 2015 - 4:22 pm | कैलासवासी सोन्याबापु

उद्या परवा लास्ट पार्ट

पगला गजोधर's picture

22 Apr 2015 - 6:09 pm | पगला गजोधर

बापुसाहब आता तुम्ही, लेखमालेतला शेवटचा लेख लिहिण्यासाठी, 'डिटेल धावा पोजिशन' घेतली असेलं ना ? मनातल्या मनात… ;)

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Apr 2015 - 6:22 pm | कैलासवासी सोन्याबापु

:D :D

यसवायजी's picture

22 Apr 2015 - 8:11 pm | यसवायजी

उद्या परवा लास्ट पार्ट??
चोलबे ना बापू. यह दिल मांगे मोअर!!!

कपिलमुनी's picture

22 Apr 2015 - 4:21 pm | कपिलमुनी

अफाट , अचाट माणसं आहात तुम्ही !

तुमच्या भरोशावर इथे आम्ही निवांत असतो !

असंका's picture

22 Apr 2015 - 4:36 pm | असंका

+१

टवाळ कार्टा's picture

22 Apr 2015 - 4:29 pm | टवाळ कार्टा

हॅट्स ऑफ्फ स्सार _/|\_

चिनार's picture

22 Apr 2015 - 4:30 pm | चिनार

काय लिहिलंय बापूसाहेब !! लाजवाब !
सगळ्या ओसींना सलाम !!

डर गए क्या?? , डरो नहीं अगर तुम डरे तो उनका क्या होगा जो तुम्हारे दम पर सो रहे है. रोज अपने ऑफिस जा रहे है?, तुम ढाल दिए गये हो, कोई कमी नहीं है तुम लोगो में,तुमको लगेगा 40 किमी लंबा सफ़र है, पर मजबुत इरादों के सामने कुछ नहीं है वो, आजतक का रगड़ा, एड़ी पटकना, सलूट , वर्दी , राइफल यहाँ तक की जो खाना रोज खाते हो वो भी इसी पल के लिए था, अगर तुम्हे लगता है की 40 किमी अंतर पीठ पर 20 किलो वजन लादकर चलना नामुमकिन है तो एक बात समझ लो , सिर्फ फिजिकल ताकद से यह नहीं हो सकता, इसके लिए चाहिए मजबुत कलेजा, ऑब्स्टकल के बाद पहले 5 किमी चलने पर मौत भी सुन्दर लगेगी, बदन में दर्द होगा कीचड़ में सना यूनिफार्म होगा टखने और घुटने टूटने के कगार पर होंगे, पर दिल नहीं टूटेगा ,मुझे भरोसा है की तुम सब ये कर सकते हो! जाओ, और अपने शर्मा उस्ताद की लाज बचाओ, कोर्स ऐसा पुरा करो के चारो तरफ डेल्टा के सुरमा अफसरों का बोलबाला हो जाये, कोई शक???"

__/\__

असंका's picture

22 Apr 2015 - 4:35 pm | असंका

अप्रतिम वर्णन!
डोळे पाणावले खरे आमचेही!!

लेखाबद्दल धन्यवाद!!

मधुरा देशपांडे's picture

22 Apr 2015 - 4:35 pm | मधुरा देशपांडे

जबरदस्त लिहिलंय. तुम्ही किती भरभरुन जगला आहात ते सर्व दिवस हे सर्व याची साक्ष आहेत हे सगळेच लेख, वाचताना ते जाणवतंय अगदी. वाचता वाचता डोळे भरुन आले. तुम्हा सर्वांनाच सलाम.

मला हे लिहिताना ही डोळे ओलावत आहेत हे सांगायला आज एक कवडीची लाज वाटत नाही मित्रहो.

