कोण हा ब्लडी पिडली पायलट ऑफिसर? भाग - २

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
27 Jun 2014 - 5:16 pm

भाग 2

‘...रन, सर्च फॉर शेल्टर यू फूल! व्हेयरीज युवर ट्रेंच रन?...
... एयरमन चेक पोस्ट पार करून शटरवर फुली मारली तेवढ्यात मागून शिटी वाजली. दोन जण धावले मी पटकन एका आडोशाला गेलो. ‘किसने लगाया ये क्रॉस? तुम क्या कर रहे थे? ये गया ना बॉम्ब के धमाकेसे! ...’ म्हणताना ऐकत होतो.
... कडकडून थंडी वाजल्याप्रमाणे मला कंप सुटला होता. ‘आता काय एक्शन घेतली जाणार याची कटू सुनावणी ऐकायला मला भिती वाटायला लागली!’
... पंधरा दिवसापुर्वी पहिल्या भेटीतील पुसटशी ओळख झालेला एओसी राक्षसाप्रमाणे वाटत होता.’

तेवढ्यात ‘यू, व्हाट इज युवर नेम? असा ओरडून पुकारा झाला म्हणून मी तिकडे पहात होतो तो दंडाला अंपायर असल्याचा बॅज दिसला म्हणून मी त्याला लपत रिपोर्ट करायला गेलो.
‘तू एकटाच बाकीचे कुठे आहेत? त्याच्या आवाजाचा दणका असा होता की मी ततपप करत मला माहीत नाहीत पण माझ्या बरोबरचे इथे तीन आहेत’ असे चाचपडत म्हणतोय तोवर एयर रेडचा सायरन वाजला. तो अंपायर ऑफिसर मला म्हणाला, ‘रन सर्च फॉर शेल्टर यू फूल! व्हेयरीज युवर ट्रेंच रन?...’
‘बट सर’... मी म्हणायच्या आत तो म्हणाला, ‘डोंट वरी मी अंपायर आहे. कोणी काय काय चुका करतोय ते पहायला आलोय. मला ट्रेंचमधे लपायला जायची गरज नाही’!...
‘सर मी तर एनिमी आहे मी कसा अन् कुठे जाऊ?’ म्हणत कुरकुरलो. ‘
‘पहली बार कर रह है क्या? म्हणून फाजील जोकची सूरत करून म्हणाला, ‘अब तक कहां थे तुम लोग? हमें तो लगा की तुम भाग गए हो! अच्छा अब शुरू करो अपना काम, मैं तुम्हारे पर नजर रख कहा हूं... ‘
‘यस सर, म्हणेपर्यंत ऑल क्लीयरचा सायरन झाला. आमच्या टीममधील एकानी हातानी बोलावून म्हटले, ‘सर आपको उसके पास नही जाना चाहिए... आपके अगेन्स्ट रिपोर्ट करेगा तो पंगा खडा होगा...!’
कुठून या चंदीगडला आलो व आल्या आल्या आता माझ्याविरुद्ध रिपोर्ट वगैरे ऐकून मला भिती वाटायला लागली. ‘बुरी तरहसे फँसा तू रे’ असा मी मला म्हणत होतो. होऊ दे काय व्हायचे ते असा मी मला धीर दिला व एटीसीच्या टॉवरकडे नजर टाकली. तेंव्हा एक जण चहाची किटली घेऊन जिना चढताना दिसला. मी टीममधल्या एकाला ‘क्या तुम ऐसा किटली लेकर जा सरकते हो? म्हणून विचारले. ‘सर मैं? ना मैं तो ... करून तो कचरत नाही म्हणायला लागला. ऐन वेळी आपल्या साथीदारांनी अशी कच खाल्यावर मला ते काम करायला जावे असे वाटू लागले. मी युनिफॉर्मचा शर्ट काढला व त्या एयरमनला म्हणालो. ‘तुम उतारो अपना शर्ट मुझे पहनने को दो...! ‘सर, ये कैसे होगा यहां खुले में?’
‘चल निकाल साले’ मी शर्ट काढून बनियानमधे अन् हा चाचरत नाही म्हणतोय असे पाहून शिवी माझ्या तोंडात अलगद आली...
किटली एका हातात व चहाचे काचेचे कप सावरत एक आकृती टॉवरवर पोचली खिशातून खडू काढून मोठी फुली मारून परतली. मला असे करताना पाहून, ‘सर मैं चला’ म्हणून आमच्यातील एकाने ती किटली उठवून ऑप्स हेडक्वार्टरकडे मोर्चा वळवला. उरलेल्याला मी सामनेवाल्या हेलिकॉप्टरला क्रॉस करायला पिटाळला. ते परतले ‘थम्प्स अप करत!’ आम्ही पुढे सरकलो विमाने जवळ जवळ दिसायला लागली. कुठे हँगरची भिंत तर कधी दुरुस्तीच्या कामासाठी ठेवलेल्या विटांच्या भिंताचा अडोसा करत सरकू लागलो. मिग विमाने टप्प्यात आली. आम्ही फुली केली तोवर शिट्यांचा पुकार झाला आमच्यातील एक पकडला गेला. त्याला धरून नेताना पाहिले. पकडला तर जाणार तेंव्हा काही अलग पंगा नको असे मनात म्हणत आता मी परत माझ्या ड्रेसात आलो. एक सिव्हिलियन सायकल वरून जाताना दिसला मी त्याला ‘कुठ जातोयस ड्यूटी सोडून?’ म्हणालो, तर तो, ‘सर, मेरा काम हो गया, मैं आपके झंझट में नही हूं’ म्हणून मला टरकावले व सटकला. मी आणखी अंधार व्हायची वाट पहात एका भिंताच्या आडोश्याला बसलो चांगला तास भर उलटला असावा. हातातील घड्याळ, अंगठी, पर्स, आयकार्ड न बाळगता मला या कामगिरीवर पाठवले होते...