एकदम भन्नाट लिहिलंय

अन आमच्या नजरेला एक विलक्षण दृश्य दिसले पुढे गेलेल्या सगळ्या टीम रस्त्याच्या दोन्ही बाजुला उभे राहून चीयरअप करत होत्या, स्वतः उस्तादजी त्यांच्या सोबत टाळ्या वाजवत उभे होते

कमऑन OC's

"पहले सब डेल्टा अंदर जाएंगे मैं अंदर आने वाला आखरी डेल्टा रहूंगा"

काय बोलावे ह्या खुराणा बद्दल

'लीव नो मॅन बिहाइंड'

अद्जुडेँट साहेबांना salute

नितिन५८८'s picture

22 Apr 2015 - 4:46 pm | नितिन५८८

उद्या परवा लास्ट पार्ट लिहा पण असेच आणखी अनुभव येऊ द्या हि समस्त मि . पा. तर्फे विनंती. तुमच्या ह्या लिखाणातून प्रेरणा घेऊन आणखी OC's तयार होतील हि अपेक्षा बाळगतो.

अनुप ढेरे's picture

22 Apr 2015 - 4:46 pm | अनुप ढेरे

भारी!!

पिलीयन रायडर's picture

22 Apr 2015 - 4:51 pm | पिलीयन रायडर

पाणी थांबेचना.. नंतर लिहते...

होबासराव's picture

22 Apr 2015 - 4:55 pm | होबासराव

बापु साहेब सगळ चित्र जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहिले. सगळेच अचाट आहे.

रुस्तम's picture

22 Apr 2015 - 4:57 pm | रुस्तम

डोळ्यात पाणी आलं आज वाचताना.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Apr 2015 - 4:59 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सॅल्युट. दुसरा शब्द नाही.

अमोल मेंढे's picture

22 Apr 2015 - 5:00 pm | अमोल मेंढे

बर्‍याच दिवसांनी कंठ दाटुन आला आज...
दंडवत तुम्हाला..
मी इथे फक्त वाचनमात्र आहे..पण आज राहवले नाही.

धन्यवाद बापूसाहेब … अकादमी लाइफ़ चे इतक्या जवळून दर्शन घडविल्याबद्दल… आम्ही काय जगलो अशी शंका यायला लागली आहे ?

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Apr 2015 - 6:27 pm | कैलासवासी सोन्याबापु

अहो असे काही नसते हो I just made a career choice and I lived it! प्रत्येकजण जर आपआपले करियर चॉइस निभावत राहिलो तर जो एक आत्मानंद मिळतो तो फ़क्त मी माझ्या केस मधला मांडला इतकेच! प्रत्येक जण महत्वाचा तसाच प्रत्येकाचे आयुष्यही

आमच्या जीवनात ओढलेली सिगारेट, पटवलेली गर्लफ्रेंड, केलेली कॉपी आणि घातलेले राडे याशिवाय काही अनुभव आठवायचे म्हण्ले तर स्मृतीपटल कोरे होऊन जाते

बेकार तरुण's picture

22 Apr 2015 - 5:05 pm | बेकार तरुण

अतिशय आवडलं
शब्द नाहित व्यक्त करायला !!
जोरदार सॅल्युट तुम्हाला व सर्व बॅच ला !

हा पार्ट खरेच अत्युच्च जमला आहे. _/\_

अद्द्या's picture

22 Apr 2015 - 5:13 pm | अद्द्या

आजवरचा सर्वात सुंदर लेख . .

असे लोक २४ तास आमच्या साठी जीव देण्यास तयार आहेत हे समजूनच छाती भरून आलीये . .

जबरदस्त

आता या धाग्यावर अवांतर होईल पण सरकार व ऑफिसर्सकडूनही जवानांना खूप वाईट वागणूक दिली जाते असे ऐकून आहे, विशेषतः सीआरपीएफच्या जवानांना अ‍ॅज़ कम्पेअर्ड टु आर्मी जवान्स. त्याबद्दल एक लेख वाचला होता त्याचा दुवा जमेल तेव्हा टाकतो. खूप वाईट वाटलं होतं ते वाचून, अन जवानांनी सांगितलं की त्यांच्याच वरचे अधिकारी गवर्मेंटच्या स्कीम्सचा लाभ जवानांपर्यंत पोचू न देता मधल्यामध्ये स्वतः खातात, वगैरे...

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Apr 2015 - 5:26 pm | कैलासवासी सोन्याबापु

मनुष्य प्रकृती कोणाला चुकली आहे हे गोथम सिटी नरेश!

माझ्यापुर्त ह्या ही विषयाला वाचा फोड़ा! काही ऐड करण्यालायक असल्यास नक्की करू!

नक्की करतो सरजी. लेखाचा दुवा शोधून टाकतो. गवर्मेंटचा दोष असायचा तो आहेच, पण सैन्यातल्या सैन्यातही असे चालते हे मला नवे होते. याबद्दल काही बोलणे आपल्यासाठी धोकादायक नसेल तर अवश्य बोलावे ही विनंती.

तुमच्या बरोबरच आम्हीही पूर्ण प्रसंग अनुभवला,
बघता बघताच डोळे कधी भरून आले कळलंच नाही

यशोधरा's picture

22 Apr 2015 - 5:26 pm | यशोधरा

आजचा भाग निखालस सुंदर! डोळे भरुन आले वाचताना. काश्मीर ट्रेकमध्ये भेटलेल्या जवानांची आठव्ण सतत मनात जागीच असते, पण आज पुन्हा एकदा प्रकर्षाने आठवण आली.

बॅट्याच्या अवांतराशी दुर्दैवाने सहमत. तिथे भेटलेल्या एका जवानाच्या तोंडचे शब्द मी कधीच विसरणार नाही. तो म्हणाला होता की " आम्ही आमच्या जीवानिशी देशसाठी शेवटपरेंत लढूच पण ताई तुम्ही कधी पुढार्‍यांची, देशातल्या पैशेवाल्यांची पोरं, नातेवाईक सैन्यात आलेली पाह्यलीयत का हो?..." आम्ही नि:शब्द झालो होतो..

प्रीत-मोहर's picture

22 Apr 2015 - 5:30 pm | प्रीत-मोहर

भारी. पण थांबु नका लिखाण.

सौंदाळा's picture

22 Apr 2015 - 5:38 pm | सौंदाळा

+१

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Apr 2015 - 5:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सहमत. सर्व्हिसमधले गोपनीय नसलेले अनुभव लिहिलेत तरं अजुन माहिती मिळेल.

सन्दीप's picture

22 Apr 2015 - 5:31 pm | सन्दीप

हॅट्स ऑफ्फ.

आदूबाळ's picture

22 Apr 2015 - 5:47 pm | आदूबाळ

जबरदस्त!

लिहीत रहा. संपवू नका.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Apr 2015 - 5:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट लिहिलय !

मला हे लिहिताना ही डोळे ओलावत आहेत हे सांगायला आज एक कवडीची लाज वाटत नाही मित्रहो.

लाज कशाला ? अत्युच्य अभिमानाची गोष्ट आहे ही !

पुभाप्र.

स्वराजित's picture

22 Apr 2015 - 5:49 pm | स्वराजित

_/\_
बापु साहेब खुप छान लेख.

अगर तुम डरे तो उनका क्या होगा जो तुम्हारे दम पर सो रहे है. रोज अपने ऑफिस जा रहे है?

डू आय, अ‍ॅज अ सिटिझन ऑफ धिस नेशन, डिझर्व्ह धिस काइंड ऑफ अश्योरंस? दीज आर्म्ड फोर्सेस? अ‍ॅम आय वर्दी ऑफ इट?

सॅल्यूट!

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Apr 2015 - 6:35 pm | कैलासवासी सोन्याबापु

Yes my dear sir, u do!!

Today we as forces boast of being worlds best just because ladies and gentlemen like you pay ur taxes and pamper us!. Always remember bro defense is a dead investment invested by the citizens for security. I do love my career choice and I wud request u to do the same, love ur work fulfill ur duties deligently and thats it!

PS:- there's no bigger offence than underestimating ourselves had I done that I would not had completed my gruesome training :)

टवाळ कार्टा's picture

22 Apr 2015 - 10:04 pm | टवाळ कार्टा

आम्ही "ब्लडी" सिविलिअन कैच करत नै ओ....उग्गीच लाजवू नका आम्हाला...जे काही पैसे ट्याक्स मध्ये भरतो त्यातले खरे जीतके सैन्यावर खर्च होतात त्यापेक्षा जास्त व्हायला हवे हे माझे मत आहे (या जास्तीच्या पैशांनी सामान्य सैनीकाचे जेवण आणखी रुचकर झाले तर ते जास्त चांगले)

and who ever says that "defense is a dead investment invested by the citizens for security"....that person never learned anything from history and that person don't have any (D)ucking right to get protected by anybody

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Apr 2015 - 10:08 pm | कैलासवासी सोन्याबापु

अरे शांत गदाधारी भीम शांत!! मुद्दा डेड इन्वेस्टमेंट चा नाही तर सेल्फ डेप्रिसिएशन टाळणे हा आहे असे सुचवतो देवा!