रेड एलर्टचे सायरन वाजायचे कमी झाले. कदाचित या कामाला लागलेल्या विमानांच्या सॉर्टीज संपल्या असाव्यात. काही काळाने जरा आवाज वाढला. एका थ्रीटनर मधून रात्रीच्या जेवायसाठी पॅकेट्स वाटायला तो ट्रक जात होता थांबून काहींना वाटून पुढे सरकत होता. मी एकाला त्या एयरमन लोकांच्या घोळक्यात शिरून ट्रकमधे बसून थांबत थांबत प्रत्येक विमानापाशी जायला चान्स घे म्हणून पिटाळला. ‘जी सर’ म्हणून त्याने त्या गार्ड एयरमनमधे डिनर पॅकसाठी आपली वर्णी लावलेली मी पाहिली! पुढे त्याचे काय झाले मला माहित झाले नाही! इतरांचे काय झाले असावे? किती पकडले गेले? वगैरे माहिती करून घ्यायला साधन नव्हते. मी आता सिग्नल सेक्शनकडे मोर्चा वळवला, चहा द्यायच्या पँट्रीरूम मधे एक डांगरी लटकलेली पाहिली ती चढवून मी डी एस सी गार्ड, एयरमन चेक पोस्ट पार करून शटरवर फुली मारली तेवढ्यात मागून शिटी वाजली. दोन जण धावले मी पटकन एका आडोशाला गेलो. ‘किसने लगाया ये क्रॉस? तुम क्या कर रहे थे? ये गया ना बॉम्ब के धमाकेसे! ...’ म्हणताना ऐकत होतो. अंपायर तिथल्या गार्डची खरडपट्टी काढत असावा बहुधा...एका जोंग्यात मी लपलो तोवर तो चालू झाला व एके ठिकाणी थांबला मी मागून उतरून ऑफिसपाशी फुली लगावली... पाहतोत तो ते बॉसचे ऑफिस होते!
मला मागून ‘हॅंड्स अप’! अशी आरोळी मिळाली. ‘पहचान के लिए आगे बढ’ म्हणून पुकारा झाला. मी हात वर करून उभा. साईड कॅप जाड काळ्याबेल्टला पोटाशी खोचलेली...
‘शो युवर आय कार्ड... मी तरीही उभा!... ‘आय से शो युवर आय कार्ड आदरवाईज आय विल शूट बिलो नीज...!’
मी थरथरत होतो. काय करावे सुचेना मी फक्त म्हणालो, ‘एनिमी फोर्स कमांडर...’ मला लगेच पकडले गेले. एका रूममधे बसवण्यात आले. तिथे माझे साथी आधीच पोहोचले होते! तिकडे एका मागून एक गाड्या थांबल्याचे आवाज येत होते. मग मला एडजुटंट समोर उभा केला गेला. तोवर अंपायरची टीम आली. पैकी एक दोघांनी मला ओळखले. मानेने थांब म्हणून ओळख दिली. ते एओसीच्या ऑफिसमधे गेलेले पाहिले. आता मला पाणी व थंड गार झालेला चहा दिला गेला. तोवर मला आत बोलावलेय म्हणून पुकारा झाला. कडकडून थंडी वाजल्याप्रमाणे मला कंप सुटला होता. ‘आता काय एक्शन घेतली जाणार याची कटू सुनावणी ऐकायला मला भिती वाटायला लागली!’ ... पंधरा दिवसापुर्वी पहिल्या भेटीतील पुसटशी ओळख झालेला एओसी राक्षसाप्रमाणे वाटत होता. सॅल्यूटमधून अवसान गळून मी कसाबसा उभा ...!
‘हू’ज धिस ब्लडी पिडली पायलट ऑफिसर?’ सिंह गुरगुरल्याचा भास व्हावा तशा आवाजात विचारणा झाली...
माझ्याकडे बघत, मी कोण हे सांगायची नामुश्कीची वेळ आपल्यावर यावी असे वाटून ‘सर, ही इज माय बॉय’ म्हणत माझ्या मल्याळी अकौंट्सच्या बॉसने तोंड वेंगाडले...
आय सी... टेबलावर पडलेला अंपायरचा रिपोर्ट वाचत माझ्याकडे न पहाच ते गुरगुरले.
‘14 टारगेट्सवर मार्किंग? आय कांट अंडरस्टँड! हाऊ डिड यू मॅनेज? माझ्याकडे नजर लाऊन त्यांनी अंपायराला विचारले, ‘सो व्हाट वी डू? मला असा फेल्यूअर रिपोर्ट कमांडला दिलेला आवडणार नाही...!’
‘ओनली वे वी डू पीएडी जीडी अगेन‘! अंपायरने बिरबली काव्यात अकबराला सुचवावे अशा पवित्र्यात समजावले. ‘ओके! इफ यू सो से...! कॉल ऑफ फॉर टुडे, एन्ड ऑर्डर टुमारो फॉर रिपीट एक्सरसाईज इमिडिएटली’ त्यांनी एडजुटंटकडे पहात म्हटले, ‘बट कीप धिस फेलो अवे...! ओके?’
सगळे पांगले. मी उभाचा उभा! ‘या कार्ट्यामुळे ही नाचक्की झाली’ असे वाटून, पण मी केलेले काम न नाकारून मानेचा झटका देत भुवया उंचावत ते म्हणाले, ‘You didn’t spare even my office? गुड...! टेक रेस्ट...!!’
दुसऱ्या दिवशी स्टेशनभर हंगामा झाला की पुन्हा पीएडी-जीडी तालमीची कटकट करायचा हुकूम आहे. सर्वांनी यथेच्च शिव्या शापांचे हार माझ्या गळ्यात टाकले असणार हे समजायला नाडी भविष्याची गरज नाही....!
……