टवाळ कार्टा's picture

22 Apr 2015 - 10:16 pm | टवाळ कार्टा

:)

श्रीरंग_जोशी's picture

26 Apr 2015 - 7:43 pm | श्रीरंग_जोशी

अप्रतिम लिहिलंय. हा भाग वाचून अभिमान दाटून आला.

या निमित्ताने सर्व भारतीय सुरक्षा यंत्रणा, त्यांच्या अकादमीज व सुरक्षा जवान अन नव्याने दाखल झालेले प्रशिक्षणार्थी यांच्यापुढे नतमस्तक व्हावेसे वाटते.

जुन्या भागांचे दुवे

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Apr 2015 - 6:37 pm | कैलासवासी सोन्याबापु

Thank you श्रीरंग भाऊ

श्रीरंग_जोशी's picture

22 Apr 2015 - 10:25 pm | श्रीरंग_जोशी

दुरुस्ती केली आहे. यापुढे काळजी घेईन.

सुबोध खरे's picture

22 Apr 2015 - 7:50 pm | सुबोध खरे

बापूसाहेब
आपण आम्हाला आमच्या ट्रेनिंगची आठवण करून दिलीत. अर्थात आमचे ट्रेनिंग आपल्या इतके शारीरिक दृष्ट्या खडतर नव्हते. पण टीम स्पिरीट काय आहे आणि त्याची गरज का असते हे प्रत्यक्ष कामा वर रुजू झाल्यावर जाणवते. एन डी ए मध्ये गेलात तर त्याच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एक प्रचंड पंख पसरलेला गरुड आहे आणि त्याच्या खाली लिहिलेले आहे
LEAD YOUR MEN TO WIN A WAR.

BECAUSE THERE IS NO RUNNERS UP AWARD IN WAR

आपली अक्खी लेख मालिका उत्कृष्टच आहे. आपले प्रशिक्षणाच्या काळातील काही फोटो टाकता येतील का?
माझ्या प्रशिक्षणाच्या वेळेचा प्रत्यक्ष फायरिंग रेंज चा फोटो टाकत आहे. जर अनुचित वाटत असेल तर तसे सांगा मी तो काढून टाकेन .
यात सर्वात उजवीकडे खाकी कपड्यात बंदूक हातात धरून नेम धरत असलेला पाठमोरा मी आहे. हा प्रत्यक्ष फायरिंग रेंज वरील फोटो आहे आणि उजवा पाय उचललेल्या उस्ताद आणि त्याची अंगकाठी आपल्याला काय दर्ज्याचे सैनिक प्रशिक्षणासाठी असतात ते समजून येईल. प्रत्येक गोळी मारणाऱ्या अधिकार्याच्या बाजूला एक सैनिक उभा आहे तो त्या गोळीचे बाहेरचे पितळी काडतूस उडून जाऊ नये म्हणून हेल्मेट धरून उभा आहे. याचे कारण प्रत्येक गोळीचा हिशेब द्यावा लागतो. ( गोळ्या मारल्या असे कागदोपत्री दाखवून त्याचा गैरवापर होऊ नये म्हणून असे आहे). अर्थात प्रत्यक्ष युद्धभूमी किंवा सीमेवर "पाहिजे तेवढ्या" (on as required basis) गोळ्या हिशेब न देता वापरता येतात. या गोळ्यांचा काळा बाजार होऊ नये म्हणून परवाना धारक माणसाना non service bore म्हणजे लष्करात वापरल्या न जाणार्या गोळ्या असणार्या बंदुकान्चेच पावणे दिले जातात.

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Apr 2015 - 7:05 pm | कैलासवासी सोन्याबापु

अहो काहीतरीच काय डॉक्टर साब!! आमच्या ट्रेनिंग चे फोटोज नाहीत कारण मोबाइल्स अन कॅमेरा स्ट्रिक्टली बॅन आमच्या एक बॅच अगोदर तिकडे काही लोक पकडले होते इंटेलिजेंस ने त्या लोकांनी आम्हाला अतिशय जास्त स्ट्रिक्ट केले होते, तुम्ही तुमच्या ट्रेनिंग चे फोटोज देऊ शकलात तर द्या की , उगाच काही काढू वगैरे नाका फोटोज असू देत

टिप :- काही काही फोटो आम्ही सेलफोन वरुन फोटो काढले होते स्नीक करून पण ते पोस्ट नाही करू शकत कारण सद्ध्या मी इन सर्विस आहे अन त्याने माझ्या buddies च्या सिक्यूरिटी कोम्प्रोमाईज़ व्हायची रिस्क वाढते

ताक :- तुम्ही साक्षात् डॉक् आहात हो! उगा नाराज झालात तर मला स्वप्नात ही एमआय रूम दिसायची :P

सुबोध खरे's picture

22 Apr 2015 - 7:34 pm | सुबोध खरे

बापूसाहेब
आम्हाला राजरोसपणे कामेरा न्यायला परवानगी होती. कदाचित आम्ही तेंव्हा अधिकारी झालेलोच (कॅप्टन) होतो म्हणून असेल त्यामुळे त्यावर प्रतिबंध नव्हता. परंतु आपल्या ताजमहालाला आमची वीट लावणे कितपत योग्य आहे हा मूळ प्रश्न आहे?
परंतु आपली परवानगी असेल तर दोन तीन फोटो टाकतो आहे.
हे फोटो १९८९ सालचे आहेत आणि ते फोटोचे फोटो काढून येथे टाकले आहेत त्यामुळे त्याचा दर्जा तेवढा चांगला नाही. .

.
.
या फोटोत हरजींदर सिंग च्या गॉगलची एक काच कुठेतरी पडून गेली होती तेंव्हा त्याला तसेच दहशतवादी म्हणून उभे राहायला सांगितले. तेंव्हा पंजाबमधील दहशत वाद जोरात होता. तो सुद्धा खिलाडूपणे तसाच उभा राहिला. दुसरा संजय आझाद हा नौदलातच होता आणि माझा रूम पार्टनर होता.आमच्या हातात असलेल्या बंदुका म्हणजे ७.६२ मिमि एस एल आर ( सेल्फ लोडिंग रायफल) आहेत. यांचा पल्ला १ किमी पेक्षा जास्त आहे परंतु ६०० मीटर पर्यंत अत्यंत अचूक पणे मारा करता येतो.
.
हि शेवटच्या फोटो मध्ये ९ मि मि कार्बाईन मशीन गन आहे.
या फोटोसाठी दिलेल्या बंदुकांमध्ये अर्थातच गोळ्या नव्हत्याच.

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Apr 2015 - 7:56 pm | कैलासवासी सोन्याबापु

अप्रतिम!!! कसला ताजमहल अन कसले काय! लावा विटा वाटेल तश्या!! सगळे फोटो विलक्षण नॉस्टॅल्गिक करून गेले सर! ती कमान पाहुन मला पहिल्या दिवशी क्वार्टर सेंट्री गार्ड रूम ला झोपलो होतो ते आठवले, शिवाय इतर फोटो पाहून ही अकादमी आठवली ! विशेषतः तुमच्या फोटोत जे मागे रान आहे एक्सक्टली तसलेच होते आमच्या ऑब्स्टकल कोर्स चे रान, मजा आली!! एसऐलआर उत्तम हत्यार होते, आम्हाला ही शिकवले होते

अवांतर :- आजकाल उझी सबमशीन गन सारखी पुण्याच्या एडीई ने बहुतेक एक नवी कार्बाइन काढली आहे तिला एमएसएमसी (मेडियम सब मशीनगन कार्बाइन) असे काहीसे नाव आहे त्याच्यावर अगदी एनव्हीडी माउंट करायला रेल्स वगैरे दिल्यात अन हलकी आहे उझी पेक्षा मस्त हत्यार सद्ध्या बहुतेक फील्ड क्लेअरेंस टेस्ट फेज ला असावी

सुबोध खरे's picture

22 Apr 2015 - 8:22 pm | सुबोध खरे
कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Apr 2015 - 8:34 pm | कैलासवासी सोन्याबापु

हा !!!!! हीच!!!