ता. क. - विमाननगरच्या जॉगर्स पार्कवर माझी भेट निवृत्त एयर कमोडर अनंत महाबळेश्वरकरांशी झाली. बोलता बोलता मी त्यांना विचारले, ‘सर तुम्ही 1972ला चंदीगडला होतात ना? मग त्यावेळी AOC कोण होते ते सांगता येईल का? हो, का रे? म्हणून विचारणा करता, मी त्याना वरील कथानक थोडक्यात सांगितले. जरा डोके खाजवून विचार करत ते म्हणाले, ‘कोssण? कोण असावा बरं? चुटकीच्या आवाजासरशी म्हणाले, ‘हां, बापरे ते? ते तर धत्तीगारा! अरे तेच होते. तुझी बोबडी वळली असेत तर नवल नाही! भले भले त्यांना टरकून असत’!...

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

एसमाळी's picture

27 Jun 2014 - 5:47 pm | एसमाळी

हा हा .
मस्त अनुभव.
पिडली चा अर्थ काय?

अनुप ढेरे's picture

27 Jun 2014 - 6:03 pm | अनुप ढेरे

मस्तं!

शशिकांत ओक's picture

27 Jun 2014 - 10:27 pm | शशिकांत ओक

थोडक्यात फडतुस...

एस's picture

27 Jun 2014 - 11:01 pm | एस

एकदम आवडला हाही भाग. वाचायला मजा आली. :)

अवांतरः ते <strong> हा HTML टॅग 'भाग 2' पर्यंत संपवायला हवा होता असे वाटले.

शशिकांत ओक's picture

28 Jun 2014 - 12:28 am | शशिकांत ओक

काही कारणांनी वरील मेनू नीट दिसत नव्हता. योग्य सूचना लक्षात आणून दिलीत या बद्दल धन्यवाद...

खटपट्या's picture

27 Jun 2014 - 11:20 pm | खटपट्या

मस्त साहेब, तुम्ही तर तुमचे काम चोख केले होतेत. तुम्हाला तर शाबासकी मिळायला पाहिजे होती. ढिसाळ सुरक्षा व्यवस्था तुम्ही उघडी पाडलीत.

सुबोध खरे's picture

27 Jun 2014 - 11:42 pm | सुबोध खरे

मजेदार अनुभव
अजून येऊ द्या

पैसा's picture

29 Jun 2014 - 9:22 pm | पैसा

मजेशीर अनुभव!

यशोधरा's picture

30 Jun 2014 - 8:09 am | यशोधरा

मजा आली वाचायला!