होबासराव's picture

23 Apr 2015 - 1:51 am | होबासराव

जी शेवट्च्या फोटोत आहे ह्यालाच स्टेन गन सुद्धा म्ह्णतात ना ?

सुबोध खरे's picture

23 Apr 2015 - 12:30 pm | सुबोध खरे

यस सर

जयंत कुलकर्णी's picture

25 Apr 2015 - 7:52 pm | जयंत कुलकर्णी

OTS Madras ?
मग पी हिल आठवत असेलच.... :-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Apr 2015 - 1:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

सोन्याबापूंना त्यांच्या सेवाशर्तींमुळे त्यांचे फोटो देणे शक्य नाही त्यामुळेच केवळ त्यांच्या ताजमहालाला आमच्या दोन विटा लावत आहे...


ब्राऊनिंग ९ मिमी पिस्तल

.


स्टेयर AUG ऑटोमॅटिक असॉल्ट रायफल

रुस्तम's picture

23 Apr 2015 - 2:37 pm | रुस्तम

बाबाव तुम्ही बी मिलिटरी वाल :O :O :O

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Apr 2015 - 2:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

दुसर्‍या फोटोमधल्या रायफलला बुलपप प्रकारची रायफल म्हणतात. ट्रिगरच्या मागच्या बाजुला बुलेट कार्ट्रिड्ज बसवायची सोय असते. ह्या विशिष्ट संरचनेमुळे रायफल बॅरलची लांबी कमी ठेउनही रायफलची इफेक्टीव रेंज वाढवता येते. शिवाय सी.क्यु.बी. साठी सुद्धा वापरता येते.

अर्धवटराव's picture

23 Apr 2015 - 10:34 pm | अर्धवटराव

तुमची हि पोज बघुनच शत्रु पळुन जाईल... फायर करायची गरजच पडणार नाहि.
कसलं दणकट प्रकरण दिसतय च्यायला.

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Apr 2015 - 10:56 pm | कैलासवासी सोन्याबापु

हिला क्राउच पोजीशन म्हणतात अमेरिकन मरीन्स ते बिन लादेन सगळ्यांची आवडती पोजीशन?

तुमची हि पोज बघुनच शत्रु पळुन जाईल... फायर करायची गरजच पडणार नाहि.
कसलं दणकट प्रकरण दिसतय च्यायला.

+१

जेपी's picture

22 Apr 2015 - 6:46 pm | जेपी

_/\_/\_

अत्रुप्त आत्मा's picture

22 Apr 2015 - 6:51 pm | अत्रुप्त आत्मा

साष्टांग नमन!

नाखु's picture

23 Apr 2015 - 11:34 am | नाखु

साक्षात जेपी शी सुद्धा सहमत.
सीमेवर जवान आहेत म्हणून घरात्-शहरात्-देशात निर्धास्त फिरू शकणारा
पांढरपेशा नाखु

अन्या दातार's picture

23 Apr 2015 - 3:41 pm | अन्या दातार

खरंच अप्रतिम लिहिलंय. अक्षरशः डोळ्यासमोर सगळं घडतय असं वाटत होते.

मोहनराव's picture

22 Apr 2015 - 8:35 pm | मोहनराव

यु आर ग्रेट! शब्दच नाहीत कौतुक करायला! लिहीत रहा!

मयुरा गुप्ते's picture

23 Apr 2015 - 12:42 am | मयुरा गुप्ते

सैन्याविषयी अतिशय अभिमान वाटतोच, पण तुम्ही केलेल्या वर्णनाने तर शब्दच नाहीत असं झालयं.

फिजिकल आणि सायकोलोजिकल टेस्ट इन्डीड. जिथे मानसिक थकवा येतो, खच्चीकरण होते तिथे बहुतेक शारिरीक साथही मनासारखी मिळत नाही. वाचताना डोळ्यातलं पाणी संपतच नव्हतं इतकं चित्रदर्शी आणि तंतोतंत वर्णन केलेलं आहे.

पुढेही लिहित रहा.
शुभेच्छा!

-मयुरा.

सांगलीचा भडंग's picture

23 Apr 2015 - 1:33 am | सांगलीचा भडंग

अफलातून लेख _/\_. इतकी जवळून ओळख तुमच्या क्षेत्राची ओळख करून दिल्याबद्दल आभार . याच्या पुढे कधी मोटिवेशन ची गरज भासली तर हा लेख परत वाचणार . तसेच टीम वर्क कसे असावे याचा एक उत्तम आदर्श म्हणून पण . मान गये बापूसाहेब उस्ताद . भारतीय आर्म्ड फोर्सेस मधील सगळ्या लोकांनापण मानाचा मुजरा

बोका-ए-आझम's picture

23 Apr 2015 - 2:10 am | बोका-ए-आझम

मस्तच बापूसाहेब! नौदल आणि हवाईदल यांच्या ट्रेनिंगबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता आहे.जर मिपावर कोणी असले तर प्लीज लिहा किंवा बापूसाहेब, तुम्हीच लिहा.

श्रीरंग_जोशी's picture

23 Apr 2015 - 2:27 am | श्रीरंग_जोशी

नौदल - डॉ. सुबोध खरे
हवाईदल - शशिकांत ओक

या विषयावर ओकसाहेबांनी लिहिलेल्या दोन लेखांचे दुवे

आनन्दिता's picture

23 Apr 2015 - 3:46 am | आनन्दिता

सकाळ पासुन २५-३० वेळा तरी लेख वाचला. प्रत्येकवेळी तितकाच रोमांचक वाटला. हॅट्स ऑफ !!!

लेख वाचतांना डोळ्यात पाणी उभं राहिलं..१ नंबर आहे हा सुध्दा लेख..पहिल्या लेखापासून तुमची शैली फारच सुंदर ठेवली आहेत तुम्ही सोन्याबापू. तुमच्या अकादमीबद्दल काहीही माहित नसतांना सुध्दा सगळे प्रसंग अगदी समोर घडत आहेत असा अनुभव येतो प्रत्येक लेख वाचतांना.सिरीयसली हॅट्स ऑफ टू यूअर करेज अ‍ॅण्ड डेडीकेशन :)

पदम's picture

23 Apr 2015 - 12:17 pm | पदम

ग्रेट. निशब्द केलत तुम्ही आम्हाला.

सुबोध खरे's picture

23 Apr 2015 - 12:28 pm | सुबोध खरे

सगळे प्रसंग अगदी समोर घडत आहेत असा अनुभव येतो प्रत्येक लेख वाचतांना
+१००
जुन्या दिवसांच्या पुनः प्रत्ययच आनंद येतो. आपली लिहिण्याची शैली उत्कृष्ट आहे लिहिते राहा.

अप्रतिम झालाय हा भाग.. खरच वाचुन डोळे पाणावले. हॅट्स ऑफ टु यु ऑल. :)

अत्यंत जीवंत लेख माला ,अंगावर काटा आला वाचुन सगळ डोळ्यासमोर घड़ताय असच वाटत् राहत सांगेची क्लिनिक मधली किंकाली ,दहिहंडी 'स्पर्धा असताना देखील इतर मेम्बर्ससाठी तूटनारा जिव 'न खुरानाला पाठीवर घेवून ठीकान्यावर पोहचनारे तुम्ही सगळ्यांना सलाम आमचा !फार कनेक्ट झालो या लेखमालेशी ,संपवू नका राव इतक्यात!

प्रभो's picture

23 Apr 2015 - 2:55 pm | प्रभो

मस्त लिखाण! लिहित रहा! :)

डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा आला... आणि हा प्रतिसाद देताना सुद्धा आलेला काटा अजुन तसाच आहे...
एक कडक सॅल्युट तुम्हाला आणि तुमच्या सारख्या अनेक वीरांना !
हा लेख वाचताना डोळ्यासमोर अनेकदा प्रहार चित्रपट आला... त्यामुळे त्यातला एक सीन इथे देत आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :What India needs to learn from #YemenEvacuation { Operation Rahaat }

जे.पी.मॉर्गन's picture

23 Apr 2015 - 7:01 pm | जे.पी.मॉर्गन

आज अकादमी भाग 1: एंट्री वाचायला घेतला आणि गेल्या दीड एक तासात कामाला हात लावूच शकलो नाहिये. एका पाठोपाठ एक भाग वाचताना सगळं चित्र डोळ्यांसमोर उभं राहिलंच पण मनातल्या मनात अन्ना, सांगे, समीर, मोसाय, शर्मा उस्ताद... अगदी श्री व सौ विक्रम सिंग सुद्धा लख्ख दिसत होते!

तुमच्या ह्या रगड्याविषयी बोलण्याची योग्यता नाहीच... पण तुमच्या लेखणीतही जादू आहे बापू! तुमचं हे लेखन कुठेही नुसतं अनुभवकथन न राहता अतिशय "वाचनीय" साहित्य झालंय. तुम्ही लिवा मालक... आम्ही वाचतो आहोत.

जे.पी.

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Apr 2015 - 7:57 pm | कैलासवासी सोन्याबापु

आभारी आहे जे पी मॉर्गन साहेब,

अनुभव लेखनात मी एकच नियम पाळला , आठवणी जश्या स्त्रवत जातील तश्या तश्या टंकत जाणे बास!! त्या सुद्धा शिस्तीत क्रमबद्ध होत्या डोक्यात, झरझरत टाइप करत गेलो (प्रसंगी प्रत्येक भागात शुद्धलेखनाची ऐशितैशी करत) माझ्या ह्या राजधानी गती ने पळणाऱ्या आठवणीना आपण सगळ्या लोकांनी प्रेम दिलेत , मस्त वाटले!

अद्द्या's picture

23 Apr 2015 - 9:01 pm | अद्द्या

बापूसाहेब . कमीत कमी २० एकदा तरी हा भाग वाचलाय प्रकाशित झाल्यापासून . आणि प्रत्येकवेळी चेहऱ्यावर पाणी मारून येतोय . . डोळ्यात पाणी आलेलं दाखवायला पण लाज वाटते आम्हाला . तितकीही हिम्मत नाही आमच्यात . .

खरंच . खूप अभिमान वाटतोय . .
आपल्याला . आणि देशासाठी सीमेवर थांबणाऱ्या प्रत्येक जवानास सलाम

अर्धवटराव's picture

23 Apr 2015 - 10:35 pm | अर्धवटराव

इतकं सगळं खडतर प्रशिक्षण घेता तुम्ही लोक म्हणुन आम्हि मिपा मिपा खेळु शकतो आरामात.
जय हो.

जुइ's picture

24 Apr 2015 - 12:01 am | जुइ

खुप जबरदस्त झाला आहे हा भाग!! डोळ्यांत पाणी आले. संपूर्ण लेख मालिकाच खुप छान झाली आहे. लिहित रहा!!

नगरीनिरंजन's picture

24 Apr 2015 - 6:34 am | नगरीनिरंजन

हा भाग सर्वोत्तम झाला आहे. आवडला!

काळा पहाड's picture

24 Apr 2015 - 12:47 pm | काळा पहाड

१. बापूसाहेब, एक प्रश्न. तुम्ही जो वॉल चा ऑब्स्टॅकल पार केलात तो तसा पार करणं अपेक्षित होतं का? माझ्या मते नसावं. एखाद्या सैनिकाला तो एकटा असताना सुद्धा अशा ऑब्स्टॅकल ला पार करण्याची सवय असावी हा त्याचा उद्देश असावा. तेव्हा असं करताना तुम्ही त्याच्या मूळ उद्देशाला बायपास केलं असं नाही का वाटत?
२. बाकीच्या सैनिकांशी तुलना करता, सर्व साधारण भारतीय सैनिक कुठे येतात? म्हणजे अमेरिका, चीन, पाकिस्तान वगैरे बाबतीत. कारण मी मागे एक व्हिडीयो पाहिला होता त्यात भारतीय सैनिक चायनीज सैनिकांच्या तुलनेत कमी चपळ वगैरे असलेले पाहिले होते.
https://www.youtube.com/watch?v=ZnWvTGX-eps
साधारण ३:२२ पासून पुढे पहा. अमेरिकन आणि पाकिस्तानी सैनिकांपेक्षा भारतीय सैनिक जास्त कठोर सराव करत असावेत असं मला वाटतं. हे कितपत खरं असावं